Goa 2012

भटकंती :अविस्मरणीय गोवा दर्शन सफर.[२०१२]


गेट सेट गो गो गो गोवा….झिंग रे एकदम…२ ते ३ वर्षे झाले रोज प्लान करत होतो कि गोवा जायचे गोवा जायचे..पण कधी आत्ता काय मजा नाही रे गोव्यात सिझन नाही तर कधी अरे सिझनला जास्त पैसे लागतात राहायला म्हणून नाही..तर कधी कोण आजारी तर कधी कोणाचे काम ..शेवटी आले आले नाहीतर राहिले हा फॉर्म्युला कामाला आला आणि मुहूर्त लागला ट्रीपला…एकंदरीत आम्ही आमच्या मावळ्यांसहित गोमंतकीय भूमीत पदार्पण केले…तसे तिसऱ्यांदा जात होतो पण यावेळचा अनुभव एकदम मस्त होता..मजा दर वेळी वेगळी..कधीही जावा गोवा बोअर होत नाही आणि जबरी आणि जिगरी दोस्त बरोबर असले तर नाहीच नाही…

गोवा भावा..

कसे जायचे गोव्याला हा प्रश्न होता पुण्यातून स्वंतंत चार चाकी घायची का रेल्वे का बस….
काय पण म्हणा राव..गोवा फिरायचा तो तिथे बाईकवर टांग मारून सुसाट वेगाने घाट ओलांडत…समुद्राच्या बाजूने गाड्या हाकत…..एका बीच वरून दुसऱ्या बीच वर पळवत ….कुठेपण थांबा ..कटिंग चहा मारत फिरायच…आम्ही पुण्यातून स्लीपर खाजगी बस मधून गेलो ते थेट उतरलो गोव्याच्या राजधानीत…पणजीत एका मित्राच्या ओळखीने हॉटेलमध्ये बुकिंग केलेले समान टाकले…..गाड्या भाड्याने घेतल्या आणि मग फिरायला गाडी तयार…२०० ते ५०० रु पर्यत पर दिवस अशा गाड्या मिळतात..अक्टीव्हा वगेरे…बुलेट वगेरे चा रेट थोडा जास्त आहे पण फोटो सेशन्स साठी ग्रुपमध्ये एक तरी पाहिजेच..तसे मापसा गावामध्ये पण आपण उतरून गाड्या भाड्याने घेऊ शकतो…

गोवा फिरताना दोन भागात फिरतात एक नॉर्थ गोवा आणि साउथ गोवा… नॉर्थ गोवा मध्ये कलंगुट बागा असे बीच येतात..येथे देशी विदिशी पर्यटकांची तुडुंब गर्दी असते..आणि पाण्यातील गेम्स पण असतात आणि साउथ गोवाची बीच एकदम शांत निवांत ..थोड्या रिमोट भागात पण प्रसन्न आहेत…यात वार्का ,अगोंडा,पोलोलीम बीच यांचा समावेश होतो.

आम्ही पणजी वरून निघून डायरेक्ट कलंगुट बीच गाठला…२० मिनटात…बीचवर विदेशी पर्यटक पाहून पोरांना काय पाहू आणि काय नको असे झालते एकाने केमेरा काढून पहिला पक्षी टिपतो न टिपतो तोच तिथल्या पोलिसाने त्याला टिपला..शेवटी ओवाळणी देऊन त्याची सुटका करावी लागली… 🙂 मस्त लाटात मस्ती करत अंघोळ केली..समुद्र किनाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये घुसून मत्स्याहार केला मग जरा गोवा आल्या सारखे वाटले…कलंगुट एकदम गजबजलेला बीच आहे पण तिथे बनाना राईड ,पेरासिलिंग सारखे गेम्स खेळायची मजा फार भारी आहे…ते करून आम्ही फिरत फिरत कलंगुट बीचच्या एका टोकाला आलो आणि बागा बीच ला जायचे म्हणून परत वळणार तेन्ह्वा कळले कि आपण उभे अहो ते बागा बीचच आहे इतके जवळ जवळ आहेत हे दोन बीच…बागा बीच हे नाईट लाईफ डिस्को बार साठी प्रसिद्ध आहे..पण जरा जपून इथे फसवण्याची शक्यता दाट..कलंगुट बीच च्या बाहेर स्त्री वर्गासाठी खरेदीची फार दुकाने आहेत..बार्गेनिंग वर्क्स एव्हरीव्हेअर इन् गोवा!! फुल्ल रेट लावलेले असतात पण आपल्यावर असते कितीची बोली लावतोय ते..मित्राला एक स्टोन चा हार २५०-३०० ला सांगितला होता मी गमतीत त्याला बोललो कि ५० ला दे तर साला तो तयार पण झाला आम्ही शॉक..मग परत सगळीकडे हाच फोर्मुला..फुल्ल बार्गेनिंग…

