xDefinition

Definitions

डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीम :बेसिक माहिती


डाटाबेस सिस्टिम :बेसिक माहिती [भाग १]

आजकाल बेंक ,तिकीट बुकिंग वा ऑनलाइन वाचनालय या सारख्या ठिकाणी रोजच्या रोज माहिती हि साठवली जाते आणि नवीन माहिती अपडेट केली जाते.पूर्वी हीच माहिती पुस्तकी रेकोर्ड वा वहीत लिहून केले जायचे पण हेच काम सोप्या व सुरळीतपणे करण्यासाठी आजकाल संगणकाचा वापर केला जातो.

डाटा हा संगणकात साठवून त्यावर हव्या त्या प्रकारे प्रोसेस करून आपणास हवी असलेली माहिती कमी वेळात व बिनचूकपणे मिळू शकते.संगणकामध्ये डाटा म्हणजेच माहिती ठेवण्यासाठी संगणकाच्या मेमरीतील काही जागा वापरली जाते.व ते सर्व मँनेज करण्यासाठी डाटाबेस मँनेजमेंट  सिस्टीमचा वापर केला जातो.

प्रारंभिक शब्दांचे अर्थ :

डाटा:माहित असलेले सत्य जे आपण रेकॉर्ड करून् ठेवू शकतो.

उदा:नाव,टेलीफोन नंबर,गाव.

डाटा हा फाईल च्या रुपात संगणकात साठवला जातो.

डाटाबेस:वेगवेगळ्या पण संबधित डाटाचे एकत्रित ठेवून एक पँकेज केले जाते त्यास डाटाबेस म्हणतात.

उदा:कंपनीशी संबधित सर्व डाटाचे एकत्रीकरण करून कंपनी नावाचा डाटाबेस तयार केला जातो.

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीम[DBMS]:असे सोफ्टवेअर कि ज्याचा वापर करून आपण आपणस हवी ती माहिती डाटाबेस मधून सुयोग्यरित्या घेऊ शकतो.

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीम खालील सोई पुरवते:

  • डाटा तयार करणे.
  • डाटाबेसची प्राथमिक माहिती साठवणे.[प्रारंभिक माहिती\मेटाडेटा]
  • डाटा टेबलमध्ये साठवले.
  • डाटावर निरनिराळे ऑपरेशन्स करणे.

 डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमचे फायदे.

=>डाटा मधील विस्कळीतपणा टाळता येऊ शकतो.

=>वेगवेगळ्या युजर्सना वेगवेगळ्या डाटाचा एक्सेस देता येऊ शकतो.

=>माहिती व्यस्थापक अचूकपणे करता येते.

=>एस क़्यु एल सारख्या प्रोग्रॅमिंग भाषा वापरून हवी ती माहिती डाटाबेस मधून शोधू शकतो.

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमचे तोटे.

*सोफ्टवेअर हार्डवेअर आणि ट्रेनिंग साठी खर्चिक.

*डाटा सुरक्षितता आणि डाटाची वेळ पडल्यास पुनर्रचना यासारख्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते.

डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीमची रचना आकृतिबंध:

Database arch marathi

सिस्टीमची माहिती:

संगणक प्रोग्राम हा युजर वापरात असतो.तो प्रोग्राम जो डाटा हवा असेल त्याबद्दल क्वेरी (प्रोग्रमिक भाषेतून प्रश्न) डाटाबेस ला पाठवतो.डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीमच सोफ्टवेअर चे प्रोसेसिंग करते व डाटाबेस च्या प्रारंभिक माहितीच्या आधारावरून डिस्क मधून माहिती शोधून काढतो.व ती माहिती प्रोग्रामला पुरवली जाते.अशा तऱ्हेने प्रोग्रामला हवा तो डाटा देण्याचे काम डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमच करते.

