About

नमस्कार मित्रानो!! 

मी महेश जाधव… माही..महेशा..व MJ इत्यादी नावाने वल्डफेमस…बोल MJ नाव धारण करून समस्त आंतरजालावर स्वछंद भरारी मारत असतो…… 🙂

कधी  काही कॉम्प्लेक्स,इंटरेस्टिंग,जबरदस्त भारी असे वाचले आणि त्यावर लिहावे वाटले कि त्याचा स्वतः अभ्यास करून मग ते कधी एकदा सगळ्यांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगेन असे होते..मग हात सपासप चालू लागतात कि-बोर्डवर आणि तयार होते एक पोस्ट खास तुमच्यासाठी..

मराठी माणसांपर्यंत जगभरातील सर्व नवनवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान पोहचावे व तेही आपल्या मराठी भाषेत हा माझा अट्टाहास.मराठी माणूस तांत्रीक ज्ञानाने समृद्ध व्हावा यासाठी या ब्लॉग  द्वारे माझा एक छोटासा प्रयत्न!!.. हो हो …बदल घडवण्यासाठी हा नवा उपद्याप…!!

माझी आवड म्हणजे Tablets ,Electronics ,PC’s, Mobile  व मराठीत लेखन,कविता ,ट्रेकिंग…आणि बरंच  काही..अगदी काहीही करत असतो..मँड सारखा 😀

तसे बरेंच काही नवनवीन  शिकायला आणि शिकवायला आवडते..टेबलेट पी सी. च्या वेडापोटी सुरवातीबरोबरच हा ब्लॉग लिहायला घेतला…नवनवीन टेबलेट पी सी.वर पोस्ट लिहिले…मराठीत टेबलेट पी सी.वर लिहणारे आम्ही तसे पहिलेच..

नंतर सिंबायोसिस मधून जर्मन भाषा शिकली आणि जर्मन शिका मराठीतून हे चँलेज घेतले आणि चालू केला लोकांना परदेशी भाषा मराठीतून सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठीचा खटाटोप…मजा आली…मला आणि वाचकांनाही ! 🙂

आता नवनवीन तंत्रज्ञानाच्या वेगवेगळया पोस्ट मी आपल्यासाठी लिहीत आहे…नक्की आवडतील आपल्याला..

आपल्याला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा.आपल्या काही सूचना ,सुधारणा,नवीन विषय याबद्दल प्रतिक्रिया ऐकायला नक्की आवडेल!!

इथे आलात ….भेटलात…… धन्यवाद…पुन्हां या भेटीला !!!

I believe that “Knowledge across the world should be Open to all, Free of cost , Easy to adopt and should available in our mother tongue.”

Bolmj is not just a person or website it is a thought to change the world of knowledge to make learning simple and interesting.

And I am running towards same direction with help of my blog ..I am very glad by your warm support…Ya.. it is just “A START” !!!!

-MJ 🙂

Smile Forever!

——————————————————————————————————————————————————————————-

संपर्क :  महेश संभाजी जाधव ,पुणे (सांगली).

Email ID: mahesh7197@gmail.com

LinkedIn Professional Network:  http://www.linkedin.com/in/jadhavmahesh

Facebook Profile :https://www.facebook.com/mahesh.jadhav.7197

————————————————————————————————————————————————————————————

53 comments

  1. हो प्रसाद हा Blog आहे..जो Tablet Pc वरील सर्व माहिती संबधित आहे.
   Blog site ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…
   काही सूचना वा सुधारणा आवशक असतील तर नक्की कळव..
   पुन्हा भेटूया!!

  1. हा वैभवजी !! काहीतरी वेगळे आणि लोकोपयोगी करायचे डोक्यात होते त्यातूनच हि कल्पना आली आणि मग सुरवात केला हा टेक्नॉलॉजी ब्लोग मराठीतून.. 🙂
   आपले मार्गदर्शन लाभो हि सदिच्छा .अशीच भेट देत राहा..
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

 1. खूपच छान कल्पना आहे Bol MJ … कीप इट अप.
  ज्ञान देण्याने ज्ञान वाढते …
  जे जे ठावे ते सांगत जावे..सकला शहाणे करुनी सोडावे …:)

  1. अरे पराग ,ब्लोगला भेट दिलीस..एकदम भारी वाटले..
   आपल्या पासून प्रेरणा घेवून करत असतो काहीतरी नवनवीन…असेच वरचेवर मार्गदर्शन करत जावा.
   तुमच्या माउसचे क्लिक आणि कळपटलावरील शब्दच्या कॉमेट आमच्या ब्लोगला लाभोत हि सदिच्छा!!

