gappa-tappa

लेख : नुसत्याच गप्पा-टप्पा.


..हातात पपेर होता सलील कुलकर्णी चा मस्त लेख वाचत होतो..”कोणीतरी आपल्याला बुद्धिबळातील सोंगटी प्रमाणे एका जागेवरून उचलून दुरीकडे ठेवत असतो आणि आपण अजाणत्या प्यादासारखे मिरवत बसतो कि कसा मी माझा मार्ग बदलला..”..मला लगेच त्याची आठवण आली…
लेख संपवतो तेवढ्यात मला घरातून सांगलीला जायची ऑफर आली..ते पण ३-४ तासासाठी…कंटाळा आलता पण काय ..मी तर काय सांगलीला जायला कधी हि रेडी .त्याला भेटायलापण मिळेल वाटत होते मनातून ..ती पण दिसली तर दिसली मटका….हा जर वेळ मिळाला तर ह..पण मी त्याला भेटण्यापेक्षाही जणू काही त्यानेच अपोइंटमेंट सेट केली होती..तसा जरा जास्तच लवकर सांगलीत पोहचलो..त्यच्या घरासमोर गाडी लावली आणि आत जायला निघलो तसा बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटत होतो..
आत जातात वाकून जात होतो थोडा हसत, थोडा सेंटी होत आणि तोच त्यानेहि मला बघितले त्याचे टपोरे डोळे एकदम चमकले आणि मी हि…मी हसलो, तो थोडाच हसला ..बोलला काय राव फार दिवसांनी आठवन आली..
मी:तशी रोजच येत असते रे, पण तुला माहित आहे ना हल्ली पुण्यात असतो सारखे सारखे नाही होत येणे..
तो:बर मग आज कसे काय आलात..
मी:आपल्याला यायला काही कारण लागत नाही आठवण आली आणि मग आलो..
तो नुसताच हसला..
मी:तुझे कसे काय चाल लय…
तो:काय सांगू आता तुला..
मी:बोल कि…माझ्या पासून काय लपवतोयस..
तो:अरे काही राम राहिला नाही रे कामात..कामापुरते सगळे .. सगळे जन स्वतःच्या कामसाठी येतात..काम झाली आहे छु..
मी:चालायचेच राव..आपण आपले काम करत रहायचे..
तो:कंटाळा आलाय रे कामचा… हल्ली वर्कलोड पण जास्त येतोय ..
मी: आता मी आलोय ना आता फ्रेश होशील…टेंशन घेवू नको रे..
…थोडावेळ तो काहीच बोलला नाही…
तो:तुझ्याकडे काय नवीन खळबळ?
मी:माझी खळबळ काय चालू आहे रे …हळू हळू प्रगतीपथावर..
तो:काय सेटींग लावू काय?
मी:नको रे बाबा..मी करतोय प्रयत्न.. जमले नाही कि शेवटी तुला नाही तर कोणाला सांगणार रे ..
तो:हा हा…..बाकी काय निवांत..
मी : एकदम…हा हा.. तसा नाही यार.. तुलापण माहित आहे पण इट्स ओके चालू आहे..
तो:माझ्यासारखीच तुझी पण अवस्था …
मी:लेका तू पण आज जोक मार्तोयास…. मूड मध्ये आहेस कि..
तो:आज तू आलास ना भेटायला सो….
मी आणि तो फुल्ल हसलो…
(थोडावेळ शांतात)
मी:बर लेका येतो मी..वेळ झाली माझी..जायचं परत पुण्याला..
तो:चाललास..एवढ्यात..
मी हळुवारपणे उलटा फिरून पुटपुटलो..हं परत येइन कि पुढच्या वेळेला…
..मागे त्याच्याकडे पहिले..आता त्याचे डोळे चमकत न्हवते पण माझ्या डोळ्या कडा चमकत होत्या..
मागे देवळाकडे न बघताच मी हात वर करून म्हणटले ..“बाय बाय बाप्पा..”
बाप्पाचा आवाज आला…येत जा भेटायला सांगलीला आल्यावर…आणि अधूनमधून खुशाली पण कळवत जा दगडूशेठ कडून..!!

-MJ [पुनर्प्रकाशित ]

Advertisements