सोप्या तांत्रिक डाटाबेस शिक्षणाच्या नव्या दुनियेत आपण स्वागतार्ह पाउल टाकल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत.

आपणास डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमची माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. 🙂

Advertisements

कॉम्प्युटरमध्ये कॉम्पुटर स्क्रीनचे चित्र कसे घ्यावे?


कॉम्प्युटरमध्ये कॉम्पुटर स्क्रीनचे चित्र कसे घ्यावे?

आपणस बरेच वेळा आपल्या कॉम्पुटर स्क्रीनवरील काहीतरी सेव्ह करायचे असते वा त्याचा फोटो काढायची इच्छा होते अशा वेळी आपण आपल्या संगणकावर दिलेल्या काही सोफ्टवेअर चा वापर करून स्क्रीन चा फोटो काढून सेव्ह करू शकतो.

या एकदम सोप्या गोष्टीसाठी आपण बर्याच वेळा अडखळतो,मी तर एका मित्राने केमेरा वापरून कॉम्पुटर स्क्रीन वरीन फोटो घेताना पहिले आणि हि पोस्ट लिहायचे ठरवले.

कॉम्पुटर स्क्रीनचे चित्र घेण्यासाठी आपण आपल्या गरजेनुसार निरनिराळ्या पद्धती वापरू शकतो.त्या मी पुढे सविस्तर दिल्या आहेत.

१]print screen वापरून पूर्ण कॉम्पुटर स्क्रीन ची प्रिंट घेणे.:

१]विंडो ओपन करणे.

२]कि बोर्ड वरीन प्रिंट स्क्रीन [PrntScr] बटन दाबणे:

३]याने पूर्ण कॉम्पुटरचे चित्र कॉपी होते.

४]नंतर पेंट  हे अप्लिकेशन कॉम्पुटरवर ओपन करणे.

५]व त्यात cntrl आणि v बटन एकदम दाबून पेस्ट करणे.

६]ते चित्र सेव्ह करणे.

७]नंतर ते चित्र आपण कोठेही मायक्रोसॉफ्ट वल्ड किंवा कोठेही पेस्ट करू शकतो.

उदा:

Full screen print

२] फक्त एका विंडो ची प्रिंट घेणे.

काही वेळा आपणस फक्त एका विंडोचाच फोटो घायचा असतो तरी फुल्ल स्क्रीन चा फोटो प्रिंट स्क्रीन मधून मिळतो.यासाठी उपाय म्हणजे अल्टर बटन वापरून फक्त विन्डोचाच फोटो घेणे.

१]ज्या विंडो ची प्रिंट घायची आहे ती ओपन करणे.

२]त्याच्या टायटल बार वर क्लिक करणे.

३]Altr आणि printscreen  बटन दाबणे .

४]याने फक्त ती विंडोच कॉपी होईल.

५]परत पेंट ओपन करून त्यात ती पेस्ट करणे.

उदा:

Windoe print

3]पेंट मधून चित्राचा हवा तो भाग क्रोप किंवा कट करणे.

आपलास काही वेळा फक्त विन्डोचा किंवा स्क्रीन चा काही भागच हवा असतो,अशा वेळी आपण ते चित्र प्रथम पेंट मध्ये पेस्ट करावे व कट कॉपी किंवा क्रोप या टूलचा वापर करून आपणास चित्राचा हवा तो भाग घेणे ए सेव्ह करणे.

Paint feature

४]सिन्पिंग टूलचा वापर करून चालू स्क्रीनचा हवा तेवढा फोटो घेणे.

१]हि सुविधा विंडोज ७ व पुढील ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे.अतिशय मस्त टूल आहे हे…

२]यासाठी प्रथम स्टार्ट मेनूत जाऊन एक्सेसरीज मध्ये सिन्पिंग टूल सिलेक्ट करणे.

३]मग स्निपिंग टूल ची विंडो ओपन होईल.

