LG, x-All Tablets

‘LG G-Slate’-3D व्हिडीओ पाहण्याच्या व 3D रेकॉर्डिंगच्या अनोख्या सुविधांबरोबर आलेली Android 3.0 असलेली Tablet.


‘3D व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी खास जलदगती प्रोसेसर व Tablet साठी बनवलेली Android3.0 हि खास ऑपरेटिंग सिस्टिम …बरोबरच T-mobile सारख्या नावाजलेल्या नेटवर्कला घेवून आली आहे…LG G-Slate

G-slate च्या उद्घाटन समारंभावेळी LG व T-Mobile चे प्रतिनिधी.

LG आणि  T-Mobile यांच्या संयुक्तिक प्रयत्नातूनच साकारलेले LG-G-Slate हे अनोखे Tablet!!

CES11 व मोबिइल वर्ल्ड कॉन्फरन्स मध्ये हि Tablet प्रथमतः प्रदर्शित करण्यात आले.

या tablet चे वैशिठय म्हणजे हि जगातील 3D कॅमेरयाची सोय असलेली पहिलीच Tablet आहे.

त्यासाठी 8.9 इंचाची Multi-touch व 3D सपोर्ट असलेली स्क्रीन आहे.

ती Tablet स्क्रीन capacitive टचस्क्रीन व LCD डिस्प्ले वाली आहे.

३D तंत्रज्ञान:

या 4G व Android 3.0 असलेल्या Tablet मुळेआपणास 3D व फुल्ल HD व्हिडीओ काढू ,पाहू व शेअर करण्याचा आनंद घेवू शकतो.

हि पहिलीच Tablet आहे ज्यामध्ये 3D च्या सर्व संलग्न सोई पुरवण्यात आल्या आहेत.

जसे कि अंतर्गतच 3D ला सपोर्ट .

3D वापरण्यासाठी स्वतःचा 3D व्हिडिओ काढून शेअर करण्यची सुविधा.

3D HD व्हिडिओ tabletवरच पाहण्याचीही सुविधा.

या Tablet साठी 3D ग्राफिक्स हे हार्डवेअर वरून गतिमानता देण्यात आली आहे.

याच्या डिस्प्ले वर आपण रेकॉर्डिंग केलेले वा डाऊनलोड केलेले व्हिडिओ पाहून मजा घेऊ शकतो.

कॅमेर्‍याची खासियत:

याची  आणखीन एक वैशिठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे यास एकूण ३ कॅमेरे आहेत.

३ D शूट करण्यासाठी २ कॅमेरे.

मागील बाजूस ३ D शूट करण्यासाठी २ कॅमेरे आहेत.

ज्या द्वारे आपण 1080p इतक्या उच्य दर्जेदार ३ D व्हिडिओ घेवू शकतो.

तसेच 5 मेगापिक्सेल चा LED flash असलेला कॅमेरा फोटो काढण्यासाठी उपुयक्त आहे.

कॅमेर्‍यात डीजीटल झूम ची सोय.

पुढील बाजूस व्हिडिओ कॉन्फरन्स साठी 2 मेगापिक्सेल चा कॅमेरा आहे.

नेटवर्क विशेष:

T-Mobile या जलदगती व अमेरिकेतील सर्वात मोठ्या 4G Network™ चा सपोर्ट असलेले हे tablet आहे.

T-Mobileचे HSPA नेटवर्क  कींवा Wi-Fi व  Google Talk™ ची सोय.

GSM – UMTS  नेटवर्क  सपोर्ट .

WiFi LAN,Wi-Fi 802.11b/g/n कनेक्टिव्हिटी .

2 कोअरचा processor:

LG-G-Slate वर चालणारा 3D व्हिडिओ.

ज्याद्वारे वेब browsing ची मजा घेवू शकतो.

तसेच Adobe® Flash® प्लेयर चा सपोर्ट आहे.

दोन कोअर असलेल्या Tegra2 processor मुळे multitasking व गेमिंग चा खरा आनंद मिळतो.

तसेच  gyroscope आणि accelerometer या सेन्सॉरने गेमची अजूनच मजा मिळते.

2592 x 1944 पिक्सलचे डिस्प्ले resolution.

MP3, AAC, AAC+, AMR साठी ऑडीओ सपोर्ट

MP4, H.263, H.264साठी  व्हिडिओ सपोर्ट.

अधिक काळ टिकणारी Battery.

रचनात्मकता :

या tablet ची रचना हि अतिशय स्टायलीश आहे.

काळ्या रंगाचे वापरण्यास सुलभ असे कव्हर.

आकर्षक कर्व केलेले कॉर्नर्स.त्यामुळे tablet व्यवस्थित्त वापरता येते.

सोफ्टवेअर विशेष:

हि  Android Tablet Java ला  सपोर्ट करते.

यामध्ये 32GB डाटा स्टोरेज ची सोय आहे.

यामध्ये Facebook, Picasa, Twitter, and Youtube सारखी Application सुरवातीलाच दिली आहेत .

Email, MMS, SMS सुविधा तसेच Instant मेसिजिंग ची सुविधा.

GPS बरोबर A-GPS चा सपोर्ट.गुगल Ebooks व मासिक वाचनाची सोय.

Gmailच्या वापरासाठीही खास बदल केले आहेत.व्हिडिओ कॉल व chat ची मजा.

एवढेच नाही तर 3D viewअसलेला गुगल  maps हि सोबतीला आहे.

आता या Tablet सोबत Need for Speed Shift हा गेम, T-Mobile TV व  Zinio eReader हे तीन नवीन apps T-mobile तर्फेच सुरवातीपासून लोड करून देण्यात येणार आहेत.

कनेक्टरच्या सोई:

यात HDMI out ची सोय आहे.

ज्याद्वारे आपण आपली tablet हि HD TV ला कनेक्ट करून TV वर 3D व्हिडिओ पाहू शकतो.

[HDMI बद्दल अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा.]

तसेच 3.5 mm universal audio jack हे ऑडीओ कनेक्शन साठी देण्यात आले आहे.

Micro SD, SDHC मेमरी कार्ड्सचा सपोर्ट .

Hi-speed USB v2.0 पोर्ट इतके सर्व पोर्ट दिलेले आहेत.

किमतीबाबत :

G-slate Tablet एप्रिलमध्ये लौंच होईल.

याची किमत कंपनीने अजून जाहीर केली नाही.

तरी T-Moblie च्या कॉन्ट्रक्‍ट सोबत ती आपणास 529$(~24000रु)इतक्यात खरेदी करता येईल.

[T-mobile बरोबर खरेदीसाठीच्या अधिक माहिती साठी येथे टिचकी मारा.]

G-Slate Tablet बाबत अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा!

मग साक्षीदार बना मजेशीर व नवीनतम अश्या 3D तंत्रज्ञानाच्या आनंदाचे.. 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s