Marathi Typing Software

कॉम्प्युटरवर मराठी भाषेत लिहण्यासाठी कोणते सोफ्टवेअर इंस्टॉल करावे?


सध्या इंटरनेटवर मराठी ब्लॉग लिहणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच हल्ली पुस्तके वा पेपर वाचण्यापेक्षा लोक ईबुक ऑनलाइन न्यूज पाहणे पसंत करतात आणि हळू हळू लोक गुगल मधून मराठीतूनच सर्च करत असतात.आपणास हि वाटत असेल कि आपण पण काहीतरी आपल्या भाषेत लिहावे.

आपणस प्रश्न पडला असेल कि इतके सारे मराठी लिहण्यासाठीचे सोफ्टवेअर आहेत इतके सारे फोन्ट आहेत नक्की कुठले सोफ्टवेअर वापरायचे जे आपणास वापरायला सोपे जाईल व इंस्टॉल करायला हि सोपे असेल व मान्यता प्राप्त कंपनीचे व फोल्ट नसलेले हवे.

मी हि या गोष्टीवर बराचसा शोध घेतला बरेच सोफ्टवेअर ट्राय केले शेवटी माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे सोफ्टवेअर सापडले आणि गेले वर्षभर झाले मी ते सुरळीतपणे वापरात आहे माझ्या मित्रांनाही ते शेअर केले सर्वाना आवडले.म्हणून आता ते आपणास सर्वाना शेअर करण्यासाठी हि पोस्ट लिहीत आहे.

सोफ्टवेअर चे नाव आहे गुगलचे आय ई एम् हे गुगलचे अनेक भारतीय भाषांसह मराठी इनपुट्ससाठीलाही सपोर्ट देणारे मस्त सोफ्टवेअर आहे.

हे सोफ्टवेअर गुगल चे अधिकृत आहे तसेच हे सोफ्टवेअर मोफत उपलब्द आहे.आपणास फक्त डाउनलोड करून इनस्टॉल करावे लागते.

आपण गुगल ट्रान्सलेटर वापरले असेलच यासाठीचे जे बेस सोफ्टवेअर आहे त्याचेच हे एक्सटेन्ड केलेले व्हर्जन आहे.त्यामुळे यात चुका फारच कमी आहेत व वापरण्यास एकदम सुलभ.

तसेच हे सोफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट ऑफीस,नोटपॅड,इंटरनेट,ब्लॉग्ज या सर्व ठिकाणी मराठीत लिहण्यास उपयुक्त आहे.

ती गुगलची अधिकृत भाषा असल्यामुळे भविष्यात मराठी शोध इंजिन व मराठी वेब या एरियात याचा लाभच होईल यात शंका नाही.

१]सोफ्टवेअर डाउनलोड करणे.

मराठी लेखन हे सोफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी गुगल आय ई एम् च्या खालील लिंकवर टिचकी  मारा.

गुगल आय ई एम् डाऊनलोड

दिलेल्या पानावर आपणस सोफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठीचा बॉक्स दिसेल.

त्याखालील भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल त्यातून मराठी हा पर्यात निवडावा.

[तसेच आपली ऑपरेटिंग सिस्टीम ३२ बीट आहे का ६४ बीट त्यावरून आपण ऑपरेटिंग सिस्टीम चे सिलेक्शन करू शकता.]

[आपली ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल माहिती मिळवण्यासाठी संगणकातील माय कॉम्प्युटर यावर राईट क्लिक करून प्रोपटी सिलेक्ट करा.[My computer->properties]येथे आपणस आपल्या ऑपरेटिंग सिस्टिम्स बद्दल माहिती मिळेल.]

सिलेक्ट करून झाल्या नंतर सोफ्टवेअर डाउनलोड करा.व कॉम्प्युटरवर एका ठीकाणी स्टोअर करून ठेवा.

२]सोफ्टवेअर इन्स्टॉल करणे.

हे सोफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपला संगणक इंटरनेटला कनेक्ट असणे जरुरी आहे.

सोफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपण ली फाईल डाऊनलोड केली आहे त्यावर डबल क्लिक करून इन्स्टॉलेशन चालू करा नंतर नेक्ट-नेक्ट बटन दाबत जावा फिनिश बटन आले कि समजा आपले इन्स्टॉलेशन पूर्ण झाले.

त्यानंतर हे सोफ्टवेअर वापरण्यासाठी इंटरनेट ची अजिबात गरज भासत नाही.इन्स्टॉलेशन करतानाच  मराठी भाषा व शब्द यांची सगळी माहिती आपल्या कॉम्प्युटर वर स्टोर होते.

इन्स्टॉलेशन  बाबत अधिक महिती साठी येथे टिचकी मारा.

४]सोफ्टवेअर वापरण्यासाठी चे सेटिंग करणे.

आपली ऑपरेटिंग सिस्टीम जर विंडोज ७ सारखी आधुनिक असेल तर आपणास फार काही सेटिंग करण्याची गरज नाही.

