PDF book, x-All Tablets

ई पुस्तक प्रकाशन: भाग १: पी डी एफ फोर्मेट मध्ये पुस्तक तयार करणे.


छंद ,आवड ,कला काहीही असो…लेखन ही मजा आहे…आपले नाविन्यपूर्ण लेखन प्रकाशित व्हावे अशी सर्वच लेखकांची इच्छा असते…पण प्रकाशकांची ओळख ,प्रकाशनासाठी लागणारा वेळ व पैसा तसेच भली मोठी प्रोसेस यामुळे पुस्तक प्रकाशित करणे म्हणजे महादिव्यच….

आज काळ बरेच लोक छापील पुस्तके विकत घेण्याऐवजी ई- बुक या माध्यमातील पुस्तके विकत घेण्याकडे कल वाढत आहे…कारण ई-बुक हे आपल्या कॉम्प्युटर,मोबाईल,टँबलेट यावर कोठेही आरामात वाचता येवू शकतात व आपल्याबरोबर बाळगता येवू शकतात…तसेच ई-बुक खरेदी ची ऑनलाईन प्रोसेस अतिशय सोपी आहे…तसेच छपाईचा खर्च नसल्यामुळे ई –बुक यांची किंमत ही कमी असते…नवीन जनरेशनला पी डी एफ व ई- बुक फॉर्मट मधील पुस्तके जास्त आकर्षित करीत आहेत.

लेखकाच्या दुष्टीने ही ई- बुक प्रकाशन फार उपयुक्त आहे..अतिशय कमीत की प्रोसेस मध्ये आपण घरबसल्या आपले पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करू शकतो,पुस्तकाची किंमत ठरवण्याचा ही अधिकार आपणस असतो, तसेच गुगल, अँमेझोन सारख्या मोठ्या कंपनी पुस्तक अनेक लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम उत्तम रीतीने पार पडतात..यामुळे आपला खर्च व वेळ यांची बचत होते. तसेच नव-लेखकासाठी अनेक प्रकाशकांची ओळख असणे किंवा लिहिण्याचा अनुभव किंवा डिग्री असणे अशा कोणत्याच गोष्टींचा अडथळा या माध्यमामुळे येत नाही हे विशेष..

या भागात आपण प्रथम आपल्या लिखाणाचे पी डी एफ पुस्तक कसे करावे ते पाहूया व पुढील भागात आपण पी डी एफचे ई बुक मध्ये रुपांतर व प्रकाशन कसे करावे ते पाहूया.

पूर्वतयारी :फोर्मेटिंग :

प्रथम आपण आपले लिखाण डॉक्युमेंट फोर्मेटमध्ये तयार करून घेतले पाहिजे.आपण पुस्तक लिहिताना जर आपणास पेज फुल्ल कागदाच्या साईझचे हवे असेल तर पेजची साईझ A4 ठेवावी.

जर आपणस पुस्तक हे नेहमीच्या पुस्तकी साईझ प्रमाणे हवे असल्यास पेज लेआउट मध्ये जाऊन पेज चा साईझ 5.5 X 8.5 इतका ठेवावा.

तसेच पेज बोर्डर मध्ये जाऊन चोकोनी एकेरी बोर्डर सिलेक्ट केल्यास पेज एका चौकोनात फिट झाल्यासारखे दिसते.

आपणास हवा असेल तो फोन्ट सिलेक्ट करणे जर आपण इंग्रजीत लिहीत असाल तर शक्यतो Arial किंवा Times New Roman हे फोन्ट वापरावेत.

आपणस जर मराठीत लिहायचे असेल तर आपणस पुढील  लिंक वर जाऊन आपल्या कॉम्प्युटर वर मराठी इन्स्टॉल करू शकता.

आपल्या नेहमीच्या लेखनाचा साईझ १० ते ११ हा ठेवावा व टायटल बोल्ड फोन्ट मध्ये ठेवावीत.