४]या द्वारे आपण माउस चा वापर करून हवा तो भाग सिलेक्ट करणे तो आपोआप चित्र रुपात सिन्पिंग विंडो मध्ये येतो .

५]हे चित्र आपण सेव्ह करू शकतो किंवा इतर ठिकाणी कोपी पेस्ट करू शकतो.

उदा:

Snipper

अशा तऱ्हेने आपण आपल्या स्क्रीन वरीन कोणतेही चित्र चालू स्थितीत सेव्ह करू शकतो अगदी चालू व्हिडीओ मधील स्कीन शॉट सुद्धा[HDCPकन्टेन्ट प्रोटेक्शन व्हिडिओ नसेल तर] आणि नंतर तो फोटो आपण आपल्या कामासाठी किंवा ब्लॉगवर डकवण्यासाठी वापरू शकतो…. 🙂

ऑपरेटिंग सिस्टम पेन ड्राईव्हने इन्स्टॉल करण्यासाठी पेन ड्राईव्ह कसा बूटेबल करावा?


पेन ड्राईव्ह का,कधी ,कसा बूटेबल करावा हा प्रश्न आपणस नक्की पडला असेल.त्याचीच महिती देणारा हा लेख आपणस नक्की उपयोगी पडेल.

नवीन कॉम्पुटर खरेदी केला आहे ,सिस्टीम बंद पडते,कॉम्पुटरमध्ये व्हाईरस आला आहे अशा अनेक  वेळी आपणास बऱ्याचदा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टॉल करावी लागतच असते. त्यावेळी नेमकी आपणस सी डी ची आठवण येते आणि बूटेबल सी.डी. शोधून सापडत नाही.सध्या यु.एस.बी. पेन ड्राईव्ह रीराईटेबल आल्यामुळे सर्वांकडे उपलब्द असतो त्याचाच वापर करून ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्याच्या सोप्या स्टेप्स आपलास फार उपयुक्त पडतील.

ऑपरेटिंग सिस्टमचा सेटअप करण्यासाठी आपल्याकडे संगणकात ऑपरेटिंग सिस्टमचा सेटअप व कमीत कमी १ जी.बी.चा पेन ड्राईव्ह असणे जरुरू आहे.

या पद्धतीने आपण विंडोज एक्स पी,विंडोज व्हिस्टा ,विंडोज ७,विंडोज ८ या सर्व ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करता येतात.

पेन ड्राईव्ह वा सी.डी बूटेबल करणे म्हणजे ती NTFS फॉर्मट मध्ये कन्वर्ट करावी लागते….तरच त्यातून नवीन ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टॉल करता येते.

ऑपरेटिंग सिस्टम पेन ड्राईव्हने इन्स्टॉल करण्यासाठी पेन ड्राईव्ह बूटेबल करण्याच्या स्टेप्स:

१]पेन ड्राईव्ह बूटेबल करण्यासाठी पहिला तो सिस्टिमला कनेक्ट करा.

२]स्टार्ट मध्ये जाऊन ‘रन’ ओपन करा.[शॉर्टकट: विंडोज बटन +R बटन]

३]त्या Run बॉक्स मध्ये ‘cmd’ टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

4]त्यामुळे कमांन्ड विंडो ओपन होते.

५]त्या विंडोत “diskpart” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[याद्वारे आपण डिस्क संबधित सेटिंग करू शकतो]

6]नंतर “list disk” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[यामुळे आपणस आपल्या कॉम्पुटर मधील हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह लिस्ट होईल.

७]त्या लिस्ट मध्ये जर पेन ड्राईव्हचा नंबर एक असेल तर ‘Select Disk 1’ ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[ही कमांन्ड आपणस उपलब्द डिक्स मधून आपण ज्या डिस्क वर प्रोसेसिंग करायचे आहे ती डिस्क सिलेक्ट करू शकतो,शक्यतो हार्ड डिस्क नंबर ० ला असते आणि कनेक्टेड पेन ड्राईव्ह नंबर १ ला असतो.]

