Information

C# डॉट नेट मधून विंडोज युजर इंटरफेस असणारे फॉर्म बेस्ड अँप्लिकेशन तयार करणे.


C# डॉट नेट मधून विंडोज युजर इंटरफेस असणारे अप्लिकेशन तयार करणे.

आपण या भागात C# डॉट नेट या प्रोग्रामिंग भाषेतून डॉट नेट फ्रेमवर्कवर आधारित उपयुक्त असे फॉर्म बेस्ड अँप्लिकेशन कसे करावे ते पाहणार आहोत.

यासाठी आपण प्रथम डॉट नेट फ्रेमवर्क व सी शार्प ची महिती घेऊन एक एक स्टेप्स पाहून.

प्रथम युजर इंटरफेस डिझाईन करून प्रोग्रामिंग कसे करावे ते पाहणार आहोत.तसेच या भागात आपण तयार झालेला प्रोग्रम रन व डीबग कसा करावा हे ही शिकणार आहोत.

.. मग चला करुया सुरवात….

डॉट नेट फ्रेमवर्क :

डॉटनेट हा मायक्रोसॉफ्टने तयार  केलेला प्लँटफॉर्म आहे जो एक सोफ्टवेअर पार्ट आहे ज्यामध्ये नेहमीच्या कोडिंग प्रोब्लेम्स वर सोल्युशन म्हणून प्री कोडेड लायब्ररीचा संच दिलेला आहे.

डॉट नेट फ्रेमवर्क मध्ये कॉमन लँन्ग्वेज रन टाईम ,सिक्युरिटी,मेमरी मँनेजमेंट ,एक्सेप्शन हँण्दलींग अशा सुविधा लायब्ररी च्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.

प्रोग्रामिंग हे एक प्रमाणबद्ध व रचनात्मक रीतीने साकारण्यासाठी डॉट नेट मोलाची भूमिका निभावते.

यात C#.J#,VB यांसारख्या प्रोग्रामिंग भाषांचा समावेश होतो.

विंडोज अँप्लिकेशन तयार करण्यासाठी डॉट नेट फ्रेमवर्क मध्ये आपणस प्रोग्रम लिहावा लागतो.तसेच आपल्या सिस्टीम वर डॉट नेट फ्रेमवर्क इन्स्टॉल असणे गरजेचे बनते.

C # :[c -sharp]

सी शार्प ही डॉट नेट फ्रेमवर्क वर आधारित टाईप सेफ,ऑब्जेक्ट ओरियेंटेड शिकण्यास सोपी व प्रगत अशी प्रोग्रामिंग भाषा आहे.

ही C++ च्या नंतर ची प्रगत अशी प्रोग्रामिंग भाषा मानली जाते त्यामुळे त्याचे चिन्ह # हे चार + चिन्हांनी जोडलेले गेलेले असे दाखवण्यात आले आहे.

ही डॉट नेट फ्रेमवर्क वर आधरित प्रोग्रामिंग ची भाषा आहे ज्याचा वापर करून आपण फॉर्म बेस्ड विन्डो तयार करणर आहोत.

तसेच त्या विन्डो द्वारे इन्स्टॉलेशन टूल  कसे करावे हे अप्लिकेशन पाहणार आहोत.

रिक्वायरमेंट :

आपण या भागात एक विंडोज फॉर्म बेस्ड टूल कसे बनवावे ते शिकणार आहोत .आपणस असे टूल बनवायचे आहे ज्याचा वापर इन्स्टॉलेशनसाठी केला जाईल.

कसे असेल टूल : या टूल मध्ये आपली जी सेटअप फाईल असेल त्याचे फोल्डर लोकेशन मोकळ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये देवू  व सायलेंट इन्स्टॉल किंवा अन इंस्टॉल करताना देण्यात येणारी पँरामिटर ड्रॉप डाऊन बॉक्स मधून सिलेक्ट करू.

आपण जो पर्याय निवडू याबरोबर त्या प्रकारच्या इन्स्टॉलेशन ची महितीही  खाली दर्शविली गेली पाहिजे अशी सुविधा देण्यात यावी.

आपण रन हे बटन दाबल्यावर प्रोसेस स्टार्ट व्हावी. जर प्रोसेस स्टार्ट झाली नसेल तर एरर मेसेज दाखवावा.

युजर इंटर फेस डिझाईन :

आता आपण टूल चे ग्राहकाला अनुसरून डिझाईन कसे तयार करावे याचा विचार करुया.

आपल्या टूल साठी आपण एक विन्डो फॉर्म तयार करावा लागेल.

त्या विन्डो मध्ये आपणस सर्वात आधी देण्यात येणारी महिती म्हणजे फोल्डर पाथ यासाठी टेक्स्ट बॉक्स द्यावा.

त्या नंतर ड्रॉप डाऊन बॉक्स व त्याच्या खाली प्रोग्रम रन करण्यासाठी बटन द्यावे.

शेवटी महिती दर्शक लेबल कोठे कोठे द्याचे ते  ठरवून कागदावर एक ले आउट तयार करणे.

