friendshipday

फ्रेंडशिप म्हणजे फ्रेंडशिप असते तुमची काय अन आमची काय…जवळपास सेमच असते.


हल्ली स्वतःशीच बोलतो..जास्त..!! हल्ली काही सुचतच नाही यार.. हा तसे सुचायला शांत डोके लागते,शांत डोके ठेवण्यासाठी चांगले विचार लागता,,चांगला विचार यायला चांगला मूड लागतो..चांगला मूड यायला चांगल्या गोष्टी घडाव्या लागतात किंवा काहीतरी नवीन, वेगळे,मजेदार,रोमांचकारक,आकस्मिक घडावे लागते…आयला !! तसले काही आम्ही घडवत नाही आणि कोणी घडवून हि आणत नाही…तरीही काहीतरी सुचत असत, काहीतरी लिहीत असतो ,काहीतरी वाचत असतो..काहीतरी प्रेरणा-एनर्जी असते जी लिहायला लावते..वेताळासारखी मानगुटीवर बसून….[तळटीप: प्रेरणा हे माझ्या कुठल्याही मैत्रीनीचे नाव नाहीये रे… :P]

….बर मुद्दा असा कि परवा एका ब्लॉगर काकांचा लेख वाचत होतो काहीतर ” मित्र-कट्टा-मस्ती-दंगा-मजा “असे शब्द वाचण्यात आले..थोडे ओळखीचे वाटले हे शब्द..जसे सिनेमात हिरोला त्याचा पुनर्जन्म मधली आयटम कोण आहे ते आठवते…तसे काहीतरी..फ्लाश बँक सारखे ब्ल्याक अन व्हाईट मध्ये..तेन्ह्वा पासून कि-बोर्ड वर हात गेला कि हात काहीतरी लिहायला शिवशिवत होता..पण साला काय आहे ..माणूस हा वेळचा ,कंपनीचा ,मेनेजरचा, कामाचा, आणि नियतीचा गुलाम असतो..तरीहि मनाचा राजा…म्हणूनच आज बसलो….!!
मागचा रविवार …हातात कसल्यातरी टेक्नोलॉजी बद्दल पुस्तक..सकाळ पासून वाचनालयात बसलेला मी..भूक लागली मग दुपारी फर्ग्युसन कॉलेज रोडवर आलो पोट पूजेसाठी..तसा नेहमीच रंगीन असतो आमच्या पुण्यातला एफ्सी रोड ..मी तर गमतीने त्याला पुण्याचं पँरीस म्हणतो..तसा आमचा हा एफ्सी रोड आज एकदमच झगमगीत दिसत होता आणि सगळे प्रेम-पक्षी नव-नवीन फ्याशनेबल कपडे (?) घालून वावरत होती,मला बुवा काय समजेना काय भानगड आहे .. हा हातात कसला तरी दोरा होता आणि खुशीच्या शेवटच्या टोकाला होती तरुणाई..मी म्हंटल असेल राखी वगेरे.. अहं ना… साला तो Friendship Band होता…मग आम्हाला कळाले तो दिवस ..तो म्हणजे फ्रेंडशिप-डे होता हो.. लोकं डे कसे लक्षात ठेवतात तेच काळत नाही.. तसे १४ फेब्रुवारी वाला डे असतो आमच्या लक्षात , कडू-गोड आठवणी सोबत..पण हा वाला डे काय फ़िक्स तारीख नाय, काय नाही तरीही लहानपणा पासूनचा आवडता डे होता हा ….नकळत स्वतःचा हाता कडे लक्ष गेले….मोकळाच होता आज…!!
….शाळेत होतो तेन्ह्वा ..प्रत्येकाचा हातात कोपऱ्यापर्यंत ब्यांड बांधलेले आणि ब्यांड बांधला कि दोस्ती अजूनच फिक्स..पण खास मित्राने बँड बांधला नाही तरी राग यायचा नाही  किंवा मैत्री तुटायची नाही.आपले बँड संपले तरी मित्र शिल्लकच…मग दुसऱ्याने बांधलेला बँड काढून तिसऱ्या मित्राला बांधायचा आणि तरीही दोघांना राग यायचा नाही…आणि मग आपापले बँड किती झाले ते मोजायचे, जसे हल्ली काही लोकांना फेसबुकवर आपल्या लाईक किंवा कमेंट मोजायची सवय असते तसे… अगदी खुशीत एखादा चांगला “स्पेशल” बँड ठेवढा हातात ठेवायचा आणि बाकि एका बॉक्स मध्ये व्यवस्थितपणे ..काही जण फुलं तयार करायची त्यापासून..पण एकंदरीत मजेत जायचा हा निरागस दिवस…
ज्युनिअर कोलेजला गेल्यावर जरा वेगळे वळण मिळायचे या डे ला..आमच्या कॉलेजचा फ्रेंडशिप डे म्हणजे दुसरे ग्याद्रिंग..मुली नवीन ड्रेस घालून येणार कॉलेजवर आणि मुले कॉलेजच्या गेट जवळ मुलींची वाट बघत [कधी नव्हे ते ..अंघोळ करून सेंट मारून एकदम चकाकत]…मग कुणाचे सेटिंग…कुणाची लडथर….सगळा ग्रुप मिळून सेलिब्रेट करणार..कधी कधी आपलं सेटिंग एवढा क्लोज जुळायचं आणि मध्येच कोणतरी शिवसैनिक कडमडायचा..असला राग यायचा त्यावेळी शिवसेनेचा…अरसिक मानसिकता म्हणून..पण आपलं तुटलं कि आम्ही पण हातात भगवा झेंडा घेवून अँन्टी फ्रेंडशिप डे ग्रुप मध्ये सामील…अजूनही जुने मित्र भेटले हि तुझ्या तिचे काय झाले रे इथून चिडवायला सुरवात होते…
