महिनाः एफ वाय

HDMI म्हणजे काय? व HDMI Port चा Tablet मध्ये उपयोग काय?


Tablet PC  हा HDMI Portसह म्हणजेच जबरदस्त मजा !


HDMI + Tablet PC बद्दल माहिती :

आज काल प्रदर्शित झालेल्या बहुतांशी सर्वच Tablets ला HDMI portची सुविधा देण्यात आली आहे.

हे HDMI port म्हणजे नक्की काय… आणि आपल्याला त्याचा उपयोग काय हा प्रश्न आपल्यालापडला असेलच.

त्याची उकल शोधण्यासाठी हा खास लेख..

पहिली गोष्ट HDMI चा लोंग फॉर्म आहे->(High-Definition Multimedia Interface).

HDMI हे ऑडिओ व व्हिडिओ digital रुपात पाठवण्यासाठी छोट्या स्वरूपात केलेला interface connector आहे.

हा एक digital format मध्ये Digital audio/video data send करण्याचा standard interface आहे.

HDMI port चा उपयोग:- set-top boxes, DVD players, HD DVD players, Blu-ray Disc players,  camcorders, personal computers(PCs), video game consoles आणि Tablets मध्ये केला जातो.

HDMI चा वापर करून आपण अतिशय उच्च दर्जाचे ( 720p60 and 1080i60) व्हिडिओ पाहू शकतो.

तांत्रिकदृष्ट्या:


 • ऑडिओ सिग्नल:- LPCM, Dolby Digital, DTS, DVD-Audio, Super Audio CD, Dolby Digital Plus, DTS-HD High Resolution Audio, DTS-HD Master Audio. इत्यादी..
 • व्हिडिओ सिग्नल:- 480i, 480p, 576i, 576p, 720p, 1080i, 1080p,1440p, 1600p, 2160p,  इत्यादी..
 • Bandwidth : 10.2 Gbit/s (340 MHz)
 • Protocol: TMDS
 • Pins:19
 • प्रमुख उत्पादक: Hitachi, Panasonic, Philips, Sony, Toshiba, Thomson आणि Silicone Image.

फायदे HDMIचे:

 1. सेटउप करण्यास एकदम सोपे.
 2. ५ m ते २० m पर्यंत wire connection करू शकतो.
 3. Blu-Ray बघण्यासाठी उत्तम.
 4. Piracyस प्रतिबंध करण्यास मदत करतो.
 5. 19 wires एकाच cable मध्ये.
 6. LCD किंवा plasma screen असेल तर व्हीडीओ बघण्याचा अत्यानंद…
 7. Connector चा लहान size हा याचा फायदा.
 8. 24-bit ते 48-bit color depth
 9. DVI पेक्ष्या कितीतरी पटीने जलद.
 10. सर्वात नवीन Digital data transfer technology यात वापरली आहे.

Tabletमध्ये HDMI का?

 • Tabletमध्ये HDMI port चा वापर करून आपणास आपली Tablet आपल्या TV किंवा Monitor  ला connect करू शकतो.
 • याद्वारे आपण Tablet मधील HD व्हिडीओ TV च्या मोठ्या Display वर पाहू शकतो.
 • TV वर youtube चे व्हिडीओ पाहू शकतो.
 • TV वर High Levelचे गेम खेळू शकतो.
 • Tabletमधील सर्व गाणी ,फोटो मोठ्या screen वर ऐकू व पाहू शकतो.
 • आणि अप्रतिम HD video आणि Audio चा आनंद घेवू शकतो.

मग नवी Tablet घेताना HDMI port वालीच Tablet जरूर घ्या आणि HD video बघाण्याची मजा घ्या घरच्या TV वर… 🙂

Advertisements

Android OS म्हणजे काय ?


Android OS म्हणजे काय ?

Android OS म्हणजे काय ?

Android म्हणजे नक्कीच फोन नाही वा कॉम्पुटर नाही…

Android हा एक Moblie साठी बनलेला एक सॉफ्टवेअर चा platform आहे.