त्यानुसार आपणस हवे ते कोम्पोनंट टूल बार मधून घेणे व आपले युजर इंटरफेस डिझाईन तयार करावे.

या पुढे आपण आता मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ मार्फेत  प्रोग्रम व युजर इंटरफेस कसा लिहावा ते पाहणार आहोत.

प्रोग्रामिंग प्रोसेस :

प्रथम आपण आपल्या कॉम्प्युटर वर मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल करावे.

मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल   व डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर टिचकी मारा.->मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल

आता आपण आपला प्रोग्रम व्हिज्युअल स्टुडिओ C # एन्व्हायर्नमेंट मध्ये लिहिणार आहोत असे अँप्लिकेशन लौंच झाल्यावर  सेट करावे.

आता आपण अँप्लिकेशन कन्सोल बेस्ड किंवा फॉर्म  बेस्ड करू शकतो .कन्सोल बेस्ड  म्हणजे यात युजर इंटरफेस विन्डो दिसत नाही कमांड प्रोम्न्ट च्या माध्यमातून प्रोग्रम रन होतो. आणि फॉर्म बेस्ड अप्लिकेशन मध्ये आपणस युजर इंटरफेस विन्डो दिसते व त्या माध्यमातून युजर अप्लिकेशन वापरू शकतो.

आता आपल्या प्रोग्रम साठी आपण प्रथम न्यू या पर्यायामध्ये जाऊन विंडोज फॉर्म अप्लिकेश हा पर्याय निवडूया.तसेच आपल्या प्रोजेक्ट ला आपण नाव ही देवू शकता.

C# new windows form

युजर इंटरफेस सेटिंग्ज :

आता आपणस हवी असेलेले एक बटन डाव्या बाजूच्या टूल बॉक्स मधून घेणे जर टूल बॉक्स दिसत नसेल तर व्ह्यू मध्ये जावून टूल बॉक्स सिलेक्ट करणे.

आता बटणावर राईट क्लिक करून प्रोपर्ती सिलेक्ट करणे त्या मध्ये बटणावर पारदर्शित करणारे टेक्स्ट हे काय असावे याची महिती टेक्स्ट या टेब समोर भरावी.

तसेच आपण फोन्ट ,रंग,व इतर सेटिंग या मधून करू शकतो. तसेच name मध्ये जाऊन आपल्या बटणाचे प्रोग्रम मधील नाव काय असेल याची महिती घेवू  शकतो. उदा: button 1.

बटणाची सेटिंग पुर्ण झाल्यावर ओक म्हणून प्रोपर्ती मधून बाहेर पडणे आता आपण विन्डोवर जेथे बटन ठेवले आहे तेथे जावून बटणावर डबल क्लिक करणे यामुळे डिझाईन विन्डो मधून आपण प्रोग्रम विंडोत जातो [frm1.cs]

व बटन प्रेस झाल्यावर काय होणे अपेषित आहेत याचा प्रोग्रम लिहिणे.

युजर इंटरफेस ऑप्शन

युजर इंटरफेस ऑप्शन

तो भाग झाल्यावर परत डिझाईन विन्डो वर येवून कोम्बो बॉक्स [ड्रॉप डाऊन बॉक्स] टेक्स्ट बॉक्स ही टूल बर मधून उचलून फॉर्म वर ठेवणे.

तसेच आपणस जेथे काही नावे हवी आहेत तेथे लेबल लावणे व लेबलच्या प्रोपर्ती मध्ये जावून तेथे काय दाखवायचे आहे ते डिस्प्ले करणे.

आता आपणस ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये काय काय दिसायला पाहिजे ते पहायचे असल्यास पुढील छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे एडीट आयटम  वर क्लिक करून येणाऱ्या बॉक्स मध्ये प्रत्येक ओळीला नवीन आयटम पँरामिटर म्हणून अँड करणे.

ज्याचा वापर ई एक्स सी ला कोणते पँरामिटर पाठवायचे ते ठरवण्यास होईल.

ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये डाटा टाकणे

ड्रॉप डाऊन बॉक्स मध्ये डाटा टाकणे

नोंद : आपण दिलेल्या टेक्स्ट बॉक्स , कॉम्बो बॉक्स व विन्डो यांचा साई झ आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो त्यासाठी त्यावर क्लिक करून कोपर्यात येणाऱ्या डॉट टेब चा वापर करून रीसाईझ करणे.

आता आपल्या फायनल अप्लीकेशन विन्डोला नाव व आयकॉन देण्यासाठी फॉर्म च्या विन्डो वर राईट क्लिक करून प्रोपर्ती मध्ये जाणे व टेक्स्ट मद्य एजून विन्डो ला नाव देणे.

आपण आयकॉन बदलणार असो तर आयकॉन टेब मध्ये जाऊन आपण डाऊनलोड केलेला आयकॉन ब्राऊज करून ते चित्र सिलेक्ट करून सेट करावे.

आता प्रोग्रम मध्ये जाऊन आपणस हवा तास प्रोग्रम लिहिणे यासाठी

अशा रीतीने आपले विंडोज फॉर्म बेस्ड अप्लिकेशन तयार झालेले आहे.

