Linux Intro and Ubuntu installation, Linux Learing

लिनक्स मराठीतून :भाग १:लिनक्सची ओळख आणि उबुंटू इन्स्टॉलेशन.


लिनक्सची ओळख :

आपण सर्व जण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमशी एकदम परिचयाचे आहोत,विंडोज बरोबरच आणखी एक ऑपरेटिंग सिस्टीम उदयास आली होती तिचे नाव युनिक्स त्याच ऑपरेटिंग सिस्टीम चे पुढे लिनस [Linus Torvalds]याने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये रुपांतर केले, लिनक्स रिलीज झाली ती 5 ऑक्टोबर  1991 ला आणि ती अतिशय प्रसिद्ध झाली.तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो कि ही लिनक्स म्हणजे लिनसचा “युनिक्सचा इम्युलेटर“हा कॉलेजचा प्रोजेक्ट होता तोच पुढे मोठा होऊन आज त्याची लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार झाली आहे.

आजही सर्व्हर्स पासून सुपर कॉम्प्युटर ते लहान डिव्हाईस मध्ये तसेच काही मोबाईल मध्ये सुद्धा लिनक्स असते.आपल्या नकळत आपण लिनक्स वापरात असतो.आज आपल्या परिचयाची उबंटू ,रेड हँट,फेडोरा इत्यादी ऑपरेटिंग सिस्टीम चा बेस हा लिनक्स हाच आहे.

लिनक्स कम्युनिटीचे जगभरातील डेव्हलपर याच्या सोर्स कोड मध्ये नवनवीन चेंज करून लिनक्स चा कोड समृद्ध करत असतात.आणि अशी ही मस्त ऑपरेटिंग सिस्टीम एकदम मोफत आहे तसे त्याचे काही डीस्ट्रीब्यूटर्स [रेड हँट,फेडोरा] काही त्यांच्या कस्टम्स ऑपरेटिंग सिस्टीम ला किंमत लावतात पण बेसिक लिनक्स एकदम मोफत आहे ते ही ऑफिशियली..

तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याचे इंटरन्ल्स शिकण्यासाठी आपणास काय यायला हवे…विंडोज वापरली आहे ना तुम्ही??….मग बास!!…मी आहे तुमच्या बरोबर,आपण मिळून जाऊया या लिनक्स च्या सफरीवर…..मग तयार आहात ना लिनक्स शिकायला….

[ लिनक्स च्या घरात पोहचण्यासाठी पुढील लिंक वर टिचकी मारा.http://www.linux.org/.]

linux
लिनक्स मराठीतून

आपण या अंकात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची ते पाहणार आहोत.

आपण विंडोज वापरणारे असाल तर उबुंटू ही विंडोज ते लिनक्स प्रवास करणार्‍या लोकांसाठी मस्त आहे ज्यात युजर इंटरफेस विंडोज सारखा आहे पण याचा बेस लिनक्स आहे…

या लिनक्स ची अजून एक मजा म्हणजे तिचा सोर्स कोड ओपेन आहे आणि आपण पण यात आपले काहीतरी किडे करून काही भर घालू शकतो..आणि आपली स्पेशल ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू शकतो,डिव्हाईस् ड्रायव्हर लिहू शकता  …म्हणजे माझ्या सारख्या किडेखोर लोकांना पर्वणीच…तसे हे फार सोपे नाही ..आणि प्रयन्त केल्यावर अवघड पण नाही फक्त शिकायची तयारी पाहिजे…

उबुंटू इन्स्टॉलेशन :

चला मग किक मारुया……आपण आपली सिस्टीम विंडोज मध्ये बुट करा मग ते एक्स पी असो वा विंडोज ७.

सिस्टीम चालू झाल्यावर इंटरनेट ब्राऊजर ओपन करून , पुढील उबंटूच्या लिंकवर जा. http://www.ubuntu.com/download

आपण आपली आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम ठेवून त्याच बरोबर उबुंटू पण इन्स्टॉल करू शकतो त्यामुळे आपला डाटा पण जाणार नाही आणि आहे त्या सिस्टीम वर आपण लिनक्स एन्जोय करू शकता..

.त्यामुळे अजिबात घाबरू नका..बिनधास्त ट्राय करा…

त्यासाठी उबंटू मध्ये विंडोज इंस्टॉलर दिलेला आहे जो नॉर्मल इन्स्टॉलेशन सारखे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत नवीन लिनक्स इन्स्टॉल करून देतो.

त्यासाठी उबुंटू च्या साईटवर विंडोज इंस्टॉलर वर टिचकी मारा.

setup link

त्यानंतर आपणास हवे ते व्हर्जन ड्रॉप बॉक्स मधून सिलेक्ट करून गेट इंस्टॉलर वर टिचकी मारा.

व्हर्जन ड्रॉप बॉक्स यात LST हे स्टेबल व्हर्जन असते ज्याला उबंटू कडून लॉंग टाईम सपोर्ट दिला जातो.]

setup 2 इन्स्टॉलेशन
इन्स्टॉलेशन

नंतर नेक्स्ट जाऊन “Not now, take me to the download › “ ला टिचकी मारावी ..[तसे तुम्ही दिलदार असाल तर उबंटू ऑर्गनायझेशन ला देणगी पण देऊ शकता].

नंतर आपणस पॉप अप मेसेज येईल तो सेव्ह करा वा रन करा.

run setup
रन सेटअप

मग उबंटू इंस्तोल होण्यास सुरवात होईल.

