x-All Tablets

Tablet technology

क्रिएटिव्हीटी : नाविण्यतेचा अविष्कार


विचारशक्तीही कल्पनाशक्तीला जन्म देते. आपली वेगळा विचार करण्याची क्षमता आपण किती क्रिएटिव्ह आहे ते ठरवते.

क्रिएटिव्हीटी  ही नवीन कल्पना तयार करणे, त्या ओळखणे व पर्यायी शक्यतांचा विचार करून प्रश्नावर उपयोगी उत्तर शोधण्याची पद्धत आहे. क्रिएटिव्हीटी  म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टी नवीन पद्धतीने जोडणे होय.

“कल्पना हे बीज आहे ,तर शोध हे त्याचे फळ !”

बऱ्याचदा आपण आपणास मिळणारे पहिले उत्तर नाकारले व अजून विचार केला ही क्रिएटिव्हिटीची उत्पत्ती होते.

क्रिएटिव्हीटी वाढवण्यासाठी विचार करण्यासाठीचे मुद्दे  :

आपण खालील मुद्यांचा अभ्यास करून व ते मुद्दे अंमलात आणण्याचा विचार करून आपण आपली क्रिएटीव्ह पॉवर वाढवू शकतो.

CreativeThinking

क्रिएटिव्ह विचार

क्रिएटिव्हीटीतून संशोधन तयार करण्याचे प्रोसेस चक्र :

खालीलप्रमाणे आपण आपले काम , बिझनेस व कला अधिक क्रिएटिव्हिट पद्धतीने करून त्याद्वारे संशोधनापर्यंत पोहचू शकतो.त्यासाठी खालील प्रोसेस चक्राचा वापर करून अधिक क्रिएटिव्हिट बना व शोध लावा.

“कल्पनाशक्ती संशोधनाकडे जाणायचा राजमार्ग आहे.”

Creativity cycle

क्रिएटिव्हिटी प्रोसेस चक्र

 

वाढवा आपली क्रिएटीव्हिटी :

 क्रिएटीव्ह माणसे ही शक्यतो जीवनाच्या टोकाच्या अनुभवातून गेलेली असतात. तो अतिशय हुशार व वैचारिक गुंतागुंतीची व प्रचंड उत्पादनशक्ती असणारी असतात.

आपण काही मानसिक गुणांची जपणूक करून आपली क्रिएटिव्हिटी वाढवू शकतो. क्रिएटिव्ह माणसे योग्य विचार ,योग्य जागा , योग्य वेळ , योग्य विचार यांची अचूक सांगड घालतात.

 

How to boost your creativity

 

क्रिएटीव्ह संशोधन करण्यासाठी प्रत्येकाने पुढील गुण अंगिकारने गरजेचे आहे.

क्रिएटीव्ह माणसाची २१ गुण वैशिष्ट्ये :

 1. एकटा मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती.
 2. प्रश्न सखोलपणे जाणून घेणे.
 3. सत्य परिस्थितीची जाणीव
 4. दुसऱ्या कडून शिकण्याची तयारी
 5. स्वतःच्या कामावर विश्वास असणारे.
 6. वर्तमान परिस्थिती व असमाधानी असणे
 7. ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा
 8. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील.
 9. स्वतः तून प्रेरणा घेणारे
 10. साधनसामग्री व सुविधेच्या अभावी न खचणारे
 11. दुसर्यांच्या प्रश्नांबाबत विचार करणारे.
 12. वैचारिक समतोल.
 13. आत्मसात करण्याची तयारी.
 14. मानसिक दृष्टीने समजूतदार
 15. ध्येयवेडे
 16. प्रश्नावर सर्वबाजूने अभ्यास करणारे
 17. टीकेमुळे विचलित न होणारे.
 18. रिस्क घेण्यास तयार.
 19. जो जाणून घेतो
 20. जो पूर्ण माहित घेतो
 21. जो अँक्शन घेतो /कृती करतो.