गोव्यात आलाय आणि पणजीत कामत हॉटेलमध्ये जेवला नाहीत तर तुम्ही गोव्यात काहीच खाल्ले नाही असे ऐकून होतो मग गेलो तिकडे नाश्ता चांगला आहे पण थाळी जेवण ओके ओके ..तसे या हॉटेलच्या आजूबाजूला बरेच चांगले हॉटेल्स आहे शाहकारीसाठी कामत ,भोसले,शिव सागर आणि मांसाहारी साठी शेर ए पंजाब आणि सी फूड साठी पण एक हॉटेल आहे नाव आठवत नाही सध्या पण लास्ट ट्रीप ला तिथे शिपले खालेले इतकेच आठवतेय..याचा हॉटेल्ससमोर जोश फिल्म मधील चर्च आहे तिथे पायरीवर बसून ग्रुप फोटो मस्ट आहे…

चर्चे

…….दिवसभर भरमसाट भ्रमंतीनंतर रात्री पत्ते कुटत शांत झोप कधी आली कळलेच नाही…

दुसऱ्या दिवशी सकाळी चेक आउट करून पेट्रोल टाकून गाड्या तयार केल्या आणि तासात अगुडा किल्ला गाठला …फोटो सेशन ला बेस्ट जागा आहे इथे दिल चाहता हे चे काही शुटींग झालते असे नंतर कळले..इथे एक पोर्तुगीज कालीन दीपस्तंभ आहे जो पाण्यातील बोटींना दिशा देण्यास वापरला जायचा….नंतर मोर्चा निघाला तो डोना पौउलाला रवाना झालो…इथल्या चौकात सिंघामचे शुटींग झालेले…खांब उपसलेला शॉट…तिथे मित्रांनी फोटो सेशन केले काहींनी कपडे टी-शर्ट खरेदी पण केली..थोडे फोटो मारून मग ठरवले कि बास आता नॉर्थ गोवा …

डोना पौला

…तसे अजून मंदिर आणि चर्च पण पाहू शकता ओल्ड गोव्यात पण आम्हाला त्यात काय इंटरेस्टि न्हवता त्यात……मग गाड्या बेभान हाय वे वरून सुटल्या…….फार भूक लागलेली रस्त्यात थांबून एकाला होटेल विचारले त्याने एक नाव सांगितलेले पण काही केल्या ते येईना..तेवढ्यात उतरला “मी कासा “ होटेल दिसले..बाहेरून एकदम महागडे वाटत होते पण रेट पुण्यातील होटेल इतकेच आणि टेस्ट काय विचारू नका इतकी भारी…किंग फिश चा स्टार्टर आम्ही तीन वेळा घेतला तरी जिभेवरून माश्याची चव रेंगाळत होती..आणि अजून भूक लागत होती..इतका भारी जेवण जेवण होते..तृप्त होऊन बाहेर पडलो ते परत इथेच जेवायचे या अटीवर..

मासा..किंग फिश..

