Greeting

जर्मन शिका मराठीतून:भाग २]जर्मन भाषेची ओळख:जर्मन अभिवादन.


आपल्या नेहमीच्या वापरात आपण काही शब्द ,अभिवचन वापरात असतो. धन्यवाद ,शुभ प्रभात,क्षमा करा असे शब्द आपल्या बोलण्यात नेहमीच येत असतात.

या भागात आपण काही नेहमी वापरात येणाऱ्या छोट्या छोट्या शब्दांना जर्मन भाषेत काय म्हणतात आणि त्याचा उच्चार कसा करायचा याची माहिती घेवूया.

जसे आपण सकाळी एकमेकांना शुभप्रभात वा गुड मॉर्निंग असे बोलतो त्याला जर्मन भाषेत “Guten Morgan” असे लिहले जाते याचा उच्चार “गुट्-अन्-मॉर्गन “असा केला जातो.

आणखी एक उदाहरण पाहूया.

आपणस कोणी भेटले कि आपण प्रथम त्या व्यक्तीस नमस्कार किंवा इंग्रजीत Hello[हँलो] म्हणतो जर्मन भाषेत Hello या शब्दास “Hallo” असे म्हणतात आणि याचा उच्चार “हालो” असा होतो.

अशा काही शब्दांची ओळख आपण पुढील कोष्टकात करून घेवूया…

मराठी

English

German

जर्मन उच्चार

शुभ प्रभात Good morning Guten Morgen. गुट्-अन् मॉर्गन
शुभ दुपार Good afternoon Guten Tag. गुट्-अन् टाग्
शुभ संध्या Good evening Guten Abend. गुट्-अन् अबेन्ड
शुभ रात्री Good night Guten Nacht गुट्-अन् नाख्ट
पुन्हा भेटू Goodbye Auf Wiedersehen. आऊफ व्हीदेअरझयेन
कृपया माफ करा Excuse me entschuldigen. इंट-शुल्डी-गून्ग
कृपया Please. Bitte. बिट्:
धन्यवाद Thank you. Danke. डांन्क
क्षमा करा Sorry Tut mir leid. तुट मिअर् लाईड
हो Yes Ja. याह्
नाही No Nein. नाइन्
बरं ok. geht. गेट्
स्वागत Welcome! Willkommen! व्हील-कोम्मेन
भले होओ Good luck! Viel Glück! फीलं ग्लुईक 

हे टेबल पूर्णपणे वाचून या शब्दांचा आपल्या नेहमीच्या जीवनात वापरून जर्मन भाषेची सवय करून घेवूया..

मग किमान हे सुरवातीचे बेसिक शब्द शिकून आपल्याला काहीतरी अर्थपूर्ण जर्मन भाषा बोलायला यायला सुरवात झाली आहे असा आपणास आत्मविश्वास येईल. 

काही निवडक शब्दांचा उच्चार समजण्यासाठी पुढील यु-टूबवरील चल-चित्र पहा आणि उच्चार लक्षपूर्वक ऐका.

चला मग जर्मन शिकण्यास सुरवात केलेली आहे.. व्हील-कोम्मेन!!!

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂

आपल्या प्रतिक्रियेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. 🙂

Advertisements