त्या दरम्यान आपणस युजर नेम पासवर्ड सेव्ह करावा लागेल.आणि उबुंटू साठी किती जागा द्यायची हे पण सांगावे लागेल.

त्यासाठी महिती खालील विंडोत भरावी.

installtion window
इनस्टॉलर विंडो

या विंडो वर किल्क करा कि झाले आपोआप उबुंटू इंस्तोल होईल आपल्या सिस्टीम वर…

३-४ वेळा सिस्टीम री स्टार्ट होईल आणि नंतर ती लॉग इन विन्डो ला येऊन थांबेल.

मग पासवर्ड देऊन सिस्टीम उबुंटू मध्ये घुसा..एक मधुर आवाज येईल आणि आपण लिनक्स मध्ये पोहचला असाल…इतके सोपे आहे सगळे.. 🙂

आता उबुंटू आणि विंडोज मधून आलटूनपालटून फिरण्याच्या टिप्स:

सिस्टीम रिस्टार्ट केल्यावर आपणस पुढील प्रमाणे उबंटू का विंडोज असे दोन पर्याय दिसतील .

आपणस त्यादोन्ही मधील एक पर्याय निवडून कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये परत जाता येईल.

जसा विंडोज ला खालच्या बाजूस टास्क बार असतो तसा उबंटू च्या वरच्या बाजूस टास्क बार असतो.

या टास्क बारच्या उजव्या बाजूस आपणस सिस्टीम रिस्टार्ट किंवा शट डाऊन करण्याचे पर्याय उपलब्द असतात.

विंडोज च्या प्रत्येक विंडोमध्ये विंडोज मोठी ,लहान किंवा बंद करण्यासाठी विन्डो च्या उजव्या बाजूस पर्याय असतात पण उबंटू मध्ये ते विन्डो च्या डाव्या बाजूस असतात.

उबुंटू विंडोच्या डाव्या बाजूस अप्लिकेशन विषयक पर्याय असतात.

वरील कोपऱ्यातील बटन हे विंडोज च्या स्टार्ट मेनू सारखे काम करते यात आपणस हावे ते अप्लिकेशन शोधून आपण ते उघडू शकतो.

खालील प्रमाणे आपला डेस्कटॉप आपणस दिसतो….

opemning terminal
उबुंटु

हळूहळू वापरण्यास सुस्र्वात केल्यावर आपणस उबंटू एकदम जमूनही जाईल…आणि  नक्कीच मजा येईल.. काही तरी ग्रेट ऑपरेटिंग वापरात असल्याचा फील तर निर्विवाद ..!!!

लिनक्स च्या काही महत्त्वाच्या लिंक्स:

1] www.kernel.org  :या लिंक वर लिनक्सचा सोर्स दिलेला असतो.

याच्या वरती लिनक्स चे स्टेबल व्हर्जन दिलेले असेल ते पण डाऊनलोड करून आपल्या सिस्टीम वर सेव्ह करू शकता.[उदा: 3.8.3 हे आत्ताचे स्टेबल व्हर्जन आहेते दर वेळी अपडेट होत असते.]

२]www.lkml.org : ही लिनक्स ची ऑफिशियल मेलिंग लिस्ट आहे.यात आपण भाग घेवू शकतो. आणि हवे ते आधीच्या मेल्स मधून शोधू शकतो.

या भागात काही शंका आल्यास वा कुठे अडल्यास नक्की विचारा MJ आहेच तुमच्या मदतीला…

[नोंद :मी दर आठवड्याला लिनक्सशी निगडीत एक पोस्ट लिहीत आहे आणि संपूर्ण लिनक्स प्रात्यक्षिकसह आपणसमोर सदर करणार आहे तेंव्हा आपणस अपडेट न चुकता मिळण्यासाठी आपला ई मेल आयडी ब्लॉगला subscribe करून नोंद करू शकता.]

माझा लिनक्स मराठीतूनहा प्रयोग कसा वाटला हे पण नक्की सांगा…मला सूचना ,सुधारणा व प्रतिक्रिया   ऐकायला आवडतील.

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

“लिनक्स मराठीतून “ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]लिनक्सची ओळख आणि उबुंटू इन्स्टॉलेशन.

भाग २]लिनक्सची जान आणि शान टर्मिनलची ओळख आणि vi एडीटर.

भाग 3]लिनक्स कर्नेल आणि डिव्हाईस ड्रायव्हर ची ओळख.

भाग ४]डिव्हाईस ड्रायव्हरचा हँलो वल्ड प्रोग्रम.

भाग ५]डिव्हाईस ड्रायव्हरचा पँरामिटर पासिंग व प्रोसेस संबन्धित प्रोग्रम.

भाग ६ ]कँरेक्टर डिव्हाईस ड्रायव्हर बेसिक

धन्यवाद -MJ 🙂

8 thoughts on “लिनक्स मराठीतून :भाग १:लिनक्सची ओळख आणि उबुंटू इन्स्टॉलेशन.”

  1. अतिशय छान माहिती आहे अशा प्रकारे जर मराठीतून सर्वच संगणक तंत्रज्ञान शिकवले तर नक्कीच मराठी माणसांचा भाषेचा अडसर (इंग्रजी प्रामुख्याने ) दूर होईल व सर्वच ज्ञान आत्मसात करता येईल. धन्यवाद !!

    1. हो धनंजय माझाही हा प्रकल्प करण्यामागे तोच उद्देश आहे.
      आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      अशीच भेट देत राहा. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s