Vishayach nahi kavitela

कविता :जाऊदे रे विषयच नाही आज कवितेला.


‎!!जाऊदे रे विषयच नाही आज कवितेला!!
————————————————–
जाऊदे रे विषयच नाही आज कवितेला,
बोलण्यापेक्षा रोखलेलेच बरे या शब्दांना,
जुन्या विषयात घुटमळने नकोरे मनाला,
नवीन विषय शोधण्यास वेळ कुठे कामाला,
मजेत गाण्यासाठी नको त्रास सुरांना,
तडे नकोत आज नाजूकशा कडव्यांना,
यमकांची तुटक मने रोखीली जुळण्याला,
अक्षरे थकलेत नवीन जागा शोधायला,
एकांतात विश्रांती हवी आहे मोहक शब्दांना,
मस्तीत पळवून लावले चक्रम शार्दूलविक्रीडितला,
पद्या आडून हसतेय खटयाळ वात्रटिका,
कोणीही मात्रेत नाही अनुस्वाराच्या मदतीला,
पण असहकार कुठला विखुरलेल्या भावनांचा,
कोण रोखत आहे रसिक बनून जगण्याला,
आणि कोण भितो अरसिकता पिण्याला,
पण मूडच नाही आज कागद खरडण्याचा,
जाऊदे रे विषयच नको आज कवितेचा!
-म.जा. [पुनर्प्रकाशित]

Advertisements