नंतर इंजिनीअरींगला आल्यावर सुंदर पोरीची तर बोंबाबोंब..आणि आम्ही नुकतेच टेक्नॉलॉजीच्या प्रेमात पडलेलो..आणि इथे बराच खेळ बघितला मित्रत्वाचा…तरीही आपल्या सारखे खडे तांदळातून शोधून काढायला जास्त वेळ गेला नाही आणि एकदा का सम-(अ)विचारी लोकांचा कट्टा जमला कि मग बास..बरेच नवीन सामील होत गेले आणि थोडे सुधारण्याच्या ध्यासापोटी ग्रुप सोडूनहि गेले..४ वर्षात तसे बरेच ग्रुप होते अभ्यासासाठी एक,चहा प्रेमी ,होस्टेलवाला ,वर्गात दंगा करायला एक ,ट्रीपला जायला एक,कार्यक्रम ऑर्गनायझेशन चा एक..पण त्यात पण एक होतो ग्रुप एकदम जिगरी छाव्यांचा…
बाकीच्या समोर सज्जनतेचे पुतळे बनणारे आम्ही एकत्र आलो कि आतले खरे गुण बाहेर ओसंडून जायचे..मग अगदी त्यात कोनत्याही लेव्हलला जाऊन चिडवले आहे, मस्ती करणे, पी जे मारणे, कुणाचीही च्यालेंज घेवून मापं काढणे किंवा पोट दुखून पार्टी करेपर्यंत हसणे सगळे काही माफ.. कोणीही कधीही कुठेहे बोलावले कि सगळे १० मिनटात दत्त म्हणून हजर..आम्ही आपल्याला छावे म्हणत असू कारण तेंव्हा कोणाची चावी/छावि न्हवती..सुखी होते रे तेव्हा !! सगळे काही शेअर करणार..रात्र रात्र जागून आपली प्रेम कहाणी सांगणार..मदतीला तर कोणत्याही वेळी न बोलवता तयार..हे असताना काही कुणाची वा कशाची कमीच जाणवली नाही..सगळेच राजे..आणि कोण आडवा आला कि त्याला मिळून आडवा केलाच म्हणून समजा..यातच ४ वर्षे ४ दिवसा सारखी गेली काही समजलेच नाही..अजून मीस् करतो साल्यांना…
जसे कंपनी ,काम ,वर्क लोड,मेनेजर,पैसा,बँक ब्लँलन्स या नावाच्या राहू-केतुनी जीवनात प्रवेश केला आणि बराच बदलवला सगळ्यांना..पूर्वी सगळे शेअर करणारा तोच आता कंपनी कॉन्फीयनशील नावाखाली चूप असतो,कायम शिव्या शिवाय न बोलावणारा त्याची ती असली कि एकदम सोफेस्टिकेटेड होऊन जातो, तर गेले उडत म्हनणारा कोणी आपले स्टेटस् ,लोक काय म्हणतील या भीती पायी चेपलेला,आणि कोणी सडेतोड बोलणारा कुणाची तरी चाटत असतो …सगळा चेहऱ्यावर खोटं हसू आणून आनंदात आहोत असे भासवणारा मेळावा…
….मनाला काही पटत नव्हते..वेळ हे या रोगाला उत्तम ओषध असते…परत सवय झाली सगळेच थोडे थोडे बदललो म्हणा वा बदलवलो गेलो…..काही गोष्टी समजून घ्यावयाला लागतात…नवी जागा, नवी कंपन,, नवे मित्र हे चक्र चालूच राहणार..अगदी शेवटच्या इच्छा निवृत्ती पर्यंत…मग नवीन जोडत गेलो आणि जुने घट्ट करत..प्रत्येक ग्रुप बरोबर वेगळे ऋणानुबंध साधत.. बरेच काही मुक्तपणे देत आणि लागेल ते हक्काने मागत…..आजही २-३ दिवस गायब राहिलो हि येतात तीच ७-८ कार्टी जिवंत आहे का नाही ते पाहायला..आजही वेळ काढून बसतो एकत्र एकमेकांचे प्रश्न सोडवत..फी न घेता सल्ले देत,गोंधळलेल्या मनातील वेडे विचार ते हि एकतात तितक्याच तन्मयतेने ,अजूनही हसतो फिसकटलेले प्रेंमप्रकरण आठवून,प्रेरणा बनतो आम्हीच एकमेकांची,आणि करमणूक हि करतो कधी कविता तर कधी लेख लिहून…गप्पांचा कट्टा संपला कि मग पार्टी करतो कोणालातरी बकरा करून आणि तो हि होतो आनंदून…आज त्या सगळ्यांची आठवण एकदम येवून डोक्यावरुन विचार ओसंडून जात होते..मनोमन ठरवले सगळ्यांना फोन करायचा आणि गप्पा मारायच्या..वेळ मिळेल तसा….
….मी कायम म्हणतो कि याचा साल्यानी मला घडवला आणि बिघडवलाही !!!…..यापैकी कोणीच भेटलेच नसते तर,या विचारानेच पायाखालची वाळू सरकली..पाय थरथरला..प्यानटीतला मोबाईल व्हाब्रेट होत होता..जुन्या मित्रचे नाव भ्रमणध्वनीच्या पटलावर आले…त्याचा हसणारा चेहरा मनःपटलावरून तरळला… फ्रेण्डशिप डे चा अजून एक मेसेज न वाचताच मोबाईल बंद केला…..आणि……परत निघलो वाचनालयात……भरलेले मन आणि रिकामा हात घेवून !!!

-MJ 🙂 [पुनर्प्रकाशित]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s