Technology

इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट डिझाईन : नाविन्यपूर्ण प्रोडक्ट संकल्पनेची प्रमुख तत्वे


नवीन प्रोडक्ट तयार करणे हे सध्याच्या युगातील मोठे आव्हान आहे तरच आपण या स्पर्धेच्या युगात प्रगती करू शकू.

प्रोडक्ट्स तयार करताना त्यात वेगळेपण तर असावाच तसेच त्याची उपयुक्तता हि अधिक हवी.जर ग्राहकास त्याचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यास मदत होणार असेल तर त्या वस्तूचे महत्व वाढते.अशाच वस्तू किंवा प्रोडक्ट तयार करण्याकडे आपला कल हवा.

सध्या बाजारात ग्राहकाला काय हवे आहे ते जाणून खास एका ग्राहक वर्गासाठी तयार केलेले प्रोडक्ट नक्कीच यशस्वी ठरेल.जर ग्राहकाचे प्रश्न आपले उपकरण किंवा प्रोडक्ट सोडवत असेल तर ग्राहक त्यास वाजवी किमत मोजण्यासही तयार असतो.

प्रत्येक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये काळानुरूप बदल करून नाविन्यता टिकवून  आधुनिकीकरण करणे हे अनिवार्य ठरत आहे. तरच आपण स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकू.

या लेखात आपण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स डिझाईन तयार करण्यासाठी लागणारी तीन प्रमुख तत्वे पाहूयात.

हि तत्वे वापरून आपण नवीन प्रोडक्ट्स कसे तयार करावेत यांचा विचार करू शकतो.तसेच आपल्या प्रोडक्ट मध्ये कशी सुधारणा करावी यासाठी कोणता विचार कसा प्रकारे करावा याची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत.

बहुढंगी वस्तू व कल्पना यांची जोडणी :

नवीन प्रोडक्ट तयार करताना दोन किंवा अधिक अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तू व त्याची पद्धत ,प्रिन्सिपल्स विचारात घेवून मुक्तपणे प्रोडक्टची कल्पना करणे.

त्याचे स्केच कागदावर तयार करणे व त्या दोन गोष्टी एकमेकांना कशा जोडता येवू शकतात व त्यापासून कोणकोणते उपयुक्त प्रोडक्ट तयार करता येऊ शकतील त्याचा विचार करावा.

विभिन्न वस्तूंची संकल्पना एकमेकांना जोडून काहीतरी भन्नाट तयार करता येऊ शकते याचा विचार करावा व ते आपल्या प्रोडक्टचे वैशिष्ट्य ठरू शकते.

एखाद्या वस्तूचा ठोकळे बंद वापर असू शकतो त्याकडे वेगळ्या नजरेने पाहून त्यातील चांगले गुण आपण दुसऱ्या एखाद्या वस्तुत वापरून नवीन प्रोडक्ट तयार करू शकतो.

उदाहरणार्थ :

ब्रेड टोस्टर व प्रिंटर हे दोन विभिन्न ठिकाणी वापरले जाणारे प्रोडक्ट पहा.

 • आता या दोन वस्तू एकमेकांना कशा जोडता येऊ शकतील याचा विचार करा.
 • त्या दोन्ही वस्तू कोणत्या तत्वावर चालतात याचा विचार करा त्यामधून काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार करता येऊ शकेल का याचा विचार करा.
 • चला तर आपल्या कल्पना शक्तीला चालना द्या .
 • हि गोष्ट प्रत्यक्षात कशी होईल यासाठी कोणती टेक्नोलॉजी वापरावी याचा सध्या विचार करू नका.
 • तर आपल्या समोर पुढील कल्पना उभ्या राहतील.
 • अगदी भन्नाट कल्पनांचा विचार करा..

ब्रेड हा प्रिंटर मध्ये कागदाच्या जागी घालायचा व तो प्रिंटर मधून भाजून येईल.

ब्रेड वर आपण काहीतरी चित्र ,कार्टून्स ,डिझाईन प्रिंट करून खास टोस्टर तयार करू शकू.

ब्रेड वर आपण शुभ प्रभात असा मेसेज किंवा काही खास मजकूर लिहून ब्रेड भाजू शकतो.

ब्रेड टोस्टर मोबाईल ला जोडून सकाळच्या बातम्या ब्रेड वर प्रिंट करणारा प्रिंटर.

