लेखक: bolMJ

मी महेश जाधव ....MJ.. :) माझा छंद : https://bolmj.wordpress.com संपर्क पत्ता :mahesh7197@gmail.com धन्यवाद!!

भविष्यातील बदलते टेक्नोलॉजीचे जग : नाविन्यपूर्ण स्मार्ट तंत्रज्ञान , मार्ग व संधी.


बटणाचा मोबाईल ते टच स्क्रीन स्मार्ट फोन ,कॉम्प्यूटर ते लँपटोप ते आता टँबलेट कॉम्प्युटर असे बदल आपल्या समोर झपाट्याने बदलत आहेत. टेक्नोलॉजीचे जग आता एका नव्या वळणावर आहे.

पुढील टेक्नोलॉजी कशी असेल कोणते नवे मार्ग खुले होतील,कोणत्या संधी बाजारात उपलब्द असतील,कोणत्या गोष्टीचे शिक्षण आपण भावी काळासाठी घेतले पाहिजे ,कोणते उद्योग धंदे पुढील काळात चालतील याचा एक आढावा या लेखात घेण्यात आलेला आहे. याचा आपणास पुढील दिशा ठरविताना नक्कीच फायदा होईल.

 

mj

मोबाईल क्रांती :

मोबाईल हे भविष्यातील सर्व काम करताना लागणारे सहाय्यक मशीन म्हणून काम करेल.त्यासाठी त्याला जास्त क्षमतेचे प्रोसेसर्स असतील ,जास्त मेमेरी असेल तसेच मोबाईल घरातील मशीनचा रिमोट कंट्रोलर म्हणून काम करेल. येत्या काळात बरेच आर्थिक व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून होतील त्यामुळे पैसे ,क्रेडीट कार्ड या पेक्षा मोबाईलचा वापर करून आर्थिक उलाढाल करण्यात लोकांचा कल राहील.

हे तंत्रज्ञान हळूहळू वाढत आणि बदलत असले तरी थोड्या वर्षांनी हे स्टेबल होईल व त्यातून रोबोटिक बेस्ड नवीन क्रांतिकारक तंत्रज्ञानाचा जन्म होईल पुढील विभागात अशा काही तंत्रज्ञानाचा उल्लेख केलेला आहे.

त्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत नवनवीन मोबाईल अप्लिकेशन लिहिणाऱ्या लोकांना वाव राहील आपण विचार हि केला नसेल असे उद्योग मोबाईल अप्लिकेशन च्या रूपाने ऑनलाईन होतील.

या विभागातील प्रस्थापित कंपन्यांना स्पर्धा करून नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्या पुढे जातील.

मोबाईलवर जास्तीत जास्त इंटरनेटवरील डाटा वापरला जाईल त्यामुळे डाटा पुरवणाऱ्या कंपनांच्यामध्ये ज्याच्याकडे जलद डाटा पुरवण्याची क्षमता आणि तांत्रिक बाजू आहेत ती कंपनी पुढे मार्गक्रमण करेल.

लोकांच्या वाढत्या डाटा ची मागणी व वेगवेगळ्या मार्गाने मिळणारे इंटरनेट या पुढे हि जाऊन प्रत्येकाचा डाटा क्लाउड सारख्या एकाचा मोठ्या सर्व्हर मध्ये साठवला जाऊन गरज पडल्यास त्या व्यक्तीला पुरवला जाईल.प्रत्येकाचे स्वतःचे अनेक मोबाईल सारखे उपकरणे असतील व अनेक मोबाईल बरोबर जोडले जाण्यासाठी क्लाउडचा वापर केला जाईल.

या बरोबर मोबाईल सामर्थ्यवान बनतील त्याचा बरोबर त्यांच्या सुरक्षिततेचा व त्यातील माहिती गुप्तते चा प्रश्न उपस्थित राहील. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनींना हे चेलेज आहे.

