Patent is property

कॉपीराईट हक्क , कायदे व नियमावली.


copy wirte
कॉपीराईट संबंधीत बहुतांशी नियम अनेक देशात समांतरच आहेत, पण काही देशात कॉपीराईट च्या नियमात थोडे बहुत फरक आढळतात.

Berne Convention :

यात नियमावलीत कोणत्या गोष्टी कॉपीराईट केल्या जावू शकतात आणि त्या नंतर त्याचा वापर कसा केला जावा याबद्दल सर्वात जुनी (1886) आंतरराष्ट्रीय दर्जावर मान्यताप्राप्त अशी महिती दिली आहे.

मजेशीर बाब म्हणजे : काही देशात तर अगदी खाजगी पत्रे,हेअरकट,परीक्षेचा पेपर,पुलावरील सजावट अशा गोष्टीही कॉपीराईट करण्यास परवानगी आहे.

रुपांतरीत काम:

यात एखाद्या मूळ गोष्टीला सुधारून किंवा त्यात बदल घडवून तयार केलेले काम यांचा समावेश होतो.

यासाठी मूळ लेखकाची किंवा कलाकाराची परवानगी घेवून याच्या मूळ कलाकृतीचा मान ठेवून नवीन बदल घडवावेत असा संकेत आहे.

अन्यथा कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होऊ शकते.

यात पुढील बाबींचा समावेश होतो:

 • काम निरनिराळ्या भाषेत अनुवादित करणे.
 • कथा,कादंबरी वरून चित्रपट तयार करणे.
 • संगीतात पियानो वर वाजलेले गाणे गिटार साठी बदल घडवून नवीन वाद्य रुपात वाजवणे.
 • कामाचे एकत्रीकरण करणे उदा:साहित्य संच ,महिती कोश.

नोंद : डिजीटल फोर्मेट मधील आवाज ,चित्रे ,अक्षरे जी कॉम्प्युटर द्वारे वाचली जावू शकतात अशा गोष्ठी ही कॉपीराईट मध्ये येतात.

कॉपीराईट च्या मालकासाठी काही खास अधिकार मिळतात यात आर्थिक अधिकार आणि नैतिक अधिकार येतात.

आर्थिक अधिकारात मालक हा कॉपीराईट चा आर्थिकदृष्ट्या फायदा मिळवण्यासाठी वापर करू शकतो:

जसे विकणे, भाडे तत्वावर देते,कामाच्या  प्रतिकृती तयार करणे व विकणे.

नैतिक अधिकारात मालकास आपल्या कामावर आपले नाव लिहिण्याचा व कलाकार आणि काम यामधील लिंक तयार करण्याचा अधिकार मिळतो.

intellectual-property-rights

पुनरावृत्तीचा अधिकार :

रेकॉर्डिंग ,सीडीज, डिव्हीडी असा डिजीटल कंटेंट असो व पुस्तक , पेंटिंग्ज अशा वस्तू असोत एकदा एखादी आवृत्ती प्रसिध्दीस आली की मग लेखक कलाकार यांना त्याच्या पुनर्निर्मितीतून फार आर्थिक लाभ मिळतो.

जसे पुस्तक प्रकाशक पुस्तकाच्या किती आवृत्ती काढेल किंवा गाण्याच्या किती सी डी प्रसारित केल्या जातील यावर मूळ कलाकाराचा किती अधिकार आहे हे ठरविण्यासंदर्भात री प्रोडक्शन कायदा तयार करण्यात आलेला आहे.

यानुसार कॉपीराईट मालकाच्या परवानगीनेच त्याच्या कलाकृतीच्या पुनरावृत्ती तयार करता येतील.

जाहीर प्रसारण व सादरीकरण नियम :

आपल्या घरगुती व खाजगी वर्तुळाच्या बाहेरील व्यक्तींसाठी केलेले व मोठमोठ्या हॉलमध्ये,मॉलमध्ये किंवा मैदानात सादर केलेले प्रोग्रम जाहीर सादरीकरण कायद्यांतर्गत येतात. असे कार्यक्रम करण्याआधी मूळ कलाकारची परवानगी घेणे गरजेचे असते.

प्रसारण कायद्यात रेडिओ ,टेलीव्हिजन,सँटालाईट मार्फत पाठवले जाणारे फोटो ,आवाज व्हिडीओ यांचा समावेश होतो.