 पुस्तक लिहिताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

प्रथम आपण काय लिहिणार आहोत याची एक रूपरेषा बनवावी. प्रथम विषयाची ओळख नंतर एक एक भाग निरनिराळ्या विभागात सविस्तरपणे मांडावा.

प्रत्येक नवीन भागाची सुरवात आधीच्या भागाला लिंक करून चालू करावी व शेवटी आपण पुढील भागात काय शिकणार आहात याबद्दल महिती द्यावी.

पुस्तकात चित्रे, आकृत्या, नकाशे,  टेबल यांचा आवर्जून वापर करावा यामुळे बऱ्याच गोष्टी वाचकांना समजण्यास सोप्या जातात व पुस्तकही सुंदर दिसते.

आपण पुस्तकाच्या शेवटी संदर्भ व आभार पत्र तसेच इतर महिती लिहू शकतो.

आपल्या पुस्तकाच्या आराखड्यानुसार अनुक्रमणिका बनवावी व त्यानुसार आपण आपले संपूर्ण लेखन मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये लिहून काढावेत.

जर आपण स्टोरी लिहीत असला तर प्रथम आपल्या कथेतील पात्रे त्यांची नावे त्यांचे वर्णन व स्वभाव कसा असेल या बद्दल विचार करून लिहून ठेवा.

तसेच कथेतील ठिकाण व प्रसंग चितारताना अत्यंत बारकाईने आजूबाजूच्या वातावरणाचे वर्णन करावे.एक आभासी जग तयार करून ते वाचकांसमोर मांडावे, जेणे करून वाचकांना आपण त्या नवीन जगात जाऊन आपण कथेतील पात्रांबरोबर कथेची अनुभूती घेत आहोत असे वाटेल.

कथेत वापरले जाणारे पात्रांच्ये तोंडचे संवाद,धावते वर्णन ,चालू वर्तमानकाळ यांचा वापर कथेला जिवंतपणा देतात.

कथेत टर्न ,ट्वीस्ट ,मसाला ,धक्का ,गोडवा यांचे मिश्रण असेल तर वाचकाकडून मस्त प्रतिसाद मिळतो.

पुस्तकाचे मुखपृष्ठ :

पुस्तकाच्या मुखपृष्ठाला अनन्यसाधारण महत्व आहे ..बऱ्याचदा वाचक हा मुखपृष्ठ पाहूनच पुस्तकाकडे आकर्षिला जातो.

आपल्या पुस्तकाच्या कव्हर वर ठळक दिसणारे पुस्तकाचे नाव असावे,तसेच एका ओळीत आणखी काही  महिती किंवा दर्शनी ओळ किंवा त्यात नक्की काय आहे याची हिंट देणारी ओळ थोड्या लहान फोन्ट मध्ये लिहावी.

पुस्तकाच्या खाली लेखकाचे नाव किंवा टोपणनाव (प्रसिद्ध असेल तर) तसेच लेखकाच्या अचिव्हमेंट बद्दल त्याच्या बद्दल एखाद्या ओळीत लहान फोन्ट मध्ये महिती द्यावी (उदा :xxx  या प्रसिद्ध पुस्तकाचे लेख ,शिक्षण ,पुरस्कार ).

मुखपृष्ठावरचे चित्र आकर्षित व पुस्तकाच्या गाभ्याला व नावाला अनुसरून असावे.आपण काही चित्रकार किंवा प्रोफेशनल कव्हर डिझाईनर याकडून रेडीमेड कव्हर तयार करून घेवू शकता किंवा स्वतः फोटो शॉप किंवा पेंट तसेच इंटरनेटवरील चित्रांच्या मदतीने कव्हर तयार करू शकता.

अँमेझोनवर खास कव्हर डिझाईनचे सोफ्टवेअर देण्यात आलेले आहे याद्वारे आपण पुस्तक जर अँमेझोनवर प्रदर्शित करणार असाल तर आपले लॉग इन करून कव्हर डिझाईनर च्या मदतीने मस्त मस्त कव्हर अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

पुस्तकाचे मलपृष्ठ :

पुस्तकाचे शेवटचे पण हे आधीच्या प्रदर्शित पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी वापरणे असा प्रघात आहे .