रोबोटिक : ड्रोन (उडते रोबो ):

येत्या काही वर्षात आपल्या कामाला सपोर्ट करणारे काही रोबो पाहण्यात येतील पण अजूनही ते तंत्रज्ञान म्हणावे इतके प्रगत होईल कि नाही यात शंका आहे.रोबो प्रयोग शाळेच्या बाहेर येऊन व्यवहारी जगात काम करण्याचाचे पाहण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

पण काही ठराविक काम करणारे रोबोटिक हात किंवा मशीन आपण मोठ्या प्रमाणात उद्योजिक विभागात काम करताना पाहू शकतो.

नवीन रोबोट प्रकार उडते रोबो अर्थात ड्रोन सध्या चर्चेत आहेत याचा वापर भविष्यात पार्सल पुरविण्यासाठी किंवा व्हिडीओ शुटिंगसाठी व करमणूक करण्यासाठी होवू शकतो.पण ते खुल्या वातावरणातील वापरासाठी सक्षम होतील कि नाही यात शंका आहे.त्यासाठी केमेरा असलेले व जी पी एस तंत्रज्ञान (लोकेशन ओळखण्यासाठी) वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे कौशल्य सध्या केले जाऊ शकते.

खाजगी कामासाठी पर्सनल रोबोट्स किंवा व्यवसायातील कामासाठी मदतनीस म्हणून रोबोट्सचा वापर केला जाईल.रोबोट्स बनवणाऱ्या व त्यांचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी बऱ्याच कंपन्याची गरज भासेल.

आर्टीफिशियल इंटीलीजंस (कृत्रिमरीत्या बनवलेली बुद्धिमत्ता ) :

काही रोजच्या जीवनातील ठरलेल्या गोष्टी साठवून त्यानुसार निर्णय क्षमता असलेली बुद्धिमत्ता तयार करणे यावर शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे.अशी बुद्धिमत्ता रोबोट ,मोबाईल कार या सारख्या उपकरणात काही प्रमाणात पाहण्यास मिळतील.यासाठी आपण रोज करणाऱ्या गोष्टी व त्या नंतर आपण घेणारे निर्णय याचा अभ्यास करणारे सोफ्टवेअर लिहिले जाईल व आपले निर्णय स्वयंचलित करण्याकडे भर राहील.या विभागात फार प्रगती अपेक्षित आहे परंतु त्याचा व्यवहारात वापर कसा केला जाईल याकडे लक्ष राहील.

आपोआप परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय घेणारे काही बुद्धिमान उपकरणे आपण भविष्यात पाहू शकू यात शंकाच नाही.

क्लाउड स्टोरेज (बाहेरील मेमरी स्टोरेज ):

सर्वांनाच आपला डाटा ठेवण्यासाठी भरपूर जागा लागत आहे.पण आपण सर्वच डाटा कायम वापरत नाही.त्यामुळे सर्व माहिती एका सर्व्हर सिस्टीम मध्ये ठेवली जाते. आपण ती माहिती निरनिराळ्या ठिकाणाहून व वेगेवेगळ्या कॉम्प्यूटर किंवा मोबाईल चा वापर करून वापरू शकतो.त्या साठी हाय स्पीड इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती हवी त्या वेळी डाऊनलोड केली जाते व माहितीमध्ये बदल करून झाल्यावर ती अपलोड केली जाते. यामुळे दुसऱ्या ठिकाणाहून हि माहिती पाहणाऱ्याला अद्यावत लेटेस्ट माहिती मिळते.

बिग डाटा या सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून या मोठ्या डाटा वर प्रोसेसिंग करून त्याचे अँनेलीसीस करून त्याद्वारे उपयुक्त ट्रेंड्स किंवा ग्राफ्स तयार करून अनोखी माहिती जमा करण्याचे तंत्रज्ञानहि वेग घेत आहे.

