DirectX, x-All Tablets

भाग १ ]Direct-X टेक्नोलॉजी म्हणजे काय ?


DirectX-Logo-wordmark

आपण गेमर्स असा किंवा ग्राफिक्स डिझायनर किंवा ऑटो केड इंजिनीअर किंवा सामान्य कॉम्प्युटर युजर ; आपण डायरेक्ट एक्स चे नाव किंवा डायरेक्ट एक्स आपल्या कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल झालेले पहिले असेलच.

तर असा हा ग्राफिक्स, गेम्स ,डिस्प्ले,डिझाईन साठी महत्त्वाचा सोफ्टवेअर प्रकार नक्की काय आहे त्याचा उपयोग काय व त्यात नक्की असते तरी काय हे आपण या भागात पाहूया.

Microsoft DirectX  हे मायक्रोसॉफ्ट ने तयार केलेला (API) ए. पी. आय. चा लेयर आहे. हा लेयर कॉम्प्युटर ग्राफिक्स काम,गेम्स,व्हिडीओ यासाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग इंटरफेस चे कलेक्शन आहे.

डायरेक्ट एक्स हे डायनामिक लिंक लायब्ररी (DLL) यांचा समूह असतो. हे फंक्शन्स प्रोग्रामर्स मार्फेत मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हे हार्डवेअर वर अवलंबून नसतात हे त्याचे खास वैशिठ्य !

यातील प्रोग्रम चा वापर करून फास्टर ग्राफिक्स ,आवाज ,इनपुट फंक्शन्स वापरण्यासाठी ग्राफिक्स कार्ड,नेटवर्क कार्ड  यासारख्या हार्डवेअर डिव्हाईस चा वापर फार उत्तम रीतीने केला जातो.

डायरेक्ट-एक्समुळे डेव्हलपर्सना कोणत्याही हार्डवेअरवर रन होणारा प्रोग्रम कोड बनवणे सोपे झाले यामुळे डिव्हाईस ड्रायव्हर स्टेडर्ड होण्यास मदत झाली.

अप्लिकेशन डायरेक्ट एक्सचा वापर करून हार्डवेअरशी संभाषण करून विंडोज चा वापर करून आपणास हवा तो डाटा मिळवतात.

खालील चित्रात वर्किंगची महिती दाखवलेली आहे.

डायरेक्ट एक्स कसे काम करते.
डायरेक्ट एक्स कसे काम करते.

नवनवीन गेम्स डायरेक्ट एक्सचा वापर करून आपणस गेम्स मध्ये निरनिराळे इफेक्ट दाखवून गेमचे ग्राफिक्स अधिकच मस्त बनवतात.

नवीन डायरेक्ट एक्स ग्राफिक्स गेम्स असले तरी आपण त्यात जुने डायरेक्ट एक्स कॉम्पोनंट ही वापरून गेम्स खेळू शकतो.

डायरेक्ट एक्स चा उगम:

मायक्रोसॉफ्टने डायरेक्ट एक्सचे पहिले व्हर्जिन सप्टेंबर १९९५ ला विंडोज गेम एस डी के नावाने विंडोज ९५ बरोबर रिलीज केले.त्यानंतर Direct3D व  DirectPlayच्या सोई पुरवल्यामुळे याची लोकप्रियता वाढत गेली.

डायरेक्ट एक्स आधी मायक्रोसॉफ्ट OpenGL नावाचा API  वापरत होते ; विंडोज एन टी मध्ये याचा वापर होत असे.

डायरेक्ट एक्स चे नवनवीन व्हर्जन मायक्रोसॉफ्ट नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर पुरवत असते.जसे व्हर्जन वाढत जाते तसे नवीन सुधारित सुविधा व फिचर्स दिले जातात.

Direct-X चे  व्हर्जन्स :

याचे DirectX 9, DirectX10,DirectX11,DirectX12 अशी व्हर्जन्स सध्या आपण वापरात असतो.

 • DirectX 9 हे विंडोज एक्स पी सोबत रिलीज झाले होते.
 • DirectX10 मध्ये WDDM ड्रायव्हर आर्किटेक्चर ला सपोर्ट देण्यात आला व हे व्हिस्टा बरोबर रेलीज झाले होते.
 • DirectX11मध्ये तेसेलेशन रेंडरींग फिचर व मल्टी थ्रेड या सारख्या सुविधा देण्यात आल्या तसेच GPGPU  तंत्रज्ञानाचा वापर  करून ग्राफिक्स फिचर्स गेम डेव्हलपर्स ना देण्यात आले होते.
 • DirectX 12 मध्ये फार सुधारित ग्राफिक्स सपोर्ट देण्यात येणार आहे तसेच WDDM चे नवीन व्हर्जन पण सपोर्टेड होईल.

DircetX मध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश होतो :

डायरेक्ट एक्स चे ए पी आय फार प्रकारे वापरले जातात. Direct3D, DirectDraw, DirectMusic, DirectPlay, DirectSound या सारख्या ए पी आय ला एकत्रितपणे दर्शविण्यासाठी डायरेक्ट + [इतर] म्हणजेच DirectX असे संबोधले जाते.

 • Direct3D हा थ्री डी विषयक असणारा ए पी आय चे कलेक्शन गेम डेव्हलपर ,व्हिडीओ अप्लिकेशन डेव्हलपर मस्त ग्राफिक्स इफेक्ट व फास्ट व उच्च प्रतीचे रेंडरींग करण्यासाठी वापरले जाते.
 • Direct3D (D3D)हे ३D ग्राफिक्स साठी वापरतात.
 • DirectCompute हे ग्राफिक्स कार्ड मधून कॉम्प्युटिंग साठी वापरतात.
 • DirectSound यात आवाजाच्या निगडीत ए पी आय असतात.
 • DXGI याचा वापर डिस्प्ले डिव्हाईस साठी वापरता.
 • DirectX Media याचा वापर व्हिडीओ व अनिमेशन साठी केला जातो.