रंगीत वेगवेगळ्यारंगात भाजून येणारा ब्रेड टोस्ट.

असे कितीतरी कल्पना आपल्याला सुचल्या असतील त्या खाली पोस्ट करा.

अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा संकल्पना एकमेकांना जोडून नवीन प्रोडक्ट ची कल्पना करू शकतो.

Bread.jpg

Innovative Product for Printing on Bread

 

फ्लूएन्सी : सुरळीत बाजूंमध्ये निरनिराळे बदल :

प्रत्येक वस्तूला वेगवेळ्या बाजू असतात त्यातील एका बाजू वर लक्ष ठेवून ती बदलावी.

वेगवेगळ्या अँगल्सचा विचार करून त्यातील एक अँगल काही अंशात बदलणे.हे तत्व आपण कोणत्याची प्रोडक्टला लावू शकतो.

प्रोडक्टचा साईझ, शेप, ठेवण ,युजर इंटरफेस ,प्रोडक्ट तयार करण्याचे मटेरियल ,प्रोडक्टची रंगसंगती ,प्रोडक्टचा आकार या सारख्या वेगवेगळ्या बाजूंवर लक्ष पूर्वक विचार करावा.

यामुळे आपण अस्तित्त्वात असणारे प्रोडक्ट नव्याने सुधारून त्याची सुधारित आवृत्ती बाजारात आणू शकतो.

अस्तित्वातील प्रोडक्टमध्ये अर्थपूर्ण बदल करून ते लोकांच्या भविष्यातील गरजा कशा पूर्ण करू शकेल यावर लक्ष दिल्यास आपण एका नवीन बिझनेसला जन्म देऊ शकाल.

या तत्वामध्ये मूळ प्रोडक्ट तेच राहून त्यामध्ये वेगवेळ्या बाजूंनी बदल करून त्याची उपयुक्तता वाढवणे याबर भर दिला जातो.

एकाच ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तूकडे वेगळ्या नजरेने पाहून त्याचा वापर आणखी कोठे करता यईल हे शोधणे हे या तत्वाचे उदिष्ट होय.

उदाहरणार्थ :

आपण कार चे उदाहरण घेवू.

आता कार चा आकार काही वेळा आपणस मोठा हवा असतो पण लहान रस्त्यावून गाडी वळवताना मोठूया गाड्यांना त्रास होतो तर आपण गाडीच्या साईझ वर विचार करून फोल्डेबल कार बाजारात आणू शकता.

गाडीसाठी प्लास्टिक मटेरियल्सचा वापर करून गाडीची किंमत कमी करण्याचा विचार करू शकता.

तसेच पाण्यावरून चालणारी कार किंवा हवेतून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणारी कार अशा संकल्पनाच आपण विचार करू शकता.

गाडीसाठी पेट्रोल किंवा डीझेल याखेरीज दुसरे इंधन कसे वापरता येऊ शकले यावर एक नवी कार इंडस्ट्री उभी करता येऊ शकेल.

लहान व कमी खर्चात तयार करण्यात आलेली नँनो कार किंवा इलेक्ट्रिक कार हि यापद्धतीच्या इनोव्हेशनची उदाहरणे आहेत.

कार हे फार मोठे उदाहरण आहे पण आपण हेच तत्व लहान लहान प्रोडक्ट्स ना लाऊन त्यांच्यामध्ये सुधारणा करून एक नवीन मार्केट तयार करू शकतो.

 

car_design

Innovative Car By Flexibility Principle

वेगवेगळी अवजारे ,उपकरणे यांच्या मुलभूत बाबीत बदल करण्याच्या विचार करून ते ग्राहकाच्या सोई नुसार बदलणे.

उत्पादन मार्केटिंगच्या पद्धतीमध्ये बदल ऑनलाईन विक्री करणे ,मोबाईल चा वापर करून उपकरण चालू बंद किंवा कंट्रोल करणे अशा वेळ वाचवणाऱ्या व आधुनिक बदलांचा ग्राहक नक्कीच आनंदाने स्वागत करतील.

फ्लेझीबिलीटी : मूळ तत्व वाकवून अमुलाग्र बदल करून दुसऱ्या ठिकाणी वापर.

यामध्ये मूळ प्रोडक्ट दुसऱ्याच कामासाठी वापरणे.एखादे प्रोडक्ट काहीतरी विशीष्ट उपयोग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले असते.

