Travel, Tung

भटकंती : लोणावळ्याजवळील तुंग किल्ला:ट्रेकिंगला मस्त स्पॉट!!


लोणावळ्याजवळील तुंग किल्ला:ट्रेकिंगला मस्त स्पॉट!!

दुर्गम गड ,जोराचा पाऊस,हिरवीगार वनराई आणि ट्रेकर्स ची टीम म्हणजे एक जबरदस्त मिलाफ…
मागच्या शनिवारी असाच एक मस्त अनुभव आला..लोणावळ्याजवळील तुंग नावाच्या किल्ल्यावर आघाडी करताना..!!

पुणे आणि मुंबईकरांना जवळ असलेला थोडाफार दुर्गम भागात वसलेला….माणसांची जास्त गर्दी नाही पण झाडाझुडपांच्या दाट गर्दीत वसलेला..लहानसाच पण एकदम खडा किल्ला…

तुंग किल्ल्याचा सुळका

जायचे कसे:तर पहिला लोणावळ्यात पोहचायचे नंतर शिवाजी रोड ला लागून टायगर हिल धबधब्या मार्गे आंबी व्हली ला जाणारा रोड पकडायचा..लोणावळ्यापासून ३०-४० किलोमीटर चा रस्ता आहे रस्ता मस्त आहे गाडी चालवायसाठी..आजूबाजूला झाडी वळणा-वळणचा मार्ग मध्ये टायगर हिल धबधब्यापासून पुढे चालू लागलो कि दाट धुके लागते ….गाडीच्या अगदी ५-६ फुट समोरचे पण अंधुक दिसते …..अगदी हेडलाईट लावून गाडी चालवली आम्ही…नंतर तुंग गावाजवळ गडाच्या पायथ्याला गाडी पार्कींगला जागा आहे तेथे आपल्या गाड्या लावून आमची ग्यांग चड्ड्या घालून तयार झाली..
खालूनच गड साद घालत होता कधी एकदा गडावर पोहचतो असे झालेले..सुरवातीला जरा पायऱ्या आहेत नंतर चढ चालू होतो..चढायच्या पायवाटांवरून पावसाचे पाणी पडून छोटे छोटे धबधबेही तयार झालेले… त्यातच हात रुतवत मध्ये मध्ये निसर्गाचे फोटो घेत जायला मजा येते..झाले म्हणाल तर फार नाहीत केळीची नाहीतर तुरळक इतर झाडे पण दाट झुडपे आणि गुढग्यावर वाढलेले गवत..

अर्ध्यावर गेल्यावर एक छोटा सपाट भाग लागतो पठारा सारखा..तीथे थोडी विश्रानी घेतली आणि गडाची माहिती आमच्या मधल्याच एका माहितीगार कडून ऐकली ती अशी..

इतिहास:माळवा भागावर लक्ष ठेवण्यासाठी 2075मीटर उंचीवर हा किल्ला उभारला गेला आहे.आदिलशाहीने हा किल्ला १६०० मध्ये बांधला आहे.नंतर तो शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला.किल्ला तसा लहान आहे जवळपास २०० मावळे या किल्ल्यावर राहू शकत होते.पण हा किल्ला चढायला अतिशय अवघड आहे. ह्याला कोणाच्या आकाराचे निमुळते टोक आहे जे आजूबाजूच्या परिसरातून दिसू शकते.सध्या बांधण्यात आलेल्या पगणे या पवना नदीवर बांधलेल्या तलावामुळे हा किल्ला पाण्याने तिन्ही बाजूने वेढलेला आहे.आपण तलावापाशी सुद्धा जाऊ शकतो..जवळच आहे..तुंग गावाजवळ..

नकाशा :

तुंग चा किल्ला

….. पायऱ्यांचा मार्ग आपल्याला किल्यावर घेवून जातो ..तो आपल्याला जड व भक्कम भिंतीने बनलेल्या किल्यावर नेतो.मध्ये एक मंदिर आहे व पाणवठा पण आहे तो मस्त फोटो स्पॉट आहे..

तुंग किला हा पूर्वीच्या काळी टेहळणी बुरुज म्हणून वापरला जायचा.हा लोहगड व विसापूर किल्लाचे रक्षण आणि मदतनीस म्हणून काम करत असे.आपण लोहगड विसापूर,तिकोना,कोरीगड हे किल्ले या किल्ल्यावरून पाहू शकतो..

…वर गड एकदम निमुळता होत जातो तसे गड सर् करायला आणि पाहायला एक तास बस आहे..तसे दरवाजे बुरुज आणि एक दोन मंदीरे एवढंच सध्या शाबूत आहे… गडाला जाताना एक रस्ता मारुती मंदिराकडे जातो.आणि तेथून पायऱ्या चालू होतात आणि पुढे आपण गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचतो.

तेथून थेट गडाच्या एकदम टोप्प वर..उजव्या हाताला एक गणपती मंदिर पण लागते आणि मागील बाजूस पाणवठा लागतो तो रस्ता पुढे किल्यावर जातो. तुम्हाला येथे तुंग देवीचे मंदिर सुद्धा दिसते या मंदिराच्या नावावरून गडाला तुंग गड असे म्हणतात. मंदिराच्या मागील बाजूस छोट्या पण सुंदर अशा जमिनीत खोदलेल्या लेण्या दिसतील यात एकावेळी २-३ लोकच जाऊ शकतात.आमचा तो स्पॉट राहिला बघायचा गडबडीत…

दरवाजा

गड चढताना जितका थकवा आलेला असतो तो गडाच्या माथ्यावर पोह्च्यावर पार पळून जातो..मग ब्यागेतून आणलेल्या खाद्यपदार्थ आणि पाण्यावर सगळे जन तुटून पडलो..तिथे जवळपास खायची काही सोय नाही म्हणून खायला आपले आपलं नेलेलं बर..पोट पूजा झाल्यावर फोटो सेशनमध्ये तास कसा गेला समजलेच नाही..प्रत्येकजन नंतर निसर्गाच्या रम्य रुपावर फिदा होऊन काहीवेळ आत्मशुद्धी करत होता..स्वतःतील स्व: विसरून डोळे बंद करून शांत वातावरणात घेतलेला तो स्वर्गीय आनंद वेगळाच…. आजूबाजूला मस्त निसर्ग मधूनच येणारे धुक्याचे ढग…रिमझिम पाऊस..आणि छत्रपति शिवाजीराजे च्या घोषणा सबंध मावळ भागात गुमणारा आवाज..यातच ग्रुपने गडाचा निरोप घेतला…

किल्ला माथा

अहो आत्ताच पावसाळी मस्त वातावरण आहे तुम्ही पण जाऊन या…आजूबाजूच्या गडांचे विहंगम दृश्य आणि अथांग पसरलेल्या तलावाच्या पाण्यामध्ये सामावून जाऊन मन अगदी प्रफुल्लित होते आणि गड सर् केल्याचे सार्थक समाधान मिळते कि नाही बघा…

-MJ [पुनर्प्रकाशित ]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s