 2. धन्यवाद राव!!
  खरं सांगू का राव …काय आहे, मला अवघड गोष्टी समजावून घायला आवडतात आणि एकदा का एखादी मस्त गोष्ट आवडली किंवा परफेक्ट समजली कि कधी एकदा सर्वाना ती गोष्ट सांगतो असं होतं..ज्ञान दान सर्वोत्तम दान हे आपलं तत्व…आणि आपल्या मराठी माणसांसाठी काम करताना उत्साह आपोआपच येतो…
  अशीच भेट देत राहा वरचेवर…आपल्या शुभेच्या आमच्या पुढील वाटचालीस लाभोत..एवढेच मागणे!!

  1. अश्विन,माझ्या माहितीनुसार सध्यातरी भारतात टेब्लेट पी सी रिपेअरिंगचे अधिकृत कोर्सेस उपलब्द नाहीत. तरी आपण उपलब्द असणारे मोबाईल व लँपटॉप रिपेअरींग चे कोर्सेस पूर्ण करून घ्यावेत .जेणे करून आपणास टेँबलेट रिपेअरींग शिकणे सोपे जाईल. टेँबलेट तयार कारणासाठी वापरले जाणारे ९०% पार्टस्‌ हे मोबाईल स्मार्ट फोन व लँपटॉप मध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्टस्‌शी समांतर असतात.एकदा आपण मोबाईल स्मार्ट फोन व लँपटॉप रिपेअरिंग शिकला कि यु-ट्यूब वरील व्हिडिओ चा वापरकरूनहि आपण टेँबलेट रिपेअरींग वरील ज्ञान घेवू शकाल.
   भेटीबद्दल धन्यवाद.

  1. धन्यवाद राहुल..अच्युत सर फार मोठे व्यक्तिमत्व आहे..,त्यांच्याशी माझी तुलना हे मी माझे भाग्य समजतो.
   माझ्या लेखनाची आत्ता फक्त सुरवात आहे अजून बरेच गड सर करायचे आहेत. 😀
   राहुल असेच भेटत राहा…प्रतिक्रिये बद्दल पुनश्च धन्यवाद!

 3. मराठीत माहिती समजवून देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा पुढील लिखाणासाठी. संपुर्ण लिखाण व्यवस्थित साठवा – पुस्तक किंवा ई-पुस्तकासाठी. लेखमाला पुर्ण झाल्यावर पुस्तक – ई-पुस्तक निघायलाच हवे असे लेख आहेत तुमचे. माहिती मराठीतून उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद

  1. धन्यवाद मिलिंद..हो नक्कीच!!! माझाही विचार चालू आहे यावर.
   लिनक्स मराठीतून आणि जर्मन भाषा मराठीतून ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यासाठी अनुरूप प्रकाशनाच्या शोधात आहे.तरीही माझ्या ब्लॉगवर वाचकांसाठी उपयुक्त असे लेख वाचनासाठी मोफत उपलब्ध करणे हेच माझे प्रथम ध्येय आहे..
   आपल्या अमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

 4. आपला ब्‍लॉग वाचला धन्‍यवाद परंतु मला सी प्‍लस प्‍लस प्रोग्रमिंग लँग्‍वेज शिकावयाची आहे त्‍याबद्रदल एखादी वेबसाईट कि ज्‍यावर यु टयुबच्‍या माध्‍यमातून सांगितले जाईल तसेच Microsoft Access मराठीमधून युटयूबच्‍या माध्‍यमातून शिकण्‍यास मिळेल अशी एखादी वेबसाईट कळवा माझा ईमेल आयडी आहे

 5. मित्रा खूपच छान …..

  technical knowledge आणि ते हि मराठीतुन….वा कया बात है…!!!!
  तुझा ज्ञानाचा सर्वाना उपयोग होईल…….. keep it up….

  U.S मधून patent कसे मिळवावे???? या विषयावर थोड मार्गदर्शन मिळाल तर खरच खूप उपयोगी ठरेल….

  …… तुझा मित्र
  अरविंद

  1. अरविंद कुमार ,प्रथम आवर्जून भेट दिल्याबद्दल धन्यवाद…
   सर्वाना अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने सांगायला मलाही मजा येते.
   तुझ्या सल्ल्या नुसार पेटंट्स बद्दल मी लेख लिहायला घेतलेला आहे.लवकरच तो प्रदर्शित करेन.
   एक मस्त विषय सुचवल्याबद्दल आणि झकास प्रतिसादाबद्दल आभारी आहे अशीच भेट देत राहा,मित्रा..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s