German Grammar 2, German Language, x-All Tablets

जर्मन शिका मराठीतून:भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.


जर्मन भाषेच्या या भागात आपण जर्मन व्याकरणाची माहिती घेऊया.प्रथम आपण नामांची माहिती घेवू.

एकवचनी नाम तयार करणे:

आपण जसे इंगजी भाषेत नामाच्या अगोदर “a/an/the” वापरतो तसेच जर्मन भाषेत नामाच्या आधी नामाच्या लिंगवचनानुसार लिंगवाचक शब्द वापरले जातात.

स्त्रीलिंगी,पुल्लिंगी व नपुसकलिंगी नामानुसार नामाच्या अगोदर “The” च्या जागी “der/die/das” हे शब्द वापरतात.येथे “The” [“der/die/das] हे एकमेवाद्वितीय किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्ती वा वस्तूसाठी त्या नामाच्या आधी वापरतात.

आणि एक [a/an/one] साठी जर्मन भाषेत [ein/eine/ein] हे शब्द लिंग वचनानुसार वापरतात.

खालील तक्त्यात

इंगजीमध्ये

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

नपुसकलिंगी

The

Der

Die

Das

one, a, an

Ein

Eine

Ein


खालील तक्त्यामध्ये उदाहरणार्थ काही शब्द दिले आहेत.

जसे [The Brother] भाऊ हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे म्हणून त्या शब्दाच्या आधी der लावतात.याचा उच्चार ‘देअर\देर’असा होतो.त्यामुळे भाऊ यास जर्मन मध्ये der Bruder [The Brother] असे म्हणतात.याचा उच्चार “देर ब्रुदर“ असा होतो.

जसे [The sister] बहिण हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून त्या शब्दाच्या आधी die लावतात.याचा उच्चार ‘दी’असा होतो.त्यामुळे बहिण यास जर्मन मध्ये die Schwester [The sister] असे म्हणतात.याचा उच्चार “दी श्वेस्टर” असा होतो.

जर्मन भाषेमध्ये काही नामांमध्ये लिंग वाचनाचा काही फरक पडत नाही.

जसे लहान मुल [The child ] या शब्दावर लिंग वाचनाचा काही फरक पडत नाही. म्हणून त्या शब्दाच्या आधी das लावतात.याचा उच्चार ‘दास’असा होतो.त्यामुळे लहान मुल यास जर्मन मध्ये लहान मुल यास das Kind [The child] असे म्हणतात.याचा उच्चार “दास किंड” असा होतो.

आपण volkswagan गाडीच्या अँड मध्ये ‘दास ओटो’ हा शब्द वापरला गेल्याचे पहिले असेल.तो शब्द कसा तयार झाला ते तुम्हाला समजले असेलच.

लिंग वचनानुसार नामे:

पुल्लिंगी नाम

उच्चार

इंग्रजीमध्ये नाम

मराठीतून

der Bruder

देर ब्रुधर

The brother

भाऊ

der Cousin

देर कुझीन

The cousin

चुलत भाऊ

der Freund

देर फ्रोयंटt

The friend

मित्र

der Vater

देर फाथर

The father

वडील

ein Mann

आइन मान

One man

माणूस

ein Sohn

आइन झोह्न

One son

मुलगा

स्त्रीलिंगी नाम

उच्चार

इंग्रजीमध्ये नाम

मराठीतून

die Schwester

दी श्वेस्टर

The sister

बहिण

die Cousine

दी कोझीनूह

The cousin

चुलत बहिण

die Freundin

दी फ्रोय्न-डीन

The friend

मैत्रीण

die Mutter

दी मुटर

The mother

आई

eine Frau

आयनअ फ्राऊ

The woman

महिला

eine Tochter

आयनअ टोचहर

The daughter

मुलगी

नपुसकलिंगी नाम

उच्चार

इंग्रजीमध्ये नाम

मराठीतून

das Kind

दास  किंटt

The child

मुल

das Model

दास  मोह-डेल

The model

मोडेल

das Individuum

दास  इन्-दी-वी-डूम

The individual

वैयक्‍तिक

das Genie

दास जेनि

The genius

हुशार

जर्मन व्यवसाय व लिंग वचनानुसार बदल :

पुल्लिंगी व्यावसायिक आणि स्त्रीलिंगी व्यावसायिक यांचा उल्लेख करताना नामात थोडे बदल होतात.जसे मराठीत पुल्लिंगी शिक्षकास “शिक्षक” आणि स्त्रीलिंगी शिक्षकास “शिक्षिका” असे शब्द वापरतो तसेच जर्मन भाषेत पुल्लिंगी शिक्षकास ‘देअर लेहरुर(der Lehrer); आणि स्त्रीलिंगी शिक्षकास दी लेहररीन (die Lehrer in)असे नामांकन केले जाते.

सामान्यतः लक्षात ठेवण्यास सोपे तत्व असे कि पुल्लिंगी व्यवसायाच्या नामानंतर “इन्” in हा शब्द वापरून जर्मन स्त्रीलिंगी व्यवसायाचे नाव तयार करता येते.

खालील तक्त्या मध्ये काही व्यवसाय व त्यांची स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी रूपे दिली आहेत तसेच इंग्रजीतून उच्चाराची फोड करून प्रत्येक जर्मन शब्दाखाली दिली आहे.

पुल्लिंगी शब्द

स्त्रीलिंगी शब्द

इंग्रजीमध्ये अर्थ

मराठीतून अर्थ

der Lehrer
deyR ley-Ruhr

die Lehrer in
dee ley-Ruh-Rin

The teacher

शिक्षक,शिक्षिका

der Schüler
deyR sh üh-luhr

die Schüler in
dee sh üh-luh-Rin

The school
boy/girl

विद्यार्थी ,विद्यार्थिनी

der Arzt
deyR aRst

die Ärtzt in
dee äRts-tin

The doctor

डॉक्टर ,डॉक्टरीण

der Bauer
deyR bou-uhr

die Bäuer in
dee boy-eyE-in

The farmer

शेतकरी,शेतकरीण

der Löwe
deyR löh-wuh

die Löw in
dee löh-vin

The lion

सिंह,सिंहीण

या भागात आपण जर्मन भाषेत व्याकरण शिकला आहात.अभिनंदन!!

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

Click for Printed Edition of Book : जर्मन शिका मराठीतून : https://store.whitefalconpublishing.com/products/zatpat-german-shika-marathitun-learn-german-in-marathi?_pos=1&_sid=d0422adb1&_ss=r

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂

 

1 thought on “जर्मन शिका मराठीतून:भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s