आपला mobile हा कोणत्या ना कोणत्या तरी OS वर चालत असतो.जसे Nokia N97 हा Symbian os वर चालतो,Samsung Omnia हा विन्डोव्स mobile osवर चालतो,तर iPhone-हा i os वर चालतो.

या पुढील बरेच Mobile ,Tablet Android नावाची नवीन OS वापरतील…एव्हाना बरेचे mobile बाजारातही आले असतील..

Androidचे उपयोग :

 • या मध्ये mobile साठी लागणारी Applications सोफ्टवेअर मधेच आहेत.
 • Android हि  ओपन सोर्स आहे.
 • Android हि open आहे.(कोणीिहे या platform मध्ये Development करू शकतो.)
 • हि os “Open Handset Alliance” नावाची संस्था चालवते.
 • यामध्ये प्रामुख्याने गुगलचा पुढकार आहे.
 • यात T-Mobile,Vadafone यासारख्या Mobile कंपनी आहेत,e-buy,Esmetec,Sasken सारख्या सोफ्टवेअर कंपनी आहेत.
 • Intel,Nvidia,ARM सारख्याprocessor च्या कंपनी आहेत.
 • LG,Motorola,Samsung,Asus,Acer,sony सारख्या Mobileच्या कंपनी आहेत.
 • मग गुणवत्तेची आणि सुविधाची हमखास हमी..
 • लक्षात ठेवा…..Android हि जगतील सर्वात जलद वेगाने वाढणारी OSआहे.

तांत्रिकदृष्ट्या:

*हा  JAVA बेस फोन आहे.

[Android uses the Dalvik virtual machine with just-in-time compilation to run Dalvik dex-code (Dalvik Executable), which is usually translated from Java bytecode.]

*याचा बेस Linux os आहे.

*यामध्ये Integrated browser आहे.

*Hardware acceleration व 2D,3D साठी graphics optimization.

*GSM Technology support सुद्धा आहे.

*SQLite चा वापर data storage साठी केला जातो.

*मीडिया,वेब,३D साठी खास libraries.

*XML चा वापर करून UI हा os शी संवाद साधतो.

*म्हणूनच हि OS सहजपणे हाताल्ण्याजोगी व भरपूरच सुविधांनीयुक्त आहे.

नक्की काय आहे Android मध्ये..

Email ची सुविधा ,SMS,calendar,नकाशे,browser,contact या सारख्या अनेक सुविधा या OS सोबतच मिळतील.

१०००० हून जास्त Application-Android Store मध्ये उपलब्ध..

यास Multi Touch चा support आहे.Bluetoot,wiFi,Adobe Flash सोबतीला..इत्यादी Applicationला व इतर सर्वांना कमी battery मध्ये एकदम सुरल रीतीने चलावतो.

Android OS चे प्रकार:

 1. Android 1.5 (Cupcake) हे Android चे सुरवातीचे version आहे.
 2. Android 1.6 (Donut) यात Voice Search,कॅमेराची सुविधा Add करण्यात आली.
 3. Android 2.0/2.1 (Eclair) यात HTML5,Digital Zoom add केले आहे.
 4. Android 2.2 (Froyo) यात Adobe Flash 10.1 wifi ला support देण्यात आला.
 5. Android 2.3 (Gingerbread) यात power management,व gyroscopes सारख्या sensor ला support देण्यात आला.
 6. Android 3.0 (Honeycomb)– हे Tablet साठी बनविलेले खास version आहे.यात Google Maps 5 व 3D तंत्रज्ञानाचा वापरासाठी योग्य बदल केले आहेत.
 7. Android 4.0 (Ice Cream Sandwich)– यात एकच अप्लिकेशन व ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल व Tablet दोन्ही साठी वापरता येते.
 8. Android 4.1 (Jelly Bean)-यात गुगल नाऊ,ऑफलाइन व्होईस टायपिंग व स्मुथ रीस्पोंससाठीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
 9. Android 4.4  (KitKat)-यात स्क्रीन रेकोर्डिंग ,सुधारित नोटिफिकेशन पर्याय व चांगला परफॉर्मन्स देण्यात आला आहे.
 10. Android 5.0 (Lollipop) यात नवीन मटेरियल डिझाईन आहे तसेच स्पीड वाढ व बँटरी बचतीबाबत सुधारणा दिल्या आहेत.
 11. Android 6.0 (Marshmallow) यु एस बी सी साठी सपोर्ट ,फिंगर प्रिंट ,४के सपोर्ट,बँटरी बचतीबाबत द्रोझ मोड  आहे.
 12. Android 7.0 (Nougat)व्ही आर सपोर्ट ,मल्टी विंडो सपोर्ट देण्यात आला आहेत.