बेरणे कन्व्हेन्शन नुसार कॉपीराईट च्या मालकास त्याची कला सादर व प्रसारित करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे.

TRIPS अँग्रीमेंट :

वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अंतर्गत इंटलेक्चुअल प्रोपर्ती च्या व्यापार विषयक बाबींसाठी TRIPS अँग्रीमेंट बनविण्यात आले आहे.

यामध्ये बेरणे कन्व्हेन्शन हून अधिक नियमावली दिलेली आहे.

यात प्रामुख्याने नवीन व्यापार पद्धती, नवीन कलाकृती जसे कॉम्प्युटर प्रोग्रम ,डाटाबेस तसेच नवीन भाडेतत्त्वाच्या पद्धती यांबद्दल नियामावालींचा समावेश करण्यात आला आहे.

कॉपीराईटचा देशाला फायदा :

देशाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कॉपीराईट फार जरुरीचे आहे.

अनेकदा अनेक लोकांच्या आर्थिक योगदानातून व कष्टातून एखादी कलाकृती उदयाला येते व त्याची कला व गुणवत्ता दुसऱ्या कोणीतरी चोरली तर तो सामाजिक व आर्थिक प्रगतीला बाधा आणू शकतो.

तसेच या वाढत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थानिक कलाकारांचे कायद्याने रक्षण होणे गरजचे बनलेले आहे.

कॉपीराईट कायद्याचा काळजीपूर्वक उपयोग करून देशातील स्थानिक कला ,कलाकार,लेखक यांचा संरक्षण देवून देशाची सामाजिक व आर्थिक प्रगतीचे संवर्धन करता येईल.

“पेटंट हीच प्रॉपर्टी” या लेखमालेचे पुढील अंकात पेटंट,कॉपीराईट,ट्रेडमार्क,इंडस्ट्रियल डिझाईन या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल सविस्तरपणे महिती दिलेली आहे .

पुढील महिती  पाहण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.

1 ] ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय ?

2 ] इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी: पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख.

3]  पेटंट्स फाईल करण्याच्या प्रोसेसची महिती.

४] कॉपीराईट प्रोटेक्शन : कलाकारांसाठी कलात्मकतेचा हक्क.

५ ] कॉपीराईट हक्क , कायदे व नियमावली.

-धन्यवाद MJ 🙂

Advertisements

कॉपीराईट प्रोटेक्शन : कलाकारांसाठी कलात्मकतेचा हक्क.


कलाकारांना आपली अनोखी कलाकृती ,नावीन्यपूर्ण साहित्य हीच आपलीची संपत्ती व यांचे कायद्याने रक्षण आणि जतन करणे  हे अतिशय महत्त्वाचे आहे.

भारतातच नव्हे तर जगभरात कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कॉपीराईट प्रोटेक्शन हा कायदा अस्तित्वात आला. याची आपणस महिती असणे फार गरजेचे आहे.

कॉपीराईट प्रोटेक्शन

कॉपीराईट प्रोटेक्शन

भारतात कॉपीराईट १९५७, कायदाच्या अंतर्गत कॉपीराईट चे संरक्षण केले जाते.

भारताची कॉपीराईटसंबंधित अधिकृत वेबसाईट: http://copyright.gov.in/Default.aspx

UK मध्ये कॉपीराईट डिझाईन व पेटंट अँक्ट नावाच्या कायद्यानुसार १९८८ पासून कॉपीराईट चे संरक्षण केले जात आहे.

युनायटेड स्टेटमध्ये कॉपीराईट प्रोटेक्शन करण्यासाठी लिंक : http://www.copyright.gov/

भारतात जसे कॉपीराईट साठी फॉर्म वगेरे भरले जाते तसे युनायटेड किंग्डम मध्ये नाही तेथे नवीन कला तयार झाल्यावर किंवा ते रेकोर्ड केल्यावर आपोआपच ते कॉपीराईट साठी पात्र समजले जाते.

प्रथमतः आपले काम हे कोणाची हुबेहूब नक्कल असतात कामा नये आणि लेखकाने आपली कला व श्रम वापरून ती कलाकृती तयार केलेली हवी.

