कसे काम करते

3D तंत्रज्ञान कसे काम करते ?


3D हे एखादे द्विमितीय चित्र त्रिमितीय रुपात दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान होय.

सध्या बाजारात 3D फोटो, 3D फिल्म्स , 3D प्रोजेक्टर, 3D कॅमेरा, 3D टीव्ही , 3D गेम्स सारखी अनेक प्रोडक्ट येत आहेत.आपल्याला प्रश्न पडलाच असेल कि हे 3D म्हणजे नक्की आहे तरी काय? आणि हे कसे काम करते? आपल्याला याचा उपयोग काय? याचे प्रकार कोणते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीचा हा प्रवास…

3D डिस्प्ले हि एखादे चित्र थ्री डायमेन्शन मध्ये दाखवण्यासाठी वापरला जातो.यामुळे 3D  चित्र अधिक आकर्षित  व अगदी खरे असल्याची अनुभूती देते व आपणस चित्रातील वस्तू चित्रातून बाहेर आल्यासारखी दिसते.

आपण जणू काही त्याला स्पर्श करू शकतो असा आपल्याला आभास होतो. हे तंत्रज्ञान मेडिकल,संशोधन सारख्या क्षेत्रातहि वापरतात.

मुख्यतः 3D  हे सध्या तत्त्वावर चालते –दोन्ही डोळ्याला वेगवेगळे चित्र अशा रीतीने दाखवणे कि ते 3D चा आभास निर्माण करेल.यास स्टेरिओस्कोपी[stereoscopy] म्हणतात.

यात आपण आपल्या मेंदूच्या मदतीने 2D चित्राला खोलीची अनुभूती देण्यास भाग पडतो व दोन्ही डोळ्याला दिसणारे वेगवेगळे चित्र मेंदू  3D चित्रासमान मानतो.  

3Dचा इतिहास :

सन १८३८ ला सर् चार्ल्स व्हीटस्टोन यांनी स्टेरिओस्कोपी तत्वावर पहिला स्टेरिओस्कोपी दर्शक बनवला.

 हे यंत्र चलचित्र व फोटोग्राफी दुनियेत मोठा बदल घडवून आणणारे ठरले.

या जवळपास २०० वर्षापासून  अस्तित्वात असणाऱ्या 3D तंत्रज्ञानत बरेचसे बदल घडत गेले.

१८४४ नंतरच्या काळात आलेले व्हीवमास्टर हे चित्र त्रिमितीय रुपात दाखवणारे यंत्र हेच तंत्रज्ञान वापरात होते.

जवळपास १९५० ला पहिला ३ D फिल्म दोन प्रोजेक्टचा वापर करून दाखवण्यात आला.

त्यानंतर यात झपाट्याने बदल होत गेले आणि  “अवतार” हा सिनेमा हा या तंत्रज्ञानाचा आधुनिक चेहरा घेवून समोर आला व जगभरचे लक्ष पुन्हा या टेक्नॉलॉजी वर आकर्षित झाले.

नवनवीन ३ D गॉगल, प्रोजेक्टर,टीव्ही क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली.इतकेच नाही तर आता संशोधन हे गॉगलचा वापर न करता आपण स्क्रीन वर 3D पाहू शकणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंत झेपावले आहे. 

डोळे व मेंदू 3D  सोबत कसे काम करतात?

३D कडे वळण्या आधी प्रथम आपणास आपले डोळे व मेंदू चित्र कसे पाहतात व समजावून घेतात हे समजावून घेतले पाहिजे. 

आपण एखादी वस्तू पाहू शकतो कारण  आपले डोळे वस्तू कडून आलेले किरण घेतात आणि आपला मेंदू त्या किरणाचा वापर करून चित्र तयार करतो.

जेन्ह्वा वस्तू हि दूर अंतरावर असेल तेन्ह्वा किरण समांतर नसतात तेंव्हा डोळे यास स्वतःला अनुरूप बनवतात व चित्र एकत्रितपणे जोडून पाहता येतात.

द्विमितीय दृष्टी :

मनुष्यप्राणी आपली द्विमितीय दृष्टी वापरून खोलीचा अंदाज घेतो आणि 3D जग पाहत असतो .

द्विमितीय दृष्टी हे गृहीत धरते कि आपणस दोन डोळे आहेत.

मेंदू आपल्या दोन डोळ्यांना दिसणारे चित्र एकत्रित करतो दोन डोळ्यांमधून दिसणाऱ्या चित्रामधील फरकावरून मेंदू वस्तू मधील अंतर शोधतो आणि खोली व अंतर यांचा अचूक अंदाज बांधतो.

