CopyRight Law, x-All Tablets

कॉपीराईट हक्क , कायदे व नियमावली.


copy wirte
कॉपीराईट संबंधीत बहुतांशी नियम अनेक देशात समांतरच आहेत, पण काही देशात कॉपीराईट च्या नियमात थोडे बहुत फरक आढळतात.

Berne Convention :

यात नियमावलीत कोणत्या गोष्टी कॉपीराईट केल्या जावू शकतात आणि त्या नंतर त्याचा वापर कसा केला जावा याबद्दल सर्वात जुनी (1886) आंतरराष्ट्रीय दर्जावर मान्यताप्राप्त अशी महिती दिली आहे.

मजेशीर बाब म्हणजे : काही देशात तर अगदी खाजगी पत्रे,हेअरकट,परीक्षेचा पेपर,पुलावरील सजावट अशा गोष्टीही कॉपीराईट करण्यास परवानगी आहे.

रुपांतरीत काम:

यात एखाद्या मूळ गोष्टीला सुधारून किंवा त्यात बदल घडवून तयार केलेले काम यांचा समावेश होतो.

यासाठी मूळ लेखकाची किंवा कलाकाराची परवानगी घेवून याच्या मूळ कलाकृतीचा मान ठेवून नवीन बदल घडवावेत असा संकेत आहे.

अन्यथा कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होऊ शकते.

यात पुढील बाबींचा समावेश होतो:

  • काम निरनिराळ्या भाषेत अनुवादित करणे.
  • कथा,कादंबरी वरून चित्रपट तयार करणे.
  • संगीतात पियानो वर वाजलेले गाणे गिटार साठी बदल घडवून नवीन वाद्य रुपात वाजवणे.
  • कामाचे एकत्रीकरण करणे उदा:साहित्य संच ,महिती कोश.

नोंद : डिजीटल फोर्मेट मधील आवाज ,चित्रे ,अक्षरे जी कॉम्प्युटर द्वारे वाचली जावू शकतात अशा गोष्ठी ही कॉपीराईट मध्ये येतात.

कॉपीराईट च्या मालकासाठी काही खास अधिकार मिळतात यात आर्थिक अधिकार आणि नैतिक अधिकार येतात.

आर्थिक अधिकारात मालक हा कॉपीराईट चा आर्थिकदृष्ट्या फायदा मिळवण्यासाठी वापर करू शकतो:

जसे विकणे, भाडे तत्वावर देते,कामाच्या  प्रतिकृती तयार करणे व विकणे.

नैतिक अधिकारात मालकास आपल्या कामावर आपले नाव लिहिण्याचा व कलाकार आणि काम यामधील लिंक तयार करण्याचा अधिकार मिळतो.

intellectual-property-rights

पुनरावृत्तीचा अधिकार :

रेकॉर्डिंग ,सीडीज, डिव्हीडी असा डिजीटल कंटेंट असो व पुस्तक , पेंटिंग्ज अशा वस्तू असोत एकदा एखादी आवृत्ती प्रसिध्दीस आली की मग लेखक कलाकार यांना त्याच्या पुनर्निर्मितीतून फार आर्थिक लाभ मिळतो.

जसे पुस्तक प्रकाशक पुस्तकाच्या किती आवृत्ती काढेल किंवा गाण्याच्या किती सी डी प्रसारित केल्या जातील यावर मूळ कलाकाराचा किती अधिकार आहे हे ठरविण्यासंदर्भात री प्रोडक्शन कायदा तयार करण्यात आलेला आहे.

यानुसार कॉपीराईट मालकाच्या परवानगीनेच त्याच्या कलाकृतीच्या पुनरावृत्ती तयार करता येतील.

जाहीर प्रसारण व सादरीकरण नियम :

आपल्या घरगुती व खाजगी वर्तुळाच्या बाहेरील व्यक्तींसाठी केलेले व मोठमोठ्या हॉलमध्ये,मॉलमध्ये किंवा मैदानात सादर केलेले प्रोग्रम जाहीर सादरीकरण कायद्यांतर्गत येतात. असे कार्यक्रम करण्याआधी मूळ कलाकारची परवानगी घेणे गरजेचे असते.