गाड्या निघालाय वार्का बीच वर..सन सेटला १-२ तास राहिले असतानाच पोहचलो तिथे…

यावेळी गोव्यातील एक नवीन अनुभव म्हणजे प्रवसात कधी कुणाला रस्ता विचाराव लागत न्हवता..सगळ्यांकडे स्मार्ट फोन होते आणि गुगल मेंप चालू होते गुगल मेप इतके करेक्ट रस्ता दाखवत होते कि कधी कोणाला फार काही विचारवे लागले नाही मेप सेट करा आणि चला डेस्टिनेशन लोकेशनला…

वार्का बीच एकदम निवांत आहे…२००-३०० मीटर पर्यंत आत एकदम सपाट पाय टेकत होते मस्त लाटा येत होत्या तसा हा बीच अजून पूर्ण डेव्हलप झाला नाहीये पण हा पाण्यात आंघोळीसाठी बेस्ट बीच वाटला…वर्कात राहायची इतकी काही चांगली सोय मिळत न्हवती…पुढे अगोंडा बीच वर भारी सोय आहे माहित होते पण वेळ झालेला रात्री रस्ता माहित नाही तरीही पुढे जायचे होते…मग जय गुगल मेप…एका रस्ता गुगल काकांनी दाखवला शोर्ट रोड म्हणून..तो हाय वे वरून नाही तर..जंगलातून जाणारा होता हे नंतर समजले…पण गोव्यातील रस्ते आणि एकदम करेक्ट जी पी एस लोकेशन मुळे हा जंगलातील रस्ता काटून अगोंडा दाखल झालो.. बाईक चालवायला काय मजा आली म्हणून सांगू…मोकळा रस्ता आजूबाजूला जंगल….गार वारा…मधूनच एखादा पूल…सगळीकडे अंधार आणि फक्त आमच्या ५ गाड्या रस्त्यावरून एका मागोमाग एक चाललेल्या..किर्रर्र आवाज..थरारक अनुभव…

अगोंडा बीच

फायनली अगोंडा ला पोहचल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पोहचला…अगोन्ड्यात राहायला समुद्रकिनाऱ्यावर टेन्ट बांधलेले आहेत बांबूचे किंवा लाकडी ते कौलारू मस्त छोटी छोटी घरे आहेत भाड्याने…अगदी ए सी झोपड्या पण आहेत परदेशी पर्यटकांसाठी…समुद्र किनार्यावर मस्त पैकी शामियाना बांधलेला होता शांत इंग्रजी गाणे इंग्रजी पाहुणे टेबलावर पहुडलेले…शांत दिवे असे सगळे वातावरण…वाटले फार महाग असेल पण बार्गेनिंग इथेपण चालले तसे ५०० ते १००० रुपये पर्यंत एक टेन्ट हाउस रूम आहे इथे नॉर्थ गोव्यापेक्षा इथे रूमचे रेंट फारच कमी आहेत तुलनेत रूम फारच सुंदर आहेत….आम्ही कुबा होटेल मध्ये राहिलो..रात्री सेंटर टेबलवर आम्ही सर्व जण वेटर ने एका मोठ्या प्लेटमधून तीन मोठे मासे आणले त्यातला एक आम्ही सिलेक्ट केला तो त्याने मस्त फ्राय करून दिला..काहींनी गोड पाणी पिण्यास सुरवात केली..एकंदरीत राजेशाही जेवण एकदम…रात्री समुद्र किनार्यावर शांत बसण्याचा गोडवा कशातच नाही…

