Technology, USB, x-All Tablets

USB म्हणजे काय आणि USB कसे काम करते?


USB म्हणजे काय आणि USB कसे काम करते?

usbjpeg

आपण रोजच्या व्यवहारात यु.एस.बी. पेन ड्राईव्ह,हार्ड डिस्क , यु.एस.बी. केबल , यु.एस.बी. पोर्ट असे शब्द एकतो आणि वापरतो,कधीकधी आपणस नक्की प्रश्न पडला असेल कि हे यु.एस.बी. आहे तरी काय? याचा वापर कुठे होतो ?यात असते तरी काय?या सर्व प्रश्नाची उकल करण्यासाठी हि पुढील पोस्ट..आपल्या सर्व शंकाचे निरसन करेल यासाठी एकदम सोप्या भाषेत USB ची तांत्रिक माहिती देण्याचा प्रयन करत आहे.

USB म्हणजे युनिव्हर्सल सिरीयल बस.

१९९० साली केबल कनेक्शन व डाटा कम्युनिकेशन साठी वापरला जाणारा हा प्रोटोकोल उदयास आला.

सध्या प्रिंटर ,मोबाईल फोन,केमेरे,संगणक इत्यादी उपकरणात आपणस हे पोर्ट दिसते.

USBचा पुढील लोगो आपण बऱ्याच केबल व कनेक्टर वर नक्कीच पहिला असेल.

USB Logo

USB १.० हे तसे USB चे पहिले व्हर्जन पण यात काही प्रोब्लेम आल्यामुळे लगेचच USB १.१ हे स्टेबल व्हर्जन काढले त्या मुळे USB१.१ हेच प्रथम व्हार्जेन मानतात.त्यात सुधारणा करून तयार झाले ते आज आपणस दिसणारे USB २.० पोर्ट…

USB २.० यात ४ पिन असतात एक पॉवर, दुसरी ग्राउन आणि दोन केबल डाटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात.USB डाटा ट्रान्सफर करण्यासाठी सिरीयल प्रोटोकॉल वापरते.

याचे प्रमुख विशिष्ट म्हणजे हे प्लग आणि प्ले आहे म्हणजेच हे जसे आपणस संगणकात प्लग केले कि याचा डिव्हाईस ड्राईव्हर आपोआप लोड होतो.

त्यामुळे आपणास विशेष असा नवीन काही सोफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नसते.या विशिष्यतेमुळे हा अल्पावधीत एकदम लोकाभिमुख झालेला पोर्ट आहे.

USB २.० पोर्ट व पिन कनेक्शन पाहण्यासाठी पुढील चित्र पहा:

usb pins

लाल रंगाची वायर +५ वोल्ट देते काळी वायर ग्राउंड साठी वापरली जाते.

पांढरी वायर डाटा + आणि हिरवी वायर डाटा – या दोन डा टा ट्रान्सफर साठी वापरल्या जातात.

USB २.० केबलचे अंतरंग पाहण्यासाठी पुढील चित्र पहा:

USB 2 internal

आपणास दिसणाऱ्या USB२.०  केबलच्या आत वरीलप्रमाणे चार केबल अल्युमिनियमच्या शिल्डमध्ये गुंडाळलेल्या असतात.

USB२. या द्वारे डाटा एकाच दिशेने ट्रान्सफर होतो.या केबल च्या आकारानुसार त्याचे A व B असे दोन टाईप होतात.

USB२. या केबल द्वारे आपण ५ वोल्ट पर्यंत वोल्टेज पाठवू शकतो म्हणूनच याचा वापर घेऊन चार्जीन करता येऊ शकते.आपण हल्ली आपले मोबाईल वा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस USB केबल वापरून चार्ज केले असतीलच..

USB२.० या केबलचे लहान रूप म्हणजे मिनी यु एस बी केबल पण नंतर ती जाऊन सध्या मायक्रो यु एस बी केबल सर्वत्र वापरली जाते एवढेच नव्हे तर मायक्रो यु एस बी पोर्ट हे सर्व नव्या मोबाईल मध्ये चार्जिंगचे नवे स्टेन्डॅड मानले जाते.

आपल्या मोबाईलमध्ये जे छोटे USB पोर्ट जे [आपण डा टा ट्रान्स्फर व चार्जिंगला वापरत असतो ते मायक्रो यु एस बी पोर्ट.

USB २.०मध्ये बऱ्याच सुधारणा करून USBचे नवे व्हर्जन सध्या बाजारात येत आहे त्याचे नाव आहे USB ३.०.

USB 3.0 लोगो :

USB ३.० यात  दोन्ही बाजूने महिती पाठवली जाते आणि सुपरस्पीड स्पीडने .त्याचा लोगो तेच प्रेसेंट करतो.

usb 3.0

USB ३.० हे सुपरफास्ट यु एस बी नावाने ओळखले जाते.हे खासकरून दोन्ही डायरेक्शन नि डाटा ट्रान्सफर करण्यासाठी बनवले आहे.यामुळे याचा डाटा ट्रान्सफर स्पीड सुद्धा वाढला आहे, USB २.० पेक्षा USB ३.० चा स्पीड जवळपास १० पटीने जास्त आहे.