C # विंडोज फॉर्म बेस्ड अप्लिकेशन प्रोग्रम.

पुढील प्रोग्रम मध्ये आपण ओळीने जाऊन प्रत्येक ओळ काय काम करते ते कमेंट च्या माध्यमातून पाहणार आहोत आपणही आपल्या प्रोग्रम मध्ये आपणास हव्या त्या ओळी त्याचा उपयोग समजावून वापरू शकतो..चला प्रोग्रम मध्ये काय काय दडलेले आहे ते पाहूया….

आपण जसे युजर इंटरफेस वर बटन व इतर ऑब्जेक्ट टाकून तयार करतो  तेंव्हाच यातील बराच बेसिक कोड आपोआप मागील बाजूने तयार होत असतो.त्यात सुधारणा करून व काही बाबी नवीन टाकून आपण आपणास हावे ते काम करून घेऊ शकतो.

————————————————————-

// सुरवातीपासून उपलब्द हेडर फाईल्स

using System;

using System.Collections.Generic;

using System.ComponentModel;

using System.Data;

using System.Drawing;

using System.Linq;

using System.Text;

using System.Windows.Forms;

—-

//नंतर इन्क्लुड केलेल्या हेडर फाईल्स

using System.Diagnostics; //प्रोसेस साठी जसे की स्टार्ट प्रोसेस 

using System.Threading; // थ्रेड स्लीप फंक्शन साठी

//using System.Windows.Forms; // optional कीबोर्ड मधून डा टा पाठवण्यासाठी 

using System.IO;

using Microsoft.Win32; // रजिस्ट्री शी निगडीत महिती गोळा करण्यासाठी

—–

// Note :पुढीलपैकी काही प्रोग्रम चा भाग आपण फॉर्म तयार केल्यावर आपोआप तयार होतो.

//तसेच आपण बटन किंवा ड्रॉप डाऊन बॉक्स यावर क्लिक करून त्या संबधी तयार झालेल्या कोड सेक्शन मध्ये जाऊन हावे ते बदल करू शकतो. 

namespace WindowsFormsApplication1

{

public partial class Form1 : Form

{

        public Form1()   // प्रथम फॉर्म दर्शविला जाईल.

{

InitializeComponent();

}

// बटन दाबल्यावर होणारी प्रोसेस

        private void button1_Click(object sender, EventArgs e)

{

if (textBox1.Text.Length == 0)   // जर टेक्स्ट बॉक्स रिकामा असेल तर मेसेज द्यावा .

{

MessageBox.Show(“Please enter Driver setup path.”, “Message”); // सेटअप ईएक्ससी फाईल नसल्यास एरर मेसेज पॉप अप देणे.

  }

else

{

  // जर कोणताच पर्याय ड्रॉप डाऊन बॉक्स मधून सिलेक्ट केला नसेल तर एरर मेसेज देणे.

if (comboBox1.Text.Length == 0) // यामध्ये कॉम्बो बॉक्स मध्ये ० ही संख्या आहे म्हणजे कोणताच पर्याय निवडला गेला नाही.

{

MessageBox.Show(“Please select parameters from dropdown.”, “Message”); // मेसेज बॉक्स दाखवा व त्यात कोट मध्ये लिहिलेला मेसेज दर्शवा.

}

else

{

         //जर सर्व महिती भरलेली असेल तर पुढील प्रोसेस चालू करावी.

Directory.CreateDirectory(textBox1.Text);

StreamWriter sw = new StreamWriter(“c:\\tempmj.txt”);  //टेक्स्ट फाईलमध्ये टेक्स्ट बॉक्स मध्ये दिलेला फाईल पाथ सेव्ह करणे

sw.Write(textBox1.Text);

sw.Close(); // स्ट्रीम तयार करून त्यात डाटा भरणे व स्ट्रीम कोल्ज करणे.

// स्पेशल केस

if (comboBox1.SelectedIndex == 17)  // जर अन-इन्स्टॉलेशन करायचे असेल तर पुढील स्पेशल केस सेलेक्ट करून रजिस्ट्री मधून पाथ घेणे.

{

string regadd=”HKEY_LOCAL_MACHINE\\SOFTWARE\\Microsoft\\Windows\\CurrentVersion\\Uninstall\\{Registry name any }_installer”;

string Parameter =comboBox1.Text;

textBox1.Clear();

textBox1.Text=(string)Registry.GetValue(regadd,”InstallLocation”,null); //रजिस्ट्री मधून इन्स्टॉलेशनचे लोकेशन मिळवणे.

Process p = Process.Start(textBox1.Text + “\\setup.exe”, Parameter); //सेटअप ला पेरामिटर पास करून कमांड देणे. 

}

else

{

string Parameter =comboBox1.Text; // ड्रॉप डाऊन बॉक्स मधील पँरामिटर घेणे.

Process p = Process.Start(textBox1.Text + “\\setup.exe”, Parameter); //पँरामिटर पासकरून प्रोसेस रन करणे

Thread.Sleep(10000); //प्रोसेस चालू होण्यासाठी थोडा वेळ थांबणे.

if (p.HasExited == true) // जर प्रोसेस चालू आहे का चेक करणे.