क्रिएटिव्हिटी हे एक विज्ञान व कला आहे , जी क्रिएटिव्ह पद्धतीचा शिकून व क्रिएटिव्ह ज्ञान अमलात आणून जोपासली जाऊ शकते.creative-people

 

-Thanks – MJ

Advertisements

इनोव्हेटीव्ह बिझनेसचे मॉडेल


इंटरनेटने जोडलेल्या व क्षणात एका ठिकाणाहून दुसरीकडे माहितीची ,वस्तूंची किंवा सुविधांची देवाणघेवाण करनारे हे जग लहान मार्केटच  बनलेले आहे. आपला व्यवसाय निवडताना तो आपणस बाह्य देशात कसा वाढवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

आपण देणाऱ्या सोई व प्रोड्क्टस हे देशातील निरनिराळ्या भागात तसेच परदेशातील मार्केटमध्ये टिकून राहावेत यासाठी आपण इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेलचा वापर करणे ही काळाची गरज आहे.

Innovatebusinessmodel

पुढील टेबलचा वापर करून आपण पारंपारिक बिझनेस मॉडेल व इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल यांच्यामधील मुख्य फरक पाहूया.

  पारंपारिक बिझनेस मॉडेल इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल
विचारसरणी स्टेबल बिझनेस व फक्त एका ठरविक भागातील मार्केटवर लक्ष ठेवणारे सतत गरजेनुसार बदलणारे व जग हे लहान खेडे आहे हे जाणून जगभरातील मार्केट पाहणारे
किंमत वापराच्या आधी किंमत ठरवणारे ,किंमत बाहेरील स्पर्धेवर अवलंबून, त्यामुळे किमतीवर बंधने वापरामध्ये व्हँल्यू
किंमत : लॉक त्यांचे जीवनमान  कसे उंचावू शकतात यावर अवलंबून
निर्णय आतून बाहेर : कंपनीच्या आतील विचारसरणीनुसार प्रॉडक्ट विषयी निर्णय बाहेरून आत : बाह्य घटक (मार्केट, ग्राहक) यांच्या गरजेनुसार कंपनीच्या आत निर्णय
आपण बिझनेस मध्ये का आहोत ? पैसे मिळवण्यासाठी अर्थपूर्ण सुविधा तयार करण्यासाठी
कोणाला केंद्रबिंदू मानून ? आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारे ग्राहक, व्यावसायिक पार्टनर,

सर्व्हिस देणारे,

प्रादेशिक व आंतरराष्टीय सिस्टिम्स,

इन्व्हेस्टर, समाज

मानसिकता फिक्स बांधील विचारसरणी काळानुसार बदलणारी लवचिक विचारसारणी
उदाहरणार्थ अँबेंसिडोर कार, इंडियन एअरलाईन्स, बजाज स्कूटर गुगल, अँपल कॉम्प्यूटर, टेस्ला मोटर्स

इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेलचा फॉर्म्युला :

खालील कॉम्बिनेशनचा वापर करून आपण आपल्या बिझनेसला इनोव्हेटीव्ह कसे करता येईल याचा विचार करावा.

कस्टमरला दिलेली नाविन्यपूर्ण सर्व्हिस व आपली सर्व्हिस वापरण्याचा अनोखा अनुभव हे  इनोव्हेटीव्ह बिझनेसचे सूत्र !

Innovatebusinessmarathi

इनोव्हेटिव्ह बिझनेस फॉर्म्युला

काळानुसार बदलणारी लवचिक बिझनेस विचारसारणी :

आपल्या अनुभवातून मिळालेल्या काही सवयी आणि पद्धती, आपणस एका ठराविक साचेबद्ध रीतीने परिणामकारक वागण्यास भाग पडतात यास फिक्स बांधील विचारसरणी असे म्हणतात.