क्लाउड स्टोरेज म्हणजे दुसऱ्याच्या मोठ्या कॉम्प्युटरवर आपली माहिती इंटरनेटचा वापर करून साठवणे. क्लाउड स्टोरेजसाठी मोठमोठे डाटा स्टोरेज उघडले जातील.त्यांच्या मेंटेनन्स व सुरक्षितेसाठी तांत्रिक लोकांना मागणी राहील.तसेच हँकर्सचा धोका चुकवून सर्व माहिती कशी सुरक्षित ठेवता येईल या दृष्टीने तज्ञाची पुढील वाटचाल राहील.

प्रोसेसर्सनी जोडलेले जग :

इंटरनेट ऑफ थिंग्स या नावाने बरेच तांत्रिक बदल होत आहेत. या मध्ये घरातील व उद्योगातील रोजच्या वापरातील गोष्टी ऑटोमेटिक करण्यासाठी त्या मध्ये लहान लहान प्रोसेसर्स वापरले जाऊन ते एकमेकांना जोडले जाऊन माहितीचे आदानप्रदान करतात.याचा वापर करून आपणास मोबाईलचा वापर करून घरातील एखादी मशीन कंट्रोल करता येऊ शकेल किंवा त्या मशीनचा स्टेटस पाहता येऊ शकेल. तसेच या मशीन्स स्वतः काही निर्णय घेवू शकतील अशा अद्यावत बनवण्यात येतील व सर्व गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्याने एक माहितीची साखळी तयार होईल.त्या माहितीचा व जोडल्या गेलेल्या उपकरणांचा पुढे कसा वापर केला जाईल हे पाहण्यासारखे असेल.

स्मार्ट कार :

कार हि भविष्यातील सुपर कॉम्प्यूटरसारखी स्मार्ट व अद्यावत घरासारखी सुख सोयीनी युक्त असेल.आज काल बऱ्याच लोकांचा फार वेळ कार मधून प्रवास करण्यात जातो हा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी कार मध्ये करमणुकीची साधने डिस्प्ले स्क्रीन्स ,वायरलेस इंटरनेट कनेक्शन पुरवण्यात येईल.तसेच कारच्या सुरक्षिततेसाठी फार नवीन प्रयोग चालू आहेत. स्वयंचलित कार आपणास भविष्यात रस्त्यावर धावताना दिसतील त्यासाठी जगप्रसिद्ध  कंपनीच्या द्वारे प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.वेगवेगळे सेन्सर्स कँमेरे ,अडथळा शोधणारी सिस्टीम तयार केली जाऊ शकते. प्रत्यक्ष रस्त्यावर येणाऱ्या अनपेक्षित अडथळया वर मात करून पुढे जाण्याची क्षमता असणारी बुद्धिमान कार आपण पाहू शकाल. स्मार्ट कार हे फार आव्हानात्मक क्षेत्र आहे यात फार वेगाने सकारात्मक बदल होत आहे.

तसेच इंटरनेट जी पी एस चा वापर करून आपणस आपोआप इच्छित स्थळी  सुरक्षित पोहचवणारी आपणास नक्कीच आवडेल.

अँग्म्युन्टेड रिआलिटी (आभासी अस्तित्व ):

आपल्या समोर आभासी जग उभे करून आपणस त्या जगाशी कनेक्ट करण्यास मदत करणारे हे तंत्रज्ञान आहे. मोबाईलला जोडता येवू शकणारे गॉगल्स, वी आर डिस्प्ले हे हेल्मेट सारखे दिसणारे व आपल्या दोन्ही डोळ्यांजवळ लावता येणारे डिव्हाइस पुढील जगाची करमणुकीची साधने असतील.याचा वापर करून त्या स्पॉटवर आपण स्वतः आहोत अशी अनिभूती घेऊन चित्रपट किंवा व्हिडीओ पाहता येऊ शकतो. याचा वापर गेम्स खेळण्यासाठी तसेच क्रीडा सामने पाहण्यासाठी केला जाऊ शकतो.या व्हर्त्युअल रिआलिटी चा आपल्या रोजच्या जीवनात वापर करून त्या मध्ये आपण अँग्म्युन्टेड रिआलिटी द्वारे रंग भरू शकतो. यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी कँमेरा तसेच इंटरनेट द्वारा मिळणारी माहिती व प्रोसेसर्सची बौद्धिक निर्णय क्षमता याचा वापर करून दृश्य जग व आभासी जग यांचा सुंदर मिलाफ करता येऊ शकेल व याचा वापर जाहिरात उद्योगात,  करमणुकीच्या क्षेत्रात भविष्यात केला जाऊ शकतो.हे क्षेत्र सध्या हळूहळू वाढत आहे. महाग डिव्हाइसला काही पर्याय निघाल्यास हे क्षेत्र सर्वसामान्यांना रोमांचकारी ठरेल.