{

MessageBox.Show(“Setup.exe is not running!!”, “Error”); // जर प्रोसेस बंद पडली तर एरर मेसेज देणे.

}

}

                //युजरला प्रोसेसचे स्टेटस पाहण्यासाठी टास्क मेनेजर विन्डो ओपन करणे.

Process p2 = Process.Start(“taskmgr.exe”); //टास्क मेनेजर ओपन करणे जेणेकरून चालू प्रोसेस पाहता येईल.

}

}

}

—–

// ड्रँग आणि ड्रॉप फिचर सेट करणे.

// खालील Drop व enter  ही दोन फंक्शन्स ड्राग आणि ड्रॉप फिचर सेट करतात.

private void Drop(object sender, DragEventArgs e)

{

string[] s = (string[])e.Data.GetData(DataFormats.FileDrop, false);

int i;

for (i = 0; i < s.Length; i++)

textBox1.Text=textBox1.Text+(s[i]); // फोल्डर ड्रॉप केल्यावर त्याचा पाथ टेक्स्ट बॉक्स मध्ये दाखवणे.

}

private void Enter(object sender, DragEventArgs e)

{

if (e.Data.GetDataPresent(DataFormats.FileDrop))

e.Effect = DragDropEffects.All;

else

e.Effect = DragDropEffects.None;

}

// फॉर्म लोड होताना काय प्री सेट करावे.

private void Form1_Load(object sender, EventArgs e)

{

if (File.Exists(“C:\\tempmj.txt”)) //जर टेक्स्ट फाईल मध्ये पाथ सेट असेल तर तो आधीच टेक्स्ट बॉक्स मध्ये दाखवणे.

{

StreamReader sr =new StreamReader(“C:\\tempmj.txt”);

textBox1.Text=sr.ReadLine();  //टेक्स्ट बॉक्स मध्ये फाईलमधील डाटा भरणे

sr.Close();

}

label5.Text = ” Verification info”; //डिफॉल्ट जनरल व्हेरीफिकेशन असा मेसेज सेट करणे.

}

//ड्रॉप डाऊन बॉक्स मधील व्हेल्यू बदलल्यावर विन्डोवरील महिती आपोआप अपडेट करावी .

private void comboBox1_SelectedIndexChanged(object sender, EventArgs e)

{

switch (comboBox1.SelectedIndex) // बॉक्स मधून किती नंबर चा पर्याय निवडला आहे ते पाहणे.

{

case 0:

label5.Text = “1]Force Install. .\n Command given is F.”; // कोणती केस आहे ते पाहून लेबल वरील टेक्स्ट बदलणे.

break;

case 1:

label5.Text = “२]Unattended and Silent Installation.\n command given is for silent installtion.”;

break;

case 17: // जर केस १७ वि निवडली तर रजिस्ट्रीमध्ये जाऊन पाथ घेणे व अन इन्स्टॉलेशन ची निगडीत कमांड रन करणे.

label5.Text = “१७]Uninstall the driver silently.\n unnstalled path from reg”;

break;

default: // अन्यथा प्री सेट मेसेज दर्शविणे.

label5.Text = ” Verification info”;

break;

}

   }

}

}

——-

आपणास संपूर्ण चालू प्रोग्रम डाऊनलोड करून घेण्यासाठी प्रोग्रम असणाऱ्या  पुढील टेक्स्ट फाईलला क्लिक करावी.

—> Instller cmd tool code.doc

प्रोग्रम बिल्ड करणे:

आपण आपला प्रोग्रम लिहून झाला की तो कंपाईल करावा लागतो.

त्यासाठी बिल्ड या मेनू ऑप्शन मध्ये जाऊन बिल्ड सोल्यूशन F6 ला किल्क करणे म्हणजे आपला प्रोग्रम कंपाईल होईल.

त्यानंतर आपणस जर कोणत्या एरर्स आल्या असतील तर आपण त्या सोडवून घ्याव्यात.

प्रोग्रम डीबग करणे :

आपणस जर एखादी चूक कोठे झाली आहे ते पहायचे असेल तर डीबग प्रोग्रम ऑप्शन मध्ये जाऊन स्टार्ट डीबगिंग[F5] या ऑप्शन ला क्लिक करणे.

व आपण एक एक स्टेप पुढे जाऊन कोणत्या स्टेप ला काय झाले ते पाहू शकतो यास सिंगल स्टेपिंग असे म्हणतात [F10,F11]

प्रोग्रम रन करणे:

आपण हिरव्या ऐरोला किल्क केल्यावर किंवा डीब गिंग संपल्यावर आपला प्रोग्रम जेथे आहे त्या जागेवर डीबग फोल्डर मध्ये बिन मध्ये आपल्या प्रोजेक्ट च्या नावाची ई एक्स सी फाईल तयार झालेली दिसेल.

  • C:\Users\Documents\Visual Studio 2008\Projects\WindowsFormsApplication1\WindowsFormsApplication1\obj\Debug\ Appplication.exe

ती ई एक्स सी आपण कोणत्याही दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये टाकून तेथे ई एक्स सी ला डबल किल्क करून आपला प्रोग्रम रन करू शकतो.