शेवटच्या पानावर आधीची पुस्तके त्यांची महिती तसेच आगामी पुस्तके यांचीही थोडक्यात महिती द्यावी.

तसेच काही वेळा शेवटच्या आपणावर लेखकांचा फोटो व त्यांचे कार्ये ,शिक्षण यांचीही सविस्तर महिती दिली जाते.

पुस्तकाचे आवृत्ती क्रमांक तसेच नोंदणी क्रमांक,किंमत ही महिती कोपऱ्यात द्यावा.

काही वेळा मुखपृष्ठाला मँच होणारे एखादे सोफ्ट डिझाइन ,नक्षीकाम ही आपण मलपृष्ठावर वापरू शकतो.

पी डी एफ फोर्मेट मध्ये पुस्तक तयार करणे:  

आपण लिहिलेले लिखाण कोणीही बदलू नये यासाठी ते पी डी एफ या फोर्मेट मध्ये कन्व्हर्ट करावे जेणेकरून त्याचे फोर्मेटिंग कायम राहील व व लिखाण रीड ओन्ली मोड मध्ये राहील.

आपले संपूर्ण लेखन व कव्हर्स तयार झाल्यावर आपण ते पीडीएफ फोर्मेट मध्ये कन्व्हर्ट करावेत .

आपले कव्हर व लिहिलेले टेक्स्ट यांचा पेज साईझ एकाच असावा,यासाठी आपण आपले कव्हर फोटो मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पेस्ट करून ते पेज आपल्या पुस्तकाच्या आकाराच्या इतके बनवून नंतर ते वेगळे वेगळे ठेवून पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करून मग मर्ज करावे.

यासाठी आपण पुढील सोफ्टवेअर वापरू शकता. :

तसेच आपण ऑनलाईन पीडीएफ कन्व्हर्ट करू शकता.

आपले पेज पी डी एफ मध्ये कन्व्हर्ट झाले की मग त्यावर आपण कव्हर पेज मर्ज करून फायनल कॉपी तयार करू शकतो.

पी डी एफ मध्ये फाईल पाहण्यासाठी आपल्या कॉम्प्युटर वर पीडीएफ रीडर इन्स्टॉल असणे आवश्यक आहे याद्वारे आपण तयार केलेली पुस्तकाची पी डी एफ फाईल ओपेन करून पाहू शकतो.

  • ऑडोबी पी डी एफ रीडर डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक पहावी : http://get.adobe.com/reader/

आता आपले पुस्तक पी डी एफ फोर्मेट मध्ये तयार झालेले आहे.

हे पुस्तक आपण मित्रांना व काही ओळखीच्या जाणकार लोकांना पाहण्यासाठी व रिव्हु करून चुका व सुधारणा कळवण्यासाठी पाठवू शकता व त्यानुसार आपल्या पुस्तकात प्रदर्शना आधी सुधारणा करू शकता.

मी तयार केलेले पी डी एफ फोर्मेट मधील पुस्तक:https://bolmj.files.wordpress.com/2013/07/zatpat-german-in-marathi-ebook_final3.pdf

आता आपले पुस्तक पी डी एफ फोर्मेट मध्ये तयार झालेले आहे ,अभिनंदन!!

पुढील भागात आपण पीडी एफ व ई बुक यांच्यातील फरक व गुगल , अँमेझोनवर ई बुक प्रकाशित कसे करावे याबद्दल महिती घेवूया.

 

–MJ 🙂

1 thought on “ई पुस्तक प्रकाशन: भाग १: पी डी एफ फोर्मेट मध्ये पुस्तक तयार करणे.”

  1. फारच छान माहिती . माझी दोन पुस्तके तयार आहेत प्रकाशितही झाली आहेत . आता बुकगंगा मधील तिनही साईटवर इ बुकवर कशी द्ययावी एहे कृपया कळवा. धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s