कॉपीराईट च्या मालकास त्याचा वापर करण्याचे आणि इतरांना त्या कलाकृतीचा अनधिकृतपणे वापर करण्यापासून रोखता येते.

आपल्या डोक्यात नुसतीच आयडिया सुचून चालत नही तर ती कोणत्यातरी पर्मनन्ट फॉर्ममध्ये व्यक्त केलेली हवी जसे पुस्तक,वेबसाईट,मूर्ती किंवा एखादी रचना…तरच आपण ती नावीन्यपूर्ण कल्पना कॉपीराईट साठी ग्राह्यं धरली जाते.

समजा “हँर्री पोर्टर “ याची कहाणी कोणालातरी आधीच सुचली होती आणि ती त्याचा डोक्यात होती असे कोणी सांगत असेल तर ते कॉपीराईट साठी मान्य नाही त्यासाठी त्याने ते फार आधी लिहिले असे याचा लिखित पुरावा हवा.

आपण कोणताही चित्रपट पाहत असताना सुरवातीलाच आपणस एक स्क्रीन दिसते जेथे हा चित्रपट व त्यातील कंटेंट हा कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे असा मेसेज दिसतो.

जर आपण अनधिकृतपणे याची कॉपी केली तर यास व्हिडीओ पायरसी असे म्हणतात, ही कृती कॉपीराईट पायरसी अंतर्गत गुन्ह्यास पात्र आहे.

copyright

प्रोसेस:

आता भारतात आपणस जर कॉपीराईट साठी अर्ज करायचा असल्यास त्यासाठी कोणती प्रोसेस करावी लागेल याची महिती दर्शविणारा फ्लो चार्ट पुढे दिलेला आहे:

फॉर्म भरण्यापासून ते आपला अर्ज मान्य होई पर्यंत आपली ही प्रोसेस चालू राहते.

भारतातील कॉपीराईट प्रोटेक्शन प्रोसेस

भारतातील कॉपीराईट प्रोटेक्शन प्रोसेस

कॉपीराईट लायसन्स फी :

 • भारतात फी २००० ते ५००० च्या दरम्यान आहे.
 • सध्याच्या फी बाबतील अधिक महिती घेण्यासाठी पुढील लिंक पहावी.
 • लिंक :http://copyright.gov.in/frmFeeDetailsShow.aspx

भारतातील कॉपीराइट चा कालावधी:

 • लेखन
 • नाटक
 • संगीत
 • कलात्मक काम फोटोग्राफ
लेखकाच्या जीवनकाल पर्येंत +लेखकाच्या मृत्यू नंतर ६ वर्षे.
 • सिनेमा
 • रेकॉर्डिंग
 • शासकीय काम
 • निनावी व्यक्तीचे काम
काम प्रकाशित झाल्यानंतर पुढची ६ वर्षे.

भारतीय काम :

 • लेखन नाटक कला संगीत काम ज्याचा लेखक वा निर्माता हा भारतीय असेल किंवा ते प्रथम भारतात प्रदर्शित झालेले असेल किंवा ते काम करत असताना लेखक त्या कालावधीत भारताचा नागरिक असला पाहिजे.

कॉपीराईटचे प्रकार :

लेखन काम:

 • लेखन कामाचे प्रोटेक्शन हा कॉपीराईट च महत्वाचा प्रकार आहे.
 • यात लिहिलेले लिखाण,पत्र,रिपोर्ट,गाण्याच्या ओळी,पत्रक , लेक्चर अशांचा समावेश होतो.
 • कॉम्प्युटर क्षेत्रातही प्रोग्राम्स व कॉम्प्युटर मधील डाटाबेस आपण कॉपीराईट करू शकतो.
 • आपण एखादे काम कसे होते हे सांगणारे महिती पुस्तक लिहिले तरी ते कॉपीराईट साठी पात्र असते.
 • तसेच आपल्या वेबसाईट वरील आपल्या बिझनेसशी संलग्नित महिती ही पण कॉपीराईट ने प्रोटेक्ट करू शकतो.
 • तसेच आपण कोणत्याही भाषेत लिहिलेले पुस्तक हे कॉपीराईट प्रोटेक्टेड करू शकतो.

