Innovative Design Principles, x-All Tablets

इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट डिझाईन : नाविन्यपूर्ण प्रोडक्ट संकल्पनेची प्रमुख तत्वे


नवीन प्रोडक्ट तयार करणे हे सध्याच्या युगातील मोठे आव्हान आहे तरच आपण या स्पर्धेच्या युगात प्रगती करू शकू.

प्रोडक्ट्स तयार करताना त्यात वेगळेपण तर असावाच तसेच त्याची उपयुक्तता हि अधिक हवी.जर ग्राहकास त्याचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यास मदत होणार असेल तर त्या वस्तूचे महत्व वाढते.अशाच वस्तू किंवा प्रोडक्ट तयार करण्याकडे आपला कल हवा.

सध्या बाजारात ग्राहकाला काय हवे आहे ते जाणून खास एका ग्राहक वर्गासाठी तयार केलेले प्रोडक्ट नक्कीच यशस्वी ठरेल.जर ग्राहकाचे प्रश्न आपले उपकरण किंवा प्रोडक्ट सोडवत असेल तर ग्राहक त्यास वाजवी किमत मोजण्यासही तयार असतो.

प्रत्येक प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये काळानुरूप बदल करून नाविन्यता टिकवून  आधुनिकीकरण करणे हे अनिवार्य ठरत आहे. तरच आपण स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकू.

या लेखात आपण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स डिझाईन तयार करण्यासाठी लागणारी तीन प्रमुख तत्वे पाहूयात.

हि तत्वे वापरून आपण नवीन प्रोडक्ट्स कसे तयार करावेत यांचा विचार करू शकतो.तसेच आपल्या प्रोडक्ट मध्ये कशी सुधारणा करावी यासाठी कोणता विचार कसा प्रकारे करावा याची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत.

बहुढंगी वस्तू व कल्पना यांची जोडणी :

नवीन प्रोडक्ट तयार करताना दोन किंवा अधिक अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तू व त्याची पद्धत ,प्रिन्सिपल्स विचारात घेवून मुक्तपणे प्रोडक्टची कल्पना करणे.

त्याचे स्केच कागदावर तयार करणे व त्या दोन गोष्टी एकमेकांना कशा जोडता येवू शकतात व त्यापासून कोणकोणते उपयुक्त प्रोडक्ट तयार करता येऊ शकतील त्याचा विचार करावा.

विभिन्न वस्तूंची संकल्पना एकमेकांना जोडून काहीतरी भन्नाट तयार करता येऊ शकते याचा विचार करावा व ते आपल्या प्रोडक्टचे वैशिष्ट्य ठरू शकते.

एखाद्या वस्तूचा ठोकळे बंद वापर असू शकतो त्याकडे वेगळ्या नजरेने पाहून त्यातील चांगले गुण आपण दुसऱ्या एखाद्या वस्तुत वापरून नवीन प्रोडक्ट तयार करू शकतो.

उदाहरणार्थ :

ब्रेड टोस्टर व प्रिंटर हे दोन विभिन्न ठिकाणी वापरले जाणारे प्रोडक्ट पहा.

  • आता या दोन वस्तू एकमेकांना कशा जोडता येऊ शकतील याचा विचार करा.
  • त्या दोन्ही वस्तू कोणत्या तत्वावर चालतात याचा विचार करा त्यामधून काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार करता येऊ शकेल का याचा विचार करा.
  • चला तर आपल्या कल्पना शक्तीला चालना द्या .
  • हि गोष्ट प्रत्यक्षात कशी होईल यासाठी कोणती टेक्नोलॉजी वापरावी याचा सध्या विचार करू नका.
  • तर आपल्या समोर पुढील कल्पना उभ्या राहतील.
  • अगदी भन्नाट कल्पनांचा विचार करा..

ब्रेड हा प्रिंटर मध्ये कागदाच्या जागी घालायचा व तो प्रिंटर मधून भाजून येईल.

ब्रेड वर आपण काहीतरी चित्र ,कार्टून्स ,डिझाईन प्रिंट करून खास टोस्टर तयार करू शकू.

ब्रेड वर आपण शुभ प्रभात असा मेसेज किंवा काही खास मजकूर लिहून ब्रेड भाजू शकतो.

ब्रेड टोस्टर मोबाईल ला जोडून सकाळच्या बातम्या ब्रेड वर प्रिंट करणारा प्रिंटर.

रंगीत वेगवेगळ्यारंगात भाजून येणारा ब्रेड टोस्ट.

असे कितीतरी कल्पना आपल्याला सुचल्या असतील त्या खाली पोस्ट करा.

अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा संकल्पना एकमेकांना जोडून नवीन प्रोडक्ट ची कल्पना करू शकतो.

Bread.jpg
Innovative Product for Printing on Bread

 

फ्लूएन्सी : सुरळीत बाजूंमध्ये निरनिराळे बदल :

प्रत्येक वस्तूला वेगवेळ्या बाजू असतात त्यातील एका बाजू वर लक्ष ठेवून ती बदलावी.

वेगवेगळ्या अँगल्सचा विचार करून त्यातील एक अँगल काही अंशात बदलणे.हे तत्व आपण कोणत्याची प्रोडक्टला लावू शकतो.

