Knowledge is property, x-All Tablets

ई-बुक प्रकाशन : ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट्स ,कॉपीराईट , ट्रेडमार्क.


नमस्कार,

प्रथमतः माझ्या पुस्तकांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व वाचकांचा आभारी आहे.माझा विश्वास आहे कि आम्ही जगभरातील उत्कृष्ट ज्ञान सोप्या भाषेत रुपांतरीत करून मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून देता येऊ शकेल.

…आणि हो मला वाचकांना एक आनंदची बातमी सांगायची आहे कि ज्ञानाचे संरक्षण व संवर्धन करण्याबद्दलचे माझे नवीन पुस्तक “ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट्स ,कॉपीराईट ट्रेडमार्क “ (Knowledge is property :Patents, Copyright, Trademark) हे ‘हाय-टेक-ईझी’ प्रकाशनाच्या माध्यामातून आज प्रकाशित करीत आहोत.

गेल्या एक वर्षापासून आम्ही हे पुस्तक वास्तवात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. वाचकांचा सततचा प्रतिसाद आणि या पुस्तकाला प्रचंड मागणी यामुळे हे पुस्तक अधिकाधिक चांगले व उपयुक्त करण्यास आम्ही प्रेरित व बांधील झाले होतो.आज ते साकार झाले.

आपण आपली संपत्ती लॉकर मध्ये ठेवतो पण आपले ज्ञान जी सर्वात मोठी संपत्ती आहे ती प्रोटेक्ट करण्यास दुर्लक्ष करतो. पुस्तक आपणस आपली ज्ञान रूपी संपत्ती प्रोटेक्ट करण्याबाबती नियम व कायदे यांबद्दल महिती देऊन जागृती करते.

पेटंट हे सर्व संशोधकांसाठी त्यांचे शोध संरक्षित करण्यासाठीचा मार्ग आहे हे आपण एकले असेलच.पुस्तकात पेटंटचे प्रकार ,पेटंट फाईल करण्याची प्रोसेस ,भारतात व युनायटेड सेट्स पेटंट ऑफिसमध्ये लागणारे फॉर्म व फी यांच्यासह सखोल महिती दिलेली आहे.

सर्व कलाकार ,लेखक ,आर्टिस्ट यांना कॉपीराईट कायदा व त्यांचे नियम यांची महिती हवीच.पुस्तकात सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत आपली कला कशी प्रोटेक्ट करावी व त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी कसा करावा याबद्दल कॉपीराईट प्रोटेक्शनच्या अंतर्गत महिती दिलेली आहे.

व्यावसायीकांसाठी आपल्या कंपनीचे नाव ,लोगो चिन्ह,मार्क याच कायमस्वरूपी ब्रँन्ड व्हेल्यू प्रॉपर्टी असतात.कंपन्यांची किंमत त्याचा ब्रँन्ड  किती चांगला आहे यावर ठरते.ट्रेडमार्क कायदा व्यापारी लोकांना आपला ब्रँन्ड सुरक्षित करण्यास मदत करते.तसेच स्थानिक कारागीरांनाही आपले स्थानिक वैशिष्टयपुर्ण प्रोडक्ट कायद्याच्या वापर करून प्रोटेक्ट करता येवू शकते.

हे पुस्तक विद्यार्थी ,संशोधक,कलाकार,लेखक ,शिक्षक ,वकील ,कायदेतज्ञ ,व्यापारी याचसाठी फार उपयुक्त आहे तसेच कोणीही ज्यास आपले ज्ञान वाढवायचे आहे असे लोक हे पुस्तक वाचू शकतात.

ज्ञान ही प्रॉपर्टी पुस्तकाची वैशिष्ठ्ये :

 • पुस्तक पेटंट ,कॉपीराईट,ट्रेडमार्क यासारखे विषय सोप्या पद्धतीने व समजेल अशा भाषते सांगितले आहेत.
 • पुस्तकात सर्व महत्त्वाचे मुद्दे ,कॉपीराईट नियमावली,पेटंट फाईल करायची प्रोसेस याबद्दल सविस्तर महिती दिलेली आहे.
 • पुस्तकात तरुण संशोधक घडवण्यासाठी मी संशोधक बनणारच ही १७ पद्धतशीर पायऱ्यांची लेखमाला दिलेली आहे.
 • तसेच संशोधक,कायदेतज्ञ यांच्या मुलाखतीचाही समावेश केलेला आहे हे विशेष.
 • प्रत्येकाने आपले पेटंट ,कॉपीराईट,ट्रेडमार्क याविषयक आपले ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून वाचाचे असे हे पुस्तक आहे.
 • पुस्तकाच्या वाचनाने सहजपणे आपण स्वतः तज्ञ बनून आपली इंटलँक्चुअल प्रॉपर्टी संरक्षित करू शकता.

 पुस्तकाचे मुखपृष्ठ :

 

Knowledge is property:Patents ,copyright,Trademark
Knowledge is property:Patents ,copyright,Trademark

[Click to Visit]

पुस्तकात काय आहे ते पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.

“ ज्ञान हीच प्रॉपर्टी :पेटंट्स ,कॉपीराईट ट्रेडमार्क “

अनुक्रमणिका:

 • ज्ञान हीच प्रॉपर्टी: इंटलँक्चुअल प्रॉपर्टी
 • पेटंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क
 • कॉपीराईट प्रोटेक्शन : कलात्मकतेचा हक्क
 • कॉपीराईटचे प्रकार
 • कॉपीराईट हक्क कायदे व नियमावली
 • ट्रेडमार्कचे महत्व : बिझनेसचा चेहरा
 • प्रोडक्ट्सची भौगोलिक ओळख
 • शोध गुप्तता : ट्रेड सिक्रेट
 • पेटंट्स : ज्ञानाचे संरक्षण आणि संवर्धन
 • पेटंट्सचे अंतरंग
 • पेटंट्चे उदाहरण
 • इंडस्ट्रीयल डिझाईन प्रोटेक्शन
 • आपणच करा पेटंट फाईल
 • पेटंट फाईल करण्याची प्रोसेस
 • पेटंट्सचे कायदे व नियमावली
 • बौद्धिकदृष्ट्या वर्गीकरण
 • मी संशोधक होणारच
 • तज्ञांचा सल्ला
 • वस्तुस्थितीचा आढावा
 • टिप्स
 • इंटलँक्चुअल प्रॉपर्टी संरक्षणाचा उद्देश
 • वल्ड इंटलँक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन
 • महत्वाच्या लिंक्स
 • संदर्भ
 • फॉर्म व फी यांची महिती

 पुस्तकाच्या लेखकाविषयी :

 • लेखक : महेश संभाजी जाधव.
 • मास्टर्स ऑफ सायन्स सोफ्टवेअर सिस्टम्स ,बिट्स पिलानी.
 • वल्ड इंटलँक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन द्वारा सर्टिफाईड.
 • बाह्य ग्राफिक्सच्या पद्धतीचे संशोधक.
 • प्रोसेसर तंत्रज्ञान विषयक चार पेटंट फाईल केलेले आहेत.
 • नाविन्यपूर्ण अशा पाच अनोख्या पुस्तकांचे लेखक.
 • Email ID: mahesh7197@gmail.com

पुस्तक गुगल बुक्स वरून खरेदी करण्यासाठी पुढील चित्रावर किल्क करा.

Google Books 2

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s