स्मार्ट सिटी :

स्मार्ट सिटी हे आधुनिक ,विकसित ,अद्यावत शहर कसे असावे याचे मॉडेल आहे.भविष्यात बऱ्याच स्मार्ट शहरांचा विकास केला जाऊन त्या द्वारे ओद्योगिक व नागरी जीवनमान उचावले जाईल.यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामात वापर करून सर्व प्रोसेस झटपट व सोयीची करण्यास भर राहील. शहरातील दळणवळण व वाहतुकीची साधने हे एकमेकांशी संगणकाचा वापर करून जोडले गेलेले असेल.व नागरिक स्वयंचलित वाहनांचा वापर करतील तसेच सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन केले जातील. शहरातील कार्यालयीन कामकाज पेपरचा वापर न होता पूर्णपणे संगणकीकृत होईल.यासाठी सर्व शाखांचे तज्ञ यांना संगणकाचा व इंटरनेटचा वापर करून आपापले क्षेत्र कसे अत्याधुनिक केले जाईल याचा अभ्यास करून अंमलबजावणी करणे गरजेचे राहील.या द्वारे आपल्याच शहरात व्यवसायाच्या व नोकरीच्या नवनवीन संधी मिळतील.

वर उल्लेख केलेली क्षेत्रे भविष्यात आपणासाठी नवे मार्ग व संधी निर्माण करतील त्यासाठी आपण आत्तापासूनच सज्ज राहिलेले गरजेचे राहील.

वरील टेक्नोलॉजी प्रमाणेच अजूनही भरपूर तंत्रज्ञान वेगाने पुढे येत आहे पण त्यातील अतिशय महत्त्वाच्या भविष्यातील तंत्रज्ञानाचा उल्लेख या लेखात करण्यात आलेला आहे.

नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर केल्यास आपण आपल्या उद्योगात भरभराट करू शकतो.सध्या स्टार्ट अप्सचा जमाना आहे यात वरील उल्लेखलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानावर नवीन स्टार्ट अप कंपनी चालू करू शकता.

अशा तर्हेने आपण भविष्यातील बदलते टेक्नोलॉजीचे जग व त्या द्वारे मिळणाऱ्या संधी व प्रगतीचे मार्ग पाहिलेत.आपण हे नाविन्यपूर्ण स्मार्ट तंत्रज्ञान आत्मसाद करून प्रगती साधाल हि सदिच्छा .

आपणस या बाबत कोणत्याही शंका असल्यास नक्की कळवा.

धन्यवाद MJ🙂

बिट्स असोसिअशनचा संशोधन क्षेत्रातील जागतिक पुरस्कार महेश जाधव यांना जाहीर !


बिट्स इंटरनँशनल अँलुम्नी असोसिअशन दर तीन वर्षांनी ३० वयोगटाच्या आतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जगभरातील ३० माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देवून त्यांचा कार्याचा सन्मान करीत असते.

ज्या तरुणांनी वेगळा विचार करून त्या अनुरूप कृती करून नवनिर्माण केला आहे ,ज्यांनी जुन्या गोष्टींना चेलेंज करून त्यांच्या क्षेत्रात नवीन मार्ग निर्माण केला आहे अशा तरुणांना हा पुरस्कार दिला जातो

कला, समाजसेवा, अध्यापन, उद्योजक, संशोधन, लीडरशिप, क्रीडा या विभागात उल्लेखनीय कामासाठी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.

