जर्मन शिका मराठीतून:भाग १]जर्मन भाषेची ओळख:जर्मन मुळाक्षरे.


मराठी लोकांना परदेशी जर्मन भाषा मराठीतून सोप्या पद्धतीने शिकण्याची हा नवा उपक्रम हाती घेत आहोत.

जर्मन सारखी क्लिष्ट भाषा एकदम सध्या सोप्या आणि सरळ शब्दातून आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

परदेश गमन करू इच्छिणार्‍या, नवनवीन भाषा शिकण्यास उत्सुक असणाऱ्या ,नवीन ज्ञान घेवू इच्छिणार्‍या लोकांसाठी जर्मन भाषा आपल्याला मराठी भाषेतून शिकवण्याची संधी उपलब्द्ध होत आहे.

आपले सहकार्य व मार्गदर्शन लाभो हि सदिच्छा !

जर्मन भाषेविषयी:

जर्मन हि जगातील प्राचीन भाषेपैकी एक अशी भाषा आहे.बऱ्याच युरोपियन देशात आजही जर्मन हि प्रमुख भाषा म्हणून वापरली जाते. जसे जर्मन, ऑस्ट्रिया, पोलंड ,डेन्मार्क, स्विझर्लंड व इतर लगतच्या देशातसुद्धा जर्मन हि बोलीभाषा म्हणून वापरली जाते.

जर्मन भाषेत बरेच पुरातन संशोधनीय लेख व भरपूर साहित्य आजही उपलब्ध आहे.या भाषेतील बरेच शब्द हे लँटिन व ग्रीक भाषेशी साधर्म्य दर्शवतात.

कित्येक संगणकीय माहिती व शोधनिबंध ,वेबसाईट आपणास जर्मन भाषेत पहायला मिळतील.जर्मन भाषेला जर्मनमध्ये डॉइच् भाषा असेही म्हंटले जाते.[जसे भारताला हिंदुस्तान म्हणतात आणि भाषा हिंदी तसे जर्मनलाच डॉइच्-लेन्ड म्हणतात व भाषेला डॉइच् भाषा म्हणतात.]

आपणया लेखमालेत जर्मन भाषेची ओळख करून घेवूया.

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे

जर्मन भाषा शिकण्यासाठी इतर नवीन लिपी शिकणे जरुरी नाही.कारण यातील मुळाक्षरे इंग्रजी भाषेशी समांतर आहेत,तसे काही अक्षरांसाठी वेगळे उच्चार आहेत तसेच काही नवीन मुळाक्षरे हि आपण शिकणार आहोत.पण जर आपणास थोडीफार इंग्रजी येत असल्यास तितकी पुरेशी आहे.जर्मन भाषेतील व्याकरण हे संस्कृत भाषेशी समांतर आहे..बाकी जर्मन भाषा हि पूर्णपणे आपण मराठीतून शिकूया..

मुळाक्षरे : 

पुढील तक्त्यात जर्मन मुळाक्षरे त्याचा इंग्रजीतून उच्चार व मराठीतून उच्चार दिला आहे.

जर्मन मुळाक्षरे व उच्चार

जर्मन मुळाक्षरे

इंग्रजी मधून उच्चार

मराठीतून मधून उच्चार

A a

Ah

B b

Bay

बे

C c

Say

से

D d

Day

डे

E e

Ay

F f

Eff

एफ

G g

Gay

गे

H h

Haa

हा

I i

Eeh

J j

Yot

य [योट]

K k

Kah

क्

L l

Ell

एल

M m

Emm

एम्

N n

Enn

एन्

O o

Oh

ओह

P p

Pay

पे

Q q

Koo

को

R r

Err

एर

S s

Ess

एझ्

T t

Tay

टे

U u

Ooh

ओह्

V v

Fow

फ् [फॉव्ह]

W w

Vay

व्हे

X x

Ixx

इक्स

Y y

oop-see-
lohn

य् [यीप्सी लॉन]

Z z

Zett

झ् [झेट्ट]

जर्मन भाषेतील काही विशिष्ट अक्षरे :

Ä ä

Ay

अय् [ए उम्लॅट]

Ö ö

Ooh

ओय् [ओ उम्लॅट]

ß

ess-zett
(s-z ligature)

स्स [एस झेट ]

Ü ü

Uyuh

यऊ [यऊ उम्लॅट]

सर्व अक्षरांचे उच्चार ऐकण्यासाठी येथे टिचकी मारा :– जर्मन मुळाक्षरे व उच्चार

नोंद:

काही विशिष्ट अक्षरांवर “..”हे दोन ठिपके असतात [Ä, Ö, Ü] त्यांना उम्लाउट/ उम्लॅट असे म्हणतात.

लक्षात ठेवण्यासारखे उच्चार :

जोडाक्षरे

उच्चार

ch

श/ख

st

श्ट

sp

स्प

au

आऊ

ei

आय

ie

o

Ö

ओय

मुळाक्षरापासून शब्द तयार करणे:

महेश हे नाव आपण इंग्रजीत mahesh असे लिहतो ते आपणस जर्मन भाषेत  बोलायचे वरील तक्त्याचा वापर करून ते जर्मन भाषेत “em-aa-ha-e-es-ha“ असे उच्चारले जाईल.

आता आपणही आपल्या नावाचा जर्मन भाषेत उच्चार करून जर्मन शिकण्यास श्री गणेशा करा..

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂

आपणास हा भाग कसा वाटला आणि आपणस आणखी काय सुधारणा हव्यात ते नक्की कळवा ! 🙂
Advertisements

18 comments

 1. नमस्कार
  माझे नाव निनाद कुलकर्णी असून माझ्या जर्मन पत्नी समवेत मी जर्मनीत राहतो.
  सुरवातीला तेथे जर्मन शिकावे लागले. मात्र आता बर्या पैकी मोडके तोडके जर्मन बोलू शकतो.
  तुमच्या उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
  अभियांत्रिकी व मेडिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी ही भाषा शिकली तर जर्मनीत उच्च शिक्षणसाठी अनेक सुवर्ण संधी त्यांना सहज उपलब्ध होतील.

  1. निनाद,तुमचे म्हणणे एकदम मान्य आहे.हल्ली प्रत्येकाला इंग्रजी सोबत एक तरी परदेशी भाषा माहित असणे फार फायदेशीर ठरते.
   आपणास माझ्या या जर्मन भाषेच्या उपक्रमात काही सुधारणा सुचवायच्या असतील तर नक्की सांगा.
   आपल्या बहुमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s