Technology

Technical Information.

भविष्यातील बदलते टेक्नोलॉजीचे जग : नाविन्यपूर्ण स्मार्ट तंत्रज्ञान , मार्ग व संधी.


बटणाचा मोबाईल ते टच स्क्रीन स्मार्ट फोन ,कॉम्प्यूटर ते लँपटोप ते आता टँबलेट कॉम्प्युटर असे बदल आपल्या समोर झपाट्याने बदलत आहेत. टेक्नोलॉजीचे जग आता एका नव्या वळणावर आहे.

पुढील टेक्नोलॉजी कशी असेल कोणते नवे मार्ग खुले होतील,कोणत्या संधी बाजारात उपलब्द असतील,कोणत्या गोष्टीचे शिक्षण आपण भावी काळासाठी घेतले पाहिजे ,कोणते उद्योग धंदे पुढील काळात चालतील याचा एक आढावा या लेखात घेण्यात आलेला आहे. याचा आपणास पुढील दिशा ठरविताना नक्कीच फायदा होईल.

 

mj

मोबाईल क्रांती :

मोबाईल हे भविष्यातील सर्व काम करताना लागणारे सहाय्यक मशीन म्हणून काम करेल.त्यासाठी त्याला जास्त क्षमतेचे प्रोसेसर्स असतील ,जास्त मेमेरी असेल तसेच मोबाईल घरातील मशीनचा रिमोट कंट्रोलर म्हणून काम करेल. येत्या काळात बरेच आर्थिक व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून होतील त्यामुळे पैसे ,क्रेडीट कार्ड या पेक्षा मोबाईलचा वापर करून आर्थिक उलाढाल करण्यात लोकांचा कल राहील.

हे तंत्रज्ञान हळूहळू वाढत आणि बदलत असले तरी थोड्या वर्षांनी हे स्टेबल होईल व त्यातून रोबोटिक बेस्ड नवीन क्रांतिकारक तंत्रज्ञानाचा जन्म होईल पुढील विभागात अशा काही तंत्रज्ञानाचा उल्लेख केलेला आहे.

त्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत नवनवीन मोबाईल अप्लिकेशन लिहिणाऱ्या लोकांना वाव राहील आपण विचार हि केला नसेल असे उद्योग मोबाईल अप्लिकेशन च्या रूपाने ऑनलाईन होतील.

या विभागातील प्रस्थापित कंपन्यांना स्पर्धा करून नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्या पुढे जातील.

मोबाईलवर जास्तीत जास्त इंटरनेटवरील डाटा वापरला जाईल त्यामुळे डाटा पुरवणाऱ्या कंपनांच्यामध्ये ज्याच्याकडे जलद डाटा पुरवण्याची क्षमता आणि तांत्रिक बाजू आहेत ती कंपनी पुढे मार्गक्रमण करेल.

लोकांच्या वाढत्या डाटा ची मागणी व वेगवेगळ्या मार्गाने मिळणारे इंटरनेट या पुढे हि जाऊन प्रत्येकाचा डाटा क्लाउड सारख्या एकाचा मोठ्या सर्व्हर मध्ये साठवला जाऊन गरज पडल्यास त्या व्यक्तीला पुरवला जाईल.प्रत्येकाचे स्वतःचे अनेक मोबाईल सारखे उपकरणे असतील व अनेक मोबाईल बरोबर जोडले जाण्यासाठी क्लाउडचा वापर केला जाईल.

या बरोबर मोबाईल सामर्थ्यवान बनतील त्याचा बरोबर त्यांच्या सुरक्षिततेचा व त्यातील माहिती गुप्तते चा प्रश्न उपस्थित राहील. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनींना हे चेलेज आहे.

रोबोटिक : ड्रोन (उडते रोबो ):

येत्या काही वर्षात आपल्या कामाला सपोर्ट करणारे काही रोबो पाहण्यात येतील पण अजूनही ते तंत्रज्ञान म्हणावे इतके प्रगत होईल कि नाही यात शंका आहे.रोबो प्रयोग शाळेच्या बाहेर येऊन व्यवहारी जगात काम करण्याचाचे पाहण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

पण काही ठराविक काम करणारे रोबोटिक हात किंवा मशीन आपण मोठ्या प्रमाणात उद्योजिक विभागात काम करताना पाहू शकतो.

नवीन रोबोट प्रकार उडते रोबो अर्थात ड्रोन सध्या चर्चेत आहेत याचा वापर भविष्यात पार्सल पुरविण्यासाठी किंवा व्हिडीओ शुटिंगसाठी व करमणूक करण्यासाठी होवू शकतो.पण ते खुल्या वातावरणातील वापरासाठी सक्षम होतील कि नाही यात शंका आहे.त्यासाठी केमेरा असलेले व जी पी एस तंत्रज्ञान (लोकेशन ओळखण्यासाठी) वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे कौशल्य सध्या केले जाऊ शकते.

