Star Business

पुस्तक परिचय:स्टार व्यवसायाची गुरुकिल्ली.


पुस्तक परिचय:स्टार व्यवसायाची गुरुकिल्ली :

स्टार व्यवसाय संकल्पना व आपला व्यवसाय स्टार करण्यासाठीच्या टिप्स:

स्टार व्यवसायाची संकल्पना हे मूळ इंग्रजीत असलेले व मराठीत भाषांतर केलेले  पुस्तक वाचनात आले त्यांनी या स्टार व्यवसाय या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे व त्यातून लेखकाला झालेले फायदे यांचे सुंदर व वास्तववादी वर्णन केले आहे.त्या पुस्तकातील मला आवडलेले व भावलेले काही मुद्दे मी आपणास सोप्या भाषेत सांगणार आहे.

स्टार व्यवसाय म्हणजे काय?

जो व्यवसाय दरवर्षी २० ते ३० % या पद्धतीने वाढत असतो व पुढील काळात हि तो अशाच रीतीने वाढेल अशी पक्की खात्री असते अशा व्यवसायास स्टार व्यवसाय म्हणतात.

असा व्यवसाय काढला वा अशा व्यवसायात गुंतवणूक केली कि ती काही वर्षातच आपणास फार मोठा लाभ देऊ शकते.

स्टार व्यवसाय कसे असतात?

स्टार व्यवसाय हा नेहमीच्याच एखद्या व्यवसाया सारखा असू शकतो पण तो आजू बाजूच्या इतर व्यावसायांपेक्षा काही गोष्टीनी वेगळा असतो त्याच गोष्टी त्याला स्टार बनवतात.

अशा व्यवसायात जो पहिला नावीन्यपूर्ण रीतीने काही बदल घडवून तो ग्राहकांना अधिक सोयीसुविधा योग्य खर्चात पुरवतो तो या व्यवसायाच्या अढळ स्थानी राहतो.व नंतर या व्यवसायात पडणाऱ्यांना या गोष्टीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी असते.

उदा: खाण्याची हॉटेल्स सगळी कडे मिळतात पण एका व्यावसायिकाने खाण्याचे पदार्थ कमी वेळात तयार केले जातील व लवकरात लवकर व कोठेही खायला येतील असे पदार्थ मिळतील अशा हॉटेल्स ची प्रथम सुरवात केली.हा व्यवसाय अजूनही स्टार आहे जो २० ते ३० टक्क्यांनी दरवर्षी वाढत आहे व त्या तुलनेत आजूबाजूचे स्पर्धक त्याच्या जवळपासही नाही.

हा सर्वात प्रथम व ग्राहकांच्या सोईचे व नेहमीच्याच बाजारात थोडे नावीन्यपूर्ण बदल घडून स्टार बनलेला हा व्यवसाय म्हणजेच “मँक्डोनाल्ड्स”.मँक व डिक या जोडगोळीने चालू केलेल्या या व्यवसायात सुरवातीला बराच नफा मिळवला.यांच्या शाखा आजही देशो विदेशात वाढतच आहेत.

आपणही आपल्या व्यवसायात कहितरी नाविन्यपूर्ण व लोकांची गरज विचारात घेऊन आपला व्यवसाय स्टार बनवू शकता.

स्टार व्यवसाय कसा सुरु करावा?

प्रथम व्यवसाय सुरु करू इच्छीत असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आपले विचार मांडा.

त्यावर सर्व बाजूने विचार करा.

काही नाविन्यपूर्ण करता येईल का याचा विचार करा.

लोकांना कोणत्या सुविधा दिल्या कि लोकांना ते जास्त फायदेशीर होईल व जेणेकरून आपला व्यवसाय वाढेल याचा विचार करा.

जे ४-५ पर्याय मिळतील त्याची नोंद करा.

आठवडाभर याचा विचार करा व परत पुढच्या आठवड्यात एकत्र भेटा.

य परत चर्चा करून या पर्यायातील एक व्यवसाय निवडा व काम चालू करा.

सुरवातील आपला नवा व्यवसाय काय आहे व कसा ग्राहकांना कसा फायदेशीर आहे याची माहिती ग्राहकांना पोहचवा.

ग्राहकांच्या सोईचे व वाजवी किमतीत तसेच दर्जेदार उत्पादन कसे देता येईल यावर लक्ष ठेवा.

पहिल्या ४-५ महिन्यात अपेक्षित २० ते ३० टक्के वाढ दिसत असेल तर आपल्या उद्योगात अजून गुंतवणूक करा.

नव्या शाखा काढण्याचा विचार करा.

ज्या गोष्टी अधिक खर्चिक होत असतील त्या दुसरीकडून कोठून स्वस्तात उपलब्द होत असतील तर तेथून करून घ्या.

कच्च्यामालाची किंमत कशी कमी ठेवता येईल तितका नफा जास्त मिळवता येईल.

तसेच कच्च्यामालाची किंमत कधीही वाढू शकते म्हणून पर्यायी पुरवठादार आधीच शोधा.

नवीन लोकांची भरती करताना जास्त वेळा द्या व पारखून नवी व्यक्ती निवडा जी आपल्या व्यवसायात प्रगती घडून आणेल व आपल्या व्यवसाइक वातावरणात मिसळून जाईल.

स्टार व्यवसाययाचे आधारस्तंभ कोण?

स्टार व्यवसाय हा कंपनीतील प्रथम २० लोकांवर फार अवलंबून असतो.पहिली २० लोकेच कंपनीची दिशा,कंपनी तील कल्चर व कंपनीची वाढ याविषयी महत्वाची भूमिका निभावतात.

म्हणून पहिली काही माणसे निवडताना वेळ देऊन व आपल्या विचारसरणीला अनुकूल असे लोक निवडावेत.

तसेच या लोकांना पुढील काही वर्षात काम्नीतील महत्वाच्या पदावर काम करण्याची लवकर संधी मिळू शकते.

तसेच आपण या पहिल्या २० लोकांना कंपनीतील काही टक्के वाटा देऊन त्यांना कंपनीचे काही भागाचे मालक असल्याचा मान देऊन अधिक चांगले काम व जबाबदारीने काम करवून घेऊ शकतो.

अशा रीतीने अतिशय मस्त व सोप्या भाषेत स्टार व्यवसायाची महिती या पुस्तकात दिलेली आहे.

आमचे मित्र अरविंद गावडे यांनी हे पुस्तक वाचण्यास सुचवले त्याबद्दल त्यांचे जाहीर धन्यवाद!!..

आपणास जर आपल्या व्यवसाय स्टार करायचा असेल तर आपण हे पुस्तक नक्की वाचून घ्या..

[संदर्भ:मेहता पब्लिकेशन: स्टार व्यवसायाची गुरुकिल्ली]

Advertisements