IP Detail info, x-All Tablets

इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी: पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख.


आ‍‍पल्या नवीन कल्पना ,नवनवीन बिझनेस आयडिया प्रोटेक्ट करण्यासाठी इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी नियमावली वापरली जाते.

इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी [IP] चे बरेच प्रकार पडतात जसे कि पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन ; या प्रत्येकाचे नियम व उपयोग वेगवेगळे आहेत.आपल्या गरजेनुसार आपण हे राईट वापरत असतो.

आपली कल्पना ,बिझनेसमध्ये वापरले जाणारे लोगो ,डिझाईन,प्रोडक्ट,प्रोसेस या गोष्टींचे कायद्याने रक्षण करण्यासाठी इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी नियमावली वापरली जाते.

याचा आपल्याला आपल्या व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत वरचढपणा मिळवण्यासाठी देखील याचा वापर होतो.

आपल्या व्यावसायिक स्कील दर्शवणे आणि आपलं व्यवसायाची व्हेल्यू वाढवणे यासाठी इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी महत्त्वाची भूमिका बजावतात.याचे रक्षण करणे ही आपली व्यायसायिक या नात्याने जबाबदारी आहे.

ट्रेडमार्क :

ट्रेडमार्क
ट्रेडमार्क

कंपनीचे नाव ,प्रोडक्टची टँग लाईन,कंपनीच्या प्रोडक्ट वा खास टेक्नोलॉजीचे नाव यांचा यात समावेश होतो.

आपल्या प्रोडक्ट्स ला इतरांच्या प्रोडक्ट पासून वेगळे करणारे त्याचे नाव,त्याचा लोगो,त्याचा शेप,रंग व त्यासाठी वापरला गेलेला विशिष्ट आवाज हे ट्रेडमार्क अंतर्गत कव्हर होतात.

आपण प्रथम आपण दिलेले नाव आधी दुसऱ्या कुठल्या कंपनीने दिले आहे का नाही याची इंटरनेटवर पडताळणी मग रीतसर फॉर्म भरावा.

या प्रोसेस मध्ये शासकीय कार्यालयात असलेल्या नोंदी नुसार असा लोगो व कंपनीचे नाव दुसऱ्या कोणाचे आधीच नोंद झाले आहे कि नाही ते पहिले जाते मगच आपणस ते नाव व लोगो वापरण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो.

आपण अनेक कंपनी आणि त्यांच्या प्रॉडक्ट च्या नवा नंतर उजव्या बाजूस वर TMअसे लिहिलेले पाहतो याचा अर्थ हे नवा TradeMark म्हणून रजिस्टर केले गेलेले आहे.

डिझाईन प्रोटेक्शन:

डिझाईन प्रोटेक्शन
डिझाईन प्रोटेक्शन

या नियमांतर्गत आपण केलेली नावीन्यपूर्ण डिझाईन आपण प्रोटेक्ट करू शकतो. नवीन प्रोडक्टचे डिझाईन,नवीन मशीनचे डिझाईन तसेच कंपनीचा लोगो या गोष्टी डिझाईन प्रोटेक्शन मध्ये मोडतात.

तुलनेने हे प्रोटेक्शन सरळ व स्पष्ट आहे कारण यात अचूकपणे सर्व डिझायनिंग परिमाणे देणे गरजेचे असते.

आपण एखाद्या मशीन मध्ये नवीं पार्ट डिझाईन केला असेल किंवा नवीन मोबाईल चे मॉडेल्स डिझाईन केले असेल तर आपण ते डिझाईन प्रोटेक्टेड करू शकतो.

कॉपीराईट :

कॉपीराइट
कॉपीराइट

कला क्षेत्रातील बाबी प्रोटेक्ट करण्यासाठी कॉपीराईट वापरतात. मिडिया,पब्लिकेशन,फिल्म,म्युझिक उद्योगात कॉपीराईट ला फार महत्व आहे.

आपण जर एखादी नावीन्यपूर्ण वेबसाईट तयार केली असेल किंवा रेडिओमध्ये जाहिरात करण्यासाठी  मस्त ओळी लिहल्या असतील किंवा एकदम द विंची कोड सारखे पुस्तक लिहीत असला किंवा मोनालिसा सारखे पेंटिंग तयार करत असाल किंवा नवीन सिनेमा तयार करत असाल तर आपण कॉपीराईट कायद्याचा नक्कीच विचार करावा.

संगणकीय क्षेत्रात ही कॉपीराईटने महत्वाची मोलाची भूमिका निभावली आहे ,प्रोग्रामर्स आपला नवीनतम सोर्स कोड किंवा अनोखी महिती असलेला डाटाबेस हा कॉपीराईट प्रोटेक्टेड करू शकतात.

एक महत्त्वाची नोंद: कॉम्प्युटर मधील प्रोग्राम हा कॉपीराईट कायद्या अंतर्गत येतो तर त्याच प्रोग्राम चा फ्लो चार्ट पेटंट अंतर्गत येतो.कारण पेटंट मध्ये प्रोसेस पेटंट केली जाते जेणे करून इतर कोणी त्या स्पेसिफिक प्रोसेसचा वापर करू शकत नाही आणि कॉपीराईट मध्ये इतर कोणीही प्रोग्राम ची जशी च्या तशी नक्कल करू शकत नाही असे प्रोटेक्शन दिलेले असते.