पण तेच प्रोडक्ट , तीच संकल्पना आपण दुसरीकडे दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये वापरू शकतो.

यामध्ये मूळ प्रोडक्टच्या कार्यकारी संकल्पनेवर विचार करून ती प्रोसेस किंवा मेथड अजून कोणत्या ठिकाणी वापरली जाऊ शकते याचा विचार करणे.

अशा रीतीने एका वस्तूचा अनोखा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जाऊन त्याद्वारे नवीन प्रोडक्टची निर्मिती करता येऊ शकते.

उदाहरणार्थ :

पंखाचे फिरणे व वारा देणे हे तत्व वापरून नवीन प्रोडक्ट तयार करू शकता.

तसेच इस्त्री चे विजेवर तापणे हे तत्व इतर ठिकाणी वापरून आत्तापर्यंत कित्येक प्रोडक्ट्स बाजारात आलेले आहेत.

सराव :

आपल्या या कन्सेप्ट क्लीअर होण्यासाठी पुढील सराव करा.याद्वारे प्रत्येक तत्वाची उजळणी होईल.

१. दोन प्रोडक्ट जोडणे : टी व्ही आणि फ्रीज

२. सुरळीत बाजूंचे बदल : स्पोर्ट्स शूज

३. तत्व वाकवून बदल : वॉशिंग मशीन

आपली उत्तरे कमेंट करा.. पाहू किती कल्पना सुचतात ते…

चला मग पक्की करूया इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट तयार करण्याची खास तत्वे..

–धन्यवाद – MJ 🙂

Advertisements

डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीम :बेसिक माहिती


डाटाबेस सिस्टिम :बेसिक माहिती [भाग १]

आजकाल बेंक ,तिकीट बुकिंग वा ऑनलाइन वाचनालय या सारख्या ठिकाणी रोजच्या रोज माहिती हि साठवली जाते आणि नवीन माहिती अपडेट केली जाते.पूर्वी हीच माहिती पुस्तकी रेकोर्ड वा वहीत लिहून केले जायचे पण हेच काम सोप्या व सुरळीतपणे करण्यासाठी आजकाल संगणकाचा वापर केला जातो.

डाटा हा संगणकात साठवून त्यावर हव्या त्या प्रकारे प्रोसेस करून आपणास हवी असलेली माहिती कमी वेळात व बिनचूकपणे मिळू शकते.संगणकामध्ये डाटा म्हणजेच माहिती ठेवण्यासाठी संगणकाच्या मेमरीतील काही जागा वापरली जाते.व ते सर्व मँनेज करण्यासाठी डाटाबेस मँनेजमेंट  सिस्टीमचा वापर केला जातो.

प्रारंभिक शब्दांचे अर्थ :

डाटा:माहित असलेले सत्य जे आपण रेकॉर्ड करून् ठेवू शकतो.

उदा:नाव,टेलीफोन नंबर,गाव.

डाटा हा फाईल च्या रुपात संगणकात साठवला जातो.

डाटाबेस:वेगवेगळ्या पण संबधित डाटाचे एकत्रित ठेवून एक पँकेज केले जाते त्यास डाटाबेस म्हणतात.

उदा:कंपनीशी संबधित सर्व डाटाचे एकत्रीकरण करून कंपनी नावाचा डाटाबेस तयार केला जातो.

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीम[DBMS]:असे सोफ्टवेअर कि ज्याचा वापर करून आपण आपणस हवी ती माहिती डाटाबेस मधून सुयोग्यरित्या घेऊ शकतो.

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीम खालील सोई पुरवते:

 • डाटा तयार करणे.
 • डाटाबेसची प्राथमिक माहिती साठवणे.[प्रारंभिक माहिती\मेटाडेटा]
 • डाटा टेबलमध्ये साठवले.
 • डाटावर निरनिराळे ऑपरेशन्स करणे.

 डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमचे फायदे.

=>डाटा मधील विस्कळीतपणा टाळता येऊ शकतो.

=>वेगवेगळ्या युजर्सना वेगवेगळ्या डाटाचा एक्सेस देता येऊ शकतो.

=>माहिती व्यस्थापक अचूकपणे करता येते.

=>एस क़्यु एल सारख्या प्रोग्रॅमिंग भाषा वापरून हवी ती माहिती डाटाबेस मधून शोधू शकतो.

डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमचे तोटे.

*सोफ्टवेअर हार्डवेअर आणि ट्रेनिंग साठी खर्चिक.

*डाटा सुरक्षितता आणि डाटाची वेळ पडल्यास पुनर्रचना यासारख्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते.

डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीमची रचना आकृतिबंध:

Database arch marathi

सिस्टीमची माहिती:

संगणक प्रोग्राम हा युजर वापरात असतो.तो प्रोग्राम जो डाटा हवा असेल त्याबद्दल क्वेरी (प्रोग्रमिक भाषेतून प्रश्न) डाटाबेस ला पाठवतो.डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीमच सोफ्टवेअर चे प्रोसेसिंग करते व डाटाबेस च्या प्रारंभिक माहितीच्या आधारावरून डिस्क मधून माहिती शोधून काढतो.व ती माहिती प्रोग्रामला पुरवली जाते.अशा तऱ्हेने प्रोग्रामला हवा तो डाटा देण्याचे काम डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमच करते.

सोप्या तांत्रिक डाटाबेस शिक्षणाच्या नव्या दुनियेत आपण स्वागतार्ह पाउल टाकल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत.

आपणास डाटाबेस मेनेजमेंट सिस्टीमची माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. 🙂

विंडोज ८ :मायक्रोसॉफ्टने घोषित केली आहे विंडोजची सर्वात अद्यावत ऑपरेटिंग सिस्टिम.


विंडोज एक्स.पी. व्हिस्ता,विंडोज ७ च्या अभूतपूर्व यशानंतर मायक्रोसॉफ्टने सध्या तैवानमध्ये होत असलेल्या कॉम्प्युटेकस्ट २०११ या शोमध्ये आपली नवीनतम अशी विंडोज ८ प्रदर्शित केली.

हि ऑपरेटिंग सिस्टिम प्रामुख्याने मोबाईल व टेबलेट पीसीसाठी नव्यातून बनवली असून ती सध्या चालणाऱ्या संगणकामध्ये व लँपटँाप मध्ये सुद्धा वापरण्यात येणार आहे.

या ऑपरेटिंग सिस्टिम साठी मायक्रोसॉफ्टला टचस्क्रीन व टेबलेट पीसीसाठी लागणारे नवीन बदल करावे लागले आहे.

विंडोज चा हा नवा अविष्कार अँपलची I-OS व गुगलची Android ऑपरेटिंग सिस्टिम यांना चांगलीच टक्कर देईल असे तज्ञांचे मत आहे.

या ऑपरेटिंग सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट पुन्हा मोबाईल व टेबलेट ऑपरेटिंग सिस्टिमच्या शर्यतीत आली आहे.

कशी आहे हि  ऑपरेटिंग सिस्टिम:


खास मेट्रो यु.आय :

प्रथमतः व टेबलेट पीसी अनलॉक करण्यासाठी विंडो स्क्रेन वरच्या बाजूस सरकवावी तेन्ह्वा आपणास होम स्क्रीन दिसेल.

या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये सुरवातीला या ओ.एस.( ऑपरेटिंग सिस्टिम) साठी बनवलेला खास मेट्रो यु.आय. दिसेल.

यामध्ये वातावरणाची माहिती देणारे अप्लीकेशन ट्वीटर,इन्वेस्टमेंट ,व्हिडिओ,गाणी व इतर भरपूर अप्लीकेशन एकाच स्क्रीनवर विशिष्टपूर्णपणे मांडली गेली आहेत.

आपण टचस्क्रीन वर स्क्रोल करून पूर्ण मांडणी पाहून अप्लीकेशन निवडू शकतो.

तसेच आपण कीबोर्ड जोडला असेल तेंव्हा पेज अप आणि पेज डाऊन बटन वापरून आपण संपूर्ण स्क्रीनभर कंट्रोल करू शकतो.

सुरवातीच्या स्क्रीन वर आपण सर्वात जास्त वापरलेली अप्लीकेशन दिसतील आपण स्वतः सुद्धा आपल्या आवडीनुसार ग्रुप सेट करून आनंद घेता येतो.

आपण या अप्लीकेशनला टच करून डायरेक्ट ते अप्लीकेशन उघडू शकतो.