८] नंतर “Clean” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

 [ही कमांन्ड  पेन ड्राईव्ह मधील आधीचा डाटा डिलीट करून स्वच्छ करतो.]

९] नंतर “Create Partition Primary” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[ही कमांन्ड पेन ड्राईव्ह मध्ये प्रमुख विभाग तयार करते जो पुढे वापरला जातो.]

१०] नंतर “Select Partition 1” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[नवीन केलेला विभाग सिलेक्ट केला]

११] नंतर “Active” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[या कमांन्डमुळे पुढील प्रक्रियेसाठी फोकस तयार केला]

१२] नंतर “Format FS=NTFS” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[ही सर्वात महत्वाची स्टेप या मुळे पेन ड्राईव्ह NTFS फोर्मेतमध्ये कन्वर्ट होतो.]

१३]या प्रोसेसला जवळपास ५ मिनिट लागतात १००% प्रोसेसिंग पूर्ण झाल्यवर पुढील कमांन्ड टाईप करणे.

१४] नंतर “Assign” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[यामुळे पेन ड्राईव्ह ला नाव दिले जाते जसे सी ड्राईव्ह,डी ड्राईव्ह]

१५] नंतर “Exit” ही कमांन्ड टाईप करून एन्टर [Enter] बटन दाबा.

[यामुळे डिस्क पार्ट टूलमधून बाहेर पडतो.]

अधिक माहितीसाठी पुढील छायाचित्र पहावे

.Bootable pen drive

१६]आता ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व फाईल्स पेन ड्राईव्ह मध्ये पेस्ट करणे.

[bootmgr फाईल सेटअप मध्ये आहे का ते चेक करणे,जर सेटअप झीप फाईल मध्ये असेल तर तो एक्स्टेन्शन करून मग पेस्ट करणे]

१७]पेन ड्राईव्ह कॉम्पुटर मधून रिमूव्ह करणे.हा झाला बूटेबल पेन ड्राईव्ह याचा वापर करून आपण कोणत्याही मशीन मध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करू शकतो.

१८]हा पेन ड्राईव्ह नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायची आहे त्या मशीनला कनेक्ट करावा.

मशीन री-स्टार्ट करावी आणि बूट ऑप्शन मधून बूट फ्रॉम “USB Drive” सिलेक्ट करावे.

१९]मग ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉलेशन चालू होईल.

हीच प्रोसेस आपण ऑटोमॅटिक करू शकता.

यासाठी आपणस बँच फाईल बनवावी लागेल.

बँच फाईल मध्ये खालील महिती टाकावी.

@echo off 
DISKPART /s
 X:\USBBoot.txt 
xcopy H:\*.* /s/e/f M:\
pause
exit

टेक्स्ट फाईल मध्ये खालील महिती टाकावी.

SELECT DISK 1 
CLEAN
CREATE PARTITION PRIMARY
SELECT PARTITION 1
ACTIVE
FORMAT QUICK
ASSIGN LETTER=M
EXIT

या दोन्ही फाईल एकाच फोल्डरमध्ये ठेवावे आणि बेच फाईल वर डबल क्लिक करावे.

त्याद्वारे तुमचा  पेन ड्राईव्ह आपोआप बूटेबल होईल.

यादोन्ही फाईल मी दिलेल्या आहेत त्यात फक्त .doc एक्सटेंशन काढून त्या फाईल आहे डेक्सटॉप वर फोल्डरमध्ये पेस्ट करून आहे तश्या वापरू शकता.

काही शंका असल्यावर नक्की कळवा…MJ आहेच तुमच्या मदतीला… 🙂

संदर्भ:

बेच फाईल कमांड: http://ss64.com/nt/

डिस्क पार्ट महिती: http://technet.microsoft.com/en-us/library/cc766465(v=ws.10).aspx

फाईल :RunBoot .BatData .txt