पण आपणस इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेलमध्ये आपणस काळानुसार बदलणारी लवचिक विचारसारणीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

ज्या कंपन्यांनी नवीन इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल अंगिकारले त्या आजही बिझनेस मध्ये टिकून आहेत. याउलट ज्या कंपन्या पारंपारिक बिझनेस मॉडेलचा वापर करत होत्या त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

“साचेबद्ध व ठोकळेबद्ध विचारसरणी  ही कल्पनाशक्ती व संशोधन यांच्यामध्ये अडथळा ठरू शकते.”

आपली विचारसरणी काळानुसार बदलणारी व लवचिक कशी कराल ?

 • आपणस ‘आणखी काय शक्य आहे’ व ‘आणखी कसे होऊ शकते’ या गोष्टीवर विचार कार्याला हवा.
 • आजूबाजूला असणाऱ्या पर्यायांकडे लक्ष दिले पाहिजे.
 • विभिन्न गोष्टी जोडण्याचे स्किल्स अंगिकारले पाहिजे.

संशोधनामध्ये आणखी काय शक्य आहे व काय होऊ शकते याचा विचार करून माहित नसलेली उत्तरे शोधणे हे यशस्वी होण्याचे गमक आहे.

या भागात आपण इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल कसे असते ते पाहिलेत , पुढील भागात आपण बिझनेस मॉडेलचे निरनिराळे प्रकार पाहणार आहोत.

“उद्याचा विचार करून अर्थपूर्ण गोष्टी तयार करण्यातच हेच खरे इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल आहे.”

–Thanks -MJ 🙂

इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट डिझाईन : नाविन्यपूर्ण प्रोडक्ट संकल्पनेची प्रमुख तत्वे


नवीन प्रोडक्ट तयार करणे हे सध्याच्या युगातील मोठे आव्हान आहे तरच आपण या स्पर्धेच्या युगात प्रगती करू शकू.

प्रोडक्ट्स तयार करताना त्यात वेगळेपण तर असावाच तसेच त्याची उपयुक्तता हि अधिक हवी.जर ग्राहकास त्याचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यास मदत होणार असेल तर त्या वस्तूचे महत्व वाढते.अशाच वस्तू किंवा प्रोडक्ट तयार करण्याकडे आपला कल हवा.

सध्या बाजारात ग्राहकाला काय हवे आहे ते जाणून खास एका ग्राहक वर्गासाठी तयार केलेले प्रोडक्ट नक्कीच यशस्वी ठरेल.जर ग्राहकाचे प्रश्न आपले उपकरण किंवा प्रोडक्ट सोडवत असेल तर ग्राहक त्यास वाजवी किमत मोजण्यासही तयार असतो.

प्रत्येक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये काळानुरूप बदल करून नाविन्यता टिकवून  आधुनिकीकरण करणे हे अनिवार्य ठरत आहे. तरच आपण स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकू.

या लेखात आपण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स डिझाईन तयार करण्यासाठी लागणारी तीन प्रमुख तत्वे पाहूयात.

हि तत्वे वापरून आपण नवीन प्रोडक्ट्स कसे तयार करावेत यांचा विचार करू शकतो.तसेच आपल्या प्रोडक्ट मध्ये कशी सुधारणा करावी यासाठी कोणता विचार कसा प्रकारे करावा याची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत.

बहुढंगी वस्तू व कल्पना यांची जोडणी :

नवीन प्रोडक्ट तयार करताना दोन किंवा अधिक अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तू व त्याची पद्धत ,प्रिन्सिपल्स विचारात घेवून मुक्तपणे प्रोडक्टची कल्पना करणे.

त्याचे स्केच कागदावर तयार करणे व त्या दोन गोष्टी एकमेकांना कशा जोडता येवू शकतात व त्यापासून कोणकोणते उपयुक्त प्रोडक्ट तयार करता येऊ शकतील त्याचा विचार करावा.