पण आपली ऑपरेटिंग सिस्टीम जर विंडोज एक्स पी असेल तर आपणास थोडे सेटिंग करावे लागतील हे फक्त एकदाच बस् परत कोणतेच सेटिंग वगेरे करावे लागणार नाही हे नक्की…

आपणस प्रथम लेन्ग्वेज सेटिंग मधून आशियन भाषा वापरण्यासाठीचे सेटिंग करावे लागेल.

आपल्या संगणकात आपली एक्स पी इन्स्टॉलेशन करायची सी डी टाकावी लागेल.

[ऑपरेटिंग सिस्टीम इंस्टॉल करायची सी डी जी आपण सुरवातील नवीन ओ एस इंस्टॉल करताना वापरलेली असते ती.]

किंवा पेन ड्राइव्ह मध्ये एक्स पी चा सेटअप घ्यावा व पेन ड्राइव्ह कॉम्प्युटर ला जोडावा.

आता टास्क बर वर जाऊन लेन्गवेज टूल बार एनेबल्ड करावा.

सेटिंग  बाबत अधिक महिती साठी येथे टिचकी मारा.

वरील लिंक चा वापर जर काही प्रोब्लेम आला तरच करावा अन्यथा मी सर्व स्टेप्स सोप्या व जितक्याची  गरज आहे तितक्याच दिल्या आहेत.

या मधेच सोफ्टवेअर चे सेटिंग होऊन जाईल.

५]सोफ्टवेअर कसे वापरावे.

प्रथम आपण ज्यात लिहणार आहोत ती मायक्रोसॉफ्ट वलर्ड फाईल किंवा नोट पँड ओपन करावे.

त्यानंतर विंडो च्या टास्क बर वर आपणस लँग्वेज बर दिसेल त्याला क्लिक करून मराठी सिलेक्ट करा.

खालील आकृतीत त्याची माहिती दिली आहे.

तेन्हावा आपणस “मंगल“ हा फोन्ट सेट झालेला दिसेल.

तसेच कोपऱ्यात आपणस आपली लँग्वेज सेटिंगचा आयकॉन दिसेलम्हणजेच आपली मराठी भाषा सेट झाली असे म्हणता येईल.

आता मराठी लिहण्यास सुरवात करा.

लिहिण्याचे लॉजिक असे कि आपण जशी चँटींगला जशी भाषा वापरतो तशी तसे टाईप करत जाणे म्हणजे मराठी शब्दाचे इंग्रजीत कसे स्पेलिंग होईल याचा विचार करून टाईप केले कि झाले.

वरील जो लँग्वेज सेटिंगचा आयकॉन आहे तेथे कि बोर्ड च्या चित्रावर टिचकी मारली कि आपल्या स्क्रीन वर कि बोर्ड येईल आपण डायरेक्ट त्या अक्षरावर क्लिक करून टाईप करू शकतो.

तसेच आपण ज्या अक्षरावर माऊस नेला कि त्या अक्षरासाठी कोणते इंग्लिश लेटर टाईप करावे लागेल याची माहिती मिळेल.

खालील चित्रात दिल्या प्रमाणे “ब“ वर क्लिक केल्यावर खालच्या चौकटीत “BA”हे इंग्लिश लेटर येते ते कि बोर्ड वर टाईप केल्यास “ब” हे अक्षर लिहले जाते.

समजा आपणास महेश हे नाव मराठीतून लिहायचे आहे.तर “mahe”इतकेच जरी टाईप केले तरी हे सोफ्टवेअर अंदाजे ऑप्शन्स नवीन बॉक्स वर दाखवतो आपण एरो कि चा वापर करून आपण ऑप्शन नंबर १,२,वा इतर पर्याय निवडू शकतो.

आता मराठीतून लिहताना मधूनच इंगजीत एखादा शब्द लिहायचा असल्यास लँग्वेज सेटिंगचा आयकॉनवरील “अ” या सिम्बॉलला क्लिक करावे तो सिम्बॉल “A” मध्ये कन्वर्ट होईल.किंवा कि बोर्ड वर “Ctrl + G”हे बटन प्रेस केले कि भाषा स्विच करत येते.याद्वारे आपण सहजपणे दोन भाषेत मिक्स लिखाण करू शकतो.

गुगलचे आय ई एम् च्या इतर सुविधांची अधिक महिती घेण्यासाठी   येथे टिचकी मारा.

अशा तऱ्हेने आपण सहज सोप्या पद्धतीने मराठीत लिखाण करू शकतो.

या बद्दल अधिक माहिती साठी गुगलच्या  अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

आपण आपल्या कॉम्प्युटरवर हा हे सोफ्टवेअर नक्की इंस्टॉल करून पहा आणि मराठीत लिहण्याची मजा अनुभवा… 🙂

आपल्याला हे सोफ्टवेअर आवडल्यास नक्की सांगा व आपल्या मित्रांनाही याबाबत नक्की सांगा..

समस्त आंतरजालावर मराठीचा प्रसार आणि वापर करुया आणि आपली मराठी आणखीनच समृद्ध करूयात.

-MJ 🙂

Advertisements