जगभरातील बिट्सियन साठी उत्सुकतेचा ठरलेला या वर्षीचा २०१५ बिट्स इंटरनेशनल “गोल्बल ३० अंडर ३०” हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.दिग्गज अशा निवड मंडळाच्या जवळपास ३ महिने चाललेल्या प्रोसेस मार्फत १३० जणांना नॉमिनेट करण्यात आले होते व यातून अंतिम ३० सुपरस्टार्सची निवड करण्यात आली आहे.

दैनिक पुढारी (७ डिसेंबर २०१५ ) सांगली

दैनिक पुढारी (७ डिसेंबर २०१५ ) सांगली

यामध्ये सांगलीचे महेश संभाजी जाधव यांना त्यांच्या इन्व्हेनशन आणि इनोव्हीजन मधील कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.ग्राफिक्स व मोबाईल प्रोसेसर्स विषयक संशोधनाबद्दल त्यांचे ४ युनायटेड स्टेट्स पेटंट प्रकाशित झाले आहेत. संशोधन व तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर ६ उल्लेखनीय पुस्तके लिहून ज्ञानाचा जगभर प्रसार करण्याच्या यांच्या कार्याबद्दल त्यांना संशोधन विभागातील जागतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

BITS_FB

माहिती : महेश संभाजी जाधव

 • बिट्स इंटरनेशनल अँलुम्नी असोसिअशन मार्फत २०१५ च्या “३० वर्षाच्या आतील ग्लोबल ३० व्यक्ती” या अँवॉर्डने इन्व्हेनशन आणि इनोव्हीजन मधील कार्यासाठी सन्मानित.
 • बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स ,पिलानी राजस्थान मधून मास्टर्स ऑफ सायन्स इन सॉफ्टवेअर सिस्टिमचे शिक्षण.
 • वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली मधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
 • सध्या बेंगलोर मधील कॉलकॉम या मोबाईल प्रोसेसर्सच्या कंपनीमध्ये सिनियर इंजिनीअर म्हणून कार्यरत.
 • याआधी एनव्हीडीया या ग्राफिक्स प्रोसेसर्स कंपनीमध्ये ५ वर्षे काम केले आहे.
 • कॉलकॉम कंपनीतील उत्कृष्ट कामासाठी कॉलस्टार (Qualstar) पुरस्कार प्राप्त.
 • एक्सटर्नल ग्राफिक्स प्रोसेसिंग तंत्रज्ञानाचे संशोधक व आद्य प्रणेते (first inventor).
 • ग्राफिक्स प्रोसेसर्स आणि मोबाईल प्रोसेसर्स तंत्रज्ञानावरील संशोधनावरील ४ पेटंट युनायटेड स्टेट्स मध्ये प्रकाशित.
 • वर्ल्ड इंटलँक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन शिकागो कडून पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क विषयक सर्टिफिकेशन प्राप्त.
 • संशोधन विषयक जागृतीसाठी व प्रसारासाठी “ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क” हे संपूर्ण कायदेशीर व तांत्रिक माहिती देणारे पुस्तक प्रकाशित.
 • तरुण मुलांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होण्यासाठी “मी संशोधक होणारच “ नावाचे संशोधनाचा पद्धतशीर महामार्ग दाखवणाऱ्या पुस्तकाचे लेखन.
 • उच्च तांत्रिक ज्ञानाच्या प्रसारासाठी “Linux Device Driver” हे संगणक प्रणालीवरील पुस्तक इंग्रजी तसेच मराठी भाषेत प्रसारित केले आहे.
 • प्रोग्रामिंग भाषा सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी “Quick Revision of C programing” हे ई-पुस्तक जगभरातील वाचकांनी नावाजलेले आहे.
 • झटपट जर्मन भाषा शिका मराठीतून” नावाचे जर्मन भाषा मराठीमधून शिकवणारे अनोखे पुस्तक प्रकाशित, यास मराठी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
 • तसेच आधुनिक टेक्नोलॉजी वर आधारित “Software Testing in Multimedia and Graphics” या तांत्रिकदृष्ट्या संपन्न पुस्तकावर सध्या काम करीत आहेत.
 • विशेष म्हणजे सर्व मराठी पुस्तके गुगल बुक्स व गुगल प्ले स्टोअर मध्ये ई – बुक्स च्या माध्यमातून मोफत उपलब्द आहेत.
 • वाचकांबरोबर संवाद साधण्यासाठी व नवनवीन माहिती मराठी भाषेत मराठी लोकांपर्यंत प्रकाशित करण्यासाठी ब्लॉग वेबसाईट bolmj.wordpress.com चा वापर. यास आत्ता पर्यंत ६० हजाराहून अधिक लोकांनी भेट दिलेली आहे.यामध्ये बऱ्याच परदेशी मराठी वाचकांचा समावेश आहे.
 • जगभरातील सर्वोच्च ज्ञान सर्वांसाठी खुले, मोफत व समजण्यासाठी सोप्या रुपात व मातृभाषेतून आणण्याचे ध्येय समोर ठेवून ज्ञान प्रसारासाठी “हाय-टेक-इझी” प्रकाशनाची स्थापना केली आहे.
 • याच बरोबर लेटेस्ट टेक्नोलॉजी नुसार अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे अँकँडमिक बोर्ड मेंबर म्हणून कार्यरत.
 • सांगली आकाशवाणीच्या युवा वाणी कार्यक्रमात सहभाग घेवून जर्मन भाषेचे मराठीशी नाते व लिनक्स प्रणालीचे महत्व याबद्दल कार्यक्रम प्रसारित केले आहेत.
महाराष्ट्र टाईम (८ डिसेंबर २०१५ ) कोल्हापूर