अप्लीकेशन उघडल्यानंतर पुन्हा होम स्क्रीन वर येण्यासाठी स्क्रीन च्या उजव्या बाजूस विंडोजचा लोगो ला टच केल्यावर आपण पूर्वीच्या होम स्क्रीनवर येतो.

ठळक बाबी:

 • विंडोमध्ये अप्लीकेशन डेवलपमेंटसाठी मायक्रोसॉफ्टने विशेष प्लेटफॉर्म केला आहे ज्याचे नाव आहे टेलेरद्र अप्लीकेशन प्लेटफॉर्म.
 • यामध्ये आपण HTML 5,जावा ,CSS यासारख्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामींग लँग्वेजेस वर आधारित अप्लीकेशन डेवलपमेंट करू शकतो.
 • यामधील सर्व अप्लीकेशन जलद गतीने चालतात.तसेच एका अप्लीकेशनमधून दुसरया अप्लीकेशनमध्ये क्षणात जाता येते.
 • तसेच सर्व अलर्ट मेसेज देण्यासठी स्क्रीनवर नोटीसची सुविधा पण दिली आहे.
 • उजव्या बाजूची स्क्रीन टच करून आतील बाजूस ढकलली असता विंडोजचा कंट्रोल बार ओपन होतो.
 • कंट्रोल बार वर आपण सेटिंग करू शकतो तसेच विंडोज च्या आयकॉन वर टच केले असता आपण होम विन्डोवर पोहचतो.
 • डाव्या बाजूची स्क्रीन टच करून आतील बाजूस ढकलली असता आपण अगोदर उघडलेली अप्लीकेशन आपण परत उघडू शकतो.
 • जेंव्हा आपण अगोदर उघडलेले अप्लीकेशन परत उघडत असू तेंव्हा ते लहान विंडो मधून परत फुल्ल स्क्रीन होईल.
 • याचा खास फायदा म्हनजे आपण आपल्या दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपणास टेबलेटवर अगदी सुरळीतपणे काम करता येते.
 • आपण खालील बाजूस वर ओढल्यास चालू अप्लीकेशन ची सेटिंग सेट करू शकतो.
 • यावर अति उच्य दर्जाचे व्हिडिओ न थाबता चालतात.
 • तसेच एकाच वेळी अनेक अप्लीकेशन चालू असतात व कोणतेही अप्लीकेशन चालू स्थितीत परत उघडू शकतो.एकदम मल्टीटास्किंगचा अनुभव..

प्रोसेसर विषयक:


या ऑपरेटिंग सिस्टिमचे आणखी एक उल्लेखनीय गोष्ट हि आहे कि पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्टने आर्म प्रोसेसर्स साठी विंडोज चा सपोर्ट दिला आहे.

विंडोज ८ हो अशी ऑपरेटिंग सिस्टिम आहे कि जी इंटेलच्या X८६ प्रोसेसर्स व आर्म कंट्रोलर प्रोसेसेस या दोघांनाही सपोर्ट करते.

AMD,Intel हे विंडोज चे पहिले पार्टनर आहेतच तसेच या  ऑपरेटिंग सिस्टिम साठी आर्म प्रोसेसेस असणारे नवे पार्टनर सुद्धा मायक्रोसोफ्टला मिळाले आहेत.

जसे कि एनव्हीडीया कंपनीचा Kal-Ei ,QualComm चा Snapdragon,Texas Instrumentचा omap4 प्रोसेसर असे आर्म बेस असणारे नवे प्रोसेसर आहेत.

जे भविष्यात येणारया स्मार्ट फोन व टेबलेट पी सी मध्ये वापरले जातील.   

आपण जेंव्हा USB पेन drive जोडला असता सिस्टिम आपोआप कोणते अप्लिकेशन आहे ते ओळखून ते चालू करते.

तसेच या ओ.एस द्वारा ७२० पी व्हिडिओ घेवू शकतो.

अशा प्रोसेसरशी संलग्न अनेक सुविधा या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत.

कोणत्या विशेष सुविधा आहेत ?

विंडोज स्न्याप सुविधा:

 • एक अप्लिकेशन फुल्ल स्क्रीन वर चालू असताना आपण दुसरे अप्लिकेशन चालू अप्लिकेशन जवळ सोडून एकच वेळी दोन स्क्रीन पाहण्याचा आनंद घेवू शकतो.
 • यावेळी दोन्ही अप्लिकेशन सुरळीत पाने चालू सतत व आपण कोणत्याची अप्लिकेशन वर काम करू शकतो.तसेच अप्लिकेशन ची साईझ बदलू शकतो.  