तयार केलेले टूल कसे वापरावे:

आता आपण आपल्या अप्लिकेशन मध्ये डायरेक्ट सेटअप असणारा फोल्डर माउस ने ड्रॉप  करून त्याचा पाथ पुरवावा.

नंतर ड्रॉप डाऊन बॉक्स मधून आपला पर्याय निवडावा व स्टार्ट प्रोसेस या बटणाला किल्क करावे.

या नंतर आपणास टास्क मेनेजर ओपन झालेला दिसेल व आपली इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू होईल.

याच धर्तीवर आधरित आपण आपले स्वतःचे एक अप्लिकेशन तयार करू शकतो ज्याचा वापर आपल्या काही इतर कामासाठी केला जाऊ शकेल.

आपण आता बेसिक फॉर्म बेस्ड अप्लिकेशन सी शार्प मधून कसे करावे ते पहिले आहे आपण हे नक्की करून पहा व नवीन प्रोग्रामिंग भाषा शिकण्यास सुरवात करा.

—धन्यवाद -MJ :)

यु. एस. बी. वर चालणारा फँन तयार करणे.


आपल्या टेबलवर खास आपण तयार केलेली डेकोरेशन ची वास्तू असणे म्हणजे मजाच और.. त्यात ती झकास डोके वापरून टेकनिकल मेथडने तयार केलेली उपयुक्त वस्तू असेल तर जवाबच नाही.. :)

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या केबल, वापरत नसलेला छोटा फँन यांचा वापर करून आपण डेकोरेशन व हवा देणारा आपल्या लँपटोपच्या यु एस बी वर चालणारा ,कोठे ही घेवून फिरता येणारा रंगीत लाईट असणारा फँन कसा तयार करायचा ते या भागात पाहूया.

बेसिक सामुग्री : लहान फँन , यु एस बी केबल, कटर किंवा कात्री.

ऑप्शनल : बटन,एल ई डी बल्ब,सोल्ड्रिंग गण किंवा चिकट पट्टी,डेकोरेशन चे कागद.

fan

कॉम्प्युटर मधील फँन

आपल्याकडे अनेक डिव्हाईस हे यु एस बी ने जोडलेले असतात आणि ते खराब झाल्यावर त्याची यु एस बी केबल तशीच पडून असते ती केबल कट करून घ्या.

किंवा पूर्ण यु एस बी केबल असते त्याचे एक टोक आपल्या कॉम्प्युटर ला लावावे व दुसरे टोक थोडे अंतर ठेऊन कट करून घ्यावे.

आता आपल्या यु एस बी चे एक टोक कॉम्प्युटरला जोडले गेलेले आहे नंतर केबल  व दुसरे वायर उघड्या असणारे टोक आहे.

आपणस यु एस बी केबल च्या आत ४ वायर दिसतील. यामधील लाल वायर ही +५ व्होल्ट पॉवर सप्लाय करते तर काळी वायर ग्राउन्ड साठी वापरली जाते.

त्या दोन वायर आपण आपल्या प्रयोगाला वापरू. आपण हिरवी व पिवळी वायर वापरणार नाही.

[यु एस बी बद्दल सखोल महिती मिळवण्यासाठी येथे टिचकी मारा]

आता लाल व काळ्या वायर वरील प्लास्टिकचे आवरण थोडे काढून घ्या.

आता आपली यु एस बी केबल पुढील छायाचित्राप्रमाणे दिसेल.

usb cable

यु एस बी केबल

आता आपल्याकडे असलेला जुना फँन घ्यावा व त्याच्या दुसऱ्या टोकाच्या केबल मोकळ्या कराव्यात किंवा आपण जुन्या कॉम्प्युटरला जोडला गेलेला जुना फँन सुद्धा काढू शकता. फँन मध्ये ही लाल वायर ही पॉवर व काळी ग्राउन्ड असते.

मी माझ्या कॉम्प्युटर मधून काढलेला जुना फँन मध्ये पिवळी वायर ही पॉवरची आहे.

आता आपण यु एस बी केबल कॉम्प्युटरला जोडून त्याची लाल वायर फँन च्या लाल वायरला व काळी वायर फँनच्या काळ्या वायर ला हाताने जोडा व कॉम्प्युटर चालू करा.

आता यु एस बी केबल मधून पॉवर फँन ला मिळून फँन चालू लागेल.

बेसिक कनेक्शन चे छायाचित्र :

connection

कनेक्शन
[+ve = +ve ला आणि -ve = -ve ला जोडावी.

आता हे टेस्टिंग झाल्यावर आपल्या लक्षात येईल की केबल व फँन सुरळीतपणे चालू आहेत.

फँन बंद करण्यासाठी आपणस कॉम्प्युटरला लावलेली यु एस बी केबल काढावी लागेल.

आता आपण आपल्या  फँन ला बटन कसे कनेक्ट करावे ते पाहूया.

आपण आपल्याजवळचे कोणतेही स्वीच घ्यावे व त्याला कनेक्ट असणाऱ्या दोन केबल मोकळ्या कराव्यात.