USB ३.० याचे आणखी ही एक वैशिठ्य म्हणजे USB ३.० डीव्हाईस हे USB २.० सुद्धा सपोर्ट करता.

म्हणजे जर आपल्या कॉम्प्युटरला जर USB ३.० पोर्ट असेल तर त्यावर आपण USB ३.० पेन ड्राईव्ह तसेच USB २.० पेन ड्राईव्ह वापरू शकतो.

USB ३.० पोर्ट हा USB २.० पोर्ट सारखाच असून त्यात एक आणखी निळी पट्टी कनेक्शन पोर्ट साठी दिलेली आहे त्यावरून आपण पाहताक्षणीच USB3.0पोर्ट ओळखू शकतो.

USB ३.०पिन कनेक्शन:

usb 3.0 pin

USB ३.० यात एकूण ९ पिन आहेत यातील ४ पिन USB २.० सारख्याच असून फास्ट डाटा ट्रान्सफर साठी दोन डाटा ट्रान्सफर पिन्स च्या जोड्या वाढाव्यात आल्या आहेत तसेच एक एक्स्ट्रॉ ग्राउंड पिन वाढाव्यात आली आहे.

या पिन्स चा वापर करून आपण जास्त माहिती पाठवू शकतो तसेच निरनिराळ्या डीव्हाईसला कनेक्ट करू शकतो.

USB ३.० पिन केबल मधून कशा जातात हे खालील चित्रात दाखवलेले आहे:

usb 3 pin internals

आपण जसे USB २ .० ला पहिले तशाच ४ पिन्स आहेत पण यात SSTX आणि SSRX या दोन ट्रान्समिटर आणि रिसीव्हर च्या दोन जोड्या आहेत ज्याचा वापर करून दोन्ही दिशांनी डा टा ट्रान्स्फर केला जातो.

म्हणजेच संगणकापासून ते मोबाईल वर आणि मोबाईल वरून परत संगणकावर एकाच वेळी डाटा पाठवू शकतो.

USB ३.० पोर्ट व पिन कनेक्शन पाहण्यासाठी पुढील चित्र पहा:

USB 3.0 connection

USB ३.० चे पोर्ट वरचेवर पाहता USB २.० सारखेच दिसते पण याच्या आतील बाजूस USB 2.0 पेक्षा जास्त पिन्स असतात त्या स्पेशल USB 3.0 च्या पिन्स वरील चित्रात दाखवण्यात आल्या आहेत.

USB ३.० केबलचे अंतरंग पाहण्यासाठी पुढील चित्र पहा:

usb 3.0 internal pins

USB 3.0 मध्ये वरीलप्रमाणे एकूण ९ पिनांची मांडणी केलेली असते.डाटा केबल्स या दोन अंतरंगात गुंडाळलेल्या असतात.

आता येणाऱ्या नवीन उपकरणात USB 3.0च असेल.तेन्ह्वा आपणही आपले नवीन पेन ड्राईव्ह,व USB वर चालणारे डिव्हाईस USB 3.0 आहे का नाही ते जरून पाहून घ्या.

पुढे आपणस मस्त फायदा होईल याचा…USB 3.0किंमत USB २.0 पेक्षा थोडी जास्त आहे पण वेळ आणि स्पीड जास्त देऊन तो नक्कीच पैसे वसूल…

आपला संगणक ही .USB 3.0 देतो का नाही हे पाहून घेणे जास्त चांगले तरच आपणस इतर .USB 3.0 डिव्हाईस चा फायदा घेता येईल…

आता बऱ्याच संगणकात आधीपासूनच .USB 3.0 पोर्ट दिले जाते नसेल तर नक्की चेक करून घ्या…

परत एकदा आपण USB २.० व ३.० मधील प्रमुख फरक पाहून लेखाची सांगता करुया.

यु एस बी २.० आणि ३.० मधील प्रमुख फरक:

सुविधा

USB2.0

USB 3.0

स्पीड 480Mbits/sec[60MB/s] 5Gbits/sec[625MB/s]
करंट 500mA 900mA
व्होल्टेज 5V 5V
पॉवर 2.5W 4.5W
पिन्स 4 9
प्रोटोकोल सिरीयल सिरीयल
कामुनिकेशन एका दिशेने दोन्ही दिशेने
हॉट प्लग सपोर्ट आहे आहे
वापर सर्वत्र ,जास्त वापरास सुरवात

आता नवीन संगणकात USB २.० ऐवजी USB ३.० पोर्ट ची सुविधा का देण्यात येत आहे आणि आपणास येत्या काळात त्याचा कसा फायदा होईल हे आपणास नक्कीच समजले असेल.

आपली  USB ३.० उपकरणे अधिक जोरात व जास्त शक्तीने चालणारी बनतील यात शंकाच नाही.

आपणास हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या शंकांना उत्तर देण्यासाठी मी आहेच… 🙂

10 thoughts on “USB म्हणजे काय आणि USB कसे काम करते?”

    1. :)हा हा…शक्य तितक्या सोप्या आणि सुटसुटीतपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
      मस्त वाटले आपल्याला समजले हे कळल्यावर..
      आवर्जून प्रतिक्रिया देण्याबद्दल धन्यवाद महेंद सर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s