Androidच का?-

तुमचा फोन वा Tablet शक्तिशाली व भरपूर सुविधा देणारी तरीही कमीत कमी battery वापरणारी हवी आहे ना!!!

Android ची Official website:

http://www.android.com/ [यावर टिचकी मारा व पोहचा Android च्या घरात..]

Androidबद्दल काहीही शंका असतील तर जरूर कळवा…मी आहेच मदतीला.. 🙂

‘Notion Ink Adam Tablet’ भारतीय कंपनीचा करिष्मा….


‘Notion Ink Adam Tablet’ भारतीय कंपनीचा करिष्मा….

Adamहे Notin Ink या भारतीय कंपनीचे पहिलेच आणि दर्जेदार Tablet आहे.

या Tablet साठी IITan’s च्या या कंपनीने ३ वर्षे संशोधन व नवीनतम शोधकार्य केले आहे.

संपूर्ण जगासाठी Ipad च्या तोलामोलाचा हा भारतीय अविष्कार आहे.

भारतीय संशोधन,कमी किंमत व नवनवीन तंत्रज्ञान हे विशेष..

विशेष काय?

 • सूर्यप्रकाशानुसार स्वतःला बदलणारा Pixel Qi Display.
 • या display मुळे आपणास प्रखर सूर्य प्रकाशातही Tablet वरील content स्पष्टपणे पाहण्यास मदत होते.
 • तसेच हा कमी Battery वर चालणारा पण उत्कृष्ट quality देणारा display आहे.
 • color व black/white दोन्ही display setting ची सुविधा.
 • NVIDIA चा Tegra2 processor जो देईल जबरदस्त Power कमी Battery वापरून.
 • 185 Degreeत कुठेही फिरवता येवू शकणारा कॅमेरा..(हि सुविधा दुसऱ्या कोणत्याही tablet ला नाही.)
 • HDMI Poerमुळे 1080p video TV वर बघता येणार तेही Tablet वापरून.
 • wiFi,3G,Bluetooth तर आहेच सोबतीला..
 • Connection करण्यासाठी 2 USB व MiniUSB,microSD सारखी ports देण्यात आले आहेत.
 • Adobe Air आणि  Flash सुद्धा याला support करतात.
 • 1GB of RAM.
 • यास Adamची custom hybrid version OS आहे.जी  Android Gingerbread आणि  Honeycomb यांचा संगम आहे….
 • Adam चे स्वतःचे custom software आहे.

*Notion Ink Adam Table याच्या किमती configuration वर अवलंबून आहेत.

• Adam Tablet LCD display  च्याबरोबर व Wi-Fi सोबत.- अंदाजे किंमत $399 (~18,000 रु.).
• Adam Tablet LCD display  च्याबरोबर व 3G (+ Wi-Fi) सोबत– अंदाजे किंमत$449 (~20,000 रु).
• Adam Tablet Pixel Qi display  च्याबरोबर व Wi-Fi सोबतअंदाजे किंमत $449 (~20,000 रु.).
• Adam tablet Pixel Qi display  च्याबरोबर, 3G व Wi-Fi सोबतअंदाजे किंमत $498(~22,500 रु.).

 • Notion Ink कंपनी Tablet ची किंमत अजून हि कमी करण्याच्या विचारात आहे..

 • Stereo loudspeakers  आणि microphone यातसमाविष्ट आहे.

[Notion INk च्या Official साईटवरभेट देण्यासाठी येथे टिचकी मारा.]

अधिक माहीतीसाठी नक्की पहा-


..मग आजच Book करा..Pixel Qi display असलेली जगातील पहिली Tablet… 🙂