आता आपल्या यु एस बी फँन ला आपण स्वीच बसवणार आहोत.

माझ्या फँन ला जवळच एक स्वीच होते मी त्याच्या वायर कट केल्या आहेत आता त्या स्वीच ला इलेक्ट्रिक लूप मध्ये आणूया.

त्यासाठी आपण आपल्या यु एस बी ची काळी वायर बटणाच्या एक टोकाला लावा व फँन ची काळी वायर बटणाच्या दुसऱ्या वायर ला गुंडाळावी.

आणि फँन व यु एस बी ची पॉवर केबल एकमेकांना जोडावी. [लाल-लाल /जर दुसऱ्या बाजूस लाल नसेल तर लाल पिवळी].

फायनल कनेक्शन हे पुढील चित्राप्रमाणे दिसेल.

basic connection

स्वीच ची जोडणी

 स्टँन्ड तयार करणे :

आता आपण तार किंवा स्टील पट्टी वापरून आपल्या फँन ला आधार तयार करू शकतो व त्याचे आपल्याला अनुसरून स्टँन्ड तयार करू शकतो.

आता तो फँन आपल्या स्टँन्डला लावा किंवा अडकवा स्वीच आपल्या जवळ ठेवा व यु एस बी केबल कॉम्प्युटरला कनेक्ट करा.

आपला कॉम्प्युटर चालू झाला की आपण आपल्या स्वीचच्या मदतीने आपला यु एस बी बेस्ड फँन चालू किंवा बंद करू शकतो.

तसेच आपण या फँन ला एल ई डी बल्ब सुद्दा कनेक्ट करून फँनचा सुंदर डेकोरेटिव्ह पीस बनवू शकतो.

यासाठी  आपण एल ई डी सुद्दा लूप मध्ये टाकून फँन बरोबर ते लागावेत अशी सुविधा देवू शकतो.

टेक्निकल महिती :

कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटचे ते सुरळीतपणे चालण्यासाठी एक इलेक्ट्रीक वर्तुळ पूर्ण होणे गरजेचे असते.

आपण जसे आधीच्या प्लेन यु एस बी + फँन सर्किट मध्ये स्वीच अँड केला तसेच एल ई डी ही अँड करावा. काही वेळा काही एल ई डी ५ वोल्ट सप्लाय हेन्डल करू शकत नाहीत अशा वेळी एल ई डी च्या बरोबर एक लहान क्षमतेचा रेजिस्टंर कनेक्ट करावा.

या सर्किट मध्ये आपली यु एस बी केबल कॉम्प्युटर मधुन पॉवर घेवून आपल्या सर्किट मध्ये बँटरी सोर्स म्हणून काम करते तर फँन ही उर्जा वापरते. आपण जेंव्हा स्वीच बंद करतो तेंव्हा दोन वायर मध्ये कनेक्शन होत नाही व त्यामुळे सर्किट पूर्ण होत नाही व फँन फिरायचा थाबतो.

आपण बटन चालू केले की दोन वायर मध्ये कनेक्शन होते, सर्किट पुर्ण होते, यु एस बी मधून सप्लाय फँन ला मिळतो व फँन फिरू लागतो.

छायाचित्र : आपणच करुया आपली हवा..

fan running cut

फँन चालू..हवा चालू..

आपणास यु एस बी मार्फत ५ व्होल्ट सप्लाय मिळत असतो त्यामुळे आपणस शॉक बसण्याची शक्यता नाही.

असा झकास फँन आपण रंगवून किंवा त्यास डोकोरेटीव्ह पीस कनेक्ट करून आपल्या टेबलची शोभा वाढवू शकतो.

आपला फँन काम करू लागल्यावर तो फिक्स करण्यासाठी त्याचे वायर चे जोड निघू नयेत यासाठी ते सोल्ड्रिंग गन ने चिटकवावे व त्यास चिकट पट्टीने आवरण बांधावे.यामुळे फँन दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.

आपण या प्रोजेक्ट ला अजून वाढवून यापासून गाडी ,हेलीकॉप्टर किंवा इतर काही डेकोरेशन बनवू शकतो.

मग वाट कसली बघताय…चालू करा तयारी.. बनवा तुमचा स्वतःचा फँन .. जरा हवा येवू दे….

–धन्यवाद  MJ :)

ई पुस्तक प्रकाशन:भाग २: गुगल , अँमेझोनवर ई बुक प्रकाशित कसे करावे ?


एक लक्षात ठेवा : पीडीएफ फोर्मेट म्हणजे ई –बुक फोर्मेट नव्हे !

…..मागील भागात आपण पी डी एफ फोर्मेट मध्ये पुस्तक कसे तयार करावे ते पहिले आहे.

आता या भागात आपण आपले ई पुस्तक खास ई बुक प्रकाशनासाठी प्रसिद्ध अशा प्रकाशाकांमार्फत प्रकाशित करावे ते पाहूया. ..

ई- बुक तयार करताना पी डी एफ व्हर्जन ला सुधारून त्यात आणखीन प्रोटेक्शन दिले जाते.

टेक्स्ट एनक्रिप्शन केले जाते यामुळे कोणीही अनधिकृतपणे पुस्तकात काहीही बदल करू शकत नाही.