शामियाना

दुसऱ्या दिवशी पहाटे खरे अगोंडा बीच पाहायला मिळाले मस्त लाब किनारा एका बाजूला डोंगर मस्तीत उधळणाऱ्या लाटा आणि तुरळक गर्दी…फ्रेश मॉर्निंगवॉक करून समुद्र किनाऱ्यावर चहा मारला..समोर बीचचे सौंदर्य पाहून सर्व प्रेमात पडलो अगदी अगोन्द्याच्या..बिनधास्तपणे मनमोकळेपणाने ३-४ तास अंघोळ आणि उड्या मारल्या पाण्यात…नंतर निघालो डॉल्फिनच्या भेटीला…खरेतर डॉल्फीन सफर सकाळी ६-७ ला नाहीतर संध्याकाळी ४-६ ला करावी तेन्ह्वा डॉल्फिन दिसण्याची शक्यता जास्त असते..आम्ही थोडे दुपारीच निघलो..डॉल्फिन काही नाही दिसले पण नावाड्याने हनिमून बीच आणि बटरफ्लाय बीच ची स्मरणिय सफर घडवली.. नावेने जावे लागते या बीचला तिथे बाकी कोणीच न्हवते.आजूबाजूला जंगल आणि समोर समुद्र…किनाऱ्यावर सोफ्ट आणि हार्ड ड्रिंक्स तिथे मिळतात दगडावर बसून जेक्स स्पेरो स्टाईल बसून फार फोटो काढले..मी तर एकट्यानेच पाण्यात उडी मारली आणि समुद्रामधल्या दगडावर जाऊन अद्वितीय साहस केल्याचा आविर्भावात फोटो काढले…नतंर परत हॉटेलवर येऊन गाड्या घेतल्या आणि निघालो परत पणजीला…गोव्यात पेट्रोल महाराष्ट्र पेक्षा फारच स्वस्त आहे आणि बहुतेव वेळा गोव्यात गावोगावी जरी पेट्रोल पंप नसले तरी दुकानातून पेट्रोल मिळते त्यामुळे एक दोन ठिकाणी चौकशी करून थोडे पेट्रोल टाकले आणि हायवे गाठला…ते परत पणजी…

बटरफ्लाय बीच

तीन दिवस कसे गेले काही कळलेच नाही एकदम फ्रेश मूड..सगळे टेन्शन विसरून फाडू मस्ती केली परत जायचा मूड न्हवता पण बुकिंग झालेले…फुगलेल्या बेग्स,दमलेले पाय,उन्हाने करपलेले चेहरे ,तरीही आनंदी मन आणि शांत डोके स्वछंदी मूड घेऊन परत निघालो ते दर ६ महिन्याला गोवा ट्रीप करायचीच असे ठरवून…बघू परत कधी चान्स मिळतोय ते..पण सध्या मस्त वातावरण आहे गोव्यात तुम्ही पण प्लान करा आणि जाऊन याच गोव्याला…कार्निव्हल फेस्टिवल पण आलाय जवळ…मग विचार काय करताय लागा पँकिंगला…गोवा आपली आतुरतेने वाट पाहत आहे…

सनसेट आणि मी

पत्ते:

Hotel at Agonda:

  • CUBA Hotel Agonda, South Goa .No:9822183775 http://www.cubagoa.com
  • Sunset Hotel Agonda is also good one.
  • For Sea food Hotel in Goa highway : Hotel ‘Mi casa’
  • panaji margao high way,near siridao church,
  • taricode,tiswadi goa.no:9850478185

वरील महिती फक्त आपल्या माहितीसाठी दिली आहे जाहिरातीच्या उद्देशाने नाही.

बीच ला जायचे नाव पण काढणार नाहीस एवढा भारी आहे बीच…पल्निंगकरताना काहीही महिती लागली तर नक्की सांग..मी आहेच…  काही

मस्तच जा…आणि याच महिन्यात जा…फ्रेश वातावरण आहे..मस्त सिझन आहे गोव्याचा..जास्त उन नाही कि जास्त थंडी परफेक्ट फिरायचे वातावरण आहे…आणि ख्रिसमस पण येतोय…ख्रिसमसला गोवा वेगळाच दिसतो एकदम..परदेशी पाहुणे पण याच महिन्यात खास गोव्यात दाखल होतात..मग आपण का मागे राहायचे…

-MJ 🙂 [पुनर्प्रकाशित]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s