आपण प्रथम आपला एक डोळा बंद करून व नंतर दुसरा डोळा बंद करून एकच वस्तू पहिली तरी आपणास आपल्या द्विमितीय दृष्टी कशी काम करते याचा अंदाज येईल.

२ D चित्र आणि 3D चित्रामधील फरक-

ज्या चित्रास उंची जाडी व खोली असते त्या चित्रास त्रिमितीय चित्र असे म्हणतात.ज्या चित्रास खोली  नसते ते चित्र द्विमितीय चित्र मानले जाते.

२D हे सोपी माहिती  पाठवण्यासाठी वापरतात पण अवघड व जटील माहितीसाठी 3D हे  2D पेक्षा जास्त अचूक ,स्पष्ट व लवकर माहिती देते हा या दोहोंमधील फरक .

 

वरील त्रिकोण हे तीन रेषा व तीन कोणापासून बनलेले आहेत इतकी माहिती त्रिकोण बद्दल सर्व सांगून जाते पण पिर्यामिड हे त्रिमितीय आहे त्यास ४ बाजू आहेत ६ कोण व ५ रेष इतकी माहिती हा पिर्यामिडची माहिती देण्यास लागते.

तात्पर्य इतकेच कि २ D चे ३ D मध्ये रुपांतर करण्यासाठी आपणास भरपूर अधिक माहिती लागते.३D मुळे चित्रात वास्तवता येऊन ती अधिक माहिती स्पष्ट करते.

3 D टेक्नोलॉजीचे  प्रमुख  प्रकार

3D तंत्रज्ञान हे फार लवकर नवनवीन टप्यावर बदलत आहे ,त्यानुसार 3D पाहण्यासाठी लागणारे गॉगल , 3D प्रदर्शित करण्याच्या तंत्रात आमुलाग्र बदल होत आहेत.

आपण काही 3D साठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख  टेक्नोलॉजीची माहिती घेवूया. 

1]अँनग्लाफ ३ D[Anaglyph 3D]

 • यामध्ये नीला व लाल रंगातून बनलेले 3D चित्र  निळ्या लाल रंगाचे गॉगल्सचा मदतीने प्रत्येक डोळ्याला वेगळी वेगळी चित्रे दाखवून 3D चा आभास केला जातो.
 • थोड्यावेळासाठी डोळे लाल फिल्टर्स द्वारा झाकले जातात जेणे करून चित्रातील लाल भाग पांढऱ्या रंगात व नीला भाग काळ्या रंगत दर्शवला जातो. 
 • नंतर डोळे निळ्या फिल्टर्स द्वारा झाकले जाऊन विरुद्ध इफेक्ट मिळतो.
 • खरा पांढरा व काळा रंगापासून बनलेले चित्र मेंदू एकत्र करतो आणि दोन्ही वस्तू मधील फारकावरून अंतराचा अंदाज मिळतो.
 • अशा प्रकारे आपणास स्टेरिओग्राफ चित्र डोळे बंद न करता पाहता येते.
 • हि लाल निळ्या रंगाची पद्धत पुर्वीच्या काळी वापरात होते आत्ता हि पद्धत थोडी जुनी झाली आहे.
 • पूर्वी हि पद्धत 3D सिनेमांसाठी वापरण्यात येत होती सध्या 3-D टीव्ही साठी हे तंत्र वापरतात.
 • याचा एक प्रॉब्लेम म्हणजे आपण खऱ्याअर्थाने रंगीत चित्रपट खऱ्या रंगात पाहू  शकत नाही व चित्राचा दर्जाही इतका चांगला नसतो.
 • सोप्या भाषेत ३ D चित्र हे डावे व उजवे चित्र रंगाचा वापर करून वेगळे करून बनले जाते.
 • चित्र हे दोन रंगाच्या पडद्यापासून बनलेले असते आणि आपण गॉगलच्या मदतीने ते पडदे वेगळे करतो.
 • हे सर्वात स्वस्तात ३ D बनवण्याचे तंत्र आहे.

2]पोलराईझ्ड 3D (प्यासीव) [Polarized 3D(passive)]

 • डिझ्नी  वल्ड ,युनिव्हर्सल स्टुडिओ सारख्या ३ D निर्मात्यांसाठी हि पध्दत फायदेशीर मानली जाते कारण यात पोलराएझ्ड गॉगल चा वापर केल्यामुळे रंगछटा उच्च प्रत्तीत दिसतात.
 •  दोन प्रोजेक्ट्स  तों दिशेने वेगवेगळ्या पोलराईझ्ड प्रकारात  चित्रे स्क्किनवर प्रदर्शित करतात. 
 • यासाठी  वेगवेगळ्या पोलरायझेशन च्या काचा असलेला गॉगल वापरला जातो.
 • गॉगल चा वापर करून एका डोळ्याला एकाच चित्र दिसेल असे प्रयोजन केले जाते आणि मेंदू ह्या दोन्ही चित्राना एकत्र करून  ३-D रुपात करतो.
 • यासाठी आपणास प्यासीव प्रकारच्या काचा वापराव्या लागतात ज्या चित्राला डाव्या व उजव्या भागात वेगळे करतात.
 • हि तशी ३ D ची नवीन पद्धत आहे आपण अवतार ,टोर्न यासारख्या इंग्रजी सिनेमांसाठी हि पद्धत वापरलेली पहिले असेल.
 • सध्या सिनेमागृहात हि पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