नवा इंटरनेट ब्राऊजर :

 • या ऑपरेटिंग सिस्टिम साठी इंटरनेट एक्सप्रोरर १० हि नवीन इंटरनेट ब्राऊजर सोफ्टवेअर देण्यात आले आहे.
 • यात टच स्क्रीन साठी विशेष बदल केले आहेत.आपण इंटरनेट ब्राऊजर चालू असताना वरील बाजूस खाली ओढल्यास  आपण उघडलेल्या विन्डो टेब दिसतील त्यावर टच करून आपण ती विंडो उघडू शकतो.
 • तसेच खालील बाजूस URL वर टच केले असता कीबोर्ड आपोआप उघडला जाईल.
 • यामध्ये टेबलेट धारकांसाठी कीबोर्ड चा नवा प्रकार आणला आहे.
 • एक बटन दाबून आपण कीबोर्ड दोन भागात विभागूनतो दोन्ही अंगठ्याने कीबोर्ड अगदी सहज वापरू शकतो.
 • यामध्ये GPUचा वापर करून इंटरनेट ब्राऊजर चालवण्यासाठी हार्डवेअर अय्सिस् ची सोय आहे.
 • तसेच आय्डोबी फ्लाशसाठी सुद्धा हि सोय आहे.त्यामुळे फ्लाश व ब्राऊजर उच्च दर्जाचे कन्टेन्ट चालवण्यास पात्र ठरतात.  

संगणकासारखा वापर:

 • हि जरी टेबलेटसाठी बनवली गेली असली तरी याचा वापर नेहमीचा संगणकासारखा करत येतो.
 • याच्या होम स्क्रीन वर एका बटणावर टच केल्यावर आपण आपल्या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम  चे रुपांतर सध्या वापरात असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये करू शकतो.
 • व परत पुन्हा नव्या  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये परत हि येवू शकतो.
 • तसेच संपूर्ण स्क्रीनला टच चा सपोर्ट दिला आहे.
 • या मोड मध्ये आपण विंडोज च्या इतर ऑपरेटिंग सिस्टिम सारखे फाईल्स व फोल्डर विंडो वर पाहू व वापरू शकतो.
 • तसेच डेस्कटॉपवर चालणारे सर्व अप्लिकेशन आपल्या पद्धतीने चालवता येतात आणि पी सी मोड ते टेबलेट मोड हे क्षणात जाता येते.
 • यासाठी आपला डिस्प्ले १६:९ रुपांतरीत हवा. यात आपणास आपली स्क्रीनला १०२४ X ७६८ इतके रेझोल्यूशन मिळते.

नवीन फाईल सिस्टम -प्रोटोगोंन:

 • विंडोज ८ मध्ये जुन्या NTFS  फाईल सिस्टम ला बदलून नव्या अशा प्रोटोगोंन फाईल सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.
 • जी डिस्क मँनेजमेंट सुरळीतपणे करेल.यात डिस्कचे खराब भाग आपोआप शोधून ते दुरुस्तकरण्याची सोय आहे.
 • तसेच नवीन इंस्टॉलरमधेच डिस्क क्लीन करण्याची सोय आहे.

अप्लिकेशन ते अप्लिकेशन शेअरिंग:

 • आपण एका अप्लिकेशन मधून माहिती दुसऱ्या अप्लिकेशन मध्ये पाठवू शकतो. हि मस्त सोय आहे.
 • उदा:फोटो फिडर या अप्लिकेशन मुले आपण आपले फोटो डायरेक्ट ट्वीटर वर अपलोड करू शकतो.
 • यासाठी आपणस कॉपी , पेस्ट, सेव्ह वापरण्याची काही गरज भासणार नाही.

आहे ना हि एक संगणक वापरणार्यांसाठी सुंदर सुविधा ..

हि ऑपरेटिंग सिस्टिम येत्या ३-४ महिन्यात आपणास वापरण्यासाठी खुली केली जाईल.

विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टिम  बाबत अधिक माहिती पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे प्रदर्शित केलेले व्हिडिओ पहा.

मग लवकरच येणाऱ्या नव्या विशेष्ट्याने भरपूर अशा सर्व कॉम्पुटर वर चालणारया विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टिम  चे स्वागत करुया..