प्रसारण कायद्यात रेडिओ ,टेलीव्हिजन,सँटालाईट मार्फत पाठवले जाणारे फोटो ,आवाज व्हिडीओ यांचा समावेश होतो.

बेरणे कन्व्हेन्शन नुसार कॉपीराईट च्या मालकास त्याची कला सादर व प्रसारित करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे.

TRIPS अँग्रीमेंट :

वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अंतर्गत इंटलेक्चुअल प्रोपर्ती च्या व्यापार विषयक बाबींसाठी TRIPS अँग्रीमेंट बनविण्यात आले आहे.

यामध्ये बेरणे कन्व्हेन्शन हून अधिक नियमावली दिलेली आहे.

यात प्रामुख्याने नवीन व्यापार पद्धती, नवीन कलाकृती जसे कॉम्प्युटर प्रोग्रम ,डाटाबेस तसेच नवीन भाडेतत्त्वाच्या पद्धती यांबद्दल नियामावालींचा समावेश करण्यात आला आहे.

कॉपीराईटचा देशाला फायदा :

देशाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कॉपीराईट फार जरुरीचे आहे.

अनेकदा अनेक लोकांच्या आर्थिक योगदानातून व कष्टातून एखादी कलाकृती उदयाला येते व त्याची कला व गुणवत्ता दुसऱ्या कोणीतरी चोरली तर तो सामाजिक व आर्थिक प्रगतीला बाधा आणू शकतो.

तसेच या वाढत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थानिक कलाकारांचे कायद्याने रक्षण होणे गरजचे बनलेले आहे.

कॉपीराईट कायद्याचा काळजीपूर्वक उपयोग करून देशातील स्थानिक कला ,कलाकार,लेखक यांचा संरक्षण देवून देशाची सामाजिक व आर्थिक प्रगतीचे संवर्धन करता येईल.

“पेटंट हीच प्रॉपर्टी” या लेखमालेचे पुढील अंकात पेटंट,कॉपीराईट,ट्रेडमार्क,इंडस्ट्रियल डिझाईन या इंटलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल सविस्तरपणे महिती दिलेली आहे .

पुढील महिती  पाहण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.

1 ] ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय ?

2 ] इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी: पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क,डिझाईन यांची ओळख.

3]  पेटंट्स फाईल करण्याच्या प्रोसेसची महिती.

४] कॉपीराईट प्रोटेक्शन : कलाकारांसाठी कलात्मकतेचा हक्क.

५ ] कॉपीराईट हक्क , कायदे व नियमावली.

-धन्यवाद MJ 🙂

1 thought on “कॉपीराईट हक्क , कायदे व नियमावली.”

  1. काय आहे की आमचे पुर्वज एक लेखक यांनी ग्रंथ लिहला तर मला असे विचारायचे आहे की हा ग्रंथ आमच्याकडे नव्हता म्हणजे आम्हाला माहित पण नव्हते की त्यांनी ग्रंथ लिहला आहे आता तो मुंबईतील एका प्रकाशनाने प्रकाशित केल्यावर कळले की आमचे पुर्वज यांनी एक पुर्वी साधारण १८९० ते १९०० साली ग्रंथ लिहला आहे मग मला सांगा यात या ग्रंथाचे कॉपीराईट कोणाकडे पाहिजेत कारण हा ग्रंथ स्वामींच्या काळात लिहला आहे.ज्या प्रकाशकाने तो प्रकाशित केला आहे त्यांनी त्यात छापाताना उल्लेख केला आहे की या ग्रंथातील मजकुर प्रकाशकाच्या परवानगी शिवाय कोणीही प्रकाशित करु शकत नाही. किंवा आमच्या परवानगी शिवाय कुठल्याही स्वरुपाय छापु शकत नाही .मला सांगा त्या लेखकाने तुम्हाला कॉपीराईट दिले तरच ते प्रकाशकाकडे असतात ना.मग ते कॉपीराईट जर लेखक यांचे वंशज म्हणुन आम्हाला घेयला काय करावे लागेल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s