3] अक्टीव शटर 3D [Active-shutter 3D]

 • नवीन आलेले ३ D  टीव्ही व प्रोजेक्टर हि पद्धत वापरतात.
 • यात आपण एकदा डाव्या व नंतर उजव्या डोळ्याला एक चित्र दाखवले जाते .
 • यात आपण घातलेला गॉगल हा डिस्प्ले सोबत कनेक्ट राहून डोळ्यास उघडझाप करतो आणि 3D चा इफेक्ट तयार करतो. 
 • या पद्धतीचा प्रमुख फायदा हा कि यामध्ये चित्राचा दर्जा अति उच्च दिसतो आपण जणू काही २-D पाहत आहे इतक्या सहजपणे आपण 3D  ची मजा घेऊ शकतो.
 • हे 3D च्या महाग प्रकारत मोडते.यात डिस्प्ले स्क्रीन वेगाने रिफ्रेश झाली पाहिजे जवळपास ६० Hz एका डोळ्यास म्हणजे १२० HZ डिस्प्ले साठी लागते.
 • याच्या गॉगल ची किमत पण जास्त असते ज्यात दोन LCD आणि बँटरी असते आणि आपणास गॉगल व डिस्प्ले इन्फ्रारेड चा वापर करून एकमेकांशी जोडून सिंकमध्ये आणावे लागतात.
 • आपण 3D  टीव्ही सोनी ,सँमगन,पँनोसोनिक नामांकित कंपन्याकडून खरेदी कारण तेन्हा त्यात हीच पद्धत वापरली गेलेली असते.
 • एनव्हीडीआ कंपनीची 3D व्हिजन हे तंत्रज्ञान अक्टीव शुटर ग्लास हीच पद्धत वापरते.
 • अशी हि दोन्ही डोळ्यास वेगळा वेगळे चित्र दाखवून व नको असलेला डाटा अडवून अक्टीव शुटर ३ D पाहण्याच्या या महागड्या पद्धतीचा आपणस अतिशय सुंदर असा 3D पाहण्यास येत्या २-३ वर्षे वापर होईल.

4]ग्लास विरहित 3D  [अँटो स्टेरिओस्कोपिक] (Auto-Stereoscopic)

 • अँटो स्टेरिओस्कोपिक  डिस्प्ले लेन्स चा वापर करून वेगवेगळे पिक्सेल प्रत्येक डोळ्यास दाखवतो.
 • याचा मस्त फायदा म्हणजे यात आपणास गॉगल घालायची की एक जरुरी नाही. सद्यस्थितीत या तंत्रज्ञानात बऱ्याच अडथळा आहेत.
 • आपण फक्त एकाच जागेवरून हे ३ D पाहू शकता.१० जागेवरून 3D  पाहण्यासाठी आपणस डिस्प्ले चे २० सेट लागतील.
 • आणखी एक तोटा असा कि या डिस्प्ले वर आपण फक्त 3D पाहू शकतो २D पाहता येणार नाही.
 • सध्या हि अतिशय महाग अशी टेक्नॉलॉजी आहे यात सुधारणा होऊन आपणस चांगले 3D गॉगल न घालता पाहता येईल अशी आशा आहे.

5]पेरलेक्स बँरीअर [Parallax barrier]

 • हि सुद्धा बिना गॉगलचे 3D  पाहण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसिद्ध पद्धत आहे.
 • शार्प,फुजी कंपनीचे 3D टीव्ही हे तंत्रज्ञान वापरात आहेत.
 • हे जवळपास पोलरायझ्ड ग्लास सारखे काम करते.
 • यात गॉगल ने चित्र फिल्टर करण्या पेक्षा स्क्रीन हे काम करते.
 • यात विशिष्ट प्रकार चे छिद्रातून  विशिष्ट कोनातून प्रकाश किरणे डोळ्यात सोडली जातात व मेदू हि वेगवेगळी  किरणे एकत्र करतो.
 • यात स्क्रीन हि कायम  3D रुपात वापरली जावू शकते.