महाराष्ट्र टाईम (८ डिसेंबर २०१५ ) कोल्हापूर

संपर्क:

Sakal News 14 DeC 2015

सकाळ सांगली १४ डिसेंबर २०१५

अँपल कंपनीच्या नवीन मँकबुक एयर लँपटॉप मध्ये अनोख्या “यु.एस.बी.- सी” पोर्टची घोषणा !


अँपल कंपनीने नुकत्याच कँलिफोर्नियामधील सोहळ्यामध्ये २ पाउंड वजनाचा हलका १२ इंची बरेच आकर्षक फीचर्स असलेला मँकबुक एयर लँपटॉप प्रदर्शित केला.

अँपल कंपनीच्या नवीन १२ इंची मँकबुक एयर मध्ये डाटा ,ऑडीओ,व्हिडीओ ट्रान्सफर करण्यासाठी नाविन्यपूर्ण “यु.एस.बी.- सी” नावच्या पोर्टची घोषणा करण्यात आली.

usbc मेक बुक लौंच

खास वैशिष्ट्ये :

 • नाविन्यपूर्ण असा प्रत्येक ‘कि’ साठी वेगळी एल ई डी संरचना असलेला कीबोर्ड.
 • १२ इंची अतिशय सुरेख व आकर्षक अशा रेटीना डिस्प्ले
 • 88mm इतका कमी जाडीचा संपूर्ण लँपटॉप
 • इंटेलचा अत्याधुनिक असा कोअर एम प्रोसेसर हि या मँकबुक एयर लँपटॉपची प्रमुख वैशिष्ट्ये .

आपण आपल्या लँपटॉपला अनेक डिव्हाईस जोडण्यासाठी वेगवेगळे पोर्ट वापरतो जसे पेन ड्राईव्ह जोडण्यासाठी यु एस बी ,डिस्प्ले जोडण्यासाठी व्ही जी ए किंवा डिस्प्ले पोर्ट वापरतो, चार्जिंग करण्यासाठी चार्जिंगचे पोर्ट असे कितीतरी पोर्ट आपल्या लँपटॉपला असतात.

आता आपणास प्रश्न पडला असेल कि या अत्याधुनिक मँकबुक एयर लँपटॉपला किती बरे पोर्टस असतील?