बिल गेट्स ने आपली ऑपरेटिंग सिस्टीम इतरांना इतर सिस्टीम मध्ये वापरण्यास देताना त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा कॉपीराईट अधिकार स्वतःकडेच ठेवला त्यामुळे त्यास ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रत्येक कॉपी मागे पैसे मिळत गेले.

असा कॉपीराईट कायद्याचा अभूतपूर्व उपयोग करताना आपणही जगातील सर्वात यशस्वी माणसाचा आदर्श नकीच घ्यावा.

कॉपीराईट कायद्यांतर्गत आपणस पुढील अधिकार मिळतात.

 • पब्लिकला आपले कॉपी प्रोटेक्टेड काम विकणे किंवा भाड्याने देणे.
 • कामाच्या अधारीत शो किंवा कार्यक्रम आयोजित करणे.
 • कामाबद्दल इतरांना महिती देणे.
 • स्वतःच्या वा व्यावसायिक कामासाठी याचा वापर करणे.
 • कामाचे प्रदर्शन किंवा विक्री करणे.

आपण बऱ्याच ठिकाणी (C) हे चिन्ह पाहते ते चिन्ह कॉपीराईट प्रोटेक्टेड हे दर्शविते.

आपल्या नकळत जर कोणी आपण कॉपीराईट केल्याला कामावरून टी व्ही प्रोग्राम करत असेल,किंवा आपल्या कॉपी प्रोटेक्टेड फोटोग्राफचा वापर व्यावसायिक प्रसिद्धीसाठी करत असेल किंवा कोणी आपला कॉपी प्रोटेक्टेड प्रोग्राम अधिकृत लायसन्स शिवाय वापरत असेल तर त्यांवर आपण कायदेशीररीत्या कारवाही करू शकतो.

पेटंट्स:

पेटंट्स
पेटंट्स

संशोधन संबंधित महिती प्रोटेक्ट करण्यासाठी पेटंट्स कायदा वापरतात.पेटंट मिळाल्यानंतर संशोधकास संशोधनाचे अधिकार २० वर्षापर्यंत वापरता येतात परंतु ते संशोधन पेटंट रुपाने पब्लिकला प्रदर्शित करण्यात येते.

एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा ग्रुप एकत्रितपणे देखील पेटंट फाईल करू शकतात.बऱ्याचदा कंपनीत संशोधनकार्य करणाऱ्या एखाद्याने पेटंट फाईल केल्यास त्याचा संशोधक म्हणून त्या संशोधकाचे नाव पेटंट वर राहते पण ते पेटंट व्यावसायिक दृष्ट्या वापरण्याचा अधिकार कंपनीच्या नावे राहतो.

यामध्ये एखादी नवीन प्रोसेस किंवा नावीन्यपूर्ण सुधारणा नवीन टेक्नोलॉजी चे संशोधन,एखादी जुनी त्रुटी सुधारण्यासाठी केलेली उपाययोजना  यांचा समावेश होतो.

पेटंट्स मध्ये प्रोसेसचा फ्लो चार्टब्लॉक डायग्राम यांना फार महत्त्वाचे स्थान आहे.

आपली कन्सेप्ट आकृतीचा वापर करून दर्शिविल्यास त्याचा पेटंट मिळवण्यासाठी फार उपयोग होतो.

याद्वारे आपण आपल्या नव्या प्रोडक्ट्स ची प्रोसेसिंग मेथड,किंवा नवीन मशीन कसे काम करेल याचा फ्लो किंवा आपला प्रोग्रामिंग सोफ्टवेअर चे स्ट्रक्चरल मॉडेल,मोबाईल चार्जिंग ची नवीन पद्धत अशा गोष्टी पेटंट करू शकतो.

आपणस आपले संशोधन पेटंट नी सुरक्षित असल्यास त्याचा व्यवसाय भरभराटीला फार फायदा होतो यात शंकाच नाही. पेटंट प्रोसेस ही बरीच खर्चिक आहे तसेच ती पूर्ण होण्यास जवळपास २ ते ३ वर्षेपर्यंत कालावधी लागतो म्हणून आपले पेटंट हे फक्त कागदोपत्रीच न् राहता त्याचा प्रत्यक्ष बिझनेसमध्ये कसा वापर करून त्यावर आधारित प्रॉडक्ट कसे काढावे यावर ही व्यवसायिकांचा फोकस राहिला पाहिजे.

अशा तऱ्हेने आपण पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख करून घेतली व यांचे कायदेशीर व्यावसायिक महत्त्व जाणले आहे इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी चा आपणस कसा फायदा करून घेता येईल हे आपण नक्कीच जाणले असेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.

इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी व त्यांचे नियम या बद्दल आपणस काही शंका असल्यास नक्की कळवावे.

संदर्भ ग्रंथ:

Enforcing Intellectual Property rights : Jame Lambert

The bright idea handbook : Michael Gardner

धन्यवाद!

–BOLMJ 🙂

6 thoughts on “इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी: पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख.”

 1. फारच मौल्यवान माहीती.
  कवितांचे काॅपी राईट करताना पुस्तक प्रकाशित केले नसल्यास एकाचवेळी अनेक कवितांचे काॅपी राईट करता येते काय?

  1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सानंद .
   कविता हि लिखित माध्यमातून प्रकाशित केली तर याचा कॉपीराईट साठी पुरावा म्हणून फायदा होतो.पण आपण अप्रकाशित कविताही कॉपीराईट करू शकतो.
   एकाच वेळी अनेक कविता ह्या कविता संग्रह अंतर्गत कॉपीराईट करता येवू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s