खाजगी कामासाठी पर्सनल रोबोट्स किंवा व्यवसायातील कामासाठी मदतनीस म्हणून रोबोट्सचा वापर केला जाईल.रोबोट्स बनवणाऱ्या व त्यांचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी बऱ्याच कंपन्याची गरज भासेल.

आर्टीफिशियल इंटीलीजंस (कृत्रिमरीत्या बनवलेली बुद्धिमत्ता ) :

काही रोजच्या जीवनातील ठरलेल्या गोष्टी साठवून त्यानुसार निर्णय क्षमता असलेली बुद्धिमत्ता तयार करणे यावर शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे.अशी बुद्धिमत्ता रोबोट ,मोबाईल कार या सारख्या उपकरणात काही प्रमाणात पाहण्यास मिळतील.यासाठी आपण रोज करणाऱ्या गोष्टी व त्या नंतर आपण घेणारे निर्णय याचा अभ्यास करणारे सोफ्टवेअर लिहिले जाईल व आपले निर्णय स्वयंचलित करण्याकडे भर राहील.या विभागात फार प्रगती अपेक्षित आहे परंतु त्याचा व्यवहारात वापर कसा केला जाईल याकडे लक्ष राहील.

आपोआप परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय घेणारे काही बुद्धिमान उपकरणे आपण भविष्यात पाहू शकू यात शंकाच नाही.

क्लाउड स्टोरेज (बाहेरील मेमरी स्टोरेज ):

सर्वांनाच आपला डाटा ठेवण्यासाठी भरपूर जागा लागत आहे.पण आपण सर्वच डाटा कायम वापरत नाही.त्यामुळे सर्व माहिती एका सर्व्हर सिस्टीम मध्ये ठेवली जाते. आपण ती माहिती निरनिराळ्या ठिकाणाहून व वेगेवेगळ्या कॉम्प्यूटर किंवा मोबाईल चा वापर करून वापरू शकतो.त्या साठी हाय स्पीड इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती हवी त्या वेळी डाऊनलोड केली जाते व माहितीमध्ये बदल करून झाल्यावर ती अपलोड केली जाते. यामुळे दुसऱ्या ठिकाणाहून हि माहिती पाहणाऱ्याला अद्यावत लेटेस्ट माहिती मिळते.

बिग डाटा या सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून या मोठ्या डाटा वर प्रोसेसिंग करून त्याचे अँनेलीसीस करून त्याद्वारे उपयुक्त ट्रेंड्स किंवा ग्राफ्स तयार करून अनोखी माहिती जमा करण्याचे तंत्रज्ञानहि वेग घेत आहे.

क्लाउड स्टोरेज म्हणजे दुसऱ्याच्या मोठ्या कॉम्प्युटरवर आपली माहिती इंटरनेटचा वापर करून साठवणे. क्लाउड स्टोरेजसाठी मोठमोठे डाटा स्टोरेज उघडले जातील.त्यांच्या मेंटेनन्स व सुरक्षितेसाठी तांत्रिक लोकांना मागणी राहील.तसेच हँकर्सचा धोका चुकवून सर्व माहिती कशी सुरक्षित ठेवता येईल या दृष्टीने तज्ञाची पुढील वाटचाल राहील.

प्रोसेसर्सनी जोडलेले जग :

इंटरनेट ऑफ थिंग्स या नावाने बरेच तांत्रिक बदल होत आहेत. या मध्ये घरातील व उद्योगातील रोजच्या वापरातील गोष्टी ऑटोमेटिक करण्यासाठी त्या मध्ये लहान लहान प्रोसेसर्स वापरले जाऊन ते एकमेकांना जोडले जाऊन माहितीचे आदानप्रदान करतात.याचा वापर करून आपणास मोबाईलचा वापर करून घरातील एखादी मशीन कंट्रोल करता येऊ शकेल किंवा त्या मशीनचा स्टेटस पाहता येऊ शकेल. तसेच या मशीन्स स्वतः काही निर्णय घेवू शकतील अशा अद्यावत बनवण्यात येतील व सर्व गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्याने एक माहितीची साखळी तयार होईल.त्या माहितीचा व जोडल्या गेलेल्या उपकरणांचा पुढे कसा वापर केला जाईल हे पाहण्यासारखे असेल.

