USB Fan

यु. एस. बी. वर चालणारा फँन तयार करणे.


आपल्या टेबलवर खास आपण तयार केलेली डेकोरेशन ची वास्तू असणे म्हणजे मजाच और.. त्यात ती झकास डोके वापरून टेकनिकल मेथडने तयार केलेली उपयुक्त वस्तू असेल तर जवाबच नाही.. 🙂

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या केबल, वापरत नसलेला छोटा फँन यांचा वापर करून आपण डेकोरेशन व हवा देणारा आपल्या लँपटोपच्या यु एस बी वर चालणारा ,कोठे ही घेवून फिरता येणारा रंगीत लाईट असणारा फँन कसा तयार करायचा ते या भागात पाहूया.

बेसिक सामुग्री : लहान फँन , यु एस बी केबल, कटर किंवा कात्री.

ऑप्शनल : बटन,एल ई डी बल्ब,सोल्ड्रिंग गण किंवा चिकट पट्टी,डेकोरेशन चे कागद.

fan

कॉम्प्युटर मधील फँन

आपल्याकडे अनेक डिव्हाईस हे यु एस बी ने जोडलेले असतात आणि ते खराब झाल्यावर त्याची यु एस बी केबल तशीच पडून असते ती केबल कट करून घ्या.

किंवा पूर्ण यु एस बी केबल असते त्याचे एक टोक आपल्या कॉम्प्युटर ला लावावे व दुसरे टोक थोडे अंतर ठेऊन कट करून घ्यावे.

आता आपल्या यु एस बी चे एक टोक कॉम्प्युटरला जोडले गेलेले आहे नंतर केबल  व दुसरे वायर उघड्या असणारे टोक आहे.

आपणस यु एस बी केबल च्या आत ४ वायर दिसतील. यामधील लाल वायर ही +५ व्होल्ट पॉवर सप्लाय करते तर काळी वायर ग्राउन्ड साठी वापरली जाते.

त्या दोन वायर आपण आपल्या प्रयोगाला वापरू. आपण हिरवी व पिवळी वायर वापरणार नाही.

[यु एस बी बद्दल सखोल महिती मिळवण्यासाठी येथे टिचकी मारा]

आता लाल व काळ्या वायर वरील प्लास्टिकचे आवरण थोडे काढून घ्या.

आता आपली यु एस बी केबल पुढील छायाचित्राप्रमाणे दिसेल.

usb cable

यु एस बी केबल

आता आपल्याकडे असलेला जुना फँन घ्यावा व त्याच्या दुसऱ्या टोकाच्या केबल मोकळ्या कराव्यात किंवा आपण जुन्या कॉम्प्युटरला जोडला गेलेला जुना फँन सुद्धा काढू शकता. फँन मध्ये ही लाल वायर ही पॉवर व काळी ग्राउन्ड असते.

मी माझ्या कॉम्प्युटर मधून काढलेला जुना फँन मध्ये पिवळी वायर ही पॉवरची आहे.

आता आपण यु एस बी केबल कॉम्प्युटरला जोडून त्याची लाल वायर फँन च्या लाल वायरला व काळी वायर फँनच्या काळ्या वायर ला हाताने जोडा व कॉम्प्युटर चालू करा.

आता यु एस बी केबल मधून पॉवर फँन ला मिळून फँन चालू लागेल.

बेसिक कनेक्शन चे छायाचित्र :

connection

कनेक्शन
[+ve = +ve ला आणि -ve = -ve ला जोडावी.

आता हे टेस्टिंग झाल्यावर आपल्या लक्षात येईल की केबल व फँन सुरळीतपणे चालू आहेत.

फँन बंद करण्यासाठी आपणस कॉम्प्युटरला लावलेली यु एस बी केबल काढावी लागेल.

आता आपण आपल्या  फँन ला बटन कसे कनेक्ट करावे ते पाहूया.

आपण आपल्याजवळचे कोणतेही स्वीच घ्यावे व त्याला कनेक्ट असणाऱ्या दोन केबल मोकळ्या कराव्यात.

आता आपल्या यु एस बी फँन ला आपण स्वीच बसवणार आहोत.

माझ्या फँन ला जवळच एक स्वीच होते मी त्याच्या वायर कट केल्या आहेत आता त्या स्वीच ला इलेक्ट्रिक लूप मध्ये आणूया.

त्यासाठी आपण आपल्या यु एस बी ची काळी वायर बटणाच्या एक टोकाला लावा व फँन ची काळी वायर बटणाच्या दुसऱ्या वायर ला गुंडाळावी.

आणि फँन व यु एस बी ची पॉवर केबल एकमेकांना जोडावी. [लाल-लाल /जर दुसऱ्या बाजूस लाल नसेल तर लाल पिवळी].

फायनल कनेक्शन हे पुढील चित्राप्रमाणे दिसेल.

basic connection

स्वीच ची जोडणी

 स्टँन्ड तयार करणे :

आता आपण तार किंवा स्टील पट्टी वापरून आपल्या फँन ला आधार तयार करू शकतो व त्याचे आपल्याला अनुसरून स्टँन्ड तयार करू शकतो.

आता तो फँन आपल्या स्टँन्डला लावा किंवा अडकवा स्वीच आपल्या जवळ ठेवा व यु एस बी केबल कॉम्प्युटरला कनेक्ट करा.

आपला कॉम्प्युटर चालू झाला की आपण आपल्या स्वीचच्या मदतीने आपला यु एस बी बेस्ड फँन चालू किंवा बंद करू शकतो.

तसेच आपण या फँन ला एल ई डी बल्ब सुद्दा कनेक्ट करून फँनचा सुंदर डेकोरेटिव्ह पीस बनवू शकतो.

यासाठी  आपण एल ई डी सुद्दा लूप मध्ये टाकून फँन बरोबर ते लागावेत अशी सुविधा देवू शकतो.

टेक्निकल महिती :

कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटचे ते सुरळीतपणे चालण्यासाठी एक इलेक्ट्रीक वर्तुळ पूर्ण होणे गरजेचे असते.

आपण जसे आधीच्या प्लेन यु एस बी + फँन सर्किट मध्ये स्वीच अँड केला तसेच एल ई डी ही अँड करावा. काही वेळा काही एल ई डी ५ वोल्ट सप्लाय हेन्डल करू शकत नाहीत अशा वेळी एल ई डी च्या बरोबर एक लहान क्षमतेचा रेजिस्टंर कनेक्ट करावा.

या सर्किट मध्ये आपली यु एस बी केबल कॉम्प्युटर मधुन पॉवर घेवून आपल्या सर्किट मध्ये बँटरी सोर्स म्हणून काम करते तर फँन ही उर्जा वापरते. आपण जेंव्हा स्वीच बंद करतो तेंव्हा दोन वायर मध्ये कनेक्शन होत नाही व त्यामुळे सर्किट पूर्ण होत नाही व फँन फिरायचा थाबतो.

आपण बटन चालू केले की दोन वायर मध्ये कनेक्शन होते, सर्किट पुर्ण होते, यु एस बी मधून सप्लाय फँन ला मिळतो व फँन फिरू लागतो.

छायाचित्र : आपणच करुया आपली हवा..

fan running cut

फँन चालू..हवा चालू..

आपणास यु एस बी मार्फत ५ व्होल्ट सप्लाय मिळत असतो त्यामुळे आपणस शॉक बसण्याची शक्यता नाही.

असा झकास फँन आपण रंगवून किंवा त्यास डोकोरेटीव्ह पीस कनेक्ट करून आपल्या टेबलची शोभा वाढवू शकतो.

आपला फँन काम करू लागल्यावर तो फिक्स करण्यासाठी त्याचे वायर चे जोड निघू नयेत यासाठी ते सोल्ड्रिंग गन ने चिटकवावे व त्यास चिकट पट्टीने आवरण बांधावे.यामुळे फँन दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.

आपण या प्रोजेक्ट ला अजून वाढवून यापासून गाडी ,हेलीकॉप्टर किंवा इतर काही डेकोरेशन बनवू शकतो.

मग वाट कसली बघताय…चालू करा तयारी.. बनवा तुमचा स्वतःचा फँन .. जरा हवा येवू दे….

–धन्यवाद  MJ 🙂

Advertisements