3G Technology, Technology, xDefinition

3G टेक्नोलॉजी म्हणजे काय?


३ G कसे काम करते ,3G मध्ये काय सुविधा आहेत,3G मध्ये काय सुविधा आहेतया  बद्दल परिपूर्ण व अद्यावत माहिती आपल्यालासाठी.

तिसऱ्या जनरेशनसाठीचे मोबाईल तंत्रज्ञान :[3G]

3G चा लॉंग फॉर्म 3rd generation mobile telecommunications असा आहे.हा नवा मोबाईल फोन standard आहे ,जो मोबाईल टेलिकम्युनिकेशन सर्विसेससाठी इंटरनेशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने ठरवून दिलेल्या इंटरनेशनल मोबाईल टेलिकम्युनिकेशन -2000 (IMT — 2000) नियमाप्रमाणे काम करतो,जी नियमावली 3G ला २ Gपासून वेगळेपण सिद्ध करण्यात मदत करते.

३G कसे काम करते?

3Gमध्ये व्हाईस व टेक्स्ट मेसेज जास्त वेगात पाठवण्याची सोय आहे, बरोबरच वेगवान इंटरनेट ,ऑनलाईन गेमींग, व्हाईस कॉल सारख्या सेवा आहेत.

३G च्या सर्व सोयीचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल हा 3G फोन असला पाहिजे.

3G फोन हा Quadruple Band असलेला व WCDMA सपोर्ट चा असतो..

3G हा GSM व CDMA तंत्रज्ञानाचा वापर करून व्हाईस व माहिती एकाच वेळी पाठवू शकतो.

3G फोन हे WiFi कींवा WLAN हे तंत्रज्ञान सुद्धा वापरतात ज्याद्वारे आपण WiFi हॉटस्पॉट ला कनेक्ट होऊ शकतो.

3G फोन सोपे कनेक्टींग व समोरासमोर बोलण्याचा आनंद मिळवून देते.

सध्या 3G फोन मध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे ,मोठी स्क्रीन ,टच स्क्रीन ,GPS सारख्याच नवीन आकर्षक सुविधा देण्यात येत आहेत.

Sony Ericsson, Samsung & Motorola ,Nokia सारख्या मोबाईल कंपन्यांनीही आपले 3G फोन बाजारात आणले आहेत.

हि जास्त वेगाने पसरणारी व लोकप्रिय होणारी सुविधा आहे.हि लवकरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल अशी अशा आहे.

3G मध्ये काय सुविधा आहेत ?

प्रमुखाने टेलिफोन,मोबाईल इंटरनेट ,व्हाईस कॉल ,मोबाईल TV ,यासारख्या सोई पुरवतो.

हे सर्व शक्य झाले आहे जलद अश्या 3G वायरलेस तंत्रज्ञानामुळे-

जास्त bandwidth व जलदगती ट्रान्समिशन वेग, जवळपास 3 Mbps,  2G फोन जास्तीत जास्त 144Kbpsपर्यन्तं वेग मिळवू शकतो.

यात जलदगती ट्रान्समिशन व अद्ययावत मल्टीमीडिया ,ग्लोबल रोमींग इत्यादी भरपूर काही.

3G हि प्रामुख्याने मोबाईल फोन ,tablet,pc मध्ये वापरून आपला फोन इंटरनेट व इतर नेटवर्क ला जोडून व्हाईस कॉल करणे,डाऊनलोड करणे,डाटा अपलोडिंग साठी व इतर इंटरनेटवापरासाठी होतो,ई-मेल मेसेज ,इंटरनेटवर व्हिडिओ पाहणे इत्यादी गोष्टी करू शकतो .

3G मल्टीतस्किंग करण्यास मदत करतो म्हणजेच फोने करतानाही आपले डाऊनलोड चालू राहील

तसेचGSM व GPS चा वापर करून map व ट्राफीक अपडेट्स पाहू  शकतो.

इतिहास:

1G:सेल्युलर मोबाईल सर्वीसेस हि सर्वात आधी analogue रेडिओ टेक्नोलॉजी वापरात होते,तीच फर्स्ट जनरेशन सिस्टिम (1G) असे मानले जाते.

2G:त्यानंतर Analogue रेडिओ टेक्नोलॉजी नेटवर्क हे डीजीटल नेटवर्कमध्ये रुपांतरीत झाले त्यास 2G असे संबोधले जाते.हे रुपांतरण१९९०च्या दशकात झाले.

3G:त्यानंतर 2G तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणात पसरले गेलेल्या व अधिक चांगल्या सोई जास्त वेग व संपूर्ण सुधारीत आवृत्तीस 3G म्हणता येईल.

3G मध्ये काय सुधारलेले आहे.

 • जास्तच वेग Several times higher data speed.
 • सुधारीत ऑडिओ व व्हिडीओ streaming.
 • व्हिडीओ कॉन्फरन्स साठी सपोर्ट .
 • जास्त वेगवान वेब व WAP browsing.
 • IPTV (TV इंटरनेटवर) साठी सपोर्ट.