अधिकृतरित्या पुस्तक कॉपी प्रोटेक्शनसाठी तयार केले जाते याचा वापर किती कॉपी खपल्या याची महिती कॉपीराईट कायद्यांतर्गत लेखकाला दिली जाऊ शकते.

तसेच पी डी एफ हे डाऊनलोड केले जाऊ शकते पण ई बुक हे एक तर ऑनलाईन वाचू शकता किंवा काही ठराविक सोफ्टवेअरच्या (ई बुक रीडर) माध्यमातून आपण ते पुस्तक आपल्या कॉम्प्युटर वर ओपेन करू शकता.

ई –बुक फोर्मेट हे निरनिराळे असू शकतात जसे की Pub फोर्मेट,PDB फोर्मेट.

पीडीएफ ची कोणीही प्रिंट काढू शकते पण ई- बुक हे ऑनलाईनच संगणकावर पाहू शकतो त्याची परवानगी घेतल्याशिवाय प्रिंट काढता येत नाही.

काही वेळा काही सोफ्टवेअर मार्फेत आपली पी डी एफ फाईल ही HTML किंवा XML या फोर्मेट मध्ये रुपांतरीत केली जाते व नंतर त्याचे ई बुक फोर्मेट मध्ये रुपांतर केले जाते.

बऱ्याचदा आपणस या गोष्टींची काळजी करायचे काही काम पडत नाही आपणस फक्त पीडीएफ कॉपी द्यावी लागते .

गुगल किंवा अमेझॉन सारख्या कंपनी हे कन्व्हर्जन्स चे काम स्वतःच करून आपले पुस्तक ई –बुक फोर्मेट मध्ये आणतात.

गुगल बुक्स किंवा गुगल प्ले वर पुस्तक प्रदर्शित करणे:

Google Books 2

गुगल हे मराठी सह अनेक लोकल भाषेत पुस्तक प्रदर्शित करण्यास मुभा देते हे गुगल चे वैशिष्ट्य.

आपण आपल्या गुगल अकाऊंट वरून गुगल बुक्स वर लॉग इन करू शकता किंव नवीन अकाऊंट उघडू शकता.

गुगल बुक्स च्या घरात पोहचण्यासाठी येथे टिचकी मारा. :http://books.google.com/

नवीन पुस्तक अँड करण्यासाठी अँड बुक पर्यायावर टिचकी मारा नंतर आपण आपल्या पुस्तकाचे नाव पुस्तकाची महिती ,लेखकाचे नाव इत्यादी महिती भरू शकता.

तसेच पण आपले पुस्तक कोठे प्रदर्शित करणार आहोत त्या देशाचे नाव द्यावे जर सगळीकडेच पारदर्शित करीत असू तर world असे एन्टर करावे.

जर आपले पुस्तक अगोदर प्रदर्शित झाले असेल तर पुस्तकाचा कोड दयावा अन्यथा आपण पुस्तक अपलोड केल्यावर गुगल आपल्यासाठी तो कोड तयार करेल

नंतर आपल्या पुस्तकाचा कंटेंट पीडीएफ मध्ये असेल तर तो आणि कव्हर पेज वेगवेगळे किंवा एकत्रितरीत्या संपूर्ण पीडीएफ मध्ये तयार केलेले पुस्तक अपलोड करावे.

त्यानंतर एका आठवड्याने गुगल आपल्या पी डी एफ वर प्रक्रिया करून त्याची ई बुक कॉपी लोड करते.

यात गुगल वॉटरमार्क ,कॉपीराईट या सारख्या गोष्टींची पूर्तता करून ई बुक व्हर्जन तयर करते.

आपण नंतर आपल्या पुस्तकाची किंमत व अकाऊंट डिटेल्स गुगल मध्ये भरल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन होऊन नंतर आपले पुस्तक गुगल बुक वर प्रदर्शित होते.

माझे गुगल बुक्स वर प्रदर्शित झालेले पुस्तक पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.

सध्या गुगल आपले बरेच पुस्तक वैभव गुगल बुक्स वरून गुगल प्ले वर शिफ्ट करत आहे जेणेकरून आपण आपल्या मोबाईल डिव्हाईस वरून पुस्तक पाहू व विकत घेवू शकू.

गुगल प्ले वर आपले बुक प्रकाशित करताना आपण ते गुगल बुक्स वरून शिफ्ट करू शकतो किंवा गुगल बुक्स पार्टनर प्रोग्राम मध्ये भाग घेवू शकतो.

गुगल बुक्स पार्टनर प्रोग्रम ला भेट देण्यासाठी पुढील लिंक ला टिचकी मारा. ->  गुगल प्ले बुक्स पार्टनर प्रोग्रम

आपले पुस्तक गुगल प्ले वर प्रकाशित करण्यासाठी गुगल तर्फे सादर केलेले पुढील चलचित्र पहावे.

अमेझॉन किंडल वर पुस्तक प्रदर्शित करणे.

kdp-amazon1

अमेझॉनने लेकाकांसाठी एक मस्त प्लेटफोर्म तयार करून दिला आहे ज्याद्वारे आपण आपले लेखन अनेक लोकांपर्यंत पोहचू शकतो.

