German Language, German Questions, x-All Tablets

जर्मन शिका मराठीतून:भाग ५]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.


जर्मन भाषेमध्ये प्रश्न हे इंग्रजी भाषेतील “Wh-Question” सारखे वापरतात.यास जर्मन भाषेत W-Fragen (वे –फ्रागेन) असे म्हणतात. वाक्याच्या सुरवातीस हे शब्द वापरून प्रश्न विचारला जातो.

आपण पुढील देलेल्या तक्त्या मध्ये जर्मन प्रश्न विचारण्यास कोणते शब्द वापरतात याची माहिती घेवूया.

इंग्रजीतील Wh शब्द

जर्मन प्रश्नार्थक शब्द

जर्मन उच्चार

मराठी अर्थ

Who Wer वेह्-र कोण
What Was वास् काय
Why Warum व्हा-रूम का
When Wann व्हान कधी
Where Wo व्हो कोठे
How Wie वी कसे
How come Wieso वी-झो कश्या पद्धतीने
Where from Woher वो-हेअर कोठून/कधीपासून [वेळ दर्शक]
Where to Wohin वो-हीन कोठून [स्थळ दर्शक]
Which Welche वेलश्  कोणते
How long wie lange वी लांग् कधी पासून

आपण वरील टेबल वाचलयास आपणास सहजपणे जर्मनीत प्रश्न तयार करता येईल.

कोणी कधी जर्मन प्रश्न विचारल्यास प्रथम टेबल आठवून प्रश्नार्थक शब्दाचा अर्थ समजावून घेऊन मग वाक्याचा अर्थ सजवून घ्यावा.

तसेच आपण नाम व सहाय्यकारी क्रियापदे हा भाग नक्की वाचवा जेणेकरून आपणस प्रश्न तयार करणे सोपे जाईल.

आता आपण जर्मन प्रश्न कसा तयार करायचा ते पाहू.

  • मराठीतून प्रश्न: ते काय आहे?
  • इंग्रजीतून प्रश्न: What is this?
  • जर्मनमधून प्रश्न: Was ist das?
  • जर्मनमधून उच्चार :वास् इस्ट दास्?

आता आपणास विचारयचे असेल कि तू कोठून आलास तर इंगार्जीतून आपण ते असे विचारू “ Where are you come from?” तेच जर्मनीतून विचारायचे असल्यास “Woher komme sie?” त्याचा उच्चार “वो हेअर कोम्म झि ? असा होतो.

तुम्हाला जर कोणाला भेटल्यावर तू कसा आहेस [How are you ?]असे जर्मन मध्ये “Wie geth es Ihnen? “ [वी गेट अस् इहनन् ?]असे बोलले जाते.

आता तुम्ही जर्मन भाषेत प्रश्न विचारायचे शिकला आहात पुढील भागात आपण काही जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना शिकुयात.

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s