कलाकृतीचे काम :

 • ग्राफिक्स,फोटोग्राफी,पेंटिंग,आकृती,नकाशे , मॉडेल्स ,मूर्ती रचना अशा कलाकारांना घडवलेल्या नाविन्यपूर्ण गोष्टी कलाकृतींचे कॉपीराईट यात समाविष्ट होतात.

नाटक काम :

 • नाटक,नृत्य,नाटकावर आधारित चित्रपट,टेलीव्हिजनवरील जाहिरात किंवा प्रोग्रँम हे नाटक काम या भागात मोडतात.

संगीत काम :

 • यात गायन व वाद्य संगीत यांचा समावेश होतो.

चित्रपट :

 • कोणतेही चलचित्र व टेलीव्हिजन प्रोग्राम्स या अंतर्गत येतात.
 • ध्वनीफिती सारखे नाविन्यपूर्ण काम ही आपण कॉपीराईट प्रोटेक्टेड करू शकतो.

आता पुढील भागात आपण कॉपीराईट कायद्याचे अंतरंग पाहुयात व अधिक महिती मिळवून त्याचा जास्तीत जास्त वापर करुया..

पेटंट हीच प्रॉपर्टी” या लेखमालेचे पुढील अंकात पेटंट,कॉपीराईट,ट्रेडमार्क,इंडस्ट्रियल डिझाईन या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल सविस्तरपणे महिती दिलेली आहे .

पुढील महिती  पाहण्यासाठी खालील लिक वर टिचकी मारा.

1 ] ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय ?

2 ] इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी: पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख.

3]  पेटंट्स फाईल करण्याच्या प्रोसेसची महिती.

४] कॉपीराईट प्रोटेक्शन : कलाकारांसाठी कलात्मकतेचा हक्क.

–BolMJ 🙂

ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय ?


आजच्या जगात आपले ज्ञान आणि आपली क्रिएटीव्हीटी हीच आपली सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी बनली आहे आणि तिचे रक्षण करणे हे आपले कर्त्यव्य आहे.याच ज्ञानाच्या आधारे आपण स्वतः व आपली कंपनी पैसे कमवू शकतो व आपली मालकी हक्क शाबूत ठेवू शकतो.

लेखकाला आपले नावीन्यपूर्ण लिखाण ,वादकाला आपली धून,संशोधकाला आपले संशोधन, डिझायनर ला आपले डिझाईन ,कंपनी मालकाला आपल्या कंपनीचा लोगो या गोष्टी फार मोलाच्या असतात त्यामागे त्यांचे वर्षांचे कष्ट, बहुमुल्य वेळ आणि पैसे खर्च झालेले असतात त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे जरुरीचे ठरते अन्यथा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

यासाठीच इंटलेक्चुअल प्रॉपर्टी या कायद्यांतर्गत वरील बाबींना कायदेशीर संरक्षण दिले जाते.

यास इंटलेक्चुअल प्रॉपर्टी कायदा किंवा आय पी (IP) राईटस् असे म्हणतात.अशा तऱ्हेने कलाकारांच्या कलात्मकतेने संरक्षण आणि संवर्धन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मार्फत केले जाते.

या लेखमालेत लेखक ,वादक ,कलाकार,विक्रेते,डिझायनर ,संशोधक ,उद्योगपती, चित्रकार ,कारागीर अशा लोकांसाठी कोणत्या बाबी गरजेच्या आहेत याची सखोल महिती सोप्या भाषेत देण्यात आलेली आहे.
तसेच ही लेखमाला सर्वसामान्य लोकांना समजण्यास सोपे जावे अशा रीतीने तयार केले आहे.

मशिनरीचा संशोधक,पुस्तकाचा लेखक,गाण्याचा कवी ,संगीतकार,हे स्वतः नवनिर्माण करत असतात आपण त्यांचे महान काम त्याच्या मालकी हक्काला बाधा पोहचून जसेच्या तसे कॉपी करू वा विकू शकत नाही.

ती त्यांची मालकी असते ज्ञान हीच त्यांची प्रोप‍‌‌‍र्टी असते.

त्या प्रोप‍‌‌‍र्टीचा मालक ती स्वतः साठी मोफत व स्वतः कसे हवे तसे वापरू शकतो व दुसऱ्यांना तीच प्रोप‍‌‌‍र्टी वापरण्यासाठी भाडे लावू शकतो किंवा ती प्रोप‍‌‌‍र्टी विकू शकतो.