3G तांत्रिकि  माहिती:

 • 3G तंत्रज्ञान हे GSM तंत्रज्ञाना प्रमाणेच packet switch पद्धतीने माहिती पुरवतो पण तेही GSM पेक्षा जास्त चांगल्याच पद्धतीने व वाढीव bandwidth बरोबर.
 • 3G तंत्रज्ञान हे TDMA व CDMA तंत्रज्ञानाचा वापर करतो.
 • 3G तंत्रज्ञान हे फार flexible आहे कारण ते ५ मुख्य रेडिओ टेक्नॉलॉजीत वापरू शकतो.
 • CDMA, TDMA व  FDMA तसेच CDMA -IMT-DS (direct spread), IMT-MC (multi carrier) हे पाच प्रकार आहेत.
 • जास्तीत जास्त माहिती पुरवठाचा वेग 200 k बीट्स प्रती सेकंद
 • नेहमी जवळपास वेग 64 K बीट्स प्रती सेकंद इतका मिळू शकतो.
 • 3G माहिती डाऊनलोड चा वेग १४ मेगा बीट्स प्रती सेकंद.
 • माहिती उपलोड चा वेग ५.८ मेगा बीट्स प्रती सेकंद.
 • माहिती पाठवण्याचा  वेगहा 9.5K पासून ते  2M बीट्स प्रती सेकंद इतका आहे.
 • यासाठी 15-20 MHz इतकी bandwidth लागते.

भारतात ३ G सेवा :

सन २००८ मध्ये भारत ३ G च्या युगात दाखल झाला.सरकारी भारत संचार निगमच्या माध्यमातून भारतात ३ G मोबाईल व डाटा सर्विसेस याची पायाभरणी झाली.

नंतर MTNL नि दिल्ली व मुंबईत ३ G सेवा सुरु केली.नंतर सध्या अनेक खाजगी कंपन्याही या सेवा क्षेत्रात उतरल्या आहेत.त्या मुळे भारतात ३ G चा प्रसार वेगाने होत आहे.

व्यापारी करारानुसार 3G हि सुविधा अधिकाधिक लोकांनी वापरण्यासाठी कमीत कमी व परवडणारया किमतीत देण्यात येणार आहे.

3G  उद्योजकांचे उदिष्ट हे जास्त कॉव्हरेज देणे व जास्त ग्राहक वाढ तीही कमीत कमी खर्चत असे आहे.

आपणास आपले सर्वीस प्रोव्हायडर कडे 3G साठी मागणी करावी लागेल.आपले मोबाईल हे सीम कार्ड चं मदतीने ३ G सेवेस जोडले जाईल.

३ G साठी आपला फोन 3G साठी चालणारा आहे का याची जरूर काह्त्री करून मगच आपला नवीन फोन घ्या.

३ G चे मुख्य उपयोग:

 • मोबाईल TV – ३ G चे सर्वीस प्रोव्हायडर हे TV चेनेल आपल्या मोबाईल फोने मध्ये डायरेक्ट पाहण्याचीही सुविधा.
 • डिमान्ड नुसार व्हिडिओ – ३ G चे सर्वीस प्रोव्हायडर हे आपल्या फोने वर मुव्ही पाठवून देतील.
 • व्हिडिओ कॉन्फरन्स–आपण एकमेकांशी बोलताना एकमेकांना पाहूही शकतो.
 • टेली -मेडीसिन– मेडीकल विक्रेते आता दूर राहणाऱ्या रुग्णांना उपचार मार्गदर्शन करू शकतो.
 • स्थळ दर्शक सर्वीस– याद्वारे आपणास वातावरण,ट्राफिक बद्दल माहिती फोनवर कळू शकते.तसेच यातील सुविधेमुळे आपण आपले बिझनेस व मित्रांना शोधून काढू शकतो.

2G,2.5G,3G मधील प्रमुख फरक:

2G वायरलेस
सध्याच्या मोबाईल फोन मध्ये हिच टेक्नोलॉजी आहे. सुविधा :
– फोन कॉल
– व्हाईस मेल
– साधे इमेल मेसेजवेग: 10kb/sec3मिनिटाचे MP3 गाणे डाऊनलोड करण्यास लागणारा वेग:
31-41 मिनिट
2.5G वायरलेस
हि नवीन टेक्नोलॉजी सध्या मोबाईल फोन साठी उपलब्द्ध झाली आहे. सुविधा:
– फोन कॉल
– व्हाईस मेल
– मोठे इमेल मेसेज
– वेब सुविधा
– नकाशे
– नवीन अपडेटसवेग: 64-144kb/sec3मिनिटाचे MP3 गाणे डाऊनलोड करण्यास लागणारा वेग:
6-9 मिनिट
3G वायरलेस
यामध्ये मोबाईल,ल्यापटॉप ,पी.सी,टीव्ही मधील सर्व सुविधा आहेत.सुविधा:
– फोन कॉल
– व्हाईस मेल
– मोठ्या इमेल मेसेजची देवाणघेवाण
– वेगवान वेब सुविधा
– नकाशे
-व्हिडिओ कॉन्फरन्स- ग्लोबल रोमींग
– टीव्ही ची सुविधा
-व्हिडिओ कॉन्फरन्सवेग: 144kb/sec-2mb/sec

3मिनिटाचे MP3 गाणे डाऊनलोड करण्यास लागणारा वेग:
11सेकंद ते 1.5 मिनिट

….3G टेक्नॉलॉजी रुपांतर करतो तुमच्या मोबाईल चे मिनी कॉम्पुटरमध्ये –उच्च दर्जेदार व्हिडिओ पाहणे,TV पाहणे,चांगले उच्च दर्जाचे फोटो पाहणे,जास्त मोठी फाईल्स ट्रान्सफर करणे.. अगदी सहज शक्य!!

..मग वाट कसली बघताय ..आताच आपला मोबाईल ३ G करून घ्या. 🙂

2 thoughts on “3G टेक्नोलॉजी म्हणजे काय?”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s