 3D चा अनुभव घेण्यासाठी लागणारी साधन सामुग्री :

आपणस 3D पहायचे असेल तर आपल्याकडे खालील गोष्टी जरुरी आहेत जेणे कुण ऑं 3Dचा मुक्तपणे आनंद उपभोगु शकतो.

 • 3D केमेरा –जो 3D  शुटिंगसाठी वापरला जातो.
 • 3D प्लेअर्स-ज्याद्वारे आपण संगणकावर 3D ब्लू-रे पाहू शकतो.
 • 3D टीव्ही –ज्यामुळे आपण घरात बसून 3D चा आस्वाद घेवू शकतो.
 • 3D प्रोजेक्टर – डिझाईन व संशोधन कंपन्याना माहिती प्रदर्शित करण्यासाठी
 • 3D गॉगल -3D पाहण्यासाठी हे सध्यातरी अनिवार्य आहे. [काही कंपनी बिना गॉगल चे 3D देण्याचा प्रयत्न करत आहेत लवकरात आपणास गॉगल शिवाय 3D पाहता येवू शकेल]

3D फिल्म्स:

जास्त बजेटच्या व अति उच्च्या तंत्रज्ञान असलेल्या 3D फिल्म्सनी सध्या बॉक्स ऑफिस वर चांगलीच धूम मचवली आहे. यात प्रामुखाने अनाग्लाफी व पोलरायझ्ड ग्लास तंत्रज्ञान वापरतात.

अनाग्लाफी मध्ये लाल व निळ्या रंगाचे चित्र पडद्यावर दिसते व पोलरायझ्डमध्ये आपणस दोन चित्र पडद्यावर एकत्र झालि आहेत असा आभास होतो.

3D टीव्ही :

3D मध्ये अक्टीव व प्यासीव असे दोन प्रकार आहेत.अक्टीव प्रकारात गॉगल हे टीव्ही सोबत सिंकमध्ये राहून आपलं डोळ्याला एकाच चित्र दिसू शकेल अशी उघड झाप करतात.

आपल्या आपल्या ब्लू रे किंवा प्ले स्टेशन ला 3D मध्ये अपग्रेड करू शकतो.एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण 3D टीव्ही मध्ये २ D सिनेमे व कार्यक्रमहि पाहू शकतो. 

3D कँमेरा : 

आपणस 3D शुटिंग करून नंतर ते 3D टीव्हीवर पाहता येवू शकतो.जरी २ D मध्ये रेकोर्ड करून ते ३ D मध्ये रूपांतरित करण्यासाठी तंत्रज्ञान असले तरी आपण डायरेक्ट 3D रेकॉड कारणाचा आनंद 3D कँमेराच्या मदतीने घेवू शकतो.

यात आपण एकाच स्क्रीन दोन केमेरा लेन्स वापरून शुटींग करतो यात दोन्ही कँमेरे सिंकमध्ये ठेवावे लागतात तसेच दोन्ही कँमेर्यातील अंतर समान ठेवावे लागते.

अनेक कंपन्या 3D सिनेमा शुटींगसाठी दोन लेन्स एकत्र असलेला केमेरा लागतो.मग नंर सगळे एकही सोपे होते.

3D छायाचित्र घेण्यासाठी आपणास एकाच दृश्याचे दोन अगदी अचूक कोन करून वेधलेले छायाचित्र करावे लागते जणू काही आपले डोळेच ये दृश्य पाहत आहेत.

चित्रपट निर्मात्याना दोन कॅमेरा मधील अंतर असे लागते कि ते वस्तू व्यवस्थीत फोकस करता येईल.

तसेच झूम ,ट्रेक ,हालचाल सारखे इफेक्ट येण्यासाठी चित्रे सिंकमध्ये असणे जरुरी असते.यासाठी नवीन कँमेरामध्ये दोन्ही कँमेरा योग्य जागेवर फिट केलेला असतो.

अगदी जवळ चे शुटींग धेण्यासाठी मिरर रिंग चा वापर केला जातो.

यात कँमेरा मध्येएक लेन्स असते व आणि आतील छोट्या आरसे द्वारे चित्र प्रतिबिंबित करून दुसऱ्या कँमेराद्वारे रेकोर्ड केले जाते.

यात आरशाच्या काचा अतिशय स्पष्ट अशाव्या लागतात मग ३ D चा झूम इफेक्ट सुरेखरीतीने आपण अनुभवू शकतो.

3D हे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत व सुधारत आहे.नजीकच्या काळात याचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाईल यात शंकाच नाही.

3D बाबत अधिक माहिती समजून घेण्यासाठी खाली देलेला व्हिडिओ पहा.

मग 3D समजावून घ्या आणि 3D चा आनंद घ्या !! अधिक माहिती हवी असल्यास  किंवा काही शंका असल्यास जरूर कळवा. 🙂

Advertisements

विंडोज ८ :मायक्रोसॉफ्टने घोषित केली आहे विंडोजची सर्वात अद्यावत ऑपरेटिंग सिस्टिम.