तसेच पुस्तक खरेदीसाठी अमेझॉन  ही लोकांची प्रथम आवड राहिली आहे.

ई पुस्तक लोकांची वाचावे यासाठी अमेझॉन ने किंडल नावाचे डिव्हाईस ही तयार केले आहे व अमेझॉन बुक स्टोअर तसेच अमेझॉन KDP नावाचे पुस्तक लेखकांसाठी व प्रकाशन व प्रदर्शनासाठी मस्त मुक्त व्यासपीठ तयार केलेले आहे.

किंडल डायरेक्ट पब्लिशिंग KDP मध्ये लॉग इन करून आपण अमेझॉन च्या पुस्तक प्रदर्शित करणाऱ्या व्यवस्थेत प्रवेश मिळवू शकतो नंतर आपण आपले पुस्तक अपलोड करून आपल्याबद्दल व  पुस्तकाबद्दल महिती भरून सेव्ह करावी.

अमेझॉन के डी पी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी येथे टिचकी मारा.-> अमेझॉन के डी पी 

तसेच आपण खास अमेझॉन कव्हर डिझाईन अप्लिकेशन चा वापर करून मस्त कव्हर डिझाईन करून सेव्ह करून ठेवणे.

आपण आपल्या पुस्तकाची पी डी एफ कॉपी अपलोड केल्यावर अमेझॉन द्वारे आपले पुस्तक ई बुक फोर्मेट मध्ये रुपांतर करून अमेझॉन बुक स्टोअर मध्ये प्रकाशित करू शकता.

अमेझॉन बुक स्टोअर ला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा. -> अमेझॉन बुक स्टोअर

आपण स्वतः आपल्या पुस्तकाची किंमत ठरू शकतो व पुस्तक विक्री व प्रसिद्ध चे काम गुगल व अमेझॉन सारखे प्रकाशक करता .

आपले पुस्तक विकले गेल्यास आपल्या खात्यावर पुस्तकाच्या किमतीची काही रक्कम [६०-८० %] जमा केली जाते व उरलेली रक्कम ई बुक प्रकाशकास मिळते.

अमेझॉन मध्ये ठराविक भाष च सपोर्ट केले जातात [मराठी अजून उपलब्द नाही].

अमेझॉन के डी पी वर पुस्तक कसे प्रकाशित करावे याबद्दल महिती ऐका पुढील व्हिडिओ वरून…

बुकगंगा प्रकाशनवर पुस्तक प्रकशित करणे :

book ganga logo

आपल्या मराठी पुस्तकांसाठी ई बुक चे दालन बुक गंगा प्रकाशनाच्या माध्यमातून उपलब्ध केले गेलेले आहे.या द्वारे आपण आपले छापील पुस्तक प्रकाशनास जमा करू शकतो व ते याच ई बुक रुपांतर करतात. पुण्यात सिंहगड रोडवर बुकगंगा चे ऑफिस आहे.

तसेच आपण आपले पी डी एफ फोर्मेट मधील पुस्तक ही जमा करून त्याचे ई बुक भाषेत रुपांतर व प्रकाशन यांचे काम बुक गंगा मार्फेत केले जाते यासठी त्यांची ठराविक फी [५०० रु ] ही आकारली जाते.

येथे मराठी पुस्तकांचे ग्राहक नक्कीच मिळतील.मराठी लोक हीच वेबसाईट मराठी पुस्तक खरेदीसाठी प्रेफर करतात .

खास मराठी इंटरफेस असलेली वेबसाईट हळूहळू लोकप्रिय होत आहे. अजून वेबसाईट फिल्टर ,सर्च, युजर इंटरफेस, अप्लिकेशन यास सुधारण्यास बराच स्कोप आहे पण सुरवात चांगली आहे.

बुकगंगा च्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा. http://www.bookganga.com/eBooks/

आता सध्या मराठी वाचकांचा ही ओढा ई पुस्तके घेण्याकडे लागला आहे व मराठी प्रकाशक ही नवीन माध्यमाचा वापर करात आहेत ही गोष्ट नक्की स्वागतार्ह आहे.

ई बुक्स , इंटरनेट यांचा वाढता वापर ही क्रांती आहे . मोबाईल युगात नवीन पिढीने स्वीकारलेली नवीन वाचन शैली प्रकाशकांनी व लेखकांनी नक्कीच आत्मसात केली पाहिजे.

अशा तऱ्हेने आपण आपले ई पुस्तक गुगल, अमेझॉन किंवा बुक गंगा अशा प्रकाशना मार्फत प्रकाशित करू शकतो.

लेखकांनाही नवीन आवृत्ती काढण्यास फार खर्च पडत नाही व काही बदल करायचे झाल्यास ते तत्काळ करून फाईल अपलोड केली के ते बदल लगेच अंमलात आणले जातात व पुस्तकात तो बदल केला जातो.

तर मग नव्या लाटेवरती स्वार होण्यास तयार व्हा आणि बना ई-बुक लेखक

– धन्यवाद :- MJ :)

मागील भागास भेट :