Patent Process

पेटंट्स फाईल करण्याच्या प्रोसेसची महिती.


आपल्या सशोधनाचे संरक्षण करण्यासाठी इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी कायद्यांतर्गत आपण आपल्या संशोधनाचे पेटंट फाईल करून त्याचा आपल्या बिझनेस साठी व पेटंट निगडीत प्रोडक्ट काढण्यासाठी उपयोग करू शकतो.

मागील भागात आपण  इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी  अंतर्गत पेटंट ची महिती पहिलीच आहे आता या अंकात आपण पेटंट फाईल कसे करावे ,कोणती गोष्ट पेटंट म्हणून स्वीकारली जाते, त्याची प्रोसेस काय या गोष्टींचा आढावा घेणार आहोत.

आपण आपले संशोधन नीट व व्यवस्थितपणे डॉक्युमेंट मध्ये मांडणे फार गरजेचे असते.पेटंट ड्राफ्ट लिहिताना त्यासाठी वापरला जाणारा प्रत्येक शब्द हा बरोबर वापरला गेला आहे कि नाही याची काळजी घ्यावी.

आपण पेटंट फाईल करण्याअगोदर ते या जगात प्रथम कोणी फाईल केले आहे कि नाही याचा शोध घेणे गरजेचे आहे.

हे काम इंटरनेटवर गुगल किंवा इतर पेटंट सर्च च्या वेबसाईटवर किंवा पेटंट ऑफिसमध्ये जाऊन अधिकृतपणे सर्च करू शकतो.

आपण आपले पेटंट इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी ऑफिस मध्ये नोंद केल्यानंतर ही जो पर्यंत ते अधिकुत मान्यताप्राप्त होत नाही तो पर्यन्त त्या माहितीची गुप्तता राखणे गरजेचे आहे.

जर ती महिती आपणास व्यावसायिक कामासाठी कोणालातरी द्यायची असल्यास त्याच्या कडून :नॉन:डिस्क्लोजर लेटर”[NDA] गुप्तता पत्र लिहून घेणे गरजेचे आहे.

आपले पेटंट लिहिण्यासाठी आपण प्रोफेशनल पेटंट एजंट किंवा त्या संबंधित संस्था याची मदत घेतलेली फायद्याचे ठरते.

जर आपण स्वतः लिहणार असाल तर आपल्या विषयावर आधारित आधी फाईल झालेली पेटंट्स रेफरन्स म्हणून वाचावीत व त्या नुसार आपले पेटंट ड्राफ्ट करावे.

पेटंट्स फाईल महिती

पेटंट्स फाईल महिती

एखादे संशोधन पेटंटसाठी पात्र ठरण्यासाठी त्यामध्ये पुढील बाबी असाव्यात:

 • आपले संशोधन पूर्णतः नावीन्यपूर्ण असावे.
 • त्या मध्ये कोणतीतरी नवीनतम पद्धत वापरली गेलेली हवी.
 • ते संशोधन उद्योगात वापरण्याजोगे असावे.

पुढील गोष्टींचे पेटंट्स होत नाही हे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे.

 • वैज्ञानिक थेअरीज,गणिती पद्धत.
 • साहित्य,कला,म्युजिक असे काम.
 • पब्लिकला बाधित होईल असे काम.
 • अस्तित्वात असलेल्या माहितीचे वेगळ्या रुपाने केलेले प्रदर्शन.
 • गेम खेळण्याच्या पद्धती.
 • कॉम्प्युटर प्रोग्राम.
 • आधीच जर्नल ,संशोधन मासिकात प्रदर्शित झालेले शोध.
 • आधीच मार्केटमध्ये आलेले प्रोडक्ट.

पेटंट फाईल करणे:

आपणस आपले पेटंट इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी ऑफिस [IPO ]मध्ये नोंद करण्यासाठी पुढील स्टेप्स चा वापर करणे गरजेचे आहे.

पेटंट फाईल करण्याची प्रोसेस

पेटंट फाईल करण्याची प्रोसेस

वरील संपूर्ण प्रोसेस ला २ ते ३ वर्षांपर्यंत कालावधी लागू शकतो.तसेच प्रत्येक टप्प्यात निरनिराळी फी सुद्धा भरावी लागते.

पेटंट फाईल झाल्यानंतर आपणास त्याची री न्यू फी पण द्यावी लागते.

तसेच आपल्या पेटंट चे उल्लंघन करून कोणी प्रॉडक्ट तयार करत असल्यास पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो.

एकदा पेटंट मंजूर झाले कि आपण अधिकृतरित्या त्याचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करू शकतो.

पेटंटची प्रोसेस आपलास कळलीच असेल या द्वारे आपण आपले अमूल्य संशोधन प्रोटेक्ट करून पैसे कमवू शकतो व नवीन उद्योगात पदार्पण करू शकतो.

आपणस हा अंक कसा वाटला हे नक्की सांगा तसेच प्रोसेस बद्दल आणखी काही महिती असल्यास नक्की कळवा.

— BOLMJ 🙂

Advertisements