DirectX लोगो:

डायरेक्ट एक्स चा लोगो हा X असा दर्शविला जातो.तो हिरव्या रंगात दाखवला जातो व त्याबरोबर त्याचे व्हर्जन सुद्धा लिहिले जाते.

लोगो:

लोगो
लोगो

नोंद : मायक्रोसोफ्ट चा गेमिंग प्लेटफॉर्म Xbox  हा डायरेक्ट एक्स वरच बेस्ड आहे. तसेच त्याचा लोगो ही X असाच आहे.

डायरेक्ट-एक्स सोफ्टवेअर डेव्हलपमेंट किट : software development kit (SDK) :

या मध्ये डेव्हलपर्सना प्रोग्रामिंगसाठी लागणारी रनटाईम लायब्ररी,कोड पार्ट ,हेडर व माहितीपत्रक यांचा समावेश असतो.

SDK मध्ये प्रोग्रामर्स साठी उपयुक्त पडणारे प्रोग्रामिंग उदाहरणार्थ दिलेले  रेफरन्स कोड असतात. SDK  हा मोफत डाऊनलोड साठी उपलब्द असतो.

पुढील लिंक वरून आपण SDK डाउनलोड करू शकतो.

लिंक: http://www.microsoft.com/en-in/download/details.aspx?id=6812

डायरेक्ट-एक्स व्हर्जन चेक :

आपल्या कॉम्प्युटर मध्ये कोणते डायरेक्ट एक्स व्हर्जन इन्स्टॉल आहे ते कसे पहावे?

 • प्रथम Start बटन वर क्लिक करावे.
 • नंतर Run वर क्लिक करावे.
 • Run बॉक्स मध्ये dxdiag कमांड टाईप करून Enter बटन दाबावे.
 • या नंतर आपणस डायरेक्ट एक्स व्हर्जन व इतर महिती दाखवणारी विन्डो ओपन होईल.

पुढीलप्रमाणे आपणस आपली सिस्टीम व त्याबद्दल महिती व आपल्या सिस्टीम वर असणारे डायरेक्ट एक्स व्हर्जन आपणस पाहता येते.

छायाचित्र:

डायरेक्ट एक्स व्हर्जन चेक
डायरेक्ट एक्स व्हर्जन चेक

वरील चित्रावरून हे समजले कि माझा कॉम्प्युटर हा विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टीम असणारा आहे व त्यात डायरेक्ट एक्सचे 11  हे व्हर्जन आहे हे आपणस समजले असेलच.

आता आपणही आपल्या कॉम्प्युटर मध्ये कोणते व्हर्जन आहे हे नक्की पहा.

ऑपरेटिंग सिस्टम या आपल्या अनुसार डायरेक्ट एक्स व्हर्जिन सपोर्ट करतात.

कोणती ऑपरेटिंग सिस्टम कोणते व्हर्जन इंस्तोल करू शकते ते पाहण्यासाठी पुढील तक्ता पहा.

ऑपरेटिंग सिस्टीम लेटेस्ट सपोर्टिंग DirectX व्हर्जन
Windows 8.1, Windows RT 8.1, and Windows Server 2012 R2 DirectX 11.2
Windows 8, Windows RT, and Windows Server 2012 DirectX 11.1
Windows 7 and Windows Server 2008 R2 DirectX 11.0
Windows Vista SP1, and Windows Server 2008 DirectX 10.1
Windows Vista DirectX 10.0
Windows XP SP2,Windows XP x64 Edition SP1,Windows Server 2003 SP1 DirectX 9.0C

इन्स्टॉलेशन :

डायरेक्ट एक्स इन्स्टॉल करण्यासाठी पुढील लिंकला टिचकी मारा व आपल्या सिस्टीम वर डायरेक्ट एक्स इन्स्टॉल करा.

लिंक:http://www.microsoft.com/en-us/download/details.aspx?id=35

डायरेक्ट एक्स बरोबरच मार्केट मध्ये ओपन असा ओपन जी एल (OpenGL) व ओपन सी एल(OpenCL) असे ए. पी. आय. ही उपलब्ध आहेत.

सारांश:

DirectX हा ग्राफिक्स,व्हिडिओ ,आवाज,नेटवर्क यावर लक्ष ठेवणाऱ्या फंक्शन्सचा साठा आहे. सोफ्टवेअरचा वापर करून ग्राफिक्स हार्डवेअर मधून काम करून घेण्यात यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.डायरेक्ट एक्स मुळे नवीन जुने हार्डवेअर व गेम्स व त्यांच्या टेक्नोलॉजी यांच्यात सांगड घालता येते.डेव्हलपर्सना हार्डवेअर कडे लक्ष न देता मस्त गेम्स व अप्लिकेशन्स तयार करताना या इंटरफेस लेयरचा फार उपयोग होतो व इतक्या सर्व गोष्टी व फंक्शन्स हे कॉम्प्युटर वापरणाऱ्या युजर्सच्या नकळत होतात.

आपल्या कॉम्प्युटर मधील डायरेक्ट एक्स हा किती महत्त्वाचा आहे हे समजले असेलच..अशीच नवनवीन टेक्नोलोजी ची महिती आपण पुढील अंकात पाहूया.

DirectX वर आधारित भागास भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा.

–MJ 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s