German Basic Question-Answers

जर्मन शिका मराठीतून:भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.


आपण मागील भागात जर्मन सोपी वाक्येप्रश्न कसे तयार करायचे ते पहिले आहेत.या अंकात आपण नेहमीच्या वापरातील प्रश्नोत्तरे कशी करायची ते पाहूया.

बहुदा संभाषणाची सुरवात एकमेकांचे नाव विचारूनच होते.सुरवातीला आपण नाव कसे विचारायचे आणि कोणी आपले नाव विचारल्यावर कसे प्रत्युत्तर द्यायचे ते शिकूया.

इंग्रजीत आपण नाव विचारण्यासाठी What is your name? असे विचारतो.

जर्मनमधून नाव विचारताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो.

१]मराठीतून प्रश्न :आपले नाव काय? [आदरार्थी]
जर्मन मधून प्रश्न : Wie hei ßen sie?
जर्मन उच्चार: वि हायसंन् झि?
२]मराठीतून प्रश्न :तुमचे नाव काय ? [वैयक्तिक नाते/personal]
जर्मन मधून प्रश्न : Wie hei ßt du?
जर्मन उच्चार: वि हाईस्ट डू ?
३]मराठीतून प्रश्न :त्यांचे नाव काय आहे ?
जर्मन मधून प्रश्न : Wie ist ihr name?
जर्मन उच्चार: वि इस्ट ईहर नामं?

या प्रश्नास आपण दोन प्रकारे उत्तर देऊ शकतो.

१]मराठीतून उत्तर :माझे नाव महेश आहे.
जर्मन मधून उत्तर : Mine name ist Mahesh.
जर्मन उच्चार: मायन् नाम् इस्ट महेश.
२] मराठीतून उत्तर :मी महेश आहे
जर्मन मधून उत्तर : Ich hi ße Mahesh.
जर्मन उच्चार:ईश् हायस् महेश.

आपणस “आपण कोठून आलात?” किंवा आपले मुळ ठिकाण कोणते ते विचारचे असल्यास ते कसे विचारतात ते आपण पाहू. आदरार्थी प्रश्न विचारायचे असल्यास “ sie (झि)” वापरतात व इतर वेळी वैयक्तिक संभाषणात “Du (डू )” वापरतात.

मराठीतून प्रश्न : आपण कोठून आलात?”
इंग्रजीतून प्रश्न :Where are you come from?
जर्मनमधून प्रश्न : Woher kommen Sie?
जर्मन उच्चार: वोहेअर कोम्म झि?

तसेच ,

मराठीतून प्रश्न : तुम्ही कोठून आलात?
इंग्रजीतून प्रश्न :Where are you come from?
जर्मन मधून प्रश्न : Woher kommst du?
जर्मन उच्चार: वोहेअर कोम्मस्ट डू ?

या प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाणे देतात.

मराठीतून उत्तर :मी सांगलीमधून आलो आहे.
इंग्रजीतून उत्तर: I am from Sangli.
जर्मन मधून उत्तर : Ich komme aus sangli.
जर्मन उच्चार:ईश् कोम्म आउस सांगली.

याचा प्रमाणे आपण कोठे राहता हा प्रश्न आपण खालील प्रमाणे विचारू शकतो.

मराठीतून प्रश्न : आपण कोठे राहता?
इंग्रजीतून प्रश्न :Where are you living?
जर्मन मधून प्रश्न : Wo wohnen Sie?
जर्मन उच्चार: वो व्होनेन झि?
मराठीतून उत्तर :मी पुण्यामध्ये राहतो.
इंग्रजीतून उत्तर: I live in pune.
जर्मन मधून उत्तर : Ich wohne in pune.
जर्मन उच्चार:ईश् व्होनं इन् पुणे.

आपणस एकमेकांच्या भाषेबद्दल जाणून घायचे असेल तर ते संभाषण आपणास खालील माहितीच्या आधारे उत्तमरीत्या करता येईल.

मराठीतून प्रश्न : आपली मातृभाषा कोणती आहे?
इंग्रजीतून प्रश्न :What is your mother-tongue?
जर्मन मधून प्रश्न : Was ist deine Muttersprache?
जर्मन उच्चार: वास् इस्ट डाईन् मुटरश्प्राख?
मराठीतून उत्तर :मराठी हि माझी मातृभाषा आहे.
इंग्रजीतून उत्तर:Marathi is my mother-tongue.
जर्मन मधून उत्तर : Mine muttersprache ist marathi.
जर्मन उच्चार: माईन् मुटरश्प्राख इस्ट मराठी.

आपणस कोणकोणत्या भाषा येतात याबद्दल संभाषण खालील प्रमाणे करतात.

मराठीतून प्रश्न : आपल्याला कोणकोणत्या भाषा येतात?
इंग्रजीतून प्रश्न :Which languages you can speak?
जर्मन मधून प्रश्न : Welche sprachen sprichst du?
जर्मन उच्चार:वेल्श स्प्राशन् स्प्रिश्ट डू?
मराठीतून उत्तर :मी हिंदी, मराठी ,इंग्रजी  व थोडे जर्मन बोलू शकतो.
इंग्रजीतून उत्तर: I can speak Hindi,marathi,english and somewhat Deutsch language.
जर्मनमधून उत्तर: Ich spreche Hindi,marathi,english und etwas Deutsch.
जर्मन उच्चार: ईश् स्प्राश् हिंदी,मराठी,इंग्लिश,उंड इटवास् डोईश्. 

आपणस जर जर्मन अंकाची ओळख असेल तर आपण जर्मन अंकाशी निगडीत प्रश्नोत्तरे पाहूया.

जर्मन अंकाची ओळख शिकण्यासाठी येथे टिचकी मारा.

मराठीतून प्रश्न : आपला टेलिफोन नंबर काय आहे?
जर्मन मधून प्रश्न : Wie ist Ihre Telefonnummer?
जर्मन उच्चार:वी इस्ट ईहर टेलीफोनुम्मर.
मराठीतून उत्तर :माझा टेलीफोन नंबर एक ,दोन ,तीन हा आहे.
जर्मनमधून उत्तर: Meine telefonnummer ist ein,zwei,drei.
जर्मन उच्चार: माइन टेलीफोनुम्मर इस्ट आईन ,त्साय, ड्राय.
मराठीतून प्रश्न : आपले वय किती आहे?
जर्मन मधून प्रश्न : Wie.alt sind sie?
जर्मन उच्चार:वी आल्ट झिंड झि?
मराठीतून उत्तर :माझे वय तेवीस वर्षे आहे
जर्मनमधून उत्तर: Ish bin dreiundzwanzig jahre alt.
जर्मन उच्चार: ईश् बिन ड्राय-ऊंड-झॉन्झिश यारं आल्ट.

या सर्व प्रश्नाची आपापल्या माहिती नुसार उत्तरे तयार करा व ती सर्व उत्तरे एकत्रितपणे करा तीच होईल आपली जर्मन भाषेतून ओळख.

या भागात आपण स्वतःची जर्मन भाषेत ओळख करून द्याला शिकला आहात.अभिनंदन!!

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂


Advertisements