विभिन्न वस्तूंची संकल्पना एकमेकांना जोडून काहीतरी भन्नाट तयार करता येऊ शकते याचा विचार करावा व ते आपल्या प्रोडक्टचे वैशिष्ट्य ठरू शकते.

एखाद्या वस्तूचा ठोकळे बंद वापर असू शकतो त्याकडे वेगळ्या नजरेने पाहून त्यातील चांगले गुण आपण दुसऱ्या एखाद्या वस्तुत वापरून नवीन प्रोडक्ट तयार करू शकतो.

उदाहरणार्थ :

ब्रेड टोस्टर व प्रिंटर हे दोन विभिन्न ठिकाणी वापरले जाणारे प्रोडक्ट पहा.

 • आता या दोन वस्तू एकमेकांना कशा जोडता येऊ शकतील याचा विचार करा.
 • त्या दोन्ही वस्तू कोणत्या तत्वावर चालतात याचा विचार करा त्यामधून काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार करता येऊ शकेल का याचा विचार करा.
 • चला तर आपल्या कल्पना शक्तीला चालना द्या .
 • हि गोष्ट प्रत्यक्षात कशी होईल यासाठी कोणती टेक्नोलॉजी वापरावी याचा सध्या विचार करू नका.
 • तर आपल्या समोर पुढील कल्पना उभ्या राहतील.
 • अगदी भन्नाट कल्पनांचा विचार करा..

ब्रेड हा प्रिंटर मध्ये कागदाच्या जागी घालायचा व तो प्रिंटर मधून भाजून येईल.

ब्रेड वर आपण काहीतरी चित्र ,कार्टून्स ,डिझाईन प्रिंट करून खास टोस्टर तयार करू शकू.

ब्रेड वर आपण शुभ प्रभात असा मेसेज किंवा काही खास मजकूर लिहून ब्रेड भाजू शकतो.

ब्रेड टोस्टर मोबाईल ला जोडून सकाळच्या बातम्या ब्रेड वर प्रिंट करणारा प्रिंटर.

रंगीत वेगवेगळ्यारंगात भाजून येणारा ब्रेड टोस्ट.

असे कितीतरी कल्पना आपल्याला सुचल्या असतील त्या खाली पोस्ट करा.

अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा संकल्पना एकमेकांना जोडून नवीन प्रोडक्ट ची कल्पना करू शकतो.

Bread.jpg

Innovative Product for Printing on Bread

 

फ्लूएन्सी : सुरळीत बाजूंमध्ये निरनिराळे बदल :

प्रत्येक वस्तूला वेगवेळ्या बाजू असतात त्यातील एका बाजू वर लक्ष ठेवून ती बदलावी.

वेगवेगळ्या अँगल्सचा विचार करून त्यातील एक अँगल काही अंशात बदलणे.हे तत्व आपण कोणत्याची प्रोडक्टला लावू शकतो.

प्रोडक्टचा साईझ, शेप, ठेवण ,युजर इंटरफेस ,प्रोडक्ट तयार करण्याचे मटेरियल ,प्रोडक्टची रंगसंगती ,प्रोडक्टचा आकार या सारख्या वेगवेगळ्या बाजूंवर लक्ष पूर्वक विचार करावा.

यामुळे आपण अस्तित्त्वात असणारे प्रोडक्ट नव्याने सुधारून त्याची सुधारित आवृत्ती बाजारात आणू शकतो.

अस्तित्वातील प्रोडक्टमध्ये अर्थपूर्ण बदल करून ते लोकांच्या भविष्यातील गरजा कशा पूर्ण करू शकेल यावर लक्ष दिल्यास आपण एका नवीन बिझनेसला जन्म देऊ शकाल.

या तत्वामध्ये मूळ प्रोडक्ट तेच राहून त्यामध्ये वेगवेळ्या बाजूंनी बदल करून त्याची उपयुक्तता वाढवणे याबर भर दिला जातो.

एकाच ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तूकडे वेगळ्या नजरेने पाहून त्याचा वापर आणखी कोठे करता यईल हे शोधणे हे या तत्वाचे उदिष्ट होय.

