आकडे

जर्मन शिका मराठीतून:भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.


आपण मागील भागात जर्मन मुळाक्षरे पाहिलीच आहेत. आता या भागात आपण जर्मनभाषेमधील अंकांची ओळख करून घेवूया.आपण आकड्यांना इंग्रजीत नंबर्स[Numbers] असे म्हणतो तसेच जर्मन भाषेत  “नुम्मर्ण” म्हणतात. [Die Nummern]

जर्मन अंक हे इंग्रजी अंकासारखेच लिहतात जसे 1,2,3.. पण हेच आकडे जेंव्हा अक्षरी लिहतो तेंव्हा ते Eins, Zwei, Drei…अशा पद्धतीत लिहतात आणि त्याचा उच्चार अनुक्रमे आईन्स, त्साय, ड्राय असा केला जातो.हे उच्चार इंग्रजी आकड्यांच्या थोडे फार सारखे आहेत.

जसे ६ ला आपण इंग्रजीत सिक्स -जर्मनीत जेक्स म्हणतो आणि ९ ला इंग्रजीत नाईन-जर्मनीत नोँईंन म्हणतात.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये  आपण जर्मन अंक आणि त्यांचे उच्चार पाहुयात.

नंबर

जर्मन अंक

जर्मन अंकांचा उच्चार

0 Null नूल
1 Eins आईन्स
2 Zwei त्साय
3 Drei ड्राय
4 Vier फिअर्
5 Fünf फुँन्फ
6 Sechs जेक्स
7 Sieben झीबेन
8 Acht आख्ट
9 Neun नोँईंन
10 Zehn त्सेन
11 Elf एल्फ
12 Zwölf झ्वेल्फ
13 Dreizehn ड्राय त्झेन
14 Vierzehn फिअर् त्झेन
15 Fünfzehn फुँन्फ त्झेन
100 (ein)hundert आईन हुंन्डट
1,000 (ein)tausend आईन-टाऊ-झुन्ड

वरील तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर आता अंकांचे उच्चार ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा व त्यानुसार एकदा सर्व आकडे एकदा म्हणून पहा म्हणजे आपले उच्चार एकदम स्पष्ट होतील.

आता आपण या अंकाचा वापर शिकूया:-

जसे [९०९६२६१०५८]  हा मोबाईल नंबर मला जर्मन मध्ये सांगायचे झाल्यास मी तो असा सांगेन.

“Neun- Null- Neun- Sechs- Zwei- Sechs- Eins- Null- Fünf– Acht”

आपणही आपला मोबाईल क्रमांक जर्मन मध्ये लिहून आणि बोलून पहा…

मग आता कोणी नंबर विचारला कि सर्वाना आपला मोबाईल नंबर जर्मनमधूनच सांगा…मग बघा कशी मजा येते ते.. 🙂

लक्षात ठेवण्यासारख्या बाबी:

वरील अंकाचे आपण काळजीपूर्वक वाचन केल्यास आपणास पुढील भाग समजणे अधिक सोपे जाईल.

  • आपणस २०,३०,४०,५० असे अंक लिहायचे असल्यास सोपे आहे.
  • फक्त आकड्याच्या शेवटी “Zing” हा शब्द जोडायचा या शब्दाचा उच्चार “झिश” असा आहे.
  • उदाहरणार्थ:३० आपणस जर्मन मध्ये लिहायचे आहे मग ३ म्हणजे जर्मन मध्ये Drei [ड्राय] यास “Zing” हा शब्द जोडायचा म्हणजे ते होईल Dreizing [उच्चार : ड्रायझिश].
  • तसेच ५०= Fünfzing [फुँन्फझिश] ,८०= Achtzing [आक्ट्झिश].
  • आपणास २१ हा अंक जर्मन मध्ये लिहायचा असेल तर तो कसा लिहणार?
  • ->आपण मराठीत २१ म्हणजे एक अधिक वीस बरोबर एकवीस म्हणतो तोच फंडा इथे वापरायचा
1 + 20 =21
मराठीत =२१ एक अधिक /आणि वीस एकवीस
जर्मनमध्ये= 21 Ein und zwanzig einundzwanzig
उच्चार आईन ऊंड झॉन्झिश आईन-ऊंड-झॉन्झिश

याचप्रमाणे 35 हे ५ आणि ३० = पस्तीस => Fünf-und-dreißig=> फुँन्फ- ऊंड-ड्रायझिश.

वरील उल्लेखावरून आपणास हे तर समजलेच असेल कि जर्मन भाषेत “und” [ऊंड] हे इंग्रजीतील and [अधिक /आणि] या अर्थाने वापरतात.

आपल्याला हे जर्मन अंकगणित कितपत समजले आहे ते समजण्यासाठी हि उजळणी:

उजळणी =पुढील अंक आपण जर्मन भाषेत लिहून पहा :९०,४८,८३,७०,२२.[आपापले उत्तर पोस्ट करा बघू कुणाचे उत्तर बरोबर येते.]

आपल्यास हे जमले कि समजा…जमले तुम्हाला जर्मन अंक!!!

..आणि अशा तऱ्हेने आपण जर्मन भाषेच्या शिक्षणाची तिसरी पायरी पादाक्रांत केलेली आहे...अभिनंदन!!

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂


Advertisements