विंडोज एक्स.पी. व्हिस्ता,विंडोज ७ च्या अभूतपूर्व यशानंतर मायक्रोसॉफ्टने सध्या तैवानमध्ये होत असलेल्या कॉम्प्युटेकस्ट २०११ या शोमध्ये आपली नवीनतम अशी विंडोज ८ प्रदर्शित केली.

हि ऑपरेटिंग सिस्टिम प्रामुख्याने मोबाईल व टेबलेट पीसीसाठी नव्यातून बनवली असून ती सध्या चालणाऱ्या संगणकामध्ये व लँपटँाप मध्ये सुद्धा वापरण्यात येणार आहे.

या ऑपरेटिंग सिस्टिम साठी मायक्रोसॉफ्टला टचस्क्रीन व टेबलेट पीसीसाठी लागणारे नवीन बदल करावे लागले आहे.

विंडोज चा हा नवा अविष्कार अँपलची I-OS व गुगलची Android ऑपरेटिंग सिस्टिम यांना चांगलीच टक्कर देईल असे तज्ञांचे मत आहे.

या ऑपरेटिंग सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट पुन्हा मोबाईल व टेबलेट ऑपरेटिंग सिस्टिमच्या शर्यतीत आली आहे.

कशी आहे हि  ऑपरेटिंग सिस्टिम:


खास मेट्रो यु.आय :

प्रथमतः व टेबलेट पीसी अनलॉक करण्यासाठी विंडो स्क्रेन वरच्या बाजूस सरकवावी तेन्ह्वा आपणास होम स्क्रीन दिसेल.

या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये सुरवातीला या ओ.एस.( ऑपरेटिंग सिस्टिम) साठी बनवलेला खास मेट्रो यु.आय. दिसेल.

यामध्ये वातावरणाची माहिती देणारे अप्लीकेशन ट्वीटर,इन्वेस्टमेंट ,व्हिडिओ,गाणी व इतर भरपूर अप्लीकेशन एकाच स्क्रीनवर विशिष्टपूर्णपणे मांडली गेली आहेत.

आपण टचस्क्रीन वर स्क्रोल करून पूर्ण मांडणी पाहून अप्लीकेशन निवडू शकतो.

तसेच आपण कीबोर्ड जोडला असेल तेंव्हा पेज अप आणि पेज डाऊन बटन वापरून आपण संपूर्ण स्क्रीनभर कंट्रोल करू शकतो.

सुरवातीच्या स्क्रीन वर आपण सर्वात जास्त वापरलेली अप्लीकेशन दिसतील आपण स्वतः सुद्धा आपल्या आवडीनुसार ग्रुप सेट करून आनंद घेता येतो.

आपण या अप्लीकेशनला टच करून डायरेक्ट ते अप्लीकेशन उघडू शकतो.

अप्लीकेशन उघडल्यानंतर पुन्हा होम स्क्रीन वर येण्यासाठी स्क्रीन च्या उजव्या बाजूस विंडोजचा लोगो ला टच केल्यावर आपण पूर्वीच्या होम स्क्रीनवर येतो.

ठळक बाबी:

 • विंडोमध्ये अप्लीकेशन डेवलपमेंटसाठी मायक्रोसॉफ्टने विशेष प्लेटफॉर्म केला आहे ज्याचे नाव आहे टेलेरद्र अप्लीकेशन प्लेटफॉर्म.
 • यामध्ये आपण HTML 5,जावा ,CSS यासारख्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामींग लँग्वेजेस वर आधारित अप्लीकेशन डेवलपमेंट करू शकतो.
 • यामधील सर्व अप्लीकेशन जलद गतीने चालतात.तसेच एका अप्लीकेशनमधून दुसरया अप्लीकेशनमध्ये क्षणात जाता येते.
 • तसेच सर्व अलर्ट मेसेज देण्यासठी स्क्रीनवर नोटीसची सुविधा पण दिली आहे.
 • उजव्या बाजूची स्क्रीन टच करून आतील बाजूस ढकलली असता विंडोजचा कंट्रोल बार ओपन होतो.
 • कंट्रोल बार वर आपण सेटिंग करू शकतो तसेच विंडोज च्या आयकॉन वर टच केले असता आपण होम विन्डोवर पोहचतो.
 • डाव्या बाजूची स्क्रीन टच करून आतील बाजूस ढकलली असता आपण अगोदर उघडलेली अप्लीकेशन आपण परत उघडू शकतो.
 • जेंव्हा आपण अगोदर उघडलेले अप्लीकेशन परत उघडत असू तेंव्हा ते लहान विंडो मधून परत फुल्ल स्क्रीन होईल.
 • याचा खास फायदा म्हनजे आपण आपल्या दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपणास टेबलेटवर अगदी सुरळीतपणे काम करता येते.
 • आपण खालील बाजूस वर ओढल्यास चालू अप्लीकेशन ची सेटिंग सेट करू शकतो.
 • यावर अति उच्य दर्जाचे व्हिडिओ न थाबता चालतात.
 • तसेच एकाच वेळी अनेक अप्लीकेशन चालू असतात व कोणतेही अप्लीकेशन चालू स्थितीत परत उघडू शकतो.एकदम मल्टीटास्किंगचा अनुभव..