उदाहरणार्थ :

आपण कार चे उदाहरण घेवू.

आता कार चा आकार काही वेळा आपणस मोठा हवा असतो पण लहान रस्त्यावून गाडी वळवताना मोठूया गाड्यांना त्रास होतो तर आपण गाडीच्या साईझ वर विचार करून फोल्डेबल कार बाजारात आणू शकता.

गाडीसाठी प्लास्टिक मटेरियल्सचा वापर करून गाडीची किंमत कमी करण्याचा विचार करू शकता.

तसेच पाण्यावरून चालणारी कार किंवा हवेतून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणारी कार अशा संकल्पनाच आपण विचार करू शकता.

गाडीसाठी पेट्रोल किंवा डीझेल याखेरीज दुसरे इंधन कसे वापरता येऊ शकले यावर एक नवी कार इंडस्ट्री उभी करता येऊ शकेल.

लहान व कमी खर्चात तयार करण्यात आलेली नँनो कार किंवा इलेक्ट्रिक कार हि यापद्धतीच्या इनोव्हेशनची उदाहरणे आहेत.

कार हे फार मोठे उदाहरण आहे पण आपण हेच तत्व लहान लहान प्रोडक्ट्स ना लाऊन त्यांच्यामध्ये सुधारणा करून एक नवीन मार्केट तयार करू शकतो.

 

car_design

Innovative Car By Flexibility Principle

वेगवेगळी अवजारे ,उपकरणे यांच्या मुलभूत बाबीत बदल करण्याच्या विचार करून ते ग्राहकाच्या सोई नुसार बदलणे.

उत्पादन मार्केटिंगच्या पद्धतीमध्ये बदल ऑनलाईन विक्री करणे ,मोबाईल चा वापर करून उपकरण चालू बंद किंवा कंट्रोल करणे अशा वेळ वाचवणाऱ्या व आधुनिक बदलांचा ग्राहक नक्कीच आनंदाने स्वागत करतील.

फ्लेझीबिलीटी : मूळ तत्व वाकवून अमुलाग्र बदल करून दुसऱ्या ठिकाणी वापर.

यामध्ये मूळ प्रोडक्ट दुसऱ्याच कामासाठी वापरणे.एखादे प्रोडक्ट काहीतरी विशीष्ट उपयोग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले असते.

पण तेच प्रोडक्ट , तीच संकल्पना आपण दुसरीकडे दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये वापरू शकतो.

यामध्ये मूळ प्रोडक्टच्या कार्यकारी संकल्पनेवर विचार करून ती प्रोसेस किंवा मेथड अजून कोणत्या ठिकाणी वापरली जाऊ शकते याचा विचार करणे.

अशा रीतीने एका वस्तूचा अनोखा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जाऊन त्याद्वारे नवीन प्रोडक्टची निर्मिती करता येऊ शकते.

उदाहरणार्थ :

पंखाचे फिरणे व वारा देणे हे तत्व वापरून नवीन प्रोडक्ट तयार करू शकता.

तसेच इस्त्री चे विजेवर तापणे हे तत्व इतर ठिकाणी वापरून आत्तापर्यंत कित्येक प्रोडक्ट्स बाजारात आलेले आहेत.

सराव :

आपल्या या कन्सेप्ट क्लीअर होण्यासाठी पुढील सराव करा.याद्वारे प्रत्येक तत्वाची उजळणी होईल.

१. दोन प्रोडक्ट जोडणे : टी व्ही आणि फ्रीज

२. सुरळीत बाजूंचे बदल : स्पोर्ट्स शूज

३. तत्व वाकवून बदल : वॉशिंग मशीन

आपली उत्तरे कमेंट करा.. पाहू किती कल्पना सुचतात ते…

चला मग पक्की करूया इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट तयार करण्याची खास तत्वे..

–धन्यवाद – MJ 🙂