उत्तर आहे फक्त एक !! आश्चर्य चकित झालात ; कसे बरे असे असू शकेल ?

तर हि किमया अँपल कंपनीने साध्य केली आहे विशेष ‘यु एस बी- सी’ पोर्टचा वापर करून.

अँपल कंपनीने आधीच्या मँकबुक एयर नावाच्या लँपटॉप मधील SD कार्ड रीडर ,दोन यु एस बी ,एक थंडर बोल्ट हि पोर्टस काढून त्याजागी यु एस बी सी हे एकाच पोर्ट नवीन लँपटॉप मध्ये ठेवण्यात आले आहे.

याबद्दलची रोमांचकारक घोषणा नुकत्याच झालेल्या अँपल च्या सोहळ्यात करण्यात आली.

मँकबुक मध्ये पॉवर सप्लाय करण्यासाठी, यु एस बी डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी , डिस्प्ले पोर्ट ,व्ही जी ए पोर्ट, एच.डी. एम.आय. हे डिस्प्ले कनेक्टर पोर्ट ; एकाच यु एस बी-सी या पोर्टच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

आपण रोजच्या व्यवहारात यु.एस.बी. पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क , यु.एस.बी. केबल , यु.एस.बी. पोर्ट असे शब्द एकतो आणि वापरतो, कधीकधी आपणस नक्की प्रश्न पडला असेल कि हे यासाठी यु.एस.बी. आहे तरी काय? हि लिंक पहा.

 USB 3.1 [USB C ] :

भविष्यातील यु एस बी-सी हा USB 3.0 मध्ये थोडी सुधारणा केलेला व USB 3.1 प्रोटोकॉलनी बनलेला आहे.याचा स्पीड 10Gbps  इतका अतिजलद आहे.

सध्या मँकबुक एयरमध्ये पाहता येणारे हे पोर्ट लवकरच नवीन येणाऱ्या डिव्हाइसमध्ये पाहायला मिळेल यात शंकाच नाही.

यु एस बी सी 100 वँट इतकी पॉवर पाठवू किंवा घेवू शकते.

या कनेक्टरचा वापर आपला मोबाईल किंवा टँबलेट चार्ज करण्यासाठीही केला जावू शकतो.

जास्त डाटा व्यवस्थितपणे पोहचेल याच्या सिक्युरिटी बद्दलची काळजी घेण्यात आलेली आहे.

यु एस बी सी अँडोप्टर :

यु एस बी सी अँडोप्टर

यु एस बी सी अँडोप्टर

याच बरोबर आपणस जर एकाचा वेळी जास्त डिव्हाईस कॉम्प्यूटरला जोडायचे असल्यास अँपल कंपनीतर्फे यु एस बी सी अँडोप्टरची सोय केलेली आहे .

या द्वारे एकाच वेळी अनेक डिव्हाईस कॉम्प्यूटरला जोडता येवू शकतात.

आपणस बऱ्याचदा यु एस बी पेन ड्राईव्ह करताना तो सरळ लावावा कि उलटा हा घोळ होत असेल.तो या  पोर्टच्या माध्यमातून निकालात काढला आहे.आपण हे पोर्ट उलट्या किंवा सुलट्या दोन्ही बाजूनी संगणकाला कनेक्ट करू शकतो.

mac air with usc c

हा नवीन मँकबुक एयर सिल्व्हर ग्रे ,गोल्ड या रंगात एप्रिल महिन्यापासून विक्रीस उपलब्द होणार आहे. हा नवीन यु एस बी सी असलेला मँकबुक एयर तंत्रज्ञान दुनियेत नक्कीच क्रांतिकारी ठरेल.

खास नोंद : यु एस बी-सी चे हे तंत्रज्ञान लवकरच गुगल क्रोम बुक मध्ये हि उपलब्ध होईल.

आपणास हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या शंकांना उत्तर देण्यासाठी मी आहेच. धन्यवाद !