प्रोसेसर विषयक:


या ऑपरेटिंग सिस्टिमचे आणखी एक उल्लेखनीय गोष्ट हि आहे कि पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्टने आर्म प्रोसेसर्स साठी विंडोज चा सपोर्ट दिला आहे.

विंडोज ८ हो अशी ऑपरेटिंग सिस्टिम आहे कि जी इंटेलच्या X८६ प्रोसेसर्स व आर्म कंट्रोलर प्रोसेसेस या दोघांनाही सपोर्ट करते.

AMD,Intel हे विंडोज चे पहिले पार्टनर आहेतच तसेच या  ऑपरेटिंग सिस्टिम साठी आर्म प्रोसेसेस असणारे नवे पार्टनर सुद्धा मायक्रोसोफ्टला मिळाले आहेत.

जसे कि एनव्हीडीया कंपनीचा Kal-Ei ,QualComm चा Snapdragon,Texas Instrumentचा omap4 प्रोसेसर असे आर्म बेस असणारे नवे प्रोसेसर आहेत.

जे भविष्यात येणारया स्मार्ट फोन व टेबलेट पी सी मध्ये वापरले जातील.   

आपण जेंव्हा USB पेन drive जोडला असता सिस्टिम आपोआप कोणते अप्लिकेशन आहे ते ओळखून ते चालू करते.

तसेच या ओ.एस द्वारा ७२० पी व्हिडिओ घेवू शकतो.

अशा प्रोसेसरशी संलग्न अनेक सुविधा या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत.

कोणत्या विशेष सुविधा आहेत ?

विंडोज स्न्याप सुविधा:

 • एक अप्लिकेशन फुल्ल स्क्रीन वर चालू असताना आपण दुसरे अप्लिकेशन चालू अप्लिकेशन जवळ सोडून एकच वेळी दोन स्क्रीन पाहण्याचा आनंद घेवू शकतो.
 • यावेळी दोन्ही अप्लिकेशन सुरळीत पाने चालू सतत व आपण कोणत्याची अप्लिकेशन वर काम करू शकतो.तसेच अप्लिकेशन ची साईझ बदलू शकतो.  

नवा इंटरनेट ब्राऊजर :

 • या ऑपरेटिंग सिस्टिम साठी इंटरनेट एक्सप्रोरर १० हि नवीन इंटरनेट ब्राऊजर सोफ्टवेअर देण्यात आले आहे.
 • यात टच स्क्रीन साठी विशेष बदल केले आहेत.आपण इंटरनेट ब्राऊजर चालू असताना वरील बाजूस खाली ओढल्यास  आपण उघडलेल्या विन्डो टेब दिसतील त्यावर टच करून आपण ती विंडो उघडू शकतो.
 • तसेच खालील बाजूस URL वर टच केले असता कीबोर्ड आपोआप उघडला जाईल.
 • यामध्ये टेबलेट धारकांसाठी कीबोर्ड चा नवा प्रकार आणला आहे.
 • एक बटन दाबून आपण कीबोर्ड दोन भागात विभागूनतो दोन्ही अंगठ्याने कीबोर्ड अगदी सहज वापरू शकतो.
 • यामध्ये GPUचा वापर करून इंटरनेट ब्राऊजर चालवण्यासाठी हार्डवेअर अय्सिस् ची सोय आहे.
 • तसेच आय्डोबी फ्लाशसाठी सुद्धा हि सोय आहे.त्यामुळे फ्लाश व ब्राऊजर उच्च दर्जाचे कन्टेन्ट चालवण्यास पात्र ठरतात.  