प्रोडक्टचा साईझ, शेप, ठेवण ,युजर इंटरफेस ,प्रोडक्ट तयार करण्याचे मटेरियल ,प्रोडक्टची रंगसंगती ,प्रोडक्टचा आकार या सारख्या वेगवेगळ्या बाजूंवर लक्ष पूर्वक विचार करावा.

यामुळे आपण अस्तित्त्वात असणारे प्रोडक्ट नव्याने सुधारून त्याची सुधारित आवृत्ती बाजारात आणू शकतो.

अस्तित्वातील प्रोडक्टमध्ये अर्थपूर्ण बदल करून ते लोकांच्या भविष्यातील गरजा कशा पूर्ण करू शकेल यावर लक्ष दिल्यास आपण एका नवीन बिझनेसला जन्म देऊ शकाल.

या तत्वामध्ये मूळ प्रोडक्ट तेच राहून त्यामध्ये वेगवेळ्या बाजूंनी बदल करून त्याची उपयुक्तता वाढवणे याबर भर दिला जातो.

एकाच ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्तूकडे वेगळ्या नजरेने पाहून त्याचा वापर आणखी कोठे करता यईल हे शोधणे हे या तत्वाचे उदिष्ट होय.

उदाहरणार्थ :

आपण कार चे उदाहरण घेवू.

आता कार चा आकार काही वेळा आपणस मोठा हवा असतो पण लहान रस्त्यावून गाडी वळवताना मोठूया गाड्यांना त्रास होतो तर आपण गाडीच्या साईझ वर विचार करून फोल्डेबल कार बाजारात आणू शकता.

गाडीसाठी प्लास्टिक मटेरियल्सचा वापर करून गाडीची किंमत कमी करण्याचा विचार करू शकता.

तसेच पाण्यावरून चालणारी कार किंवा हवेतून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणारी कार अशा संकल्पनाच आपण विचार करू शकता.

गाडीसाठी पेट्रोल किंवा डीझेल याखेरीज दुसरे इंधन कसे वापरता येऊ शकले यावर एक नवी कार इंडस्ट्री उभी करता येऊ शकेल.

लहान व कमी खर्चात तयार करण्यात आलेली नँनो कार किंवा इलेक्ट्रिक कार हि यापद्धतीच्या इनोव्हेशनची उदाहरणे आहेत.

कार हे फार मोठे उदाहरण आहे पण आपण हेच तत्व लहान लहान प्रोडक्ट्स ना लाऊन त्यांच्यामध्ये सुधारणा करून एक नवीन मार्केट तयार करू शकतो.

 

car_design
Innovative Car By Flexibility Principle

वेगवेगळी अवजारे ,उपकरणे यांच्या मुलभूत बाबीत बदल करण्याच्या विचार करून ते ग्राहकाच्या सोई नुसार बदलणे.

उत्पादन मार्केटिंगच्या पद्धतीमध्ये बदल ऑनलाईन विक्री करणे ,मोबाईल चा वापर करून उपकरण चालू बंद किंवा कंट्रोल करणे अशा वेळ वाचवणाऱ्या व आधुनिक बदलांचा ग्राहक नक्कीच आनंदाने स्वागत करतील.

फ्लेझीबिलीटी : मूळ तत्व वाकवून अमुलाग्र बदल करून दुसऱ्या ठिकाणी वापर.

यामध्ये मूळ प्रोडक्ट दुसऱ्याच कामासाठी वापरणे.एखादे प्रोडक्ट काहीतरी विशीष्ट उपयोग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले असते.

पण तेच प्रोडक्ट , तीच संकल्पना आपण दुसरीकडे दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये वापरू शकतो.

यामध्ये मूळ प्रोडक्टच्या कार्यकारी संकल्पनेवर विचार करून ती प्रोसेस किंवा मेथड अजून कोणत्या ठिकाणी वापरली जाऊ शकते याचा विचार करणे.

अशा रीतीने एका वस्तूचा अनोखा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जाऊन त्याद्वारे नवीन प्रोडक्टची निर्मिती करता येऊ शकते.

उदाहरणार्थ :

पंखाचे फिरणे व वारा देणे हे तत्व वापरून नवीन प्रोडक्ट तयार करू शकता.

तसेच इस्त्री चे विजेवर तापणे हे तत्व इतर ठिकाणी वापरून आत्तापर्यंत कित्येक प्रोडक्ट्स बाजारात आलेले आहेत.

सराव :

आपल्या या कन्सेप्ट क्लीअर होण्यासाठी पुढील सराव करा.याद्वारे प्रत्येक तत्वाची उजळणी होईल.

१. दोन प्रोडक्ट जोडणे : टी व्ही आणि फ्रीज

२. सुरळीत बाजूंचे बदल : स्पोर्ट्स शूज

३. तत्व वाकवून बदल : वॉशिंग मशीन

आपली उत्तरे कमेंट करा.. पाहू किती कल्पना सुचतात ते…

चला मग पक्की करूया इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट तयार करण्याची खास तत्वे..

–धन्यवाद – MJ 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s