German Grammer 1

जर्मन शिका मराठीतून:भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.


आपणस जर्मन भाषेचा वापर करताना थोड्या प्रमाणात व्याकरण येणे जरुरी आहे.आपण त्याचा अभ्यास करून मग पुढे गेलेले सोपे जाईल.

सर्वनामे:

आपण आता थोडे व्याकरणाचे मुद्दे पाहू जेणे करून आपणस वाक्य बनवायला सोपे जाईल.

पुढे आपणासाठी जर्मन नामे व त्यांचे उच्चार दिले आहेत.

एखाद्या वाक्यात “मी“ असेल तर त्याजागी  “ish” वापरले जाते त्याचा उच्चार “ईश्” असा होतो.

आपल्या संदर्भासाठी इंग्रजीतील सर्वनामे सुद्धा तक्त्यात दिली आहेत.

सर्वनामे
जर्मन नामे जर्मन उच्चार इंग्रजीत नाम मराठीत नाम
Ich ईश् I मी
Du डू you (familiar) तू
er, es, sie एअर् ,एस्,झि he, she, it तो ,ती ते
Wir व्हीअर we आपण
Ihr इहर् you (all) तुम्ही सर्व
sie,Sie झि,झि TheyYou[respect] ते सर्वआपण[आदरार्थी]
हा तक्ता व्यवस्थीतपणे पहा आणि समजावून घ्या.हे पाठ करण्याची काही गरज नाही.
आपल्या पुढील अनेक भागात याचा उल्लेख येईल तेंव्हा हे मुद्दे अधिक स्पष्ट होतील.

सध्या वर्तमान काळातील साह्यकारी क्रियापदे :

सध्या वर्तमान काळातील साह्यकारी क्रियापद “Sein”[झाइन]

Present tense of sein = to be =असणे.

जर्मन सहक्रियापदे जर्मन उच्चार इंग्रजीत सहक्रियापदे मराठीत सहक्रियापदे
ich bin ईश् बिन् I am मी आहे.
du bist डू बीस्ट you are (familiar) तू आहेस.
er/sie/es ist एअर् ,एस्,झि –इस्स्ट he/she/it is तो ,ती ते आहेत.
wir sind व्हीअर झिंट we are आपण आहात
ihr seid इहर् झाइड you (plural) are तुम्ही सर्व आहात
sie/Sie sind झि,झि झिंट they/you (formal) are ते सर्व आहेत.आपण[आदरार्थी]
याचा प्रमाणे आपण haben [हँबेन]  = to have =आहे [बाळगणे] याची सध्या वर्तमान काळातील रूपे पाहू. 
सध्या वर्तमान काळात “haben” [हा-बेन]  = to have =आहे.
जर्मन सहक्रियापदे जर्मन उच्चार
ich habe ईश् हाब:
du hast डू हास्ट
er/sie/es hat एअर् ,एस्,झि – हाट्
wir haben व्हीअर हँबेन
ihr habt इहर् हाब्स्त
sie/Sie haben झि,झि झिंट हँबेन
आपण वरील टेबल पूर्ण वाचले असेलच.थोडे किचकट आहे समजून घ्यायला.या क्षणी नाही समजले तरी चालेल कारण जेन्हा आपण या शब्दांचा वाक्यात उपयोग करू तेंव्हा तुम्हाला या गोष्टी आपोआपच लक्षात येतील.तेव्हा परत या पानावर येवून उजळणी करून पुढे समजून घेवू शकता.

आपण काही छोटी छोटी वाक्ये करून पाहुयात म्हणजे आपणस या शब्दांचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते समजेल.

मराठीतून वाक्य: माझ्याकडे एक गाडी आहे.
इंग्रजीतून वाक्य: I have one auto.
जर्मनमधून वाक्य: Ich habe ein Auto.
जर्मनमधून उच्चार :ईश् हाब् आईन आटो.

अजून एक वाक्य करून पाहू….

मराठीतून वाक्य: तुम्ही सगळे विद्यार्थी आहात.
इंग्रजीतून वाक्य: You are are student.
जर्मनमधून वाक्य: Ihr seid studenten.
जर्मनमधून उच्चार : इहर् झाइड स्टुडन्टीन.

हि वाक्ये काही तयार झाली हे समजण्यासाठी वरील तक्त्यांचा वापर करा.

आपणास कोणते नाम व सहाय्यकारी क्रियापदे का वापरला ते लक्षात येईल.

जर्मन भारतील सोपे व्याकरण आपण शिकला आहात..तसेच या व्याकरणाचा वापर करून सोपी वाक्य कशी करायची ते हि शिकूला आहात.आता पुढील भागात प्रश्न कसे तयार करायचे ते शिकूया.

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂


Advertisements