संगणकासारखा वापर:

 • हि जरी टेबलेटसाठी बनवली गेली असली तरी याचा वापर नेहमीचा संगणकासारखा करत येतो.
 • याच्या होम स्क्रीन वर एका बटणावर टच केल्यावर आपण आपल्या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम  चे रुपांतर सध्या वापरात असणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये करू शकतो.
 • व परत पुन्हा नव्या  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये परत हि येवू शकतो.
 • तसेच संपूर्ण स्क्रीनला टच चा सपोर्ट दिला आहे.
 • या मोड मध्ये आपण विंडोज च्या इतर ऑपरेटिंग सिस्टिम सारखे फाईल्स व फोल्डर विंडो वर पाहू व वापरू शकतो.
 • तसेच डेस्कटॉपवर चालणारे सर्व अप्लिकेशन आपल्या पद्धतीने चालवता येतात आणि पी सी मोड ते टेबलेट मोड हे क्षणात जाता येते.
 • यासाठी आपला डिस्प्ले १६:९ रुपांतरीत हवा. यात आपणास आपली स्क्रीनला १०२४ X ७६८ इतके रेझोल्यूशन मिळते.

नवीन फाईल सिस्टम -प्रोटोगोंन:

 • विंडोज ८ मध्ये जुन्या NTFS  फाईल सिस्टम ला बदलून नव्या अशा प्रोटोगोंन फाईल सिस्टमचा वापर करण्यात आला आहे.
 • जी डिस्क मँनेजमेंट सुरळीतपणे करेल.यात डिस्कचे खराब भाग आपोआप शोधून ते दुरुस्तकरण्याची सोय आहे.
 • तसेच नवीन इंस्टॉलरमधेच डिस्क क्लीन करण्याची सोय आहे.

अप्लिकेशन ते अप्लिकेशन शेअरिंग:

 • आपण एका अप्लिकेशन मधून माहिती दुसऱ्या अप्लिकेशन मध्ये पाठवू शकतो. हि मस्त सोय आहे.
 • उदा:फोटो फिडर या अप्लिकेशन मुले आपण आपले फोटो डायरेक्ट ट्वीटर वर अपलोड करू शकतो.
 • यासाठी आपणस कॉपी , पेस्ट, सेव्ह वापरण्याची काही गरज भासणार नाही.

आहे ना हि एक संगणक वापरणार्यांसाठी सुंदर सुविधा ..

हि ऑपरेटिंग सिस्टिम येत्या ३-४ महिन्यात आपणास वापरण्यासाठी खुली केली जाईल.

विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टिम  बाबत अधिक माहिती पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे प्रदर्शित केलेले व्हिडिओ पहा.

मग लवकरच येणाऱ्या नव्या विशेष्ट्याने भरपूर अशा सर्व कॉम्पुटर वर चालणारया विंडोज ८ ऑपरेटिंग सिस्टिम  चे स्वागत करुया..

गुगल व्हॉलेट व गुगल ऑफर्स :मोबाईलचा वापर क्रेडिट कार्डसारखा करण्याचे तंत्रज्ञान.


नुकतेच गुगलने आपले नवीनतम गुगल व्हॉलेट व गुगल ऑफर्स हे मोबाईल कॉमर्स क्षेत्रात क्रांती करणारी शोधजनक -सुविधा प्रदर्शित केली.यामध्ये आपण मोबाईलचा वापर क्रेडिट कार्ड सारखा करण्याची सोय दिली आहे जेणेकरून आपला मोबाईलच क्रेडिट कार्ड चे काम करेल.

….आहे ना आश्यर्यकारक..!!

यामुळे भविष्यात आपणस आपले पाकीट ,पैसे, क्रेडिट कार्ड आपल्याजवळ बाळगण्याची काही एक गरज नाही.फक्त आपला मोबाईल जवळ ठेवा आणि काहीही खरेदी करून मोबाईल मधून बिल भरा..

..हे तंत्रज्ञान भविष्यातील ई कॉमर्स चा पाया असेल!!

गुगलच्या न्यूयॉर्क ऑफीसमधून माहिती देतानात गुगलने आपली येणारी मोबाईल पेमेन्ट सर्वीसगुगल व्हॉलेटहे अप्लिकेशन जाहीर केले.यात मोबाईल मध्ये आपल्या क्रेडिट कार्ड ,प्रि-पेड कार्डची माहिती साठवली जाईल व आवश्यकतेनुसार त्याचा क्रेडिट कार्ड सारखा वापर करण्यात येईल.

गुगलचे गुगल कॉमर्स विभागाचे प्रमुख यांनी या सुविधेची माहिती दिली.सध्या ७० टक्के लोक ऑनलाइन व क्रेडिट कार्ड चा वापर मोठ्या व्यावहारिक बाबींसाठी करतात पण नेहमीच्या व्यवहारात सध्या बरेच अडथळे आहेत.यासाठी या क्षेत्रात करण्याची गरज आहे.

बैंकिंगची क्षेत्रात व्यापार प्रगती ती पैसे पासून कागदी क्रेडिट कार्ड ते नंतर प्लास्टीक क्रेडिट कार्ड इथपर्यंत झाली नंतर सहजता व सुरक्षिततेच्या कारणास्तव यास मर्यादा आली होती गुगलने या सर्वाचा अभ्यास करून लोकाभिमुख सुविधा प्रदर्शित केली.