बऱ्याच वेळा काही डिझाईन किंवा संशोधन हे काही लोकांच्या समूहाने किंवा कंपनीतील संशोधकाने जरी केले असतील तरी त्याची मालकी ही कंपनीकडे राहते.

आपण जेव्हा एखादी आय पी प्रोटेक्टेड गोष्ट खरेदी करतो तेंव्हा त्या पैशातील काही हिस्सा हा मूळ मालकाला त्याच्या श्रम आणि पैसे कलात्मक काम यासाठी मोबदला म्हणून दिला जातो यास रॉयल्टी असे म्हणतात.

यामुळेच उद्योग जगतात नवनवीन कल्पना आणि नवीन कलात्मक काम यास चालना मिळू लागलेली आहे.

पेटंट,कॉपीराईट,ट्रेडमार्क,इंडस्ट्रियल डिझाईन याच आहेत इंटलेक्चुअल प्रॉपर्टी.

 इंटलेक्चुअल प्रॉपर्टी.

इंटलेक्चुअल प्रॉपर्टी.

 इतिहास :

मानवाची इतिहासातील घोडदौड ही मानवाच्या विचार करण्याच्या नव्या वृत्ती ,प्रोब्लेमवर मात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नवनवीन क्लुप्त्या ,नाविन्यता कलात्मकता यावर आधारित राहिली आहे.

पौराणिक काळापासून माणूस अगणित शोधांच्या आधारावरच प्रगती करत आलेला आहे.

नोंदीप्रमाणे १८६७ साली जर्मन मध्ये प्रथम इंटलेक्चुअल प्रोपार्ती कायद्याचा वापर केला गेल्याचे आढळते नंतर जिनेव्हा येथे १९६८ ला स्थापित झालेल्या वल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन द्वारे युनायटेड स्टेट्समधील इंटलेक्चुअल प्रॉपर्टी व्यवस्थापन पहिले जाते.

पूर्वीच्या काळीही बऱ्याच देशात संशोधकाला आपले संशोधन मर्यादित काळासाठी वापरण्याची मुभा दिली जायची तसेच जे संशोधन गरजेचे आहे ते करण्यासाठी मानधनही दिले जाई.

उद्देश :

 • कलाकार व कलात्मक लोकांना त्यांच्या रचणे बद्दल संरक्षण देणे.
 • इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे मालकी हक्क आर्थिकदृष्ट्या फायदा मिळवण्यासाठी ती कलाकृती भाड्याने देऊ शकतात किंवा विकू शकता येतात.
 • समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लावते.
 • कलाकारास त्याच्या कलाकृतीवर आपले अधिकृतरित्या नाव लिहिण्यासाठीचा नैतिक अधिकार मिळतो.
 • कलाकृतीच्या किंवा संशोधनाच्या गैरवापरास व अनैतिक वापरास आळा बसतो.
 • ज्ञान हे समस्त जगासमोर खुले होऊन संशोधन वृत्ती वाढीस लागते.
 • बिझनेसच्या वृद्धी साठी पूरक वातावरण निर्मिती होऊन ग्राहकांना निरनिराळ्या प्रोडक्ट्स मधील फरक ठळकपणे करता येतो.
 • लेखकांना व डिझाईन यांच्या क्रिएटीव्ह रचनेचे अनधिकृत कॉपी करण्यापासून संरक्षण होते.

या संरचनेमुळे रचनाकारची ऑफिशियल नोंदणी होते. तसेच या माध्यमातून बऱ्याच महत्त्वाच्या महितीचे एकत्रितरीत्या जतन केले जाते.

भारत सरकारच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी साईटला भेट देण्यासाठी पुढील लिंकवर टिचकी मारा.

लिंक : http://www.ipindia.nic.in/

“पेटंट हीच प्रॉपर्टी” या लेखमालेचे पुढील अंकात पेटंट,कॉपीराईट,ट्रेडमार्क,इंडस्ट्रियल डिझाईन या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल सविस्तरपणे महिती दिलेली आहे .

पुढील महिती  पाहण्यासाठी खालील लिक वर टिचकी मारा.

1 ] ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय ?

2 ] इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी: पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख.

3]  पेटंट्स फाईल करण्याच्या प्रोसेसची महिती.

–BolMJ 🙂