स्मार्ट कार :

कार हि भविष्यातील सुपर कॉम्प्यूटरसारखी स्मार्ट व अद्यावत घरासारखी सुख सोयीनी युक्त असेल.आज काल बऱ्याच लोकांचा फार वेळ कार मधून प्रवास करण्यात जातो हा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी कार मध्ये करमणुकीची साधने डिस्प्ले स्क्रीन्स ,वायरलेस इंटरनेट कनेक्शन पुरवण्यात येईल.तसेच कारच्या सुरक्षिततेसाठी फार नवीन प्रयोग चालू आहेत. स्वयंचलित कार आपणास भविष्यात रस्त्यावर धावताना दिसतील त्यासाठी जगप्रसिद्ध  कंपनीच्या द्वारे प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.वेगवेगळे सेन्सर्स कँमेरे ,अडथळा शोधणारी सिस्टीम तयार केली जाऊ शकते. प्रत्यक्ष रस्त्यावर येणाऱ्या अनपेक्षित अडथळया वर मात करून पुढे जाण्याची क्षमता असणारी बुद्धिमान कार आपण पाहू शकाल. स्मार्ट कार हे फार आव्हानात्मक क्षेत्र आहे यात फार वेगाने सकारात्मक बदल होत आहे.

तसेच इंटरनेट जी पी एस चा वापर करून आपणस आपोआप इच्छित स्थळी  सुरक्षित पोहचवणारी आपणास नक्कीच आवडेल.

अँग्म्युन्टेड रिआलिटी (आभासी अस्तित्व ):

आपल्या समोर आभासी जग उभे करून आपणस त्या जगाशी कनेक्ट करण्यास मदत करणारे हे तंत्रज्ञान आहे. मोबाईलला जोडता येवू शकणारे गॉगल्स, वी आर डिस्प्ले हे हेल्मेट सारखे दिसणारे व आपल्या दोन्ही डोळ्यांजवळ लावता येणारे डिव्हाइस पुढील जगाची करमणुकीची साधने असतील.याचा वापर करून त्या स्पॉटवर आपण स्वतः आहोत अशी अनिभूती घेऊन चित्रपट किंवा व्हिडीओ पाहता येऊ शकतो. याचा वापर गेम्स खेळण्यासाठी तसेच क्रीडा सामने पाहण्यासाठी केला जाऊ शकतो.या व्हर्त्युअल रिआलिटी चा आपल्या रोजच्या जीवनात वापर करून त्या मध्ये आपण अँग्म्युन्टेड रिआलिटी द्वारे रंग भरू शकतो. यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी कँमेरा तसेच इंटरनेट द्वारा मिळणारी माहिती व प्रोसेसर्सची बौद्धिक निर्णय क्षमता याचा वापर करून दृश्य जग व आभासी जग यांचा सुंदर मिलाफ करता येऊ शकेल व याचा वापर जाहिरात उद्योगात,  करमणुकीच्या क्षेत्रात भविष्यात केला जाऊ शकतो.हे क्षेत्र सध्या हळूहळू वाढत आहे. महाग डिव्हाइसला काही पर्याय निघाल्यास हे क्षेत्र सर्वसामान्यांना रोमांचकारी ठरेल.

स्मार्ट सिटी :

स्मार्ट सिटी हे आधुनिक ,विकसित ,अद्यावत शहर कसे असावे याचे मॉडेल आहे.भविष्यात बऱ्याच स्मार्ट शहरांचा विकास केला जाऊन त्या द्वारे ओद्योगिक व नागरी जीवनमान उचावले जाईल.यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामात वापर करून सर्व प्रोसेस झटपट व सोयीची करण्यास भर राहील. शहरातील दळणवळण व वाहतुकीची साधने हे एकमेकांशी संगणकाचा वापर करून जोडले गेलेले असेल.व नागरिक स्वयंचलित वाहनांचा वापर करतील तसेच सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन केले जातील. शहरातील कार्यालयीन कामकाज पेपरचा वापर न होता पूर्णपणे संगणकीकृत होईल.यासाठी सर्व शाखांचे तज्ञ यांना संगणकाचा व इंटरनेटचा वापर करून आपापले क्षेत्र कसे अत्याधुनिक केले जाईल याचा अभ्यास करून अंमलबजावणी करणे गरजेचे राहील.या द्वारे आपल्याच शहरात व्यवसायाच्या व नोकरीच्या नवनवीन संधी मिळतील.

वर उल्लेख केलेली क्षेत्रे भविष्यात आपणासाठी नवे मार्ग व संधी निर्माण करतील त्यासाठी आपण आत्तापासूनच सज्ज राहिलेले गरजेचे राहील.

वरील टेक्नोलॉजी प्रमाणेच अजूनही भरपूर तंत्रज्ञान वेगाने पुढे येत आहे पण त्यातील अतिशय महत्त्वाच्या भविष्यातील तंत्रज्ञानाचा उल्लेख या लेखात करण्यात आलेला आहे.

नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर केल्यास आपण आपल्या उद्योगात भरभराट करू शकतो.सध्या स्टार्ट अप्सचा जमाना आहे यात वरील उल्लेखलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानावर नवीन स्टार्ट अप कंपनी चालू करू शकता.

अशा तर्हेने आपण भविष्यातील बदलते टेक्नोलॉजीचे जग व त्या द्वारे मिळणाऱ्या संधी व प्रगतीचे मार्ग पाहिलेत.आपण हे नाविन्यपूर्ण स्मार्ट तंत्रज्ञान आत्मसाद करून प्रगती साधाल हि सदिच्छा .

आपणस या बाबत कोणत्याही शंका असल्यास नक्की कळवा.

धन्यवाद MJ 🙂

Advertisements

हवेवर चालणारा ड्रोन हेलीकॉप्टर तयार करणे.


सध्या ड्रोन हेलीकॉप्टर सर्व फिल्म्स ,जाहिराती, व्हीडीओ शूटिंगमध्ये दिसत आहेत.ते पाहून आपणाशी एखादा ड्रोन तयार करावा वाटला असेलच.

बाजारात ड्रोन बनविण्यासाठीची साधन सामुग्री विकत मिळते पण त्याची किंमत थोडी जास्त असते व स्वतः तयार केलेल्या ड्रोनची मजाच काही ओर !
आपणस छंद म्हणून पंख्यावर चालणारे वाहन कसे करावे याबद्दल माहिती सांगितलेली जाणार आहे .खास आपल्यासाठी घरातील उपलब्द वस्तू वापरून सोप्या पद्धतीने व कमी किमतीत ड्रोन कसा बनवावा हे या लेखात सांगितले आहे.

साधन सामुग्री :

चार कॉम्प्युटरच्या मोटर्स, चार पंखे, थर्मोकोलचा बेस किंवा फायबरचा बेस, पॉवर सप्लाय, चिकटपट्टी

IMG_20150120_154609

प्रोसेस:

बेस तयार करणे.बेस तयार करण्यासाठी थर्मोकोल ,फायबर ,हलकी लाकडी पट्टी असे वजनाला हलके मटेरियल वापरावे.बेस आपल्या मोटरचे वजन पेलेल इतका भक्कम हवा.

बेस नुसार आपल्या कॉडकँप्टरचा प्रकार ठरतो.+ शेप,वाय शेप ,बंदिस्त शेप. आपण वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे बेस बनवू शकतो.

आपण पहिला साधा + आकाराचा प्रकार पाहूया.त्यासाठी आपण थर्माकॉलचा वापर करून त्यावर सारख्या लांबीची व एकत्रित येणारा शेप तयार करा.व आपला थर्माकॉल तसा कापून घ्या. किंवा आपण दोन लाकडी पट्यांही एकमेकांना मधोमध जोडून तसा शेपचा बेस तयार करू शकतो.

खालील चित्रात वेगवेगळ्या शेपचे मॉडेल्स दाखवले आहेत.

प्रकार:

IMG_20150120_170539

प्रकार क्रमांक १

 

 

IMG_20150103_155324

प्रकार क्रमांक २

IMG_20150102_233043

प्रकार क्रमांक ३

पंखा तयार करणे:

आता आपल्या कॉम्प्युटर मध्ये येणारे व वापरात नसलेले फँन घ्या व त्याच्या आजूबाजूचे प्लास्टिक काढून टाका व फक्त मोटार व फँन राहील याची काळजी घ्या.त्यामुळे मोटार वजनाला हलकी होईल व आपले हेलिकॉप्टर उडू शकेल.

आता चार पाती घेवून ती  मोटरला फेविकॉल किंवा फेविक्विकचा वापर करून चिटकवा.दोन फँन सरळ व दोन फँन उलटे चिटकवा.

ड्रोन उडण्यासाठी दोन पंखे घडयाळाच्या दिशेने तर दोन पंखे घडयाळाच्या उलट्या दिशेने फिरले पाहिजेत.यासाठी आपण सरळ व उलट्या दिशेने फिरणारी मोटर वापरू शकतो.पण आपली मोटर साधी एकाच दिशेने फिरणारी असल्यामुळे आपणास दोन मोटारी सरळ तर दोन उलट्या दिशेने लावाव्या लागतात.तरच हवा बँलन्स होऊन ड्रोन उडेल.

dron direction

वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणे एकमेकांसमोरील मोटर एकाच दिशेने फिराव्या लागतात.आता दोन सरळ पाती असलेले पंखे एकमेकांसमोर वरच्या बाजूने लावले तर उलटी पाती लावलेले पंखे उलटी करून पाती खाली येतील अशा प्रमाणे लावले.

आता ते पंखे चिकटपट्टी ,फेव्हीकोल यांचा वापर करून मोटर बेसला फिक्स चिटकवा.

IMG_20150122_121751

ड्रोन कनेक्शन

 

कनेक्शन:

सर्व फँनला पॉवर देण्यासाठी आपण २० व्होल्ट चा अँडाप्टर किंवा लँपटाँप चार्जिंग केबल वापरावी.पुढील प्रयोगासाठी लँपटाँपची चार्जिंग केबल पुढून कट करून पॉवर सप्लाय म्हणून वापरली गेली आहे.

आपण २० व्होल्ट पर्यंत इतर सप्लाय किंवा बँटरी वापरू शकतो.पण डायरेक्ट २४० व्होल्ट वापरू नये ,त्यामुळे मोटर जाळण्याची शक्यता असते.तसेच कमी ५ व्होल्ट सुद्धा सप्लाय वापरू नये कारण इतका सप्लाय मोटर वेगाने फिरून ड्रोन उडण्यास कमी पडू शकतो.

ट्रायल:

आवश्यक झाल्यास सप्लाय व्होल्टेज वाढवून पहा व आपल्या मोटरच्या क्षमते नुसार त्यास कमी जास्त पॉवर द्या.

आता सर्व मोटरचा पॉझिटिव्ह सप्लाय (लाल किंवा पिवळी वायर)एकत्र करून तो मेन सप्लायच्या पॉझिटिव्ह सप्लायला पोहचवावा. सर्व मोटरचा निगेटिव्ह सप्लाय मेनच्या निगेटिव्हला (काळी वायर) जोडावा.

उडण्यास सज्ज:

प्रथम आपण एक फँन व एक मोटर थर्मोकोलच्या एक तुकड्यावर चिटकवून त्याला सप्लाय देऊन टेस्ट करुया.नंतर आपण दोन फँन सुद्धा थर्माकॉलला लावून आपण त्याचा स्पीड व इतर कनेक्शन चेक करू शकतो.आता आपले दोन पंखे लावलेले हेलीकॉप्टर चालायला लागेल.व एक जागेवरून दुसरीकडे जायला लागेल.

आता आपण फायनल कापलेला बेस घेऊन त्यावर सर्व कनेक्शन फिट करून घ्यावीत .त्यास पॉवर देऊन चालू करावे.आता आपले हेलीकॉप्टर एका जागेवरून दुसरीकडे घसरत जाईल.

नंतर आपल्या फँनच्या कनेक्शनला आणखी पॉवर देऊन ड्रोन चालू करावा.आता ते आकशात भरारी घेईल.अशा रीतीने आपण घरातील समान वापरून सोप्या पद्धतीने ड्रोन कॉड कँप्टर कसे करायचे ते पहिले आहे.

बाजारात आपल्याला ड्रोन बनविण्यासाठी बऱ्याच गोष्टी विकत मिळतात.पण त्या फार महाग असतात.म्हणून आपण नेहमीच्या वापरातील वस्तूंपासून तयार केलेले हेलिकॉप्टर नक्की तयार करा व आपल्या मित्रांना दाखवा.

अँडव्हान्स कॉड कँप्टर:

Advance Drone Controller

Advance Drone Controller

 

आपण यास आणखी अँडव्हान्स बनवू शकतो. यास वायरलेस करण्यासाठी आपण त्यावर बँटरी बसवून आपली कनेक्शन डायरेक्ट बँटरीला जोडू शकतो.आता हे वायरलेस ड्रोन कंट्रोल करण्यासाठी यावर सर्किट बसवावे लागेल.ते सर्किट आपल्या चार मोटर्सना कनेक्ट करून त्यातून वायरलेस सिग्नल ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करण्याची सोय असावी.

आता आपल्याला एक कंट्रोलर तयार करावा लागेल.त्याद्वारे आपण वायरलेस मोटर कंट्रोल करू शकतो.यासाठी कंट्रोलर मध्ये वायरलेस डाटा ट्रान्समीटर असावा जो मोटरला सिग्नल देऊ शकेल.

तसेच आपल्या ड्रोनची दिशा ठरवण्यासाठी त्यातील चार मोटरचा स्पीड कमी जास्त करून त्याची दिशा ठरवता येते.यासाठी डबल पोल स्वीचचा वापर करून आपण मोटर कंट्रोल करू शकतो.

आपली मोटर जर जास्त क्षमतेची असेल तर आपला ड्रोन जास्त ओझे पेलू शकतो.असे असल्यास आपण आपल्या हेलिकॉप्टरवर कँमेरासुद्धा बसवू शकतो त्याद्वारे आपणास कँमेरातुन उंचावरून फोटो किंवा व्हिडीओ काढता येतो.हे फोटो किंवा व्हिडिओ आपण ड्रोन वरच लहान मेमरी कार्डमध्ये साठवून ठेवू शकतो किंवा वायरलेस माध्यमातून ते कंट्रोलरला पाठवू शकतो.

अशा तऱ्हेने आपण व्हॉईस ,डिस्प्ले ,कँमेरा ,सेन्सर्स अशी निरनिराळी उपकरणे बसवून आपला ड्रोन हेलीकॉप्टर अनेक कामासाठी वापरू शकतो.

तसेच आपण आपल्या मोबाईलवर प्रोग्राम करून आपला मोबाईल सुद्धा त्याचा कंट्रोलर म्हणून वापरू शकतो.मग चला कामाला लागुया आणि बनवूया खास आपला ड्रोन हेलीकॉप्टर !!

drone

Thanks,

MJ 🙂

‘C’ प्रोग्रामिंग भाषा शॉर्ट नोटस्‌ मराठीतून !


 • C प्रोग्रामिंग भाषा उजळणी नोटस्‌ व महिती मराठीतून.
 • ALGOL –BCPL या नंतर उदयाला आलेली प्रोग्रामिंग भाषा म्हणजे C.

  वैशिष्ट्ये व महत्त्वाचे मुद्दे :

 • फास्ट, वापरण्यास सोपी, तयार फंक्शन्स व पद्धतशीर प्रोग्रामिंग करण्याची सोय तसेच सर्वच कॉम्प्युटर वर चालणारी भाषा.
 • main फंक्शनने प्रोग्रमची सुरवात, प्रोग्रम मध्ये एकाच main; ते काहीच रीटर्न करणार नसल्यास Void  असे डिक्लेअर केले जाते.
 • printf आणि scanf  ही C प्रोग्राम मध्ये तयार फंक्शन ; ही फंक्शन्स डाटा प्रिंट करण्यासाठी व  कि बोर्ड वरून डाटा घेण्यासाठी वापरतात.
 • व्हेरिएबल प्रिंट करण्यासाठी printf(“ %d “, व्हेरिएबलचे नाव) वापरतात.
 • कॉंस्टंट व्हेल्यू डिफाईन करण्यासाठी  # define वापरतात.जसे # define n=0.
 • काही ठराविक काम करण्यासाठी main प्रोग्रममध्ये आणखी एक उप प्रोग्रम असतो त्यास फंक्शन म्हणतात.
 • c भाषेतील प्रोग्रम हा अनेक फंक्शन्सनी बनलेला असतो.
 • फंक्शन काम झाल्यावर उत्तर परत करतो ते  return() द्वारे करतो.
 • प्रोग्रमला लागणारी काही फंक्शन मिळवण्यासाठी त्यात डॉट एच फाईल इन्क्लुड केली जाते. #include   वापरून  डॉट एच फाईल मधील तयार फंक्शन्स प्रोग्रम मध्ये वापरतायेतात.
 • C मध्ये प्रोग्रम लिहिला असेल तर तो रन करण्यासाठी प्रोग्रम प्रथम कंपाईल करून त्यातील चुका चेक करतात नंतर त्या प्रोग्रम संबधित फाईल लिंक केल्या जातात नंतर त्या रन करण्यास योग्य ऑब्जेक्ट कोड मध्ये रुपांतरीत केल्या जातात.
 • प्रोग्रममध्ये नवीन ओळीत लिहिण्यासाठी \n प्रिंट केले जाते तर थोडी मोकळी जागा सोडण्यासाठी \t प्रिंट केले जाते.
 • char –अक्षरे, float –अपूर्णांक ,int – पूर्ण संख्या हे डाटा टाईप डाटा नुसार वापरले जातात (%c,%f,%d)
 • प्रथम आपला व्हेरिएबल कोणत्या प्रकारात आहे ते घोषित केले जात व त्यास व्हेल्यू ठेवली जाते.
 • scanf फंक्शन वापरताना & हे चिन्ह व व्हेरिएबल चे नाव वापरले जाते.कि बोर्ड वरून व्हेरीअएबलला दिलेली संख्या स्टोअर केली जाते.
 • कमी जागा असणाऱ्या व्हेरिएबल मध्ये मोठा व्हेरिएबल स्टोअर केल्यास तो ओव्हरफ्लो होतो व डाटा वाया जातो.
 • ++ हे व्हेरिएबल च्या आधी लिहिल्यास आधी व्हेल्यू एक ने वाढते व नंतर ती वापरली जाते व हे चिन्ह व्हेरिएबलच्या नंतर वापरल्यास  आधी  व्हेल्यू वापरली जाते व नंतर ती एक ने वाढते.
 • जास्त प्रायोरिटी *,/,% यांना असते तर कमी प्रायोरीटी +,- यांना असते.
 • कि बोर्ड वरून दिलेले एकच अक्षर मिळवण्यासाठी  getchar() फंक्शन वापरतात व एक अक्षर स्क्रीन वर दर्शविण्यास  putchar() वापरतात.
 • % 7.4f  म्हणजे ७ आकडे  व एक पॉइंट साठवले व दर्शविले जातील ; त्यात ४ आकडे पॉइंटच्या पलीकडे असतील (98.7654).
 • if (बरोबर) काम चालू अन्यथा else मधील काम चालू.
 • अनेक पर्याय व त्यानुसार वेगवेगळी कामे असे असल्यास switch वापरतात.यात उत्तर कोणत्या  case  बरोबर जुळते त्या केसचा कोड चालतो अन्यथा default  मध्ये लिहिलेला कोड रन होतो.
 • goto lable  मुळे जेथे लेबल लिहले आते तेथे डायरेक्ट प्रोग्रम कंट्रोल जातो व तिथून परत प्रोग्रम रन होतो.
 • while लूप म्हणजे जो पर्यंत कंडीशन येत नाही तो पर्यंत दिलेले काम करत रहा.
 • do आणि while जोडी मध्ये do आधी डिक्लेअर केला जातो , शेवटी while  व कंडिशन्स दिली जाते.जोपर्यंत कंडीशन पुर्ण होत नाही तोपर्यंत यामधील प्रोग्रम लूपमध्ये  फिरत राहतो.
 • for  लूप मध्ये फॉर(सुरवातीची संख्या , कंडीशन चेक करणे ,काउंट वाढवणे) असे चक्र चालू असते.
 • लूप मधून बाहेर पडण्यासाठी  break; स्टेटमेंट वापरतात.
 • समान डाटा टाईप चा एक संच म्हणजे अँरे होय.
 • अँरे लिहिताना त्याचे नाव ,त्याचा प्रकार व किती काउंट लिहिला जातो.int num [3];.
 • अँरे हा रो व कॉलम यांच्या टेबल रुपात मांडण्यासाठी द्विमितीय रुपात लिहिला जातो जसे  int product [2][5].
 • कँरेक्टरचा अँरे हा अक्षरांचा संच एकत्र ठेवण्यासाठी वापरतात.
 • दोन ओळी जोडण्यासाठी strcat() फंक्शन,दोन ओळी कम्पेअर करण्यासाठी strcmp() फंक्शन वापरतात.
 • एक ओळ दुसऱ्या ओळीमध्ये कॉपी करण्यासाठी strcpy() फंक्शन व ओळीची लांबी मोजण्यासाठी strlen()  हे फंक्शन वापरतात.
 • मोड्ल्युलर प्रोग्रामिंग म्हणजे फंक्शन्सचा वापर करून एक एक मोड्युलच्या तुकड्याने प्रोग्रम लिहिणे.
 • main  मध्ये फंक्शन डिफाईन केले जाते व फंक्शनला काही आर्ग्युमेंट पाठवून ते कॉल केले जाते.
 • फंक्शन आपले काम करते व तयार झालेले आउटपुट रिटर्न करते.रिटर्न केले आउटपुट हे फंक्शनच्या टाईपचे असते.
 • external  म्हणून डिफाईन केलेले व्हेरिएबल हे main च्या बाहेर असून सर्व प्रोग्रम मध्ये वापरले जाऊ शकते.
 • static  व्हेरिएबल हे एका फंक्शन मध्ये एकदाच कॉल होते.
 • register  या व्हेरिएबलचा वापर प्रोसेसरच्या रेजिस्टर मध्ये संख्या ठेवण्यास होते जी संख्या प्रोग्रममध्ये फास्ट मेमरीसाठी वापरली जावू शकते.
 • वेगवेगळ्या डाटा टाईप चा एकत्रित डिफाईन केलेला संच म्हणजे स्ट्रक्चर.
 • अँरेमध्ये एकाच डाटा टाईप असतो तर स्ट्रक्चर मध्ये अनेक डाटा टाईप असतात.
 • स्ट्रक्चर structure लिहिताना त्याचे नाव डिफाईन केले जाते व  त्या स्ट्रक्चरचे व्हेरिएबल सुद्धा तयार केले जातात.
 • स्ट्रक्चर मधील व्हेरिएबल मेंबर हे डॉट चा वापर करून कॉल केले जातात.person1.name.
 • स्ट्रक्चरमध्ये दोन डाटा टाईप जोडताना एक बीट एवढी मोकळी जागा ठेवली जात त्यास slack  बीट असते म्हणतात.
 • दोन स्ट्रक्चर कम्पेअर करता येत नाहीत तर त्या मधील मेंबर कम्पेअर केले जातात व जर ते सारखे असतील तर स्ट्रक्चर सेम आहे असे ठरवले जाते.
 • स्ट्रक्चरमध्ये ही दुसरे स्ट्रक्चर डिफाईन करता येते.त्यातील मेंबर कॉल करताना ते p1.p2.memberअसे दोन डॉट च्या मदतीने केले जाते.
 • स्ट्रक्चरमधील मेंबर स्वतंत्र स्टोअर केले जातात तर union मध्ये सर्व मेंबर्सना  एकाच मेमरी लोकेशन असते.
 • युनियनमधील मेमरी लोकेशन हे त्यातील सर्वात जास्त मेमरी लागणाऱ्या मेंबर इतकी असते व बाकी मेंबर एक एक करून ते लोकेशन वापरतात.
 • एखाद्या स्ट्रक्चरची टोटल साईझ काढून ती पुढे फंक्शनमध्ये वापरण्यासाठी sizeof() फंक्शन वापरतात.
 • पॉइंटर हा त्याच्या व्हेरिएबलचे मेमरी लोकेशन स्टोअर करतो.
 • pointer  हा C  मधील सर्वात उपयुक्त व पॉवरफुल डाटा टाईप आहे.
 • पॉइंटर हा * या चिन्हाचा वापर करून दर्शवितात. *P  म्हणजे पॉइंटर व्हेरिएबल  हा p  हा मेमरी लोकेशनला पॉईंट करतो.
 • p=&quantity;  म्हणजे P हा quantity  व्हेरिएबल जेथे ठेवले आहे त्याच्या मेमरी लोकेशनला पॉईंट करून त्या लोकेशन मध्ये साठवलेली व्हेल्यू बदलू शकतो.
 • पॉइंटरमध्ये संख्या मिळवू किंवा कमी करू शकतो; तसेच दोन पॉइंटर एकमेकांतून वजा करू शकतो पण दोन पोइंटरची बेरीज किंवा गुणाकार होत नाही.
 • आपण अँरेचा किंवा स्ट्रक्चरचा पॉइंटर डिफाईन करून त्यातील संख्या पॉइंटर व्हेरिएबल च्या मदतीने मेमरी लोकेशनला जावून बदलू शकतो.
 • पॉइंटर एक ने वाढवल्यास तो त्याच्या डाटा टाईपच्या साईझ इतका वाढतो.
 • (*p)(x,y) यास फंक्शन पॉइंटर म्हणतात.
 • स्ट्रक्चर मधील मेंबर पॉइंटरचा वापर करून  ptr->name किंवा  (*ptr).name असे आले जातात.
 • फाईल ओपेन करणे या फंक्शन मध्ये फाईल नाव बरोबर ती रीड किंवा राईट मोड मध्ये उघडायची आहे ते ही लिहिले जाते.
 • फाईल बंद करतान फक्त फाईल पॉइंटर लागतो ज्याचा वापर करून त्या पॉइंटर ला जोडलेले मेमरी लोकेशन मोकळे केले जाते.
 • फाईल मधील करेक्टर घेण्यासाठी getc व   साठवण्यासाठी putc फंक्शन वापरले जाते.
 • फाईल ऑपरेशन्स साठी खास fprintf आणिfscanf ही सुधारित फंक्शन्स फाईल मधील डाटा प्रिंट करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी वापरली जातात.
 •  ferror व feof या फंक्शन चा वापर करून फाईल मध्ये चुका आहेत का ते शोधले जाते.
 • फाईल पोइंटर सुरवातीला नेह्ण्यासाठी rewind फंक्शन वापरतात.फाईल पॉइंटर थोड्या अंतरावर मागे किंवा पुढे करण्यासाठी fseek  फंक्शन वापरतात.
 • append  फंक्शनचा वापर करून आधीच्या फाईल मध्ये बदल न करता आपला नवीन डाटा त्या पुढे जोडला जातो.
 • कमांड लाईन द्वारा पँरामिटर पास करता येवू शकतात त्यासाठी main फंक्शन ला पँरामिटर दिले जावू शकतात.
 • फाईल चा शेवट एन्ड ऑफ फाईल म्हणजे -१ ने करतात.
 • स्ट्रिंग चा शेवट नल म्हणजेच \० ने होतो.
 • प्रोग्रम चालू असताना मेमरी अलोकेट करण्यासाठी malloc  फंक्शन वापरतात यात मेमरी अलोकेशन साईझ दिला जातो.
 • समान साईझ चे मेमरी ब्लॉक अलोकेट करण्यासाठी calloc फंक्शन वापरतात.
 • free  फंक्शन च वापर करून पॉइंटर ची मेमरीतील जागा मोकळी केली जाते.
 • परत मेमरी वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी realloc  फंक्शन वापरतात.
 • लिंक लिस्ट मध्ये एक स्ट्रक्चर दुसऱ्या स्ट्रक्चरशी लिंक ने जोडले असते ते मेमरीत सलग असतीलच असे नाही.यात पॉइंटर चा वापर करून लिंक प्रस्थापित केली जाते.*next , node.next.
 • लिन्कड लिस्ट मध्ये हवी तेवढी मेमरी हवी तेंव्हा वापरेली जाते या मुळे मेमरी ची बचत होते.
 • दोन्ही बाजूंनी लिंक्स जोडण्यासाठी डबल लिन्क लिस्ट चा वापर होतो यामुळे पॉइंटर पुढे किंवा मागे करू शकतो यसाठी प्रत्येक नोड ला दोन लिन्क लागतात.
 • तसेच पहिला नोड हा शेवटच्या नोडला जोडून सर्क्युलर लिन्क लिस्ट ही तयार करता येते.

वरील मुद्दे वाचून आपण  सी प्रोग्रामिंग भाषेची रिव्हीजन करू शकता.आपणस ह्या नोट्स कशा वाटल्या हे नक्कीच कळवा.

धन्यवाद !
MJ 🙂