यासाठी आपणस गुगल चा मोबाईल आपल्या जवळ असणे  गरजेचे आहे.या ३००० नवे पार्टनर गुगल बरोबर हि सुविधा देण्यात सहमत झाले आहेत. यात ग्राहकांना ऑफर्स चेक करणे ऑफर्स संबधी माहिती साठवून ठेवणे नवीन ऑफर व ती ऑफर कोठे आहे तची माहिती घेणे सोपे होईल आणि खरेदीहि कोठूनही करता येईल तेही फक्त मोबाईल वापरून..

तसेच विक्रेत्यांना नवीन ग्राहक वर्ग मिळेल व माहिती वेगाने ग्राहकांना पोहचवन्यास व जास्त ग्राहकाना आकर्षित करण्यास होईल.

हि सुविधा गुगल येत्या काही महिन्यात ग्राहकांना वापरन्यास खुली करणार आहे.या सुविधेचे दोन प्रमुक प्रभाग आहेत.

गुगल व्हॉलेट:

 • यामुळे आपला फोनच आपले पैश्याचे पाकीट बनेल.यामध्ये आणिक क्रेडीट कार्डला सपोर्ट दिला आहे.
 • सिटी बँक सारख्या नामान्कीत बँक व मास्तर कार्ड्स सारख्या कंपनी यास सपोर्ट पुरवत आहेत.
 • आता प्रश्न आहे तो सुरक्षिततेचा पण गुगलने याची पूर्णकाळजी घेतली आहे.
 • आपण आपले व्हॉलेट लॉक करू शकता.तसेच गुगलने गुगल पिन कोड दिला असून तो क्रेडिट कार्डची सुविधा सुरक्षित केली आहे.
 • यासाठी पे-पल व मास्तर कार्ड या यूएस मधील पार्टनर आहेत.फक्त एकच टिचकीसरशी आपण खरेदी करू शकतो.   

गुगल ऑफर्स:

 • मोठे विक्रेते व  मॉल्सच्या मालकांना मोठी विक्रीस व आपला व्यवसाय वाढवण्यासाठी याचा वापर होईल.
 • यामुळे ग्राहकाच्या इनबॉक्समध्ये नवीन ओफेरची माहिती पोहचवली जाईल.
 • ग्राहकांनाही नवीन ऑफर पाहणे व कोठे हि ऑफर आहे याची माहिती घरबसल्या मिळेल.
 • आपण विचार करत असाल कि हि फक्त कल्पनाच आहे पण गुगलने याचा काम करताना पूर्ण सेट पारदर्शित केला.
 • गुगलच्या Nexus फोन सोबत हे अप्लिकेशन काम करत आहे.
 • यात एकाच व्हॉलेट मध्ये अनेक कार्ड बसव्याची सुविधा आहे तसेच गुगलचे स्वतःचे कार्ड सुरवातीपासूनच दिले आहे.
 • आपण एखादे क्रेडिट कार्ड चालू व बंद करू शकतो.

सुविधा कशी दिली आहे :

 • हे सर्व काम करण्यासाठी मोबाईल मध्ये secure element chip नावाची चीप बसवली जाईल हि  चीप सध्या क्रेडिट कार्ड मध्ये वापरल्या जाणारया चीप सारखी आहे.
 • यात क्रेडिट कार्डमधील सर्व माहिती साठवली व अपडेट केली जाईल.आपण व्हॉलेट सोफ्टवेअर लॉक केल्याबरोबरच हि चीप पण लॉक होईल.
 • यासाठी आपणस सध्या  मार्केट मध्ये असणऱ्या AMT swipe मशीन सारखे वेगळे मशीन लागेल जे मोबाईल मधील क्रेडिट कार्ड  ओळखू शकेल.
 • या मशीनसमोर आपला मोबाईल धरीला असता ते मशीन मोबाईल मधून पैसे कापून घेवून व्यवहार पूर्ण करेल.ते हि कागद न वाया घालवता.आहे ना अप्रतिम…

हे अप्रतिम तंत्रज्ञान ओपन आहे जेणेकरून इतर लोकही यात आपले तंत्रज्ञान त्यामध्ये आपली सुधारणा गरजेनुसार करू शकतात  व हे तंत्रज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहचवू शकतात.

गुगल लवकरच हि सुविधा त्यांच्याAndroid os मध्ये समाविष्ट करणार आहे..

 …मग सहज सोपे आणि खरेदीचा आनंद देणारे हे तंत्रज्ञान मोबाईल कॉमर्स मध्ये क्रांती करणात यात शंकाच नाही. 🙂