x-All Tablets

जर्मन शिका मराठीतून:भाग १]जर्मन भाषेची ओळख:जर्मन मुळाक्षरे.


Learn German in Marathi : Print Edition is Now Available.

"ज्ञान हीच प्रॉपर्टी "

मराठी लोकांना परदेशी जर्मन भाषा मराठीतून सोप्या पद्धतीने शिकण्याची हा नवा उपक्रम हाती घेत आहोत.

जर्मन सारखी क्लिष्ट भाषा एकदम सध्या सोप्या आणि सरळ शब्दातून आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

परदेश गमन करू इच्छिणार्‍या, नवनवीन भाषा शिकण्यास उत्सुक असणाऱ्या ,नवीन ज्ञान घेवू इच्छिणार्‍या लोकांसाठी जर्मन भाषा आपल्याला मराठी भाषेतून शिकवण्याची संधी उपलब्द्ध होत आहे.

आपले सहकार्य व मार्गदर्शन लाभो हि सदिच्छा !

जर्मन भाषेविषयी:

जर्मन हि जगातील प्राचीन भाषेपैकी एक अशी भाषा आहे.बऱ्याच युरोपियन देशात आजही जर्मन हि प्रमुख भाषा म्हणून वापरली जाते. जसे जर्मन, ऑस्ट्रिया, पोलंड ,डेन्मार्क, स्विझर्लंड व इतर लगतच्या देशातसुद्धा जर्मन हि बोलीभाषा म्हणून वापरली जाते.

जर्मन भाषेत बरेच पुरातन संशोधनीय लेख व भरपूर साहित्य आजही उपलब्ध आहे.या भाषेतील बरेच शब्द हे लँटिन व ग्रीक भाषेशी साधर्म्य दर्शवतात.

कित्येक संगणकीय माहिती व शोधनिबंध ,वेबसाईट आपणास जर्मन भाषेत पहायला मिळतील.जर्मन भाषेला जर्मनमध्ये डॉइच् भाषा असेही म्हंटले जाते.[जसे भारताला हिंदुस्तान म्हणतात आणि भाषा हिंदी तसे जर्मनलाच डॉइच्-लेन्ड म्हणतात…

View original post 439 more words

Innovative Concept Generation

नवीन प्रोडक्ट्ससाठी इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट्स तयार करणे


कोणत्याही प्रोडक्ट बाबत नवीन कन्सेप्ट तयार करताना त्या विषयातील सखोल ज्ञान असणे व त्या ज्ञानाचा वापर कसा करावा व एखादे प्रोडक्ट कसे काम करते त्या मागील तत्व याबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे.

आपली कन्सेप्ट कशी काम करेल याची कल्पना करणे व त्यावर पद्धतशीरपणे काम करून ती प्रत्यक्षात उतरवणे म्हणजे कन्सेप्ट इन्व्हेंशन होय.

एखाद्या प्रोडक्टचे फीचर्स,फंक्शन,वर्किंग प्रिन्सिपल ठरवणे म्हणजे प्रोडक्ट कन्सेप्ट तयार करणे.

concept_gen1
कन्सेप्ट तयार करण्याची तत्वे

नावीन्यपूर्ण कन्सेप्ट तयार करणे :

१.प्रॉब्लेम स्पष्ट करणे.

 • मोठ्या प्रश्नाची लहान लहान विभागात विभागणी करणे.

२.बाहेरील स्त्रोतांकडून माहिती मिळवणे

 • प्रमुख युजर कडून फीडबॅक घेणे व कोणत्या सुधरणा कराव्यात, त्याचा फायदा कसा होईल याची माहिती घेणे.
 • तज्ञांकडून सल्ला घेणे.
 • पेटंट माहितीपत्रका मधून माहिती मिळवणे
 • मासिके, ग्रंथ, पुस्तकातून माहिती मिळवणे
 • मार्केट मधील स्पर्धकाचे प्रोडक्ट पाहून त्याचा अभ्यास करणे.
 • ३.अंतर्गत स्त्रोतांकडून माहिती मिळवणे

व्यक्तिगत माहितीचे प्रोसेसिंग:

 • अनेक कल्पना तयार करणे.
 • कल्पनाचे चित्रात व स्केचेस मध्ये रुपांतर करणे.

प्रोडक्ट कन्सेप्ट स्केचेस :

concept sketch
कन्सेप्ट स्केचेस

नवीन कन्सेप्ट वर विचार करा – नवीन कन्सेप्ट बद्दल बोला – नवीन कन्सेप्टवर काम करा – नवीन कन्सेप्ट कशी फायदेशीर होईल ते फील करा.

concept_gen_process
कन्सेप्ट जनरेशन चक्र

ग्रुप मधून माहिती मिळवणे व माहितीचे प्रोसेसिंग करणे.

४. पद्धतशीरपणे माहिती प्रोसेस करणेव त्यातून नाविन्यपूर्ण कन्सेप्ट चे प्राथमिक रूप तयार करणे.

५.तयार झालेली कन्सेप्ट अंमलात आणणे.

प्रोडक्ट मध्ये याच पद्धतीने सातत्याने सुधारणा करणे.

concept_genration_2
कन्सेप्ट प्रोसेसिंगच्या पायऱ्या

Thanks -MJ 🙂

Creativity, Innovative Design Principles, x-All Tablets

क्रिएटिव्हीटी : नाविण्यतेचा अविष्कार


विचारशक्तीही कल्पनाशक्तीला जन्म देते. आपली वेगळा विचार करण्याची क्षमता आपण किती क्रिएटिव्ह आहे ते ठरवते.

क्रिएटिव्हीटी  ही नवीन कल्पना तयार करणे, त्या ओळखणे व पर्यायी शक्यतांचा विचार करून प्रश्नावर उपयोगी उत्तर शोधण्याची पद्धत आहे. क्रिएटिव्हीटी  म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टी नवीन पद्धतीने जोडणे होय.

“कल्पना हे बीज आहे ,तर शोध हे त्याचे फळ !”

बऱ्याचदा आपण आपणास मिळणारे पहिले उत्तर नाकारले व अजून विचार केला ही क्रिएटिव्हिटीची उत्पत्ती होते.

क्रिएटिव्हीटी वाढवण्यासाठी विचार करण्यासाठीचे मुद्दे  :

आपण खालील मुद्यांचा अभ्यास करून व ते मुद्दे अंमलात आणण्याचा विचार करून आपण आपली क्रिएटीव्ह पॉवर वाढवू शकतो.

CreativeThinking
क्रिएटिव्ह विचार

क्रिएटिव्हीटीतून संशोधन तयार करण्याचे प्रोसेस चक्र :

खालीलप्रमाणे आपण आपले काम , बिझनेस व कला अधिक क्रिएटिव्हिट पद्धतीने करून त्याद्वारे संशोधनापर्यंत पोहचू शकतो.त्यासाठी खालील प्रोसेस चक्राचा वापर करून अधिक क्रिएटिव्हिट बना व शोध लावा.

“कल्पनाशक्ती संशोधनाकडे जाणायचा राजमार्ग आहे.”

Creativity cycle
क्रिएटिव्हिटी प्रोसेस चक्र

 

वाढवा आपली क्रिएटीव्हिटी :

 क्रिएटीव्ह माणसे ही शक्यतो जीवनाच्या टोकाच्या अनुभवातून गेलेली असतात. तो अतिशय हुशार व वैचारिक गुंतागुंतीची व प्रचंड उत्पादनशक्ती असणारी असतात.

आपण काही मानसिक गुणांची जपणूक करून आपली क्रिएटिव्हिटी वाढवू शकतो. क्रिएटिव्ह माणसे योग्य विचार ,योग्य जागा , योग्य वेळ , योग्य विचार यांची अचूक सांगड घालतात.

 

How to boost your creativity

 

क्रिएटीव्ह संशोधन करण्यासाठी प्रत्येकाने पुढील गुण अंगिकारने गरजेचे आहे.

क्रिएटीव्ह माणसाची २१ गुण वैशिष्ट्ये :

 1. एकटा मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती.
 2. प्रश्न सखोलपणे जाणून घेणे.
 3. सत्य परिस्थितीची जाणीव
 4. दुसऱ्या कडून शिकण्याची तयारी
 5. स्वतःच्या कामावर विश्वास असणारे.
 6. वर्तमान परिस्थिती व असमाधानी असणे
 7. ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा
 8. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील.
 9. स्वतः तून प्रेरणा घेणारे
 10. साधनसामग्री व सुविधेच्या अभावी न खचणारे
 11. दुसर्यांच्या प्रश्नांबाबत विचार करणारे.
 12. वैचारिक समतोल.
 13. आत्मसात करण्याची तयारी.
 14. मानसिक दृष्टीने समजूतदार
 15. ध्येयवेडे
 16. प्रश्नावर सर्वबाजूने अभ्यास करणारे
 17. टीकेमुळे विचलित न होणारे.
 18. रिस्क घेण्यास तयार.
 19. जो जाणून घेतो
 20. जो पूर्ण माहित घेतो
 21. जो अँक्शन घेतो /कृती करतो.

क्रिएटिव्हिटी हे एक विज्ञान व कला आहे , जी क्रिएटिव्ह पद्धतीचा शिकून व क्रिएटिव्ह ज्ञान अमलात आणून जोपासली